अनुबंध मैत्रीचे (भाग १)

Submitted by लाडू on 7 August, 2016 - 11:51

तनया घरी आली ती रडतच. डोक प्रचंड दुखत होत. मेंदू थकलेला. खूप जास्त विचार. आणि भावनिक ताण असह्य झालेला. बर कोणाला काही सांगाव तर काय सांगणार. घरी जाऊन झोपून जाव हेच बर. घरी गेल्या गेल्या पाहते तर अमृतने हा पसारा काढलेला. अख्ख्या बेडरूम मध्ये कपडेच कपडे. आता मात्र तिला स्वतःला सावरता आल नाही. 'अमृत काय हे? ही वेळ आहे का पसारा करायची? माणस दमून येतात घरी. घरीच असतोस रिकामटेकडा बसलेला तर सकाळपासून आटप ना ही फालतू काम. जरा घरात शांतपणे पडून रहाव तर जागा नाही दोन फूट पण.' आणि मग चक्क तिला रडूच आलं.
अमृत, तिचा लहान भाऊ मात्र पार भांबावून गेला. त्याला कळेचना की नेमकं काय झाल. कालपर्यंत तनयाच त्याच्या मागे लागली होती की पसारा आवर. उद्या आपण दोघ मिळून कपाट लावू. आणि आज काढलाय ती यायच्या वेळी पसारा तर हिच काहीतरी वेगळच. त्याने पटापट बेड वर जागा करून दिली तिला. पण तिचं लक्षच नव्हत. ती तोपर्यंत खिडकीत जाऊन बसली होती. शून्य नजरेने लांब बसलेला कावळा पाहत. तिला सांगायला त्याने तोंड उघडलंच की मी आवरलंय जमेल तेवढ. पण त्याला धीरच झाला नाही. तसाच तो बाहेर गेला. आणि मग थोड्या वेळात चक्क कॉफी घेऊन आला तिच्यासाठी. तिला आवडते तशी आणि ती त्याला नेहमी देते तशी कॉफी खूप प्रयत्न करूनही त्याला जमली नव्हती. पण तरीही याने ती थोडी शांत होईल हे मात्र त्याला कळल होत. ती अजूनही तिथेच होती. तिच्यासमोर कॉफी ठेऊन तो पाहत राहिला फक्त तिच्याकडे.आणि मग त्याला अपेक्षित होत ते घडलं.
तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि मग अर्ध त्याच्याशी आणि अर्ध स्वत:शीच बोलल्यासारखी म्हणाली, 'माझ्याच बाबतीत अस का होत नेहमी? इतका विचार करून, इतका वेळ घेऊन मी कोणाशी मैत्री केली तरी माणसं शेवटी अस का वागतात माझ्याशी? तुला माहितेय ना अमृत, माझ्या मैत्रीबद्दलच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. त्यात नाही फिट होत माणस जनरली. म्हणून हल्ली तर मैत्री सुद्धा करण सोडलं मी कोणाशी. आणि त्यानंतर मी कोणाला मित्र मानत असेन तर निदान त्याने तरी असं वागायला नको होत माझ्याशी.' तनयाच्या मैत्रीबद्दलच्या कल्पना जरा जास्तच भ्रामक आहेत हे अमृतला खूप आधीपासूनच माहित होते. पण आता त्यावरून वाद घालण म्हणजे तनयाला अजून रडवण झालं असतं. त्यामुळे आता काहीही वाटलं तरी तनयाच बरोबर अस मानायचं तर काहीतरी बर घडेल हेही त्याला सवयीचं होत.
'आता कोणी काय केल तुझ? आणि कोणाशी भांडलीस तू?' तनया सहसा कोणाशी भांडत नसे. दोन माणस वगळून. एक म्हणजे अमृत आणि दुसरा कैवल्य. तिचा प्रियकर. कैवल्यशी भांडून ती रडत असेल तर अमृतसाठी त्यात नवल काहीच नव्हत. त्यांचं रोजचं भांडण ऐकण आणि मग शेवटी कसला गोड आहे ना माझा कैवल्य अस वरून ऐकून घेण अमृतच्या बेडटाईम स्टोरीज चा भाग झाल होत हल्ली. पण आज तसं काही वाटत नव्हत. आणि मी त्यांच्याशीच भांडते ज्यांना मी माझी हक्काची माणस समजते. हे असल तनयाचं अशक्य लॉजिक वापरून अंदाज बांधला तर गोष्ट सिरिअस होती. कोणीतरी तिचं अजून एक जवळचं माणूस झाल होत आणि त्यात जर तो कोणी मुलगा असेल तर कैवल्य असताना ही फारशी चांगली गोष्ट नव्हती.
“तनया काय विचारतोय मी? कोणाबद्दल बोलतेयस? कैवल्यशी भांडलीस का पुन्हा? मी चोप देऊन येऊ का त्याला एकदा ? पुन्हा माझ्या गरीब बिचाऱ्या बहिणीला आयुष्यात काही बोलणार नाही तो मग.” अमृतने नेहमीचा जोक ट्राय केला. वातावरण थोडं निवळेल असं वाटलं त्याला पण कसलं काय. “अमृत तुला गम्मत सुचतेय? तर चालता हो इथून. कैवल्यशी का भांडेन मी? मी तन्मयशी भांडलेय. any problem?” “हम्म” अमृतला कदाचित हेच ऐकायचं नव्हत आता.
