कामथे काका (भाग ८ वा )

Submitted by मिरिंडा on 11 September, 2016 - 04:14

नंतर दादाने डीसीपी गर्दम ना फोन लावला. "सलाम, बडे चाचा! " दादा नम्रतेने म्हणाला. डीसीपींनी ओळखलं असावं. " कोण किशा? " ते तुच्छतेने म्हणाले....... " हां हां किशा, आपको पार्टीमे आमंत्रित कर राहा हूं. आज रात पार्टी है. आप आयेगे तो झगमग आ जायेगी. राह देखता हूं. गाडी भिजवा दूं क्या? ".... "किशा, तूने मुझे क्या तुम्हारा गँगमन समझके रखा है क्या? तुमने मुझे फोन करनेका डेअरींग कैसे किया? क्या समझते हो अपने आपको?.... " ते पुढेही काही बोलणार होते पण किशा मध्येच म्हणाला, " अरे चाचाजी, आप तो नाराज हो गये. ठीक है साब गलती हो गयी. " त्याने निराशेने फोन खाली ठेवला. आत जाण्या आधी त्यांनी त्याला समजावलं होतं. तेवढ्यावरून त्याने त्यांना आपल्याबद्दल सहानुभूती असल्याचं गृहीत धरलं होतं..... आठ वाजून गेले. दादाने सूर्याला गाडी काढायला सांगितली. मग ते तिघे अर्ध्या तासात हॉटेल डिलाईटला पोचले. काकांनी सहज नजर मागे वळवली. एरवी थुंकण्याच्या लायकीचाही नसलेला वेश्यांचा विभाग एखाद्या स्वप्न नगरी सारखा झगझगीत दिसत होता. रात्रीच्या उजेडात एखाद्या हिरॉईन सारख्या त्या सजल्या होत्या. भसाड्या आवाजात लागलेली गाणीही ऐकू येत होती. हवा जरा थंड होती. मग ते तिघे एकेक करून आत शिरले...... आतला हॉल खच्चून भरलेला होता. किशा आत आल्याबरोबर मॅनेजर कमरेत वाकला. लवकरच त्यांना कॉरिडॉर मधून येणारा अन्वरमिया दिसला. तो थेट दादाजवळ आला. दादाने त्याला मिठी मारली आणि म्हणाला, " अरे यार गुड्डी, तेरा गाल तो साला चूमनेके बजाय खाने को दिल करता है रे. क्या खाता है तू, की तेरा गाल बन मस्का बन गया? " तो लाजून हसला. मग सगळेच वरच्या मजल्यावर गेले. दादाचे इतर भक्तही येऊ लागले.

हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर एक हॉल होता. तिथे जवळ जवळ दहा ते बारा टेबलं मांडली होती. प्रत्येक टेबल सजवलेलं होतं. रिकाम्या प्लेटस, चमचे ग्लासेस आणि एक शँपेनची बाटली ठेवली होती. लहान लहान दिव्यांच्या माळा खिडक्यांवर आणि भिंतींवर सोडल्या होत्या. भिंतींच्या कडेने गोलाकार खुर्च्या मांडल्या होत्या. इथे टेबलं पांढरी आणि खुर्च्या लाल होत्या. लाल रंगाची रेलचेल का होती ते काकांना कळेना. रंग इतका लाल होता की डोळ्यांना खुपत होता. दादाचे अंतरंगीचे भक्त व त्याच धंद्यातले इतर काही पाहुणे कलाकारही (? ) (काकांना माहिती नव्हते म्हणून पाहुणे, इतकंच) हळूहळू हजर झाले होते. प्रत्येकाचं वर्णन करणं शक्य नाही. पण सर्वांच्या चेहऱ्यावर त्यांच्या धंद्यातलं तेज (? ) चमकत होतं. खिडक्यां मधून दूरचा बाजार दिसत होता. सगळं वातावरण कसं निशाचरी होतं. बाहेरही आणि आतही. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याला काय ऊत आला होता कुणास ठाऊक, पण त्यामुळे सगळ्या दिव्यांच्या माळा हालत होत्या. दादा हजर झाला. त्याचं स्वागत हॉटेलचा मालक "श्रीपतराय" याने केलं. त्याने लगबगीने अन्वरमियाने पुढे केलेला एक वजनदार हार दादाच्या गळ्यात घातला..... "आईये दादा, " असं म्हणून तो अदबीने दरवाजाच्या एका बाजूला उभा राहिला. जणू एखादा संत तिथे अवतरला होता. संत जरी नाही तो नरकाचा राजा नक्कीच होता. दादाचं वैशिष्ट्य म्हणजे, कोणत्याही प्रश्नावर ताबडतोब निर्णय घेणं. ते अर्थातच त्याच्या धंद्यातल्या नीतिशास्त्राला धरून असावं. त्याला कोणीही हरकत घेत नसत. किंवा हरकत घेण्याचं धाडस तरी करताना दिसत नव्हते, असं काकांना वाटलं. काकांनी चांगल्या लोकांची स्वागतंही फारशी पाहिलेली नव्हती. त्यातून अशा खालच्या पातळीवरचं स्वागत पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसत होता. काही असो, माणसाला मानमरातब मिळवण्यासाठी त्या त्या क्षेत्राप्रमाणे कष्ट करावेच लागतात. आयुष्यात मानमरातब मिळवण्याच्या दृष्टीने काकांच्या कल्पना चाकोरीबद्ध होत्या.

