इथल्या टेकोबेल नावाच्या मेक्सिकन फास्टफूड चेनमध्ये अॅपल एम्पनाडा मिळतात. मध्यंतरी त्याबद्दल वाचताना कळलं होतं की त्याचा बीफ असलेला प्रकारही मेक्सिको आणि इतर लॅटीन अमेरिकन देशांमध्ये केला जातो. घरच्या गणपतीसमोर बरीच सफरचंद आली. ते संपवण्यासाठी एम्पनाडा करावा का असा विचार केला पण आधीच घरत खूप गोड आहे, त्यामुळे तो बेत रद्द केला. पण मग त्यावरून नियमांत बसणारा तिखटामिठाचा एम्पनाडा करायचं सुचलं.
साहित्यः
१. १ कप मैदा
२. १ मोठा (इथे अमेरिकेत मिळातो तेव्हडा मोठा) बटाटा. (उकडून)
३. ४ पाकळ्या लसूण
४. ऑलिव्ह ऑइल.
५. १-२ हिरव्या मिरच्या
६. १ मोठा चमचा दही.
७. अर्धा टीस्पून बेकिंग पावडर
८. लिंबाच रस किंवा आमचूर पावडर.
९. हवी असेल तर हळद.
१०. चवीप्रमाणे मिठ
११. चिमुटभर साखर.
१२. ३/४ कप पाणी.
कृती:
आवरणासाठी:
१. मैदा, पाणी, बेकींग पावडर, दही, मिठ आणि साखर एकत्र मळून घ्यावं आणि त्याचा पुर्यांसाठी असतो तश्या जाडीचा गोळा करावा.
२. गोळा ओल्याफडक्याने अर्धा तास झाकून ठेवावा. मूळ कृतीत अंडं होतं पण त्या ऐवजी मी दही घातलं.
सारणासाठी:
१. तव्यावर किंवा भाजीच्या भांड्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करावं.
२. त्यात लसूण एकदम बारीक चिरून घालावा.
३. लसूण डार्क ब्राऊन झाला की त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावे. लसूण हा मुख्य घटक असल्याने त्याची चव यायला हवी. त्यामुळे बाकी कुठलेही हिरवे मसाले (आलं, पुदीना वगैरे) घालणं टाळलं आहे.
४. वरून उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालावे.
५. लिंबाचा रस घालून खरपूस पेक्षा थोडं कमी परतून घ्यावं.
१. मैद्याच्या गोळ्याच्या पुरीसारख्या लाट्या करून घेऊन त्या लाटाव्या.
२. अर्ध्या भागात सारण भरून दुसरी बाजू बंद करावी.
३. करंज्यासारख कातून घ्यावं किंवा फोर्कने टोचावं.
४. तेलात दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून घ्यावं.
५. केचप, हिरवी चटणी, लालचटणी कश्याही बरोबर खायला घ्यावं.
गरमागरम, स्वादिष्ट, चविष्ट, खुसखुशीत* एम्पनाडे तयार !!!
तळटीपा:
१. अजून थोडा 'म,य,ब,ल' पणा करायचा असेल तर सारणात याम घालावा. बटर वर शॅलो फ्राय करावं किंवा बेक करावं.
२. * ह्या विशेषणांमध्ये 'पारितोषिकप्राप्त' असं लिहायची फारफार इच्छा आहे. तेव्हा भरभरून मतं द्या!
३. सारणाच्या घटकांमध्ये कुठल्याही भाज्या, चिकन, खिमा, आपलं ते हे काहीही वापरू शकता.
४. घरच्या सदस्यांनी 'ह्यॅ ! ह्यातर साध्या बटाट्याची भाजी भरलेलया करंज्या!! " असं म्हणून तुक टाकले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना एम्पनाडाबद्दल अधिक माहिती देत रहावं!
फोटो:
तळण्याआधी
छान
छान
ह्यॅ ! ह्यातर साध्या
ह्यॅ ! ह्यातर साध्या बटाट्याची भाजी भरलेलया करंज्या!! >>
म्हणणं तुमचे रास्तं हाय, पण बटाटा वडा नायतर समोसेच खाल्लेत असे, एम्पनाडे ऐकले पण नाय कदी. त्यात म, ब, ल हायत.. त्यामुळे बेस्टंच! आल द बेष्टं.
