खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिर्षक गीत creative होत, छान होत. नेहमीसारखे हिरो-हिरोइनचे posters नाही दाखवले गाण्यात. Sand Art चा वापर छान केला होता. + १११११

सुलू +१.

शिरेलीची टॅग लाईन काय तर 'काही नात्यांना नाव नसते' पण मानसी तर त्याची मेव्हणी लागते ना?? मग नात्याला नाव का नाही??
पहिलाच भाग पाहिल्यावर तर दाखवलेले प्रोमो आणि शिरेल यांचा काहीच संबंध नव्हता असंच दिसतंय.

देशपांडे आजोबा नातीच्या आई-वडीलांच्या फोटोला नमस्कार करायला नवदांपत्याला नेतात आणि सांगतात काय तर- ' मुलीला श्रीमंत घर मिळावं अशीच तुमची ईच्छा होती ती सफल झालीय !' . मग नवर्‍या मुलाचं हॉस्पिटल आहे, औषधाचं दुकान आहे, शेती आहे इ.इ.तपशीलही भरीला घालतात. पण नवरा मुलगा सुविद्य आहे, गुणी आहे याचा उल्लेखही नाही ! >>>> मला तो सीन इमोशनल न वाटता विनोदी वाटत होता. ऐन लग्नाच्या वेळी अशी रडारड! Uhoh

ओवाळताना निरंजन विझणे, तेंहीं तीन-तीनदां, हें तर फारच सवंग वाटलं;>>> मला आधी वाटल,शशीकलाताई मुद्दामहून दिव्याला फुन्कर मारतात की काय?

हिरॉईनची एंट्रीची हेअरस्टाईल, मेक-अप, गेट-अप भीषण वाटला मला..>>>> सहमत

बहिणी-बहिणींचा साड्यांचा सीन बघुन मला वाटल की सेम साड्यांमुळे चुकुन दुसरीच्या गळ्यात माळ घालणार असे काहीतरी असेल >>> Rofl

काल्च्या भागावरुन तरी उषाताईंची आजी नेहमी प्रमाणे तोंडाचा पट्टा सोडणारी आजी असेल असेच वाटते. गाडीला हार घालायला सजवायला दोरा कमी पडला अस तो कोणी सांगतो तर आजीबाई म्हणतात तुझ्या पॅटची नाडी वापर >>>> आल्या आल्या सिक्सर मारला उषा नाडकर्णीने.:हाहा:

आणि त्याची वहिनी ...ती एक धागा सुखाचा मधली कस्तुरी ना?>>> या सुखानो या होती ती सिरीयल. तिथे ती ऐश्वर्या नारकरची धाकटी जाऊ झाली होती. ह्या सिरीयलमध्ये तीचे प्रमोशन झाले. Happy

शिरेलीची टॅग लाईन काय तर 'काही नात्यांना नाव नसते' पण मानसी तर त्याची मेव्हणी लागते ना?? मग नात्याला नाव का नाही?? >>>> ते नात जगाला दाखवण्यासाठी. पण खर नात काही वेगळच!

पहिलाच भाग पाहिल्यावर तर दाखवलेले प्रोमो आणि शिरेल यांचा काहीच संबंध नव्हता असंच दिसतंय.>>> जनरली असेच होते बर्याच सिरीयलबाबत, प्रोमो वेगळा असतो,पण सिरीयल सुरु झाल्यावर स्टोरी भलतीच निघते.

काल मी जरा उशीरा लावली त्यामुळे शीर्षकगीत नाही बघता आलं, आज केवळ ते बघण्यासाठी लावलं. मस्त आहे शीर्षकगीत आणि sand-art चित्रकथा. मग मालिका मात्र नाही बघितली.

ह्या दोघी सक्ख्या बहिणी असतात ना.. मग इतक्या सेम रंगसंगतीच्या साड्या कशा काय नेसतात एका वेळी ? जनरली कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमात आपण किती बारकाईनं प्लॅनिंग करतो कपडे वगैरे चं.. लग्न लागायच्या वेळी पण दोघींच्या सेम आंबा कलर साड्या .. काहीच को-ऑर्डिनेशन नाही बाई.. Proud

सिरियल सुरू होताच सालं काढायला सुरू का? Rofl

मला हिरॉईन अजिबात आवडली नाही. किती वसवस करत होती आजीवर Uhoh
आणि हिरो, दुधभात भेंडीची भाजी त्याला अर्ध्या मिरचीची फोडणी = बु ळ च ट

तसही हिरविणी नेहमी सज्जन, सोज्वळ वगेरे वगेरे असतात Wink अश्या वसवस करणार्या नसतात. मोठ्यांचा मान ठेवतात.

Dhanya ahet mabokar.......ekahi episode pahila nai ajun pan ya comments vachun sagli story kalali ....all comments +१११११११..ata nakkich nai bagnar..tya velat jevan ataple ki ahech mg aple Shivji .. Happy

कालच्या भागात काय झालं पण ?????
ते भेंडिची भाजी [इति दक्षिणा ;)] आत्याला सांगतं का?? हिरविण बरी आहे, पण अ‍ॅक्टिंग च्या नावाने आत्ता तरी बोंब दिसते, भेंभा आणि हिरविण पेक्षा बाकी पब्लिक च भाव खाउन जाणार शिरेलीत Lol

विक्रांतपण गायनॅकच दाखवला आहे. मला झेपलाच नाहीये तो हिरो म्हणुन.

