पहिले दान देवाला (प्रकाशचित्रांचा झब्बू - १) - समाप्त!

Submitted by संयोजक on 4 September, 2016 - 00:31

पहिले दान देवाला

मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस्‌ अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?

आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

चित्रं कुठल्याही विषयावर चालतील, पण आंतरजालावर भारतीय संस्कृती / परंपरा, मराठी संस्कृती / परंपरा, मराठी व्यक्ती यांची खूपच कमी प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध आहेत. त्यात आपण या उपक्रमातून काही भर टाकू शकलो, तर खूप छान होईल.

हे लक्षात ठेवा -
१. या धाग्यावरचे नियम इतर झब्बूच्या नियमांपेक्षा वेगळे आहेत.
२. ही स्पर्धा नसून खेळ आहे. प्रत्येक चित्राखाली ते नंतर शोधायला सोपं जाईल, अशा काही शब्दखुणा अपेक्षित आहेत. या शब्दखुणांमुळे नंतर वर्गीकरण करणं सोपं होईल.
३. इथे तुमच्याकडे असलेली कुठल्याही विषयावरची प्रकाशचित्रं किंवा रेखाटनं, जी तुम्हांला पूर्णपणे प्रताधिकारमुक्त करावयाची आहेत, ती टाकणं अपेक्षित आहे. ती चित्रं नंतर वापरताना, किंवा काही बदल करताना तुमचा नामोल्लेख केला जाण्याचं बंधन, परवानगी घेण्याचं बंधन वापरकर्त्यावर असणार नाही.
४. या धाग्यावरची प्रकाशचित्रं आंतरजालावरील कुणीही व्यक्ती वा संस्था , कुणाचीही परवानगी न घेता, कुठल्याही कारणासाठी (व्यावसायिक / अव्यावसायिक commercial / non commercial) वापरू शकेल (Public Domain).
५. या प्रकाशचित्रांमध्ये कुणीही काहीही बदल करू शकेल.
६. या धाग्यावरची प्रकाशचित्रं पुन्हा वापर करायला सोपं जावं म्हणून मायबोलीवर एक कायमस्वरूपी अल्बम केला जाईल.
७. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊन शकणार नाही.
९. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्ं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
१०. या धाग्यावर प्रकाशित केलेलं प्रकाशचित्र तुम्ही कायमचं प्रताधिकारमुक्त करत आहात, हे लक्षात ठेवा. चित्र प्रकाशित झाल्यावर त्यावर तुमचा काहीही हक्क असणार नाही. तुम्ही ते देवाला दान करता आहात. प्रकाशचित्राखाली ते कुणी दान केलं, याचा उल्लेख असेल.

उदा.
टोरांटोची शान. स्ट्रीट कार (क्रमांक ५०५ डंडास वेस्ट स्टेशन ते ब्रॉड व्हू स्टेशन)

20150325_153112.jpg
टोरांटो , स्ट्रीट कार, सार्वजनिक वाहतूक : (अमितव)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंडीया गेट : भिंतीवरील मजकूर
india-gate-wall.jpg

इंडीया गेट, दिल्ली, भारत, भिंतीवरील मजकूर, आदरांजली
अजय गल्लेवाले

@केदार
वरील चित्र चालणार नाही. त्यावर कॉपीराई़़ट JK असे लिहले आहे. तेव्हडे काढून टाकले तर चित्र चालू शकेल. कॉपीराई़़ट JK लिहले असल्यामुळे झब्बूच्या मुळ उद्देशालाच विरोध होतो आहे.

कृपया प्रकाशचित्र पोस्ट करताना width=600 असे पोस्ट करा आणि height काढून टाका. म्हण़जे मूळ चित्राचे रिझोल्यूशन राहील आणी इथेही चांगले दिसेल.

उदा.
< img src="/files/u26/ny-23.jpg" width="600" alt="ny-23.jpg" />

खूपच छान उपक्रम.
प्रताधिकार कायद्याचं अवास्तव अवडंबर माजवण्या ऐवजी उपयोगी दस्तऐवज निर्माण करणाऱ्या या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

छायाचित्र अपलोड करायला काही सोपी सुविधा उपलब्ध करून देता येणार नाही का?

@टग्या
उपक्रमाची कल्पना आणि गणेशोत्सवाची तारीख या कालावधीत मायबोलीवरच्या उपलब्ध सुविधा वापरून जे शक्य होईल ते करतो आहोत. मिळणार्‍या प्रतिसादावरून भविष्यात बदल करता येईल. तुम्हाला कुठली अडचण येते आहे?

20150917_134246.jpg

गणेशाचे शिस्तबध्द खेळ करून स्वागत करणारे पथक, पुणे.

गणपती, खेळ, टिपरी, पथक, रस्ता, मिरवणूक, पुणे, गणेश, स्वागत.

क्या बात है!!!
मस्त उपक्रम संयोजक!!! Happy

प्रताधिकार कायद्याचं अवास्तव अवडंबर माजवण्या ऐवजी उपयोगी दस्तऐवज निर्माण करणाऱ्या या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. >>>> +१ Happy

स्तुत्य उपक्रम. खूप सुरेख सुरेख प्रचि एकत्रित होतील. सगळ्या शब्दखुणांमध्ये मायबोली लिहायला सांगितलं तर?

प्रताधिकार कायद्याचं अवास्तव अवडंबर माजवण्या ऐवजी उपयोगी दस्तऐवज निर्माण करणाऱ्या या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
>> +1

रच्याकने मी टाकलेल्या कोणत्याही छायाचित्राची हाय रिजोलुशन प्रत हवी असेल तर संपर्क साधा

einstein house.jpg

आइन्स्टाइनचं घर , प्रिन्स्टन न्यू जर्सी. Albert Einstein House, Princeton NJ
112 Mercer St, Princeton, NJ 08540
आइन्स्टाइन यांचे इथे १९३५ ते १९५५ असे २० वर्षे वास्तव्य होते.

Pages