वाढदिवस थिम

Submitted by _आनंदी_ on 5 July, 2016 - 04:47

मुलीचा चौथा वाढदिवस आहे..

काहीतरी थिम ठेवायची आहे
तिच्या मैत्रिणीचा आत्ताच वाढदिवस झाला त्यानी जंगल थिम ठेवली होती .. छान प्राणी झाड वेली पक्षी ई मिळुन घरच्या घरी छान डेकोरेशन केले होते...

मुलीला पण खुप काही कराव आपल्या बड्डे ला अस वाटत आहे...

खालिल थिम नेटवर मिळाल्या... पण लक्षात आल की मराठी/ भारतिय अशा थिम्स जास्त नाहित

Frozen
princess
circus
Snowman
color
rainbow
Barbie
Cindrella
butterfly garden

असो मदत करा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलीला कोणते कॅरॅक्टर्स आवडतात का? किंवा कोणती पुस्तके? तुम्ही दिलेल्या थीम्समध्ये खरंतर अभारतीय काहीच नाही :), सगळीकडच्या मुलांच्या आवडी निवडी हया वयात थोड्याफार फरकाने सेमच असतात असा माझा समज आहे. बाहेर पाऊस कोसळत असताना आत सुद्धा पाऊस नको, असं मला वाटतंय. त्यापेक्षा वेगवेगळे खेळ अरेंज करा, त्यासाठी लागणार्‍या गोष्टी घरी बनवा. मुलांना खूप मजा येते. मागच्या वर्षी मी माझ्या मुलाच्या वाढदिवसाला जंगल थीमच ठेवली होती. त्यासाठी नेटवरून शोधून सिंह, हत्ती, माकड एका मोठ्या कार्डबोर्डवर रंगवले होते. सिंहाची फक्त आयाळ रंगवली होती. चेहर्‍याचा गोल भाग कापला होता. त्यातून मुलांना डोके बाहेर काढता येत होते. असं काही करता आले तर बघा Happy

ओके खरतर जंगल थिम खुप छान आहे..
पण तिच्या मैत्रिणीकडे आत्तच ती थिम झाल्यामुळेनाही घेता येणार..

बटरफ्लाय थिम विचार करते .

म्हणजे बटरफ्लाय गार्डन... फुलं ई . बघु विचार करते अजुन

..

Barbie or princess theme - buy fashion tiara for all girls and boys can be pirates . birthday girl gets more elegant tiara and decoration could be stars and moons and sparkles and clouds.

माझे मत प्रिन्सेस थीम. बार्बीचा फर्स्ट क्लास केक मिळतो.

गुलाबी मस्त गाउन आणायचा वाढदिवसाचा ड्रेस. विविआनात क्लेअर म्हणून आहे तिथे मुगुट वगैरे सर्व मिळेल. परि राणीचा ड्रेस पण येतो विंग्ज वगैरे. सर्व मैत्रिणी त्यानुसार स्वतःच प्रिन्सेस बनून येउ शकतात. घरी बार्बीचे घर असल्यास ते पण सजावट म्हणून ठेवता येते एका बाजूला गौर ठेवल्यासारखे.
धमाल.

मी बटर फ्लाय ड्रेस पण एका फॅन्सी ड्रेसला केला होता लै सोपा आहे.

बार्बीथीम साठी... अमॅझॉन ला पार्टी साठी टोप्या, मास्क, रिस्ट्बेल्ट्स, क्राऊन्स आहेत... आणि रिटर्न गिफ्ट्स पण मस्त आहेत... डिस्पोझेबल प्लेट्स आणि ग्लास पण थीम नुसार मिळतात...

छान पैकी छोटा भीम किंवा मोटू पतलू ची थीम ठेवा.
मुलींना परकर पोलका(तो नसल्यास लॉंग स्कर्ट्/मुलांना घरात असलेल्या साहित्यात मॅनेज करुन धोती/कुर्ता)
स्नॅक्स म्हणून लड्डू.
एक छोटा भीम क्विझ.विनर ला राजा इंद्रवर्मा चा क्राऊन आणि भारी गिफ्ट.

डिस्पोझेबल प्रॉप वर जास्त पैसे घालू नका(उदा बर्थडे कॅप आणि मास्क) त्याऐवजी काही उपयोगी वस्तू देता आल्या तर बघा.
रिटर्न गिफ्ट प्रत्येकाला छोट्या सुंदर कुंडीत कढिपत्ता किंवा वाढवायला सोपा फुलाचा प्लँट.

