मायबोली गणेशोत्सव २०१६ - आमच्या घरचा गणपती

Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 15:47

नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः। नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः ॥
विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे । भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक॥
मंगलमूर्ती मोरया !!

घरोघरी गणरायांचं आगमन झालेलं आहे. बाप्पाचा नैवेद्य, आरत्या आणि पाहुण्यांची लगबग यांतून थोडासा वेळ काढा. तुमच्या लाडक्या बाप्पाची, त्याच्यासाठी केलेल्या सजावटीची प्रकाशचित्रं इकडे द्यायला विसरू नका. ही सजावट कशी केली, यावर्षी विशेष काय केलं, हे सगळं आम्हांला वाचायला आवडेल.

IMG-20160903-WA0007.jpg

आपण आपल्या घरच्या गणपतीविषयी थोडक्यात माहिती आणि प्रकाशचित्र इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचं सभासद होणं गरजेचं आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी शेवटच्या क्षणाला.. फुलझाडं विकत घेतली आणि आजूबाजूला लावली. गणपती विसर्जन नंतर ती झाडं बरेच जण घरी कुंड्यांमध्ये लावायला घेऊन गेले.

14233133_1002174603226299_8333421398019010669_n.jpg

कित्ती छान आहेत सगळ्यांचेच बाप्पा.... मस्तच.
पण मला तो बैलगाडीत बसलेला बाप्पा खुप आवडला. कसला क्युट दिसतोय तो.

धन्यवाद संकुल माहिती दिल्याबद्द्ल....

<<सगळ्या सजावटी छानच आहेत. वारली, झावळ्या आणि बैलगाडीतले गणेश विशेष आवडले Happy आणि हो, गहू पेरून सजावट उगवायची कल्पना झक्कास.>>>

अगदी...अगदी...

Pages