दादासाठी एक लहानसं स्टेज उभारलेलं होतं. तिथे तीन खुर्च्या मांडलेल्या होत्या. तिथे त्याला श्रीपतरायने आदरपूर्वक बसवले. दादाच्या उजव्या बाजूला एक छोटेखानी बार होता. टेबलावर, इतर टेबलांप्रमाणे एक शँपेनची बाटली होती. हॉल मधल्या खुर्च्या अशा रितीने मांडल्या होत्या की मधला एक गोलाकार भाग मोकळाच राहील. अचानक सगळे लाइट पेटले. मधल्या गोल भागावरचा आणि दादाच्या स्टेजवरचाही लाइट प्रखरतेने पेटला. बाकी लाइट मंद झाले. मालक श्रीपतरायने हातात माइक घेतला. स्वागतपर भाषणाला सुरुवात केली. " आज दादाके छूटनेकी खुशीमे ये पार्टी दी जा रही है. इसमे हमने अपनी तरफसे कैब्र्रे डान्स रखा है. मुझे तो लगता है, की अब दादाकी मौजुदगीमे अपून सबका धंदा सौ गुना वधारेगा. मुझे याद है की दस पंदरा बरस पहले मै इस माया नगरीमे नया आया था तो केवल दादाके बलपरही यहाँ पर एक चाय की छोटीसी टपरी लगायी थी जिसका आज ये रूप आप देख रहे है. दोस्तों जम के पार्टी का मजा लुटाइये. ज्यादा टाइम नही लूंगा. " असं म्हणून तो गर्दीत मिसळला. मग दादासहित सगळ्यांनी फेसाळ शँपेन उडवली. वेगवेगळे आवाज आणि शिट्या मारून आनंद व्यक्त केला आणि सलामी दिली. काकांना तर साधारण पार्टीचाही अनुभव नव्हता. नाही म्हणायला, एकदा एका पियक्कड सहकाऱ्याने त्याच्या घरी पार्टी दिली होती. तेव्हा तो मित्र इतका प्यायला होता की जेवण खाण विसरून पार्टीतल्या सगळ्यांनाच त्याला सांभाळावं लागलं होतं. तसंच पार्टीला जाताना रोहिणीने शंभरवेळा तरी बजावून न पिण्याबद्दल सांगितलं होतं. फार काय ते घरी आले तेव्हा तिने त्यांच्या तोंडाचा वास घेऊनच त्यांना घरात घेतलं होतं. कुठे ती पार्टी कुठे ही पार्टी.... काकांना हळूच हसू आलं. ते पाहून दादा म्हणाला, "अरे काकाजी यहां आईये स्टेजपर....... " असं म्हणून तो खाली येऊन त्यांना घेऊन गेला. सूर्यनारायणला अजिबात आवडलं नाही. काकांचा हात धरून किशा स्टेजवर येऊन उभा राहिला. एका हातात ड्रिंक आणि दुसरा हात काकांच्या खांद्यावर ठेवून तो मोठ्याने म्हणाला, " सब अंटर पंटर लोग यहां ध्यान दो. खाना पीना बादमे होता रहेगा. ये है हमारे 'काकाजी '(काकांचा एक हात वर करून तो म्हणाला). हम दोनो एकसाथ अंदर थे. हमने इतना शरीफ और जंटलमन आदमी आज तक नही देखा. " तेवढ्यात कोणीतरी ओरडला, ' अंदर जाके आया तो कायका शरीफ? '. लगेचच दादा म्हणाला, " ज्यादा बात या आवाज नही. ये काकाजी आजसे धंदेमे बराबर के पार्टनर है. ये मेरे ही नही हम सबके काकाजी है. उमर और तजुर्बेके हिसाबसेभी इनको मानना होगा. "...... परत कोणीतरी ओरडला, " इस बुढ्ढेको कौनसा तजुर्बा है, बताओ तो. " मग मात्र दादा ओरडला, " कौन बोला रे? मेरे सामने बात करता है!.... " इकडे तिकडे नजर फिरवीत तो म्हणाला, " कौन काली?, अरे तू तो चोर उचक्के की अवलाद, तू क्या जाने गुडका स्वाद? बकवास बंद कर. हां और एक बात, अगर कोई भी काकाजी के बारेमे कुछ बोला तो जबान खींच लूंगा! समझे?, अपना खाना पीना जारी रखो. "

