पहिले दान देवाला
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
चित्रं कुठल्याही विषयावर चालतील, पण आंतरजालावर भारतीय संस्कृती / परंपरा, मराठी संस्कृती / परंपरा, मराठी व्यक्ती यांची खूपच कमी प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध आहेत. त्यात आपण या उपक्रमातून काही भर टाकू शकलो, तर खूप छान होईल.
हे लक्षात ठेवा -
१. या धाग्यावरचे नियम इतर झब्बूच्या नियमांपेक्षा वेगळे आहेत.
२. ही स्पर्धा नसून खेळ आहे. प्रत्येक चित्राखाली ते नंतर शोधायला सोपं जाईल, अशा काही शब्दखुणा अपेक्षित आहेत. या शब्दखुणांमुळे नंतर वर्गीकरण करणं सोपं होईल.
३. इथे तुमच्याकडे असलेली कुठल्याही विषयावरची प्रकाशचित्रं किंवा रेखाटनं, जी तुम्हांला पूर्णपणे प्रताधिकारमुक्त करावयाची आहेत, ती टाकणं अपेक्षित आहे. ती चित्रं नंतर वापरताना, किंवा काही बदल करताना तुमचा नामोल्लेख केला जाण्याचं बंधन, परवानगी घेण्याचं बंधन वापरकर्त्यावर असणार नाही.
४. या धाग्यावरची प्रकाशचित्रं आंतरजालावरील कुणीही व्यक्ती वा संस्था , कुणाचीही परवानगी न घेता, कुठल्याही कारणासाठी (व्यावसायिक / अव्यावसायिक commercial / non commercial) वापरू शकेल (Public Domain).
५. या प्रकाशचित्रांमध्ये कुणीही काहीही बदल करू शकेल.
६. या धाग्यावरची प्रकाशचित्रं पुन्हा वापर करायला सोपं जावं म्हणून मायबोलीवर एक कायमस्वरूपी अल्बम केला जाईल.
७. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊन शकणार नाही.
९. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्ं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
१०. या धाग्यावर प्रकाशित केलेलं प्रकाशचित्र तुम्ही कायमचं प्रताधिकारमुक्त करत आहात, हे लक्षात ठेवा. चित्र प्रकाशित झाल्यावर त्यावर तुमचा काहीही हक्क असणार नाही. तुम्ही ते देवाला दान करता आहात. प्रकाशचित्राखाली ते कुणी दान केलं, याचा उल्लेख असेल.
उदा.
टोरांटोची शान. स्ट्रीट कार (क्रमांक ५०५ डंडास वेस्ट स्टेशन ते ब्रॉड व्हू स्टेशन)
टोरांटो , स्ट्रीट कार, सार्वजनिक वाहतूक : (अमितव)
.
.
एका तळ्यात होती बदके पिले
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख! ( विजय टॉकिज - गणपती मंडळ देखावा)
द्वारकेला गोपी तलावात असे
द्वारकेला गोपी तलावात असे पक्षी आढळून आले (पूर्वाश्रमीच्या गोपीच जनु)
मुकु, एवढा मोठा फोटो कसा
मुकु, एवढा मोठा फोटो कसा अपलोड केला? पिकासा बंद असल्याने मला जमतच नाही.
फोटोसाठी आम्ही तयार आहोत बरं
फोटोसाठी आम्ही तयार आहोत बरं का!
मांजर, दोन मांजरे, प्राणी, पाळीव प्राणी
अकु, हा डीपी रोड वरचा ना?
अकु, हा डीपी रोड वरचा ना?
अ.कु. तुला झब्बू.
अ.कु. तुला झब्बू.
हा झब्बु आमच्या मांजराचा!
हा झब्बु आमच्या मांजराचा!
कृष्णा मांजर झब्बू भारीच, .
कृष्णा मांजर झब्बू भारीच, .
मुकु, एवढा मोठा फोटो कसा
मुकु, एवढा मोठा फोटो कसा अपलोड केला? पिकासा बंद असल्याने मला जमतच नाही. अ ओ, आता काय करायचं>> फोटोशॉप मधे save as JPEG - Low image madhe
(No subject)
(No subject)
हा आमचा आकाश दिवा!
हा आमचा आकाश दिवा!
मॅक्रमे तिरंगा
मॅक्रमे तिरंगा
कृष्णा, नरवीर मंडळ गणपती
कृष्णा, नरवीर मंडळ गणपती म्हणजे गावठाण.
आज कोणती भाजी विकत घ्यावी?
आज कोणती भाजी विकत घ्यावी?
ताजी भाजी, विक्री, पडवळ, भेंडी, तोंडली
तिरंग्यातल्या एका रंगाला
तिरंग्यातल्या एका रंगाला झब्बू.
केसरिया! या फुलझाडाचं नाव माहिती नाही पण पिवळ्या-लाल अशा एकत्रित शेडमुळे हळदी-कुंकवाचं झाड म्हणतात असं ऐकून आहे. आमच्या घरी श्रीरामपूरला जे झाड होतं त्याला जर्द पिवळ्या आणि लाल रंगाच्या पाकळ्या असलेली फुलं यायची. माझ्याकडे आहे त्याला जरा केशरट येतात.
टपोरे फूल भगवंताचे चरणी!
टपोरे फूल भगवंताचे चरणी!
ही अमेरिकन किंवा हवायन जुई.
ही अमेरिकन किंवा हवायन जुई. फुल दिसायला थोडं प्राजक्ताच्या फुलासारखं दिसतं पण सुगंध जुईचाच आहे.
(No subject)
सिंडरेला, हे स्टार जॅस्मिन
सिंडरेला, हे स्टार जॅस्मिन आहे का?
हा माझ्यातर्फे झब्बू. वर्षातून एकदा बहरते फक्त. अतिशय लो मेन्टेनन्स.
पिंक जॅस्मिन, अमेरिका
संपादित.
संपादित.
@अभि हा फोटो चालणार नाही.
@अभि
हा फोटो चालणार नाही. यावरचे कॉपीराईट आणि तुमचे नाव काढल्यावर चालेल. या धाग्याचा हेतू कुठलेही हक्क नसलेले फोटो हा आहे.
मेणवलीच्या वाड्यातली खिडकी
मेणवलीच्या वाड्यातली खिडकी
नातेवाईकांच्या अंगणातील
नातेवाईकांच्या अंगणातील पपया
पपई, फळ, झाड
लोणार येथील दैत्यसुदन मंदिर
लोणार येथील दैत्यसुदन मंदिर
अकुंच्या भाज्यांना हा झब्बु!
अकुंच्या भाज्यांना हा झब्बु!
परवा भाजी आणली त्यात अश्या ४-५ मिरच्या आल्या!
वाह!
वाह!
लालबुंद फळे असणारा हा फॅन
लालबुंद फळे असणारा हा फॅन पाम!
श्री. अनंत देवस्थान, सावई
श्री. अनंत देवस्थान, सावई वेरे, गोवा.
Pages