शैक्षणिक कर्ज- माहिती हवी आहे.

Submitted by संशोधक on 2 August, 2016 - 02:49

शैक्षणिक कर्ज काढण्यासाठी काय करावे लागते?
तसेच पात्रतेचे निकष, नियम व अटी याची माहिती हवी आहे.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे एका माहितीतल्या मुलीसाठी कॉमॅास मध्ये चौकशी केली होती. पण फक्त मास्टर करायचं असेल तर ही बँक कर्ज देते .

पण कॅनरा बँकेत काम झाले.
Loan has been sanctioned for bachelor degree, Jointly in name of Parent and student. Sanction receive along with fees and educational accessories for example laptop..etc

डॉकयुमेंंटस :
1.Last years Form 16
2.Receipt of college for fees paid

firstly student has to pay fees and present इत to bank. Then bank pays to college and college reimburses the same to student.

1st installment is payable to bank after 3 years.

तेच लिहायला आले होते. एच डी एफ् सी बँकेत योजना आहे ती चांगली आहे. महाराषट्र बँकेची पण योजना आहे. बहुत करून सर्व नॅशनलाइज्ड बँकांच्या योजना आहेत. थोडा सीड मनी लागू शकेल.

https://www.bankbazaar.com/education-loan.html इथे तुलना करता येइल.

जर आपल्याला एडुकेशन लोण घ्यावयाचे असेल तर..खालील गोष्टी विचारात घेतल्या जातात..

1) कुठल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेणार आहे...
2) जर तो PG किंव्हा gradu आहे..
3) गॅरेंटर कोण आहे, त्याचा वेवसाय काय आहे.त्याच्याकडे IT रिटर्न आहेत का?

फायदा
1) शिक्षणाच्या कालावधीत मुद्दल पे करायला लागत नाही..
2) शिक्षण संपल्यानांत नोकरी लागल्यावर किंवा 6 महिने या पैकी जे पहिल्यादा पूर्ण होईल त्यावेळीपासून मुद्दल परतफेड चालू होते.

तोटे
1)व्याजदर खूप जास्त आहे
2) पहिल्यांदा फी आपल्याला पे करावयास लागते जर डोमेस्टिक असेल तर.. इंटरनॅशनल जर असेल तर partial payment करावे लागते..

जर ईबीसी सवलत मिळणार असेल तर मिळणा-या कर्जावर किंवा त्याच्या व्याजावर काही फरक पडतो का?>>>> नाही education लोन करताना बँक फी डिमांड लेटर मागते त्यावर किती कर्ज देणार हे ठरते..

क्रेडिला ही कंपनी पण शैक्षणिक कर्ज देते. ती HDFC ची कंपनी आहे.तिथेही चॉऊईकशी करू शकता>>>> हि intermeditary आहे.. ती समोरची इन्स्टिट्यूशन खरोखरच चांगली आहे का?? आणि व्यक्ती जेनुइन आहे का याचा अभ्यास करते..

धन्यवाद!
बॅंक ऑफ महाराष्ट्र मधून लोन घेण्याचे ठरवले आहे. बँकेने फी भरलेली पावती आणि फी स्ट्रक्चर आणावयास सांगितले होते. त्यानुसार ती कागदपत्रे मिळवली आहेत.