या बर्थडे कॅप वगैरे वस्तू एक्तर ज्याच्याकडे जातील तिथे किंवा पार्टी देणार्‍याकडे प्रचंड कचरा निर्माण करतात.सुंदर दिसल्याने धड फेकवत नाहीत आणि थोड्या जरी चुरगळल्या तर परत वापरता येत नाहीत.
रिटर्न गिफ्ट ला सारख्या किंमतीच्या वस्तूंचे पॉट लकी ड्रॉ करता येईल.
खाण्यात चॉइस मात्र अ जि बा त नकोत(उदा चॉकलेट किंवा वेफर्स चे वेगवेगळे फ्लेवर), मुलांना सगळ्याना आपण कमीत कमी प्रमाणात आणलेला ब्रँडच हवा असतो.
मुलांची खूप व्हेरिड रेंज नको.गोंधळाने अगदी लहान मुलं घाबरतात.

जी थीम असेल त्याच विषयावरचे एखादे लहान मुलांचे पुस्तक अथवा बोर्ड गेम रिटर्न गिफ्ट म्हणून देता येइल.

मुलांसाठी बड्डेपार्टी म्हणजे मज्जा हे समीकरण असतं. त्यांच्या आनंदाला कडिपत्त्याच्या आदर्शवादात मारू नका प्लीजच.

४ वर्षे वयाला विमान थीम बेस्ट. खोटे खोटे सीटबेल्ट लावून खुर्चीवर बसवून ठेवावे. पूर्ण खाऊन झाल्याशिवाय उठायचे नाही. Wink

मुलांसाठी बड्डेपार्टी म्हणजे मज्जा हे समीकरण असतं. त्यांच्या आनंदाला कडिपत्त्याच्या आदर्शवादात मारू नका प्लीजच.>>>>+11111

ओ आम्ही काही कडीपत्ता देऊन सूतक पाळा असं म्हणत नाहीय, ज्या गोष्टीचा नंतर घरात 'आवरण्याचा पसारा' हां एकमेव उपयोग होतो त्यान्च्या ऐवजी जरा यूजेबल वस्तू दया इतकंच म्हणत होते, धागाकर्तीने आयड्या विचारल्या त्यात आम्हा कडीपत्ता आदर्शवाद्यांचे उगी चार आणे.
खर्च आणि मजा सोडून वलकलं नेसून बसा असं म्हटलेलं नाही.एकाच प्रकारच्या त्याच त्या बार्बी थीम आणि इतर हव्या असतील तर धागाकर्तीने गूगल केलं असतं, इथे पोस्ट टाकली नसती.
असो, चालूदया तुमचं.

ज्यांचे वाढदिवस कोणी साजरे करत नाही त्यांचे वाढदिवस त्याच दिवशी साजरे करा. सगळ्यात मस्त थीम!

(अशी मुले व मुली मी सांगू शकतो, पण फक्त पुणे जिल्ह्यापुरती)

मराठी संकल्पना पाहिजे असेल तर मावळे , खोट्या तलवारी , जिरेटोप अशी वेषभूषा करा . मातीचे किल्ले करवून घ्या सर्व मुलांकडून. मग प्रत्येक पाहुण्याला तो किल्ला, त्याच्यावर लावायला गवत, अळीव, मेथी अशा बिया द्या. घरी जाऊन किल्ल्यावर हिरवळ उगवायचा प्रयोग करु शकतात.

मुलांकरता मोठे चौकोनी रुमाल आणि मुलींकरता दुपट्टे घेऊन पारंपारिक कोळी वेषभूषा करा. भिंतीवर कागद चिकटवून होड्या, माशांची जाळी असा देखावा करा . रंगीबेरंगी कागद , खडू घेऊन माशांची चित्रे, इतर जलचर ( खेकडे, ऑ़क्टॉपस , स्टार फिश ) बनवून घ्या मुलांकडून. प्रत्येक मुलाला आपापली कलाकृती लावण्यासाठी एक फ्रेम किंवा शॅडो बॉक्स द्या .

paper fish craft for preschoolers असे शोधल्यास अनेक उदाहरणे मिळतील

कोळी वेशभूषा थीम चांगली आहे.. ते करून झिंगाट गाण्यावर नाचायला धमाल येईल पोरांना

नकली मिश्याही लावायला द्या पोरांना. मी लहान असताना मला या प्रकाराची क्रेझ होती ..

art /क्राफ्ट थीम ठेवता येईल. एका वाढदिवसाला आम्ही canvass शूज पेंटिंग केले होते. सगळ्या मुलींच्या आयाना शूज साइज विचारून आधीच शूज आणून ठेवले होते. पर्मनंट मारकर्स ने मुलींनी शूज रंगवले. तेच रिटर्न गिफ्ट.
शिवाय इतर 2-3 गेम्स घेतले.

