वाढदिवस थिम

Submitted by _आनंदी_ on 5 July, 2016 - 04:47

मुलीचा चौथा वाढदिवस आहे..

काहीतरी थिम ठेवायची आहे
तिच्या मैत्रिणीचा आत्ताच वाढदिवस झाला त्यानी जंगल थिम ठेवली होती .. छान प्राणी झाड वेली पक्षी ई मिळुन घरच्या घरी छान डेकोरेशन केले होते...

मुलीला पण खुप काही कराव आपल्या बड्डे ला अस वाटत आहे...

खालिल थिम नेटवर मिळाल्या... पण लक्षात आल की मराठी/ भारतिय अशा थिम्स जास्त नाहित

Frozen
princess
circus
Snowman
color
rainbow
Barbie
Cindrella
butterfly garden

असो मदत करा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅक्वा थीम छान आहे.
समुद्र, मासे, जलचर, ऑक्टोपस, सी हॉर्स, निळे- हिरवे कलर्स, बर्थ डे गर्ल ला मरमेड चा पोषाख.

खाऊ पण सी वीड, फीश फ्राय, असा...किंवा शाकाहारी असेल तर माशांच्या आकाराची बिस्कीटे, कासवाच्या आकाराची केक्स- कुराकाव सरबत..

तुमची मुलगी गर्ली गर्ल असेल तर या वयात जनरली बार्बी आणि प्रिन्सेस ,ड्रेस-अप याची खूप आवड असते त्यामुले ती थिम ठेवता आली तर बघा.
बार्बी केक, तिच्या आव्डैच्या प्रिन्सेस ,बार्बीचा कटआउट ने डेकोरेट करता येइल, मुलिना वॅन्ड्स, डोक्याच्या पिना,हेअरबेल्ट,गळ्यातल्या माळा अस गुडि बॅग मधे देता येइल. सगळ्याकडे असल्यास ड्रेस घालुन यायला सान्गा.
सगल्याच प्रिन्सेस!

माझ्या बहिणीने यंदा भाच्याच्या वाढदिवसाला जंगल थीम ठेवली होती. मुलांना गालावर हातावर वैगरे भिल्ल लोकांसारखे पट्टे काढले होते. त्यासाठी तिने बीट आणि हळदिचे कलर्स केले होते. फोटो जमल्यास टाकेन. मुलांनी खूप एन्जोय केले.

सगळ्याना धन्यवाद..
बटर्फ्लाय थिम ठेवलि होती..

मधे एक बटर्फ्लाय लावुन कडेला क्रेप पेपर च डेकोरशन केल होत एका
भिंती वर

बाकी एक untumble.com म्हणुन वेब्साईट आहे त्या वरुन मास्क, रिस्ट बँड मागवले होते बटर्फ्लाय चे..
मधे वॉल वर लावलेला बटर्फ्लाय पन तिथुनच मागवला होता..
क्वालिटी मस्त होती..

अजुन झेब्रा बंबल बी, हत्ती अ‍ॅ चे पोस्ट्र पण मागवले मागे दुसर्या भिंती वर मागे लावले होते..
बाकी बॉक्स मागवले होते त्यात एक समोसा, चिप्स आणि एक ढोकळा आणि केक ...आणि मँगो ड्रिंक ट्रॉपिकाना च

तो मागवलेला बटर्फ्लाय आणि इतर गोष्टी घरी लावल्या आहेत..
क्वालिटी खरच मस्त..

त्या साईट वर सगळ्या थिम्स वर सप्लाय आहे.. आणि स्वस्त पण..
त्यात ही वेगवेगळ्या पोस्टर चे साईझ चूझ करायचा पण ऑप्शन आहे..अगदी १ फिट पासुन पुढे..

मस्तच _आनंदी_..
या धाग्यावर आधी लिहीलं नव्हतं कारण थीम बड्डेचा अनुभव नव्हता.
तुमच्या थीम चे फोटो शेअर करा जमल्यास >> +१

दोन वर्षांपूर्वी माझ्या मुलीच्या वाढदिवसाला 'पिंक अ‍ॅण्ड पर्पल' थीम ठेवली होती.
पिंक्/पर्पल रंगाचे कपडे सगळ्यांनी घातले होते.
ब्लुबेरी क्र्श दिले सगळ्यांना आल्याआल्या. कोकम सरबतही ठेवले होते.
पिंक रंगाच्या चार्टपेपरचे कोन बनवून त्यातून पॉप्कॉर्न्स दिले सगळ्यांना.
सर्व्हिंग प्लेटसना पिंक्/पर्पल रंगाच्या कागद गुंडाळला होता. फुगेही याच दोन रंगांचे लावले होते.
बड्डे कॅप्स, प्लेटस, बाऊल्स, पेपर नॅपकीन्स पण याच रंगांचे.
मुलांना पिंक्/पर्पल रंगांची लॉलीपॉप्स दिली. केकही याच रंगांचा होता.
मुलांना रिटर्न गिफ्ट म्हणून पिंक कलरचे छोटे प्रिन्सेस प्रिंटचे पंखे आणि पर्पल कलरचे पाऊचेस (पाऊचेस पिंक रंगाच्या कागदात पॅक केले होते.) दिले.

जिथे राहत होतो, त्या छोट्याश्या गावात जेजे उपलब्ध होते त्याप्रमाणे बेत ठरवला. मुलगी आणि तिच्या मैत्रिणी खूप खुश झाल्या.

Pages