मायबोली गणेशोत्सव २०१६ - आमच्या घरचा गणपती

Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 15:47

नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः। नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः ॥
विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे । भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक॥
मंगलमूर्ती मोरया !!

घरोघरी गणरायांचं आगमन झालेलं आहे. बाप्पाचा नैवेद्य, आरत्या आणि पाहुण्यांची लगबग यांतून थोडासा वेळ काढा. तुमच्या लाडक्या बाप्पाची, त्याच्यासाठी केलेल्या सजावटीची प्रकाशचित्रं इकडे द्यायला विसरू नका. ही सजावट कशी केली, यावर्षी विशेष काय केलं, हे सगळं आम्हांला वाचायला आवडेल.

IMG-20160903-WA0007.jpg

आपण आपल्या घरच्या गणपतीविषयी थोडक्यात माहिती आणि प्रकाशचित्र इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचं सभासद होणं गरजेचं आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आम्ही (मीआणि माझा बारा वर्षाचा मुलगा) घरी केलेला गणपती.
आठ दिवस आधी एका पितळी परातीत काळि माती घेऊन त्यात गहू पेरले. गणेशचतुर्थीपर्यंत ते उगवून छान वीतभर वाढले. परातीत कडेला मोकळी जागा दिसत होती म्हणून बागेतलीच फुले त्यात खोवली आणि मागे एक शंकासुराच्या फुलांची फांदी.
पूर्णपणे पर्यावरणपूरक बाप्पा!!

IMG_20160905_090615-1.jpg

सुंदर आहेत सजावटी.

मी घरात आहेत त्यापैकीच एका मुर्तीची स्थापना करते दर वर्षी. यावर्षी एका मैत्रिणीनं मंगळुरुहून खूप सुरेख पितळ्याची मूर्ती आणली त्या मुर्तीची स्थापना केली आहे.

IMG_5378.JPG

Pages