छान, तोपासु.... हे तर Curry
छान, तोपासु....
हे तर Curry Puff सारखे दिसत आहेत. दक्षिण-पुर्व आशिया मध्ये हा भारतिय स्नॅक म्हणुन विकला जातो.
https://en.wikipedia.org/wiki/Curry_puff
सुबक दिसत आहेत एखादा मध्ये
सुबक दिसत आहेत एखादा मध्ये फोडून , कापून सारणाचा फोटो असलेला नाही का?
पारंपारीक रेसिपीत बाहेरच्या सारणात भरपूर बटर/लार्ड घालून एकदम खुसखुशीत करतात. हे अगदी हेल्दी व्हर्जन दिसत आहे.
मस्त आलाय फोटो.
मस्त आलाय फोटो.
सुबक आणि चमचमीत! तोम्पासु
सुबक आणि चमचमीत!
तोम्पासु दिसतायत एकदम
तळलेल्या करंज्या छान तोपासू
तळलेल्या करंज्या छान तोपासू दिसत आहेत. तळायच्या आधीचे बैलाच्या पोटासारखे दिसत आहेत.
शीर्षकातही करंज्या उर्फ ... असे नाव द्यायचे होते. क अक्षरावरून सुरू होणारे हिट जाते आपल्याकडे
एम्पनाडे हे प्रथम कन्नड तमिळ
एम्पनाडे
हे प्रथम कन्नड तमिळ नाव वाटले .
एम्पनाडे हे प्रथम कन्नड तमिळ
एम्पनाडे
हे प्रथम कन्नड तमिळ नाव वाटले .
एम्पनाडे हे कन्नड तमिळ नाव
एम्पनाडे
हे कन्नड तमिळ नाव वाटले होते
बैलाच्या पोटासारख्या>> काय
बैलाच्या पोटासारख्या>> काय काय सुचतं रे तुला!! वाचल्यावर खरंच तश्या दिसायला लागल्या
अच्छा, म्हणजे तू किचन मध्येही
अच्छा, म्हणजे तू किचन मध्येही लुडबुड करतोस तर
रच्याकने, भारी झालेय प्रकरण
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय
मस्त दिसतायत. अरे पण किसलेलं
मस्त दिसतायत.
अरे पण किसलेलं चीज घातलं नाही का एम्पनाड्यात घरचे लोक करंज्या म्हणतील नाय तं काय
यातच हि. मिर्च्यांऐवजी हालापिनो + किसलेलं मेक्सिकन चीज, हवं तर टॅको सीझनिंग चवीला- असेही काँबो मस्त लागेल !!
छान प्रकार, बरेच variations
छान प्रकार, बरेच variations करता येतील.
मस्त दिसतंय.
मस्त दिसतंय.
मस्तय.
मस्तय.
अरे वा, छान जमलाय एंपनादाज चा
अरे वा, छान जमलाय एंपनादाज चा आकार..
बटाट्याचं सारण ..नोनो... फॉर मी!!!!
मोस्टली आम्ही बेक्डच करतो हे..
मस्त दिसत आहेत करंज्या!
मस्त दिसत आहेत करंज्या!
त्या करंज्या फोडून फोटो दाखव की पग्या. त्याशिवाय त्यात बटाटा-लसूण भरलाय की गूळाचुनाचं सारण हे कसं कळणार?
मूळ अॅपल एम्पेनाडाची कृती/ लिंक दे, उत्सुकता आहे त्या पदार्थाबद्दल.
छान पाकृ. बैलाच्या
छान पाकृ.
बैलाच्या पोटासारख्या>> काय काय सुचतं रे तुला!! वाचल्यावर खरंच तश्या दिसायला लागल्या >>>>>>>>
एंड प्रोड्क्ट मस्त
एंड प्रोड्क्ट मस्त दिसतय.लसणाचा स्वाद नक्कीच वेगळा लागत असनार.
भारीच की आदमा. अव्वा खुश झाली
भारीच की आदमा. अव्वा खुश झाली का?
असो. तर मटाराच्या करंज्याऐवजी बटाटा घातलेले सारण घातल्यावर एम्पनाडा बनतोय व्हय. घरी सांगतो.
