डोबा पुरी

Submitted by सुलेखा on 23 August, 2016 - 04:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

डोबा पुरी हे नां व असले तरी प्रत्यक्षात तळणे नाही.पूर्वी बेकरी किंवा रेडिमेड पदार्थांचे प्रस्थ कमी होते तेव्हा प्रवासाला जाताना किंवा नाश्ता म्हणुन ही डोबा पुरी करायचे. डोबापुरी करताना ती जेव्हा भाजतात तेव्हा घरभर बेकरी सारखाच खमंग वास दरवळतो. आपल्याकडे जशी दशमी करतात तशीच थोड्याफार फरकाने ही डोबापुरी. करतात.
डोबापुरी साठी साहित्य :--\
२ कप कणीक
चवीपुरते मीठ
१ चमचा साखर
२ टेबलस्पून तूपाचे मोहन
पाऊण वाटी दूध व त्यानंतर लागेल तितके पाणी
१ चमचा तीळ

क्रमवार पाककृती: 

तूप व कणिक एकत्र मिसळुन घ्यावे.मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर १-१-१ मिनिट असे भाजुन घ्यावे.प्रत्येक १ मिनिटाने कणिक चमच्याने छान ढवळुन घ्यावी.किंवा गॅसवर पॅन मध्ये ही गुलाबीसर भाजुन घेता येईल.
भाजलेलीकणिक थंड करुन घ्यावी. मीठ्,साखर, दूधआणि लागेल तितके पाणी घालुन पिठाचा मऊसर गोळा भिजवुन घ्यावा.वरुन तेलाचा हात फिरवावा. १० मिनिटे हा गोळा मुरू द्यावा.
या गोळ्याच्या एकसारख्या लाट्या करुन घ्या.प्रत्येक लाटी वर थोडे तीळ लावुन हातानेदाबुन घ्या.
नेहमी पुरी लाटतो तितक्याच आकाराची पण दुप्पट जाड पुरी लाटायची. त्यावर सगळीकडे गोलाकार होईल असे खळगे एका बोटाने हळुवार दाबुन करा.अशा सगळ्या पुर्‍या तयार करा.DDDDDDD.jpg

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक-रंग रंगिलुगुजरात
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलेखाताई छान आहे रेसिपि.

सध्या फोटो लोड करण्याचे प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळे सुलेखाताईंनी फोटो टाकले नाहीत. फक्त फ्लिकरवरचे फोटो दिसताहेत. सुलेखाताई फ्लिकर डाउनलोड करुन त्यावरून अपलोड करा फोटो.

प्रकार एकदमच नविन आहे. इतकी वर्षे पाककलेत मुरलेल्या मला(म्हणजे मला तरी तस वाट्तय!) देखिल नविन आहे. छानच आहे.
१) या पुर्‍या/रोट्या तुप सोडुन भाजायच्या का?
आणि
2) खळगे आरपार करायचे का ?(थालिपीठासारखे?)

रोचिन दिब्बा रोटी चेच हेल्दी वर्जन आहे हे .!दिब्बा रोटीत मुटका वळेल इतके तुपाचे मोहन आणि भाजताना खळग्यातुन भरपुर तूप सोडुन जिरवायचे असते.
जागु,जमत नाहीये. तरीही खटपट चालु आहे.
दीपा, थालीपिठासारखे आरपार खळगे करायचे नाहीत.फक्त एकाच बाजुला , जिथे तीळ लावले आहेंत तिथेच करायचे.दोन्हीकडुन मंद आचेवर गुलाबीसर भाजुन घ्यायचे.तव्यावर एका वेळी तीन भाजता येतील.भाजुन झालेकि तव्यावरुन काढुन ,तीळ लावलेयाभागावर पातळ केलेले तुप अगदी कमीत कमी लावायचे.
इन्ना होय.घरगुती बेक्ड शंकरपाळ्या पण लहान पुरीच्या आकाराच्या आहेंत.
अशाच बारीक रवा भरपुर तुपाचे मोहन, दुध्,साखर्,किंचित मीठ घालुन भिजवुन जाड पुरीइतके लाटुनत्यावर टोचेमारुन भाजले कि घरगुती रोट तयार होतात. त्यात वेलची,/बदाम पुड/वनिला एसेन्स घालायचा.माझी आई शेगडीवर पुरणाच्या जाड तव्यावर करायची.