बादवे थंडाक्का गौरी नंतर थंडोबा मिळाल्याच लक्षात नाही आल का कोणाच्या? सगळे डायलॉग्ज चेहर्‍यावर "उद्या आलीय जगबुडी अजुन केवढ काय काय करायच आहे मला" असे भाव घेउन म्हणत असतो.

लोकेश गुप्तेला बघुन डोळे निवले..

अश्या वसवस करणार्या नसतात. (अपवाद: कादिप ची गौरी ) >>>> सुलु, ती फक्त शिववरच वसवसत होती. त्यांच्या अम्मा-बाबुजींवर किंवा स्वतःच्या आई-वडीलांवरसुद्धा वसवसली नाही कधी ती. त्यामुळे ती पण गुळचटच....

त्यांच्या अम्मा-बाबुजींवर>>>> हो पण, ती अम्मा-बाबुजी विषयी आई-वडीलान्कडे बोलताना कधी कधी तिरकस बोलते. त्यादिवशी नाही का म्हणाली ती, की अम्माने केलेले जेवण ठिकच आहे.

पहिलाच भाग पाहिल्यावर तर दाखवलेले प्रोमो आणि शिरेल यांचा काहीच संबंध नव्हता असंच दिसतंय.>>> जनरली असेच होते बर्याच सिरीयलबाबत, प्रोमो वेगळा असतो,पण सिरीयल सुरु झाल्यावर स्टोरी भलतीच निघते.>>

ते झी वालयाच नेहमीच आहे म्हणजे जाहिरातीत डाल-फ्राय्,पनिर-माखणी ,तन्दुरी रोटी टाइप आश्वासन पण शेवटी ढुळुक पाणि, जळलेले फुलके वाढायचे.

<< पहिलाच भाग पाहिल्यावर तर दाखवलेले प्रोमो आणि शिरेल यांचा काहीच संबंध नव्हता असंच दिसतंय.>>> तसं नसावं, असं वाटतं. थोडं थांबून मगच खात्रीपूर्वक असं म्हणतां येईल. [ फक्त, मोठ्या बहिणीकडून गाडी धाकट्या बहीणीच्या रुळावर कां व कशी येते , तें वास्तवाला धरून आहे कीं हास्यास्पद हे बघूंया ! ]

काल रिसेप्शनच्या वेळी पण "ते आले आले " झालं !
परत मोनिका आणि मैत्रिणीनी मागे वळून बघितलं , त्याच स्टाईलमध्ये - जणू काही ह्रि.रो . येतोय . पण अवघडलेल्या चालीने विक्रांत आला.
आणि रिसेप्शन्च्या वेळी नवरी अगोदरच तयार होउन स्टेजवर नवर्याची वाट बघत होती.

विक्रांत म्हणत होता ," असं सगळं असूनही तिच्या बिनधास्त वागण्याचा मला त्रास होतोय . "
मला तर हे सगळ माहित नसतं तरी तिच्या वागण्याचा त्रास झाला असता . किती आगावू आणि नाटकी वागत होती ती.

आणि मानसी - एअर हॉस्टेस च्या अवतारात का होती ? फक्त कानातले झूमके जरा जास्तच मोठे होते.
ती पण डॉ आहे का ? की ठोकळी ? बर नाही वाटलं म्हणून कुठलीतरी गोळी दिली बहिणीला.

आता बहुतेक विक्रांत आणि मोनिका मध्ये ,लग्न झाल, तरी नवरा बायको च नात नसणार .
तो मानसी च्या प्रेमात पडणार . पण घरच्यांमुळे त्यान्च चोरी चोरी चुपके चालु राहिलं .

खरतर त्या मोनिका आणि मानसी पेक्शा , शर्वरीच छान दिसते .
एक्दम रॉयल .

नायिका सुंदर वाटली, झी ची ही नायिकाही आवडली बरका....
माझ्या या वरील मताशी ( म्हणजे नायिका सुंदर आहे या मताशी Wink ) लिंबी अज्जिबात सहमत नाही...... Proud
(सुंदर नायिकांबाबत झीवाले नशिबवान आहेत..... आता ती अ‍ॅक्टिंग करते वा नाही ते नंतर बघुन ठरवू....)

तुम्ही नेहमी प्रत्येक झीहिरवणीची तारीफ कराल सुंदर सुंदर म्हणुन तर लिंबीकाकी कशा काय सहमत होणार. Happy

मला हिरो चांगला वाटला.

प्राजक्ता....माझाही भ्रमनिरास झाला. खरं तर "प्रोमो" म्हणजे, हा सीन पुढे कधीतरी दाखविण्यात येईल असा माझा समज होता , पण तो बर्‍याच मालिकांनी खोटा ठरविला. वैभव लक्ष्मी मधे तो एके व लक्ष्मीचा "चहात साखरच नाहीये" चा प्रोमो....पुढे आलाच नाही. नांदा सौख्य भरे मधेही "नात्यात खोट नसली की.." असं काहीतरी असणारा प्रोमो होता....पुढे नंदी ची पा र च रया गेली व कथा भरकटली त्यात तो लुप्त झाला, हे अलाहिदा. !!
Happy "जय मल्हार" चे प्रोमोज काय होते , होते तरी का... ह्या गोष्टी आता ऐतिहासिक दस्तावेज आहेत !

थोडक्यात "झी" ला आपण आधी काय कमिट केले होते याचा विसर पडतो हे नक्की.

Pages