का कोण जाणे त्याला तनया आणि तन्मयची मैत्री कधीच आवडली नव्हती. तन्मय - तनया मित्र मानते त्याला. कुठल्याशा सेमिनार मध्ये भेटला तिला. एकदाच. आणि गेल्याच वर्षी. पण तनया हल्ली त्याच्याच बद्दल दिवस दिवस बोलत असते. दोघे दिवसभर ऑनलाईन बोलत असतात. अमृतला हे कायमच खटकत होत. तसे तनयाचे बरेच मित्र होते. आणि त्याबद्दल अमृतला काहीच त्रास नव्हता. तस तर अमृतला त्रास कसलाच नव्हता. पण तनयाच्या बाबतीत तो जरा जास्तच हळवा होता. पुढे जाऊन तिला कसलाही त्रास कधीही होऊ नये अस त्याच म्हणण होत. आता हा विषयच नव्हता पण. आता त्याला हे जाणून घ्यायचं होत की अस नेमकं काय झालं की तनया रडतेय तेही तन्मयमुळे.
“तनया, अग बोलशील का काय झालंय ते.” “'काही नाही”, तनया चा रोजचा रिप्लाय. अमृतला कळतच नव्हत की काय करावं. तनयाला आता आपल्याशी बोलायचय हे त्याला कळत होत. पण स्वत: तिला विचारून तिची चिडचिड वाढेल अस त्याला काही करायच नव्हत. मग थोड्या वेळाने ती स्वत:च स्वत:शी म्हनाल्यासार्ख पुटपुटली,'तू तर आधीच म्हणाला होतास ना, तन्मयपासून लांब राहा, ऑनलाइन झालेल्या मैत्रीत इतकं गुरफटण चांगल नाही. तेव्हा तर मी नाही ऐकल तुझ. तूच म्हणाला होतास, नंतर काही झाल तर मला सांगू नकोस. मग आता का आणि काय ऐकायचय तुला?' अमृत यावर काहीच म्हणाला नाही. तनयाला सध्या तिची चूक कळलीय इतकं बास आहे अस वाटून तो तनयाने आणखी काही बोलण्याची वाट पाहत राहिला.
बराच वेळ कोणीच काहीच बोलल नाही. मग न राहवून अमृत स्वतःच म्हणाला, "तनया मान्य आहे मी अस म्हणालो होतो. पण तूच म्हणतेस न, माणस ओळखण्यात तुझी कधीच चूक होत नाही." "चूक नाहीच झालीय माझी अमृत" ताडकन तनया म्हणाली."मी कधीच चुकू नाही शकत निदान या बाबतीत. माझ मन मला चुकीचा सिग्नल देतच नाही कधी. आताच एकाच माणसासाठी ते का चुकेल सांग मला." तनया पुढे काहीच बोलली नाही. तिच्या आणि तन्मयच्या मैत्रीत प्रॉब्लेम झाला होता खरा. पण नेमक काय झालंय हे कोणी समजून घेईल अस तिला नव्हत वाटत. ज्याला आपल्याला काय म्हणायचय हे कमीतकमी शब्दात समजतं, त्याच्याशीच भांडलोय आपण आज हे हि तिला कळत होत. कधीकधी तर फक्त तिच्या मेसेज करण्याच्या पद्धतीवरून तो सांगू शकायचा कि तीच काय बिनसलय. "शी किती प्रेडिक्टेबल आहोत आपण, की कोणीही आपल्या मनात काय आहे ते सांगू शकतो?..." "नाही कोणीही नाही. फक्त तन्मय. बाकी सगळ्यांना सगळच सांगाव लागत." "पण माझीच चूक आहे ना. मलाच सवय झाली आहे, सगळे प्रॉब्लेम त्याला सांगायची. हा तन्मय मला जेमतेम एका वर्षापूर्वी भेटला. त्याआधी पण मला प्रॉब्लेम होतेच की. आपले आपणच सोडवले ना. मग हल्लीच इतकी का गरज लागते मला त्याच्याशी बोलण्याची? त्याचा सल्ला घेण्याची? का उलगडते मी माझ आयुष्य त्याच्यासमोर? आणि अस काय ग्रेट काम केलंय याने?आपले चार दोन प्रश्न सोडवले तर फार शहाणा झाला का? एक गोष्ट नक्की आता इथून मागे फिरणं नाही. आजपासून त्याचा माझा संबंध संपला. एक ही मेसेज करणार नाहीये मी त्याला. किंवा कॉल. समजतो काय तो स्वत:ला. वर मलाच विचारतो माझ काय चुकलं. आणि वरून तर काय म्हणे त्याला नाती जपायला आवडतात. ही अशी? आताही त्याला हेच वाटतंय की त्याचं अजिबात चुकल नाहीये. हा तर कळस आहे हटवादीपणाचा. आणि तो एक हट्टी असेल तर मी दहा हट्टी. माझं ही नाहीच चुकलंय. जाऊ दे खड्ड्यात मैत्री." तनयाची अशक्य चिडचिड होत होती स्वत:शीच.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडे पॅराग्राफ्स पाडा, वाचायला सुटसुटीत पडेल, पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!!