सगळेच खाण्यापिण्यात लागले. अचानक लाइट मंद झाले. मधल्या गोलाकार भागावर सर्च लाइट पडतो तसा फिरणारा प्रकाशाचा झोत पडला. एखादं वाद्य फोडल्यागत संगीत चालू झालं. गर्दी बाजूला सारीत, सर्वांना आश्चर्याचा धक्का देत एक अर्ध नग्न तरुणी नाचत नाचत आली. तिच्या कमरेभोवती आणि हातांना लहान लहान फुगे लावले होते. ती प्रत्येकाच्या गळ्यात हात टाकीत गिरक्या घेत येत होती. ती गोलावर आली आणि गाणं चालू झालं:

....... ख ल्ला स!

बचके तू रहना रे

बचके तू रहना रे

नही दूजा मौका

मिलेगा समझना

कही भी छूपा हो

तुझे ढूंढ लेगा

ये है इष्क समझा

तुझे कर ही देगा..... खल्लास..... ए. ऽ ए... ऽ ए.. ऽ... ऽ ऍ.... ऍ.. ऍ.... खल्लास

खाण्या पिण्याची नुसती रेलचेल चालू झाली..... मटण, मच्छी, खिमा, राईस दाल, पुलाव, बिर्याणी, दारू यांचा एक मिसळलेला सामुदायिक आंबूस तिखट मसालेदार वास तयार झाला. काकांनीही जेवायला सुरुवात केली. बहुतेक जण हातात चिकनचे तुकडे किंवा दारू घेऊन नर्तकी बरोबर नाचत होते. कोणी तिच्या अंगचटीला जात होते, तर कोणी तिला कवेत घेऊन तिचा किस घेण्याचा प्रयत्न करीत होते. पण ती इतकी हुशार होती की कोणाच्याही हातात न येता सटकत होती. काकांना गाणं जणू त्यांच्यासाठीच लागलं होतं असं वाटलं...... खरंच आपण खलास झालो का? आपल्याला आता साधारण आयुष्य जगण्याचा मोका कधीच मिळणार नाही की काय? आणि आपण आता पळायचा प्रयत्न केला तरी हे लोक आपल्याला शोधून काढून परत इथे आणून टाकतील असं वाटून, त्यांना अडकल्याची भावना झाली. तसेही आपण दुसरे काहीतरी करून साधारण जीवनात कटकटींच्या रूपाने अडकलोच असतो की. त्यांच्या भळभळणाऱ्या मनाने त्यांचे समाधान करायचा प्रयत्न केला. इथून पळून जावं असा विचार करीत असतानाच अचानक नवीन पाखरू शोधण्याची सवय असलेली नर्तकी त्यांच्या मांडीवर येऊन बसली. त्यांच्या गळ्यात हात टाकून त्यांच्या गालावर तिने ओठ टेकले. ते गडबडले..... त्यांना फक्त रोहिणीची चुंबनं घेण्याची सवय होती. मग त्यांना आठवलं, एकदा त्यांनी रोहिणीलाही उचलायचा प्रयत्न केला होता. त्यावर ती म्हणाली होती, " पुरे, पुरे कंबर तुटेल... " आणि हसत सुटली होती. ते लाजून लाल झाले. खरं तर ते रोहिणीच्या आठवणीने लाल झाले होते. त्यांना ती नर्तकी येऊन बसलेली अजिबात आवडलं नव्हतं. तिच्या मेक अप चा भडक वास त्यांच्या नाकात घुसत होता. ते तिला ढकलत होते तो तो ती त्यांना चिकटत होती. असला हिडीस प्रकार त्यांना अजिबात आवडत नव्हता. खरंतर आयुष्यात इच्छा झाली तरी त्यांनी दुसऱ्या स्त्रीला हात लावला नव्हता. त्यांच्या समोर त्या रात्री एवढी पुष्पा उभी होती, नुसती उभी नव्हती तर सर्व काही द्यायला आलेली होती, तरी लोकांकरता का होईना, त्यांनी संयम बाळगला होता. हा तर अगदीच निर्लज्जपणा होता. ते बावचळले. तिच्या' ब्रा ' कडे निर्देश करीत किशा हसत हसत ओरडला, " अरे काकाजी, उसकी ब्रा तो खोल दो... " पण काकांची बावचळलेली अवस्था पाहून उठत नर्तकी ओरडली, " खल्लास! काकाजी, एकदम ख ल्ला स! ".... असं म्हणत ती किशा कडे गेली. त्याने मात्र जे करायला पाहिजे ते सर्व केलं. काकांना सुटल्यासारखं वाटलं. आजूबाजूच्या गर्दीतून काकांना कोणीतरी म्हणालं, " ये तो साला छगन है. " काकांना आवडलं नाही. पण या वातावरणात राहायचं, म्हणजे दुर्लक्ष करणं आवश्यक होतं. नर्तकी आता निर्लज्जपणे उघड्या अंगाने नाचत होती. हे सर्व लवकर बंद झालं तर बरं, असं वाटून काकांनी मान खाली घातली. परमेश्वराने त्यांची हाक ऐकली असावी.... हॉल मध्ये एका चारफुटी माणसाने प्रवेश केला. त्याने जीन आणि लाल आडवे पट्टे असलेला टी शर्ट घातला होता. तो स्टेजवर दादाकडे जाण्याची वाट काढीत येत होता. सूर्यनारायणने त्याला ओळखले. तो पटकन स्टेजवर गेला. दादाच्या कानाशी लागून म्हणाला, " जीवनराम आया है, क्या हुकुम है? " दादाचे तरारलेले डोळे मोठे झाले. जीवनरामवर नजर ठेवून तो सूर्याला म्हणाला, " आने दो उसे. पार्टीके बाद साथ ले जायेंगे. नजर रखना, जाने न पाये. " सूर्या खाली उतरला. काकांना पार्टनर करून घेतलं, हे सूर्याला अजिबात आवडलं नाही. पार्टीमध्ये दारू नुसती गंगेसारखी वाहत होती. कधी नाही तो काकांनी एखाद दोन पेग मारले. त्यांना नशा आली. सगळा हॉल त्यांच्या भोवती फिरू लागला. जणू हॉल म्हणजे जत्रेतली चक्री होती. स्वतःवर ताबा ठेवत ते बिर्याणी खाऊ लागले. इकडे दादाचं लक्ष पार्टीतून उडालं. पण जमलेले सर्वजण त्याला भेटवस्तू देऊ लागले, तेव्हा त्याला गहिवरून आलं. त्याने सर्वांनाच मिठ्या मारल्या. कुणाच्या गळ्यात पडून तो रडला, तर कुणाच्या गळ्यात पडून तो नाचला. एकूण पार्टीचा रंग वाढत चालला होता. रात्रीचा एक वाजायला आला. मग दादाने उभं राहून पार्टी संपल्याचं जाहीर केलं. त्याचं लक्ष जीवनरामवर होतं. आता जीवनराम स्टेजजवळ आला. त्याने दादाच्या पायाला हात लावला. दादाने खोटे हसून त्याला मिठी मारली. मग तो म्हणाला, " देखिये, ये मेरा यार है, और आजतक इसने मेरी बहुत सेवा की है. उसे पुरस्कार देना जरुरी समझता हूं. मै उसे ऐसा पुरस्कार दूंगा, की वो जिंदगीभर याद रखेगा. "..... काकांना कळेना हा असं का बोलतोय. हळूहळू लोकांची जाण्याची गडबड सुरू झाली. ज्यांना जास्त झाली होती ते तिथेच लुढकले. दादाने सूर्याला खूण केली. हळूच सटकणाऱ्या जीवनरामला त्याने बकोट धरून मागे खेचले. लवकरच हॉल रिकामा झाला. मगे ते तिघे जीवनरामला घेऊन जायला निघाले. त्याचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. श्रीपतराय परत आला. त्याने दादाला विनंती केली की परत परत त्याने आपल्या हॉटेलमध्ये यावं. त्यावेळी त्याच्या तोंडावर "पुनरागमनायच" चा भाव होता. इतका भक्तिभाव काकांनी पूर्वी कधी पाहिला नव्हता. गाडी चालू झाली. समोरच्या वेश्या वस्तीत अजून चांगलीच जाग होती. काकांच्या डोळ्यावर झोप होती. किशा ड्रायव्हरवर ओरडला, " अबे जलदी चल. बहोत काम बाकी है. " लवकरच ते ऑफिस जवळ आले. रस्त्यावर शुकशुकाट होता. रात्र बहरात होती. जीवनरामचे बकोट धरून ते सूर्या आत शिरला. केबीन मध्ये गेल्यावर त्याने जीवनरामला ढकलले. तो धडपडत भिंतीजवळ उभा राहिला. दादा टेबलावर बसला. काका बाजूच खुर्चीत स्थिरावले. त्यांच्या डोळ्यावर झोप होती. घरी कधी जाऊन झोपतो असं त्यांना झालं होतं. पण दादाला घरी जाण्याबद्दल सांगण्याचं धैर्य त्यांना झालं नाही. प्रथम कोणीच काही बोललं नाही. जणू जीवनराम अस्तित्वातच नाही. मग सुर्याने न राहवून विचारलं, " दादा इस मच्छर का क्या करे? "... दादाने ग्लास भरला. म्हणाला, " काकाजी आपको नींद आ रही है, लेकीन पार्टीको जरा फायनल टच देता हूं, वो भी देख लीजिये..... " असं म्हणून त्याने जीवनराम कडे थंड नजरेने पाहिलं. त्याच्या अंगावर काटा आला असावा. तो कापत म्हणाला, " दादा एक बार माफ कीजिये. मेरे छोटे छोटे बच्चे है. " असं म्हणून तो खाली वाकला. काका जीवनराम कडे पाहत होते. तो एक पन्नाशी उलटलेला माणूस होता. जेमतेम चार फूट उंची, डोक्यावर उंदराने कुरतडल्या प्रमाणे केस आणि लहानसर सपाट चेहरा. जीवनरामचं वेगळेपण त्याच्या डोळ्यात होतं. एक डोळा खाली, दुसरा वर शिवाय चकणेपणा. सध्यातरी त्याचा चेहरा निर्जीव दिसत होता. पण चेहऱ्यावर भीती पसरली होती. त्याने एकदा सूर्याकडे पाहिलं आणि मग काकांकडे. दादा म्हणाला, " सूर्या पहले ये केमरे बंद कर. " जीवनकडे वळून म्हणाला, " तुझे बडी चरबी चढ गयी क्या? गद्दारीसे मै खूष होगा क्या? लगता है ऑपरेशन करना पडेगा. इसे सबक सिखा. ".. .. सूर्याने त्याला खाडकन कानफटात मारली. त्याचं डोकं मागच्या भिंतीवर आपटलं. ते दाबीत कसातरी तो उठायला लागला. तशी सूर्याने त्याचं बकोट धरून आणखीन दोन तीन कानफटात ठेवून दिल्या. ते पाहून दादा चिडला आणि म्हणाला, "मैने तुझे सबक सिखाने को कहां था न? तू क्या प्यार कर राहा है क्या? "... त्याला आणखीन एक फाइट देऊन सूर्या म्हणाला, " सबकही तो सिखा राहा हूं दादा. " जीवनचे एक दोन दात हालले असावेत. तोंडाच्या कोपऱ्यातून रक्ताची एक लाईन बाहेर आली. सूर्याने दादाकडे मान्यते साठी पाहिलं. पण दादा किंचाळला. " लगता है तेरेकोही अब सबक सिखाना पडेगा. "

सूर्या म्हणाला " मेरेको नही जमेगा, काकाजीको बोलो. " दादा उठला. त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, " देख, काकाजी नया है. चल पकड. " त्याच्या हातात पिस्तूल घुसवीत तो म्हणाला. मग तो जागेवर जाऊन बसला.

जीवनरामने धडपडत पुढे होऊन दादाचे पाय धरले. म्हणाला, " गलती हो गयी, माफ करना, एक बार माफ करना. " दादा म्हणाला, " ये क्या अदालत है? जहां पहिला गुनाह माफ होता है. आं?.... " सूर्याने त्याला कॉलर धरून उचलला, त्याबरोबर टर्रकन आवाज आला. त्याची कॉलर मागच्या बाजूला लोंबू लागली. तोंडातलं रक्त पुशीत तो काकांना म्हणाला, " काकाजी, आप बुजुर्ग है. रहम करनेको कहो दादाको. मेरे बच्चे छोटे छोटे है. " किशा काकांकडे पाहत होता. तो मध्येच म्हणाला, " काकासे क्या बात करता है, ये क्या हायकोर्ट है? ". स्वतःच्या छातीला हात लावीत तो म्हणाला, "हायकोर्ट वगैरे सब इधर है. "..... नंतर थोडा विचार करून दादा म्हणाला, " ऐसा करते है, 'सोल्या ' को बुलाते है, रुको जरा. " तो फोन लावू लागला. तशी पुन्हा जीवन त्याचे पाय धरून म्हणाला, " दादा, चाहिये तो मेरी जान लेलो, लेकीन सोल्याको मत बुलाना "

दादा हसून म्हणाला, " सोल्याका नाम सुनते ही लोग इतना घबरते क्यूं है. " काकांना प्रश्न पडलेला पाहून तो म्हणाला, " आपको सोल्या मालूम नही है. लेकीन सूर्या को मालूम है..... क्यूं सूर्या काकाजीको बता तेरा पाव. " सूर्याने उजव्या पायातला मोजा काढला त्याचा पाय कापलेला होता. काका म्हणाले, " मै समझा नही. " दादा म्हणाला, " सूर्याने भी शुरूमे ऐसाही किया था. तभी सोल्या आया, उसका क्या तरीका है, मालूम नही, लेकीन अपने नाखून से वो चीर के शरीर की पूरी की पूरी नसे निकालता है. सूर्याके पावकी नसे निकाली थी. दस पंधरा दिनतक सूर्या डरसे सोया नही था..... " त्याने जीवनकडे पाहिले, तो चांगलाच थरथरत होता. मग विचार करून म्हणाला, " ऐसा करते है, इसको फिलहाल नीचे वाले सुरंगमे बंद करते है. सोल्याको बुलाते है, काकाजीको भी आयडिया आयेगी, चलो कार्पेट उठाके डाल दो उसे सुरंगमे". सूर्याची तयारी दिसली नाही. त्याने काकांसमोर नको असा डोळ्याने इशारा केला. ते पाहून तो म्हणाला, " तेरेको पटता नही क्या? काकाभी अभी अपनेही है. चल चल जल्दी कर. सबको सोना है. उसे बांध ले. " असं म्हणून दादाने बाजूचे कपाट उघडून जाडसर दोरी काढली आणि सूर्याच्या अंगावर फेकली. सूर्याने जीवनरामचे हात पाय बांधले. आणि कार्पेट गुंडाळायला सुरुवात केली. काका आश्चर्याने पाहत राहिले. अर्धं कार्पेट गुंडाळून झाल्यावर सूर्याने सराईत पणे लाद्यांच्या सापटीत हात घालून कळ दाबली. आस्ते आस्ते चार लाद्यांचा तो चौकोन उचलला गेला. प्रखर दिव्याच्या प्रकाशात काकांना आतल्या दगडी पायऱ्या दिसल्या. सूर्याने मग जीवनच्या तोंडात बोळा कोंबला. आणि ओढत ओढत, स्वतः आधी आत शिरून, त्याला आत ओढला. आणि तिथेच असलेल्या एका दुसऱ्या दगडावर त्याला बसवला. सूर्या बाहेर आला. पुन्हा चारही लाद्यांचा तो दरवाजा त्याने बंद केला............

मग दादा म्हणाला, " काकाजी आप अभी घर जाईये, रात बहोत हुइ है. आप कल शामको ऑफिस आईये. तबतक छूटी समझिये. तबतक सोल्याभी आया होगा. इतनी रात आपको शायद जानेमे तकलीफ होगी. मै हिराको आपको छोडनेको बोलता हूं. " पण काका म्हणाले, " नही दादा, मै चला जाउंगा. " पण दादाने हिराला फोन करून बोलावले होते. लवकरच काका घरी पोचले.....

काकांनी बेल वाजवली. रमेशने दरवाजा उघडला. तो चिडलेला दिसला. पण त्याच्याकडे लक्ष न देता ते आत शिरले. आपल्या जागेवर जाऊन झोपले.

(क्र म शः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

९ वा भाग केव्हाच टाकलेला आहे. माझ्या लेखन संचामधे जाऊन मिळू शकेल. . किंवा नियमितही मिळू शकेल. आपणास सोयीचे काय आहे ते पाहावे. संगणकीय वापरात मी तज्ञ नसल्याने माझ्या सुचना चुकीच्या ठरू शकतील. प्रतिसादाबद्दल आभार.