चांगल्या दिसतायेत करंज्या.
चांगल्या दिसतायेत करंज्या. 'ब' मुळे बटाटा घालावा लागलाय वाट्ट. नाहीतर बरंच काही घालता येईल.
त्या सफरचंदांचं काय केलं मग?
मस्त दिसत आहेत करंज्या.
मस्त दिसत आहेत करंज्या. पिकनिकला न्यायला अजून एक पदार्थ. पुरी आणि बटाटा भाजीसाठी वेगवेगळा डबा नको. कुणाचं काय तर कुणाचं काय!
सफरचंदाचे एंपनादे वेगळेच लागत असणार. सफरचंदाचा हलवा करून भरायचा का?
छान पाककृती. स्पर्धेसाठी
छान पाककृती. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
इकडे गुंगला होतास त्यामुळेच
इकडे गुंगला होतास त्यामुळेच यंदा यूएस ओपनचा धागा काढला नाहीस ना!!
सगळ्यांना धन्यवाद! बैलाच्या
सगळ्यांना धन्यवाद!
बैलाच्या पोटासारख्या >>>> काहीही..
त्या करंज्या फोडून फोटो दाखव की पग्या >>>>> सशल आणि मंजूडी, झाकलेली मुठ आपली करंजी राहू देत की तशीच..
रच्याकने, तसे फोटो काढलेले नाहीत. आता ह्या आठवड्यात पुन्हा करणं शक्य नाही. त्यामुळे तुम्हीच करा आणि पोटफोडे फोटो काढून इथे टाका. मी बक्षिस मिळाल्यावर तुमच्याबरोबर शेअर करेन.
कुणाचं काय तर कुणाचं काय! >>>>
सफरचंदाचा हलवा करून भरायचा का? >>>> हो, सफरचंद, बटर , सारख आणि सफरचंद अगदी मिट्ट गोड असतील तर थोडा लिंबाचा रस ह्यांचा लगदा करायचा आणि भरायचं. सफरचंद अगदी पूर्णा शिजवायची नाहीत. किंचित करकरीत रहातील असं बघायचं. लवंग, दालचिनी ह्यांचा स्वादही चांगला लागेल.
मै, चीज संपलं होतं नव्हतं नेमकं. अॅलॅपिनोजची आयड्या छान आहे. पुढच्या वेळी.
त्या सफरचंदांचं काय केलं मग? >>>> ती सफरचंद कोणाकोणाला वाटली. थोड्यांच कस्टर्ड केली. थोडीफार खाल्ली. थोडी अजून आहेत..
'ब' मुळे बटाटा घालावा लागलाय वाट्ट.>>>> हो.. नियमांत बसवण्यासाठी. तळटीपेत लिहिलं आहे ना.
इकडे गुंगला होतास त्यामुळेच यंदा यूएस ओपनचा धागा काढला नाहीस ना!! >>>>> धागे बंद केलेत रे सध्या.. ते जागते ठेवायला वेळ मिळत नाहीये.
तयार एम्पनाडे भारी दिसताहेत.
तयार एम्पनाडे भारी दिसताहेत.
हालापिनो + किसलेलं मेक्सिकन चीज, हवं तर टॅको सीझनिंग चवीला >>> +१.
मस्त!
मस्त!
छान आहे पदार्थ. हालापिनो +
छान आहे पदार्थ. हालापिनो + किसलेलं मेक्सिकन चीज घालून करुन पाहाणार. मैद्याच्या आवरणाचा खटाटोप करण्याऐवजी पफ पेस्ट्रीजचे करुन बेक करणार. (चीज+लसूण चे पॅटीस )
पराग, घरी जर वॉफल आवडत असतील तर, उरलेल्या सफरचंदाचं टॉपिंग करता येईल.
सफरचंद (सालं काढून, बारीक तुकडे करुन ) किंचित तुपावर परतायची . त्यात ब्राऊन शुगर घालून सुट्लेलं पाणी बर्यापैकी आटवायचं. गॅस बंद करुन सिनॅमन पावडर टाकायची. वॉफलवर टाकून खायचं. चिल्लर पार्टीचा आवडता ब्रे फा आहे.
Pages