स्पॉट रीडक्शन

Submitted by माधुरी८५ on 21 August, 2016 - 23:26

लोकहो जरा सिरीयसली मदत ह्वी आहे. इंटरनेट वर शोधले पण सोल्युशन सापडले नाही. शरीरावरच्या एका ठराविक एरीयातले वजन आपण कमी करु शकतो का? माझ्या लोअर बॉडीवर खूप सारे फॅट जमा झाले आहे. अन डीलीवरी नंतर तर जास्त. सर्व टेस्ट करुन झाल्या म्हण्जे थायरॉएड वगैरे पण नॉर्मल आहेत तर ते कमी करण्यासाठी कुठल्या प्रकारचे डायेट किंवा व्यायाम जास्त उपयोगी आहेत ? अस सोपं नाही स्पॉट रीडक्शन पण काहीतरी फरक पडेलच ना. सध्या वॉक कर्तेय १ तास दररोज. पण फरक नाही काही. बसुन काम आहे . मी फ्रस्टेट होतीय Sad प्लीज मदत करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आलटून पालटून वेट ट्रेनिंग
अ‍ॅब्स.
लंजेस
स्क्वॉट्स
(तसे स्पॉट रिडक्शन १००% शक्य नसते पण याने जनरल फायदा होईल आणि साईड इफेक्ट म्हणून स्पॉट रिडक्शन.)

शरीरावरच्या एका ठराविक एरीयातले वजन आपण कमी करु शकतो का? >> नाही. वेट रिडक्षन इंड स्ट्री वाले असे बोलून फसवतात प ण कृपया न्युट्रिशनिस्ट च्या सल्ल्याने वेल प्लॅन्ड डाएट व व्यायाम लाइफ स्टाइल चेंज हेच क्खरे उपाय आहेत. काम बसून असले तरी ही मधून मधून ब्रेक घेउन चालून या. फिजिकल फिटनेस वाढवा हळू हळू व वजन कमी करा. क्विक फिक्स उपायांच्या मागे लागू नका.

डाएटमधे स्वीट डिशा, साखर पूर्ण बंद करा. चहातबी नाय घ्यायची अन आर्टीफिशल शुगर तर अजिबात नाय.

हो खरे आहे. साखर कमी केली की वजन खूप कमी होते. मिठाई ( विकतची ) अती गोड फळे ( आंबा, सिताफळ, चिकु वगैरे) पण कमी करावीत. मी जेव्हा साखर कमी केली होती तेव्हा माझे वजन खूपच कमी झाले होते, अगदी दृष्ट लागण्या इतपत मी सडपातळ झाले होते. पण मला गोड फार आवडते. लाडु, केक, गुळाचे सर्व खमंग पदार्थ उदा. दिवे, खिरी, पुपो वगैरे ( नावे मुद्दाम लिहीली कारण श्रावण व गणपतीत यावरच ताव असतो ) दिसले की मी भान न ठेवता हादडते त्यामुळे वजन परत वाढले. आहारातुन अती तेल व साजूक तूप पण कमी करा. पण साजूक तूप ( घरचे ) दिवसातुन अर्धा चमचा घ्यायला हरकत नाही याने पोट साफ होते.

आहारावर नियंत्रण ठेवा. कुठलीच गोष्ट अती नको, मग खाणे असो वा व्यायाम.

मी साखर कमी केली होती तेव्हा कमरेवरची व पोटावरची चरबी खूप कमी झाली होती. पण आता परत जैसे थे. मी बाहेरचे ( हॉटेलिंग वगैरे) खात नाही. पण घरचे गोड पदार्थ खाते. आता हे पण कमी करावे लागेल.

धन्यवाद !

साखर मध्यंतरी दोन वर्ष बंद केली होती पण म्हणावा तसा काही फरक पडला नाही. डायेट चालु केले की आधी चेहराच बारीक होतो. खप्पड दिसतो , लोकं म्हणतात बारीक झालीस पण खाली काहीच फरक पडत नाही. थायज अन पेल्विक एरीयात खुप जाड आहे. मला कळतय हे accept कराव लागेल पॉजिटीव राहुन स्वताच्या शरीरावर प्रेम करायला शिकल पाहीजे. जे आहे ते आहे. Be positive Happy
सर्व व्यायाम चालुच आहेत. नाजुक विषय आहे तर कुणी मोकळेपणी बोलेल अस वाटत नाही.