ऋन्मेषने सुचवलेली थिम मस्त आहे>+१
चौपाटी थीम बघा आवडत्येय का. खाऊ पण साजेसाच ठेवता येइल. आणि रि.गिफ्ट सुद्धा.

माझ्या एका भाचीला दरवर्षी वाढदिवसाला वेगळी व हटके थीम हवी असते. मग कलाकार माय-लेकी दोघी मिळून घरभर रंग, कागद, कातरकाम, क्राफ्ट मटेरियलचा पसारा करत दोन दिवस अगोदर त्यांचा हॉल थीमनुसार सजवायला घेतात. मस्त असतात त्यांच्या थीम्स.

१. समुद्रातील प्राणी - यात नीमोसकट सर्व मत्स्यकंपनी, जलपऱ्या वगैरे.
२. जंगल व जंगलातले प्राणी - वाघ, सिंह, हरणे, ससे, लांडगे, अस्वले व वृक्षवल्ली
३. स्पाँजबॉब व त्याचे सहकारी
४. फुलपाखरं, भुंगे, अळ्या, फुले
५. डोरेमॉन व सहकारी
६. पतंग थीम
७. किल्ले थीम
८. ऊगी कॉकरोच व सहकारी ही कल्पना बहिणीने फेटाळून लावली. Lol

हॅलो किटी ची थीम पण करु शकता. अमेझॉनवर डीशेस, ग्लास , टे. क्लॉथ वै मिळेल. मनीचे (आयडी नव्हे Proud ) कान लावलेले हेअरबॅंड्स घरी बनवु शकता. मुलींसाठी बो लावलेले गुलाबी रंगाचे आणि मुलांसाठी निळ्या रंगाचे पण बो नसलेले. पिंटरेस्टवर ढीगाने आयडीया आणि प्रिंटेबल्स मिळतील. रि गिफ्ट म्हणुन पुस्तके, पझल्स , वॉटरबॉटल्स देउ शकता . मी गेल्या वर्षी काढलेल्या या धाग्यावरही काही नवीन कल्पना मिळु शकतील.

ज्यांचे वाढदिवस कोणी साजरे करत नाही त्यांचे वाढदिवस त्याच दिवशी साजरे करा. सगळ्यात मस्त थीम!
(अशी मुले व मुली मी सांगू शकतो, पण फक्त पुणे जिल्ह्यापुरती)
>>>> चार वर्षाच्या मुलाच्या वादि ला चॅरीटी मध्ये कशाला आणायची? हे करायला बाकी ३६४ दिवस आहेत की.. झालंच तर स्वत:चा वादि, लग्नाचा वादि, प्रमोशनची पार्टी, ३१ डिसेंबर वगैरे. Wink

चार वर्षाच्या मुलाच्या वादि ला चॅरीटी मध्ये कशाला आणायची? हे करायला बाकी ३६४ दिवस आहेत की.. झालंच तर स्वत:चा वादि, लग्नाचा वादि, प्रमोशनची पार्टी, ३१ डिसेंबर वगैरे. >>> अगदी मान्य... मुलांना काही काळ तरी मुलं म्हणुन वाढु द्यात. त्यांचे हे छोटे छोटे आनंद उपभोगु द्यात. चॅरिटी इतर वेळी नक्की करावी पण मुलांचा वाढदिवस हा त्या मुलाचा वाढदिवस म्हणूनच राहावा. त्या दिवशीचं त्याचं स्पेशल स्टेटस त्यालाच मिळावं..

अवांतर: पूर्वी मीही विचार करायचे, किती खर्च करतात लोक, थोडी चॅरिटि करावी मुलांवर संस्कार इत्यादी होईल... पण स्वतःला मूल झाल्यावर मग विचारांची दिशा बदलली.. मुलं योग्य वेळी मॅच्युअर होतात आणि स्वतःच चॅरिटीचा विचार करतात हे दिसलं... असो...

