'हवाई' बद्दल माहिती

Submitted by सुनिधी on 10 September, 2009 - 12:29

आम्ही डिसेंबर च्या शेवटी ८ दिवस हवाई ला जायचा विचार करत आहोत. कृपया तुम्हाला हवाई बद्दल जी माहिती असेल ती लिहावी. पहिल्यांदा जाणार्‍यांना खुप उपयोगी पडेल.
कोणत्या बेटाला जावे? कोणत्या बेटावर कायकाय पहाण्यासारखे आहे?
एका बेटाहुन दुसर्‍या बेटाला जायचे कसे?
जाण्यास चांगले हवामान कधी असते?
तिथे काय काय गोष्टी करु शकतो? करण्यासारखे, पहाण्यासारखे काय आहे इत्यादी.

मी गुगल वर पहायला सुरु केले आहे पण फार गोंधळायला होते बुवा.
माझी मैत्रीण म्हणाली ती सर्वात मोठ्या बेटावर १ आठवडा राहीली पण ते सुद्धा कमी पडले.

धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कोणीतरी येथे माहिती लिहील म्हणून वाट बघत होतो, पण बहुधा पान बरेच मागे गेल्यामुळे लोक विसरले.

एवढे इंटरेस्टिंग नक्की काय आहे तेथे? का यूरोप अमेरिकेच्या लोकांना केवळ गरम समुद्रकिनार्‍यांचे फारच जास्त कौतुक आहे? मी अजून गेलो नाही, पण वर्णने वाचून किंवा इतरांकडून ऐकून (ते ही "it's amazing" पेक्षा फार डीटेल्स मिळाले नाहीत) आवर्जून जावेसे अजून वाटले नाही.

या प्रश्नांकडे केवळ करूणेच्या नजरेने पाहिलेत तरी चालेल Proud पण भारतातले (विशेषतः कोकणातील) समुद्रकिनारे पाहिलेल्यांना एक स्वच्छता वगळली तर हवाईला ४-५ दिवस जाण्यासारखे काय आहे? जरा माहिती द्या.

>> विशेषतः कोकणातील समुद्रकिनारे पाहिलेल्यांना .. हवाईला .. जाण्यासारखे काय आहे?
दुधाची तहान ताकावत भागवायची!... अगदी खाइन तर तुपाशीच म्हणुन चालत नाही ना!

समुद्रकिनारे पाहिलेल्यांना एक स्वच्छता वगळली >>> आहो farend कोकणातील समुद्र किनारे स्वच्छ आहेत हो. ( गणपतीपुळे वगैरे सोडले तर) भाट्ये, कशेळी,गावखळी समुद्र किनारा खुप छान व स्वच्छ आहे Happy

हो ते स्वच्छता वगैरे शहरांमधल्या किनार्‍यांबद्दल म्हणायचे होते. कोकणातील स्वच्छ किनारे मी बघितले आहेत (गणेशगुळे वगैरे).

आता हवाईबद्दल बोलू जरा Happy

मी होनोलुलु आणि माऊई ह्या दोन बेटांवर गेले आहे. त्यात मला माऊई जास्त आवडलं. खूप पिक्चरिस्क आहे आणि होनोलुलुच्या तुलनेत शांतही आहे.
फारेंडा, कोकण आणि हवाईची तुलना का करा?;) दोघांचंही आपलं असं खास सौंदर्य आहे.
एका बेटावरुन दुसर्‍या बेटावर जायला विमानाने जाण्याशिवाय पर्याय नसावा माझ्यामते. तिथल्या तिथे फिरायला अर्थातच कार हवीच. करायला भरपूर अ‍ॅक्टिव्हिटीज आहेत. जेट स्की,पॅरासेलिंग, स्नॉर्केलिंग, स्कूबा डायव्हिंग, हेलिकॉप्टर राईड, मुलांकरता सबमरीन वगैरे आहे. आणि असं धाडसी काही करायचं नसेल तर मगरीसारखं बीचवर पडून रहायला हरकत नाही. हॉटेल मध्येही मुलांकरता काही करण्यासारखं असेल तर बघावं.
रहाण्याकरता: होनोलुलुला आम्ही हयाट मध्ये राहिलो होतो. अगदी फडतूस आहे, चुकुनसुद्धा जाऊ नये तिथे कुणी. त्यापेक्षा माऊईला काँडो होती ती जास्त सुंदर होती. त्याचा तोटा एकच होता की तिथे हॉटेलचं रेस्टॉरंट नव्हतं त्यामुळे ब्रेकफास्टही स्वतःच बनवावा लागायचा. लहान मुल असेल तर तसाच ऑप्शन रेकमेंड करेन मी.

आम्ही २०१० मधे माउवी ला गेलो होतो. मस्त आहे. बीच वरच्या भागात आरामात राहणे, नेहमी अमेरिकेतील मुख्य भागात राहणार्‍यांना एकदम वेगळे वाटणारे "ट्रॉपिकल" वातावरण व करायला असंख्य गोष्टी (स्नॉर्केलिंग, स्कुबा, हेलिकॉप्टर राईड्स, विविध बोट राईड्स) ही मला मुख्य आकर्षणे वाटली.

> स्नॉर्केलिंग, स्कुबा, हेलिकॉप्टर राईड्स, विविध बोट राईड्स

ती आकर्षणे आहेतच, पण ती इतरही समुद्रकिनार्‍यांवर आढळतात.
हवाईचे मुख्य आकर्षण म्हणजे अतीशय फ्रेण्डली ज्वालामुखी. ज्वालारसापासून फूट दोन फुटांवर जाता येतं.
त्याशिवाय सर्वात मोठ्या बेटावर अनेक वेगवेगळे वेदर पॅटर्न्स असतात उदा. वायमीयाला जवळजवळ रोज मस्त धुकं असतं, हिलोला रोज पाऊस पडतो, तर १५००० फुटी मौना कियावर जगातल्या सर्वात महत्वाच्या अनेक दुर्बीणी आहेत. हवाईचे पक्षी इतरत्र दिसणार्‍या पक्षांपेक्षा वेगळे आहेत.

अजुनही अनेक वैशिष्ट्यपुर्ण गोष्टी आहेत ...