हा नाजूक विषय नाही राहीलाय. उलट स्त्रियांच्या पोटाचा व कमरेचा घेर प्रमाणापेक्षा वाढला तर डायबेटीसची शक्यता वाढते असे डॉक्टरांचेच मत आहे. दूरदर्शनवर हॅलो डॉक्टर म्हणून जो कार्यक्रम असतो त्यातच एका डॉक्टरांनी सांगीतले होते की पोट सुटले तर त्याच्या पाठीच्या मणक्यावर पण ताण येऊन पाठदुखी सुरु होते. आणी मधूमेह होण्याची पण शक्यता वाढते.

डाएट जास्त करायचेच नाही. त्यापेक्षा आहार विभागुन खायचा. सकाळी नाश्ता मात्र भरपूर करावा, म्हणजे दिवसभर उर्जा टिकुन रहाते. दुपारी पोळी ( नोकरी करत असाल तर डब्याला वगैरे ) खात असाल तर रात्री ज्वारीची भाकरी खावी. माझ्या मुलीच्या शाळेत मुलांना न्यायला येणार्‍या कित्येक आया भाकरी आणी पालेभाजी खातात. दुपारी जेवणात भात नसतो. अगदी सडपातळ आहेत. मिटिंग मध्येच मी काही मुलींना त्या विषयी विचारले होते. त्यांच्या आहारात भाकरी जास्त आहे, पोळी कमी असते.

कमरेचा घेर, मांड्या थोडक्यात अ‍ॅप्पल्,पीयर आणि मफिन टॉप हे बैठ्या कामाचे इश्यूज आहेत.
जोपर्यंत हे भाग हालचाल, थोडीफार वाकण्याची कामे (जमिनीवर बसणे, घरकाम, खोबरे खवणे, इ.इ) प्लस वेट ट्रेनिंग करत नाहीत तोपर्यंत फरक पडत नाही.(ही माहिती लिहीताना मी रोज १० तास बैठे काम करते Happy हे सर्व थिअरी मध्येच आहे.)

पोटाचा ,कमरेचा घेर कमी करण्याचे घरगुती कामाचा व्यायाम म्हणजे नियमित घरातील फरशी पुसणे.इति माझी आज्जी.

वेट ट्रेनिंग चाळीशी नंतर करावे का? ती वेट्स उचलणे माझ्याच्याने काही होत नाही...फार स्टॅमिना लागतो .त्यापेक्षा पोटाचे व्यायाम (अ‍ॅब्ज) , योगा करते. पण लोअर बॉडी, थाईज खूपच जाड आहे. वजन काही हलत नाही.

सुरुवातीला अगदी कमी - मिनिमम वेट्स वापरायचे वेट्स ट्रेनिंगसाठी. मग ह्ळू ह्ळू वाढवायचे. चाळीस नंतर न करण्याचे काही कारण नाही. मसल टोन पूअर आसल्याने वजन उचलवत नाही. आधी स्क्वाट्स लंजेस सुरु करा मग वेट्स. मसल टोन सुधारल्यावर पाठदुखी सारखे त्रास कमी होतात,

योग्य डाएट घेतले की वजन कमी व्हायला सुरुवात होते., योग्य डायट म्हनजे केवळ ट्रॅडिशनल चौरस आहार नव्हे. वेट लॉस साठी योग्य आहार... ज्यात कॉम्प्लेक्स कार्ब्ज असतील. सिंपल कार्ब्ज नसतील. प्रोटिन फॅट्स फायबर्सचा बॅलन्स असेल.. आणि योग्य वेळी योग्य खाणे असेल.