सगळ्यांनी सुचवलेल्या थीम्स मस्त... मी आळशी आहे नाही तर मलाही आवडलं असतं असं काही करायला...

अनु ने टोप्यांबद्दल जे सुचवलय त्याला + ११११... माझ्याकडे अशा किती तरी टोप्या मास्क पडुन आहेत.

मास्क द्ययचेच असतील तर मुलांना स्वतःलाच बनवु द्यावे. एक मस्त अ‍ॅक्टीव्हिटी सुद्धा होईल.

ह्याशिवाय रिटर्न गिफ्ट संबंधात एक सूचना करावीशी वाटते.

दरवेळी रिटर्न गिफ्ट काय द्यायचे हा एक खुप गहन प्रश्न असतो... क्वालिटी बजेट पॅकिंग सगळ्याचा विचार करावा लागतो..

बजेट मध्ये बसावे म्हणून बरेच जण ते प्लास्टिकचे डबे प्लेट्स देतात गिफ्ट म्हणुन. जे वापरले जात नाहीत.. नुसती अडगळ बनुन राहतात.. त्यापेक्षा काही वेगळा विचार करावा.. स्केचपेन्स, क्रेयॉन्स, जेलपेन्स, अगदीच तेही नाही तर एक स्टेशनरी किट बनवुन द्यावे. बाजारात जे स्टेशनरी किट मिळते ते गिफ्ट म्ह्णुन दिल्यास पैसे फुकट.. त्यातल्या पेन्सिल्स लिहिण्यासारख्या नसतात. शार्पनरला धार नसते. इरेझर कागदाला सोबत घेऊनच इरेझ करतो. फक्त पट्टीचा वापर होतो.. रेषा काढायला.

एका वर्षी मी चित्र काढायच्या वही, ऑईल पेस्टल्स, पेन्सिल, इरेझर, शार्पनर असं किट बनवुन दिलं होतं. देताना मात्र प्लॅस्टिकच्या पिशवीत दिलं होतं. (ती पुन्हा वापरता येते ना म्हणुन) ह्या सगळ्या वस्तु क्वांटिटिमध्ये घेतल्याने थोड्या स्वस्त मिळाल्या होत्या आणि माझ्या बजेट मध्ये वापरण्यासारख्या क्वालिटि वस्तु दिल्याचं समाधान.

एकदा सॉफ्ट बॉल्स, वयानुसार वॉटर कलर्सच्या वड्या / जिगसॉ पझल आणि कागद - कापड ह्याच्या मध्ये असते त्या मटेरियलची पाठीवरची बॅग दिली होती. त्या बॅगेला दोन-तीन वह्यांचं वजन पेलवतं

दोन वेळा स्टोरी बुक्स दिली होती...

अर्थात आपण गिफ्ट्स देतो तेव्हा आपण आपल्या बजेटनुसार देतो.. पण आपण स्वतः ते वापरु की नाही हा विचार करावा

मागच्या वेळ च्या बर्थडे पार्टीला बेन १० आणि स्पाइडर मॅन सरप्राइझ बॅग दिल्या होत्या(आयड्या नवरयाची), मला त्या अजिबात आवडल्या नाहित.मोठी चूक ही की एक विकत घेऊन उघडून न बघता ५० विकत घेतल्या घाईत.
१०० रु च्या बॅग च्या आत एक खोदरबर, एक पोस्टर, एक कँडी, एक फोल्डेबल पेन्सिल स्टॅंड, एक पेन.तेही अगदी चांगलं वगैरे नाही.मला असं रिटर्न गिफ्ट दिल्याबद्दल परत पार्टी देऊन प्रायश्चित्त घ्यावं असं वाटायला लागलं.
तात्पर्य: अगदी २० जणांची पार्टी असेल तरी चांगल्या प्रतीच्या रिटर्न गिफ्ट, मेनू यांची मनात तयारी एक महीना आधी चालू करा.रेडीमेड किट घेऊ नका, त्यातले मटेरियल बरेचदा कमी टिकाऊ असते.तयारी शेवटचे २ दिवस सुट्टीत करू म्हणून मागे ठेवू नका, न दिसणारी पण वेळ जाणारी कामं बरीच असतात.
लहान मुलाना वेगवेगळ्या ब्रॅण्ड चे खाऊ किंवा रिटर्न गिफ्ट चे चॉइस ठेवू नका, सगळे अगदी एकसमान असावे.एकाला हवी असलेली वस्तूच सगळ्यांना हवी असते आणि ज्याला दूसरा ब्रॅण्ड घ्यावा लागला त्याचा विरस होतो.
लहान मुलं आजूबाजूला असताना मलटी टास्किंग कठीण असतं त्यामुळे आयत्या वेळी करण्याची कामं अगदी कमी ठेवावी घरातले दोन हट्टे कट्टे गडी/गडीणी मुलं मॅनेज करायला, गेम चालू करायला ,गाणी बदलायला, डिश भरायला हाताशी असावे.सीनियर सिटीझन ना उठबस किंवा धावपळ कामे न देता कंवहर्सेशन को ऑर्डिनेटर म्हणून एका जागी बसवावे.बऱ्याच लहान मुलांचे आजी आजोबा त्यांना घेऊन येतात.
खाऊ हा आई बाबा मदतीशिवाय खाता येणारा आणि जास्त चिकटपना सांडासांडी न होता खाता येणारा प्रकार शक्यतो असावा.

