’संगीतक हे नवे’ - मी टिळकांशी बोलतो!

Submitted by कविन on 11 September, 2016 - 11:34

(डोंबिवलीतल्या टिळक पुतळ्यापाशी टिळक, कल्याणकर अशा मला भेटतात, तेव्हाचा हा आमचा संवाद)

टिळक : तुझ्या गावी आलो होतो, शतकापुर्वी मी जेव्हा
गणपती उत्सवाचा, रुजला कोंब तेव्हा

मी : पाहीलाय तुमचा "तो" फोटो मी व्हॉटस अ‍ॅपच्या द्वारी
प्राऊड फीलही केलेय मी ही केव्हढे तरी

(मित्रांनो आहे यालाही पार्श्वभुमी,
नंबर द्या पाठवतो,छबी व्हॉटस अ‍ॅप वरुनी)

टिळकः बाळा, ये तू माझ्या, समोरी तू ऐसा
गणेशोत्सव चाले, अता सांग कैसा?

मी: तेव्हा रुजला कोंब, त्याचा वटवृक्ष झालाय
गल्ली बोळात पारंब्यांनी ट्रॅफीक जॅम केलाय Sad

टिळकः काय सांगतोस? इतका पॉप्युलर हा झालाय?

मी: पॉप्युलर? नाही हो. आता धंदाच बोकाळलाय

(ऐकून झाले टिळक उदास
म्हणे, यासाठी का घेतला ध्यास?)

मी: नका होऊ असे उदास
सैर घडवतो तुम्हा खास
बघून तिथला उत्सव भारी
जाईल पळून निराशा सारी

टिळकः चल घेऊन मला सत्वरी
बघूदे तुझा तो उत्सव तरी

मी: कशाला कुठे जायला हवे
आयपॅडवरच दिसेल की रुपडे नवे

(उघडला आयपॅड, टाईप केला कोड
मायबोलीवर उघडला गणेशोत्सवाचा नोड
सतरा वर्षांचे उपक्रम दाखवले
तेव्हा कूठे चेहर्‍यावर पुन्हा हसू उगवले)

(म्हणाले "धन्यवाद! आता कसे बरे वाटले
जीवास माझ्या तृप्त वाटले"

मी म्हंटल, "चला इथे, ऐकवतो एक गंमत खाशी
इथे जे ऐकाल ते आहे एकदम बावनकशी"

(मित्रहो, टिळक तर ते ऐकून नॉस्टाल्जीक झाले
धन्यवाद म्हणून, आशिर्वादही देऊन गेले)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उघडला आयपॅड, टाईप केला कोड
मायबोलीवर उघडला गणेशोत्सवाचा नोड>> खासच!!
मज्जा आली वाचायला..

उघडला आयपॅड, टाईप केला कोड
मायबोलीवर उघडला गणेशोत्सवाचा नोड >> मस्तच! सुंदर झालंय.