माधुरी तुम्ही एक तासभर रोज चालताय ना.
जर इतका वेळ देऊ शकताय तर मी सुचवेन की जवळचा एखादा हास्ययोगा क्लब जॉईन करा. असाच निवडा जिथले योगगुरू सगळ्यांच्या गरजा समजून घेऊन योगासनं करून घेतात. मी नाशिक मध्ये ज्या हास्ययोगा क्लबला जाते तिथे सव्वा तास योगासनं + प्राणायाम आणि मग १५-२० मिनिट हास्य घेतात. माझ्या अनुभवानुसार हा स्लो बट स्टेडी उपाय आहे.
आपण जे खातो ते नीट पचावं यासाठी ताक, बडिशोप हे रोज आहारात असू द्या.
जर फार frustrate झाल्या असाल तर weight management drink एखादा महिनाभर घ्या.(मी कधीच नाही घेत. पण माझ्या वडिलांनी हर्बल लाईफ महिनाभर घेत्लं होतं, बराच फरक पडला )

डायेट चालु केले की आधी चेहराच बारीक होतो. खप्पड दिसतो , लोकं म्हणतात बारीक झालीस पण खाली काहीच फरक पडत नाही. थायज अन पेल्विक एरीयात खुप जाड आहे. >>>> हे मी बऱ्याच जणांच्या बाबतीत पाहिलं आहे.
माझ्या मैत्रिणीने किक बॉक्सिंग try करून पाहिलं होतं पण काहींच फरक पडला नव्हता.

ॠजुता दिवेकरांची पुस्तके वाचा . त्यांचे मला एक मत फार पटले. जे डायट नियंत्रण तुम्ही आयुष्यभर मेंटेन करू शकत नाही ते डायट घेऊ नका. नाही तर उतरलेले वजन ते डयट सुटल्यावर पुन्हा वाढते. रोजच्या च नेहमीच्या आहाराचेच टाईम शेड्युलिंग त्याणी सांगितल्याप्रमाणे केल्यास वजन निश्चित कमी होते आणि चेहर्‍याचा तजेला टिकून राहतो. डोन्ट लूज युअर माईन्ड लूज वेट हे त्यांचे पुस्तक सुंदर आहे. शिवाय यू टुबवर त्यांची मराठी व ईम्ग्रजी भाषणे आहेत ती पहावीत.

आणि हो स्पॉट रिडक्शनबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात तुम्हाला मिळतील Happy

जाता जाता....
शिरीष कणेकरांचे वडील डॉक्टर होते.एकदा कणेकर मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेना भेटायला गेले असता तिथे पोलीस महासंचालक श्री जोग त्याना भेटले. कणेकर आडनाव ऐकून त्यानी सहज डॉ कणेकर तुमचे कोण असे विचारले असता ते माझे वडील असे कणेकरानी सांगितले. त्यावर जोगानी त्याना सांगितले त्यांची शुगर वाढल्याने फार वर्षापूर्वी मी तुमच्या वडलाना भेटलो होतो . त्यानी मला विचारले की तुमचे कपडे कोण धुतो? त्यावर मी सांगितले नोकर धुतो . तेव्हा डॉ कणेकरांनी जोगाना सांगितले की आजपासून तुमचे कपडे तुम्ही स्वतः धुवायचे. तेव्हापासून मी आजपर्यन्त माझे कपडे धुतो आहे आणि मला कधी ही नन्तर सुगर डिटेक्ट झाली नाही. थोडक्यात, छोट्या छोट्या घरगुती अ‍ॅक्टीविटीज जर चालू ठेवल्यातर वजन ही कमी होते आणि सुगरही खर्च होते. ऋतुजाच्या पुस्तकातही शरीराच्या दिवसभराच्या अ‍ॅक्टीविटीबद्दल बरेच क्लिहिलेले आहे.

अरेच्चा, मला वाटायचे जिथे जास्त चरबी जमा होते त्या अवयवाचा खास व्यायाम केला तर त्या भागातली चरबी हळुहळु कमी होउ शकते.
उदा. मी बारीक, पण व्यायाम बंद झाला थोडे पोट सुटते पण पोटाचा व्यायाम केला की पुन्हा खाली जाते.
विचारुन पहा तज्ञाला.