कॅलिडोस्कोप

Submitted by स्मिता द on 10 September, 2009 - 01:41

कॅलिडोस्कोप...(आनंदाच्या , दु:खाच्या, रागाच्या, फजितीच्या, प्रेमाच्या सगळ्याच आठवणींचा).........

रोजच्या जगण्यात असे किती प्रसंग येतात. किती प्रत्यक्ष घडतात..कितीतरी वाचनात येतात..ते बघुन आपण आतुन कुठेतरी हलतो..रिलेट होतो त्याच्याशी अन मग अंतर्मनात एक कॅलिडोस्कोप फिरतो..गर्रकन काही आठवणी, घटना आपल्या नजरेसमोरुन तरळुन जातात..
प्रत्येकाच्या आयुष्यात असे घडत असते....ते आपण शेअर करु या ..घटना वेगवेगळ्या असतील..कुठे नात्यांशी रिलेटेड असतील तर कुठे मैत्रीशी..कुठे शत्रृत्वाशी तर.... कुठे एकदम अनोळखी..चला आपण एक एक मांडुया

सुरवात माझ्या पासुन
परवा रस्त्यात जाताना मी एक दृष्य बघितल एक माणु स तर्र दारू प्यायलेला एका मुलीला ओढत होता . टि नाही नाही म्हणत होती. अक्षरशः फरफटत चालवल होत तिला हाताला धरुन .. लोक केवळ बघ्याची भुमीका घेऊन शांतपणे तो तमाशा निरखत होते. मी थांबले पण माझ्या मैत्रीणीने पण मला बळेