मायबोली मास्टरशेफ - कृष्णा- मका मस्तवाल पकोडा

Submitted by कृष्णा on 15 September, 2016 - 03:08

पहिल्यांदाच पाककलेच्या पानावर यायचे म्हणून खरे तर ही धडपड!

गेले ४ दिवस ह्या हैदराबादेत दमदार पाऊस सुरु आहे त्यामुळे ह्यापेक्षा चांगला पदार्थ सुचलाच नसता! काय करणार??

काय काय करावे म य ब ल चे विचारान्ती सर्वपरिचित पारंपारीक पण कुरकुरीत खुसखुशीत अशी रेसिपी डो़क्यात अवतरली आणि पार पाडली केवळ अर्ध्या तासात सुचल्या पासुन बनवे पर्यंत!

काल शेवटच्या क्षणी सुचलेला हा...

आता पटापट साधने सांगतो! सगळी उपलब्ध हाताशीच होती..

f-34.jpg

१. मक्याचे कणीस १ ( माझ्या पाशी गोड मका होता साधा सुद्धा उत्तम!)
२. बेसन पीठ - जेवढे बसेल तेवढे साधारण १ मोठा चमचा.
३. लसणाच्या पाकळ्या- ७-८
४. मैदा - अर्धा चमचा
५. आल्याचा तुकडा पाव इंच (मी पट्टी ने मोजला नाही)
६. कोथिंबीर
७. एक कांदा मध्यम लांबट चिरून
८ मिरच्या 2-3 (तिखट हवे असेल तर झेपतील तेवढ्या)
९. मीठ चवी नुसार.
१०. धने जीरे पूड
११ कढीलिंब
१२. तेल तळण्यासाठी

कृती:

१. मक्याचे कणीस सोलून दाणे काढा.
२. मिक्सर मध्ये २ फिरक्या मारा. (जरा जाडसरच हवे)
३. कढीपत्ता, कोथिंबीर हिरव्या मिरच्या दळून घ्या.
४. आले लसणाची ची छान पेस्ट बनवा..
५. कांदा चिरुन घ्या.
६. एका भांड्यात दळलेला मका घेऊन त्यात सर्व घटक द्रव्ये छान मिसळून घ्या.

F-2.jpg

७. तेल तापवत ठेवा.
८. तापलेल्या तेलात आपल्याला हव्या तेवढ्या आकाराचे छान खरपूस तळावे.

F-1.jpg

९. गरमा गरम प्लेट मध्ये घेऊन तळलेल्या मिरच्या / सॉस चा सोस असल्यास सॉस /कोणतीही चटणी अथवा तसाच देखील फडशा पाडू शकता.
१० जेवताना, नाष्ट्याला, स्वीट डीश सोबत तोंडी लावणे. किंवा जेवणापुर्वी बसणार असाल तर तेंव्हा देखिल Wink ह्याचा आस्वाद लुटु शकता...

११. हे अत्यंत कुरकुरीत झाले होते!

Final.jpg

धन्यवाद! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी एकदम छान. आम्ही यात कार्नफ्लावर पण मिक्स करतो आणि कटलेट चे शेफ देऊन तळतो.स्पर्धा साठी शुभेच्छा.

रेसिपी एकदम छान. आम्ही यात कार्नफ्लावर पण मिक्स करतो आणि कटलेट चे शेफ देऊन तळतो.स्पर्धा साठी शुभेच्छा.

>>आम्ही यात कार्नफ्लावर पण मिक्स करतो आणि कटलेट चे शेफ देऊन तळतो.
हे कार्नफ्लावर म्हणजे ते पांढरं कॉर्नस्टार्च की मक्केदी रोटीचे पिवळे मक्याचे पीठ?

संयोजकांचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद!!

Happy

अतिशय कमी वेळात ठरवून आणि जमेल तश्या बनविलेल्या ह्या पकोड्यांना माबोकरांनी उदंड प्रतिसाद दिला त्या बद्दल समस्त मोयबोलीकरांचे धन्यवाद!

हा पदार्थ केला की खायला बोलवायला विसरू नका! Happy

Pages