खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियु Rofl

मयूरीचे, आशूतोष भाकरेशी बहुतेक लग्न झालयं. ती डाॅ. प्रकाश बााबा आमटे ह्या चित्रपटात पण होती.

ही सध्या प्लेझंट सरप्राईज नाटकात काम करतेय, सौरभ गोखले आणि प्राजक्ता माळीबरोबर. वेणूपण (समीर खांडेकर) आहे त्या नाटकात.

नाही, दुसर्‍या फोटोत साई नाहीये.

काल प्रोमो पाहिला. हिराॅईन आवडली, दिसतेय तरी छान.

याच्यात साई बहुतेक गरीब, स्ट्रगलर वगैरे दाखवला असावा असं वाटतंय त्याच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीवरुन.

हो त्या साई प्रसाद च बोलणं / उच्चार मात्र भयाण होत कारे दुरावा मध्ये. अशुद्ध उच्चार.
पण तो काम चांगलं करेल असं वाटत . मेन रोल मिळालाय ना Happy

मग साई पेक्षा कोण त्या आशुतोष भाकरेलाच द्यायचा नं रोल.....स्मार्ट दिसतोय >> स्मार्ट हिरो नको असेल त्यांना. Wink

आपल्याला काय, सगळे सारखेच!!>> शिव आणि उका सोडून. Happy

याच्यात साई बहुतेक गरीब, स्ट्रगलर वगैरे दाखवला असावा असं वाटतंय त्याच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीवरुन.>>>> प्रोमोवरुन कथेचा थोडाफार अन्दाज येतोच. नायक गरीब असतो,नायिका श्रीमन्त असेल. सो, तो गरीब असल्याकारणाने तिला त्याच्याशी लग्न करायची लाज वाटत असेल. status problem असेल. ते भेन्डीच्या टोपलीत गुलाब दाखवलेय प्रोमोत म्हणजे असेच काहीतरी असेल.

प्रोमोवरुन कथेचा थोडाफार अन्दाज येतोच. नायक गरीब असतो,नायिका श्रीमन्त असेल. > ? एका प्रोमोत तर नायक मस्त गाडीतून लिफ्ट देतो तिला.

मला कथानक "मै प्रेम की दिवानी हू" सारख वाटतयं. तिच लग्न ठरलय वेगळ्याशी आणि जिकडे तिकडे मदतीला हा येतोय.

गाडीतून लिफ्ट दिल्याचा प्रोमो मी तर नाही बघितला बुआ.. सारखं आपलं ते " ही रिंग छान आहे नं..?" " हो मलापण हीच आवडलीये", "थोडी लूज होईल का?"......"सर तुम्ही ट्राय का नाही करुन बघत?" ..... हेच दळण चालूय.!!!!
Happy

Pages