इतके स्टार्टर्स झाले. स्टार्टर्स म्हणलं की बरोबर गरमागरम सुप हवच!
साहित्य : ब्रोकोली - १/२ कप
मश्रूम : मोठे ५-६
लोणी : १/२ चमचा
कांदा : १ मध्यम
मिरपूड : चवीनुसार
मीठ : चवीनुसार
दूध : १/४ कप
मक्याचे पीठ : १/२ चमचा
कृती :
१. ब्रोकोली वाफवून प्युरी करून घ्या.
मश्रूम पातळ काप करून घ्या.मश्रूम थोडे वाफवून प्युरी करून घ्या.
कांदा बारीक चिरून घ्या.
२. ब्रोकोलीचे ४-५ तुरे आणि मश्रूमचे थोडे काप सजावटीसाठी बाजूला ठेवा.
३. पॅनमधे लोणी गरम करा. फार गरम होण्याआधी़ कांदा घालून परता.
४. कांदा पारदर्शक झाला की त्यात दूध, मक्याचे पीठ पाण्यात कालवून घाला.
५. ब्रोकोलीची प्युरी घाला. उकळी येउ द्या. घट्ट वाटल्यास पाणी घाला.
६. मश्रूम घाला. मश्रूम घातल्यावर फार उकळू नका.
७. चवीप्रमाणे मीठ व मिरपूड घाला.
८. ब्रोकोलीचे ४-५ तुरे व मश्रूमचे काप घालून गरम वाढा.
मस्तच आहे रेसिपी . मी विचारच
मस्तच आहे रेसिपी . मी विचारच करत होते की अजून पर्यंत मश्रुम ची रेसिपी कशी नाहो आली एक ही
मश्रूमला मराठीत ओळंबी म्हणतात
मश्रूमला मराठीत ओळंबी म्हणतात माहित आहे. पण मीठ आणि मिरपूड आहे मदतीला!
बाकी सगळ्यांच्या पाककृती एकापेक्षा एक आहेत. तरीही म्हणलं आपण कमीत कमी परिक्षेला बसू तरी. म्हणून हा प्रयत्न.
आयत्या वेळी जाग आल्यामुळे साहित्याचे फोटो वगैरे लाड जमले नाहीत.
~साक्षी
मस्त! गरमागरम सूप प्यायला मजा
मस्त! गरमागरम सूप प्यायला मजा येईल..
मास्टरशेफमधल्या सगळ्या पाकृ एकत्र केल्या तर five course meal च तयार होईल की
धन्यवाद मनीमोहोर! लगेच
धन्यवाद मनीमोहोर! लगेच प्रतिसाद!
ब्रोकोली सूप माझं लाडकं
ब्रोकोली सूप माझं लाडकं आहे
मस्त रेसिपी
यात लसूण पण छान लागते आणि
यात लसूण पण छान लागते आणि स्मोकी फ्लेवर देता आला तर अजूनच छान
मस्त रेसिपि.
मस्त रेसिपि.
छानच.
छानच.
धन्यवाद!
धन्यवाद!
ब्रोकोली आणि मश्रूम दोन्ही
ब्रोकोली आणि मश्रूम दोन्ही आवडीचं. नक्की करुन बघेन.
वॉव, चविष्ट आहे रेसिपी..
वॉव, चविष्ट आहे रेसिपी.. गार्लिक ब्रेड आणी हे सूप.. आहाहा..
मक्याचं पीठ घालून ट्राय नाही केलं कधी.. करून पाहीन आता
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
वाह! आज पाऊस पडतोय... अगदी
वाह! आज पाऊस पडतोय... अगदी प्यावंसं वाटलं गरमागरम!
छान पाकृ.
छान पाकृ.
छान सूप
छान सूप