आम्ही काल कार्टून असलेले अगदी मऊ हातरूमाल/नॅपकीन होलसेलमधून आणून घरीच रियूजेबल डेकोरेटीव प्लास्टीक पिशवीत घालून दिले .
सगळ्यांना खूप आवडले.

सर्वांना धन्यवाद.. Happy

समुद्रातील प्राणी - यात नीमोसकट सर्व मत्स्यकंपनी, जलपऱ्या वगैरे
फुलपाखरं, भुंगे, अळ्या, फुले

वरच्या दोन थिम्स पैकी काहीतरी सिलेक्ट करेन असे वाटत आहे..

सगळ्यानी दिलेल्या सुचना/ सल्ले नोट केले आहेत..
धन्यवाद.. Happy

एका वाढदिवसाला आम्ही एका होलसेलरकडून एक कंपासपेटीसारखे छोटेसे लवचिक फोल्डर, त्यात मागच्या टोकाला निरनिराळ्या कारटून्सच्या चेहर्‍याचे खोडरबर असलेल्या पेन्सिली, क्रेयॉन्स आणि असेच काहीबाही भरलेली एक छोटीशी पिशवी रिटर्न गिफ्ट म्हणून दिली होती. मला हा प्रकार आधी अतिशय रटाळ वाटलेला. घरी जे आले होते त्या मुलांना त्या भेटी कश्या वाटल्या हे काही कळाले नाही. पण आम्ही हापिसातल्या ज्या सहकार्‍यांना लहान मुले आहेत त्यांनाही त्या गिफ्ट्स दिल्या होत्या. त्या सगळ्यांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या त्यावरून त्या भेटी मुलांना भलत्याच आवडलेल्या दिसल्या.

अकु, मस्त थीम आहेत.

मी दिलेल्या रिटर्न गिफ्ट पैकी. एक डॉय साबण हँडमेड कागदी पिशवीत. प्रत्येक पोर रोज अंघोळी साठी वापरेल. व एकदा कलरिंग बुक्स आणि क्रेयॉनचा सेट.

नेट वर प्रिंटाउट घ्यायला चित्रांचे अस्तात. ते घ्यायचे जितकी मुले तितके व कलरिंग साठी खडू पेने द्यायची. बसतात रंगवत. शिवाय पासिंग द पार्सल. व संगीत खुर्ची हे खेळ व्हायलाच पाहिजेत. ए बी सी डी हा पण मजेशीर खेळ आहे. मुलांना गोलाकारात बसवायचे. व एकाने ए दुसृयाने बी अशी सुरु वात करत झेड परेन्त जायचे. हुकला तो आउट. वन टु टेन पण करता येइल कारण बच्चे कंपनी हे नवीनच शिकत असते. हो आणि ह्या बारक्या खेळ व स्पर्धांना पण एखादे छोटेसे बक्षीस ठेवा. खूप खूश होतात मुले.

कृपया खोट्या तलवारी/ बंदुका आजिबात आणू नका. एकतर मुलांना इजा होउ शकते. ते प्रिन्स सारखे तलवारीने केक कापायचे हट्ट होतील.

एखाद्या कॉलेजातील दादा किंवा ताईला जादूचे प्रयोग करता येत असतील तर त्याला बोलवा. मजा येते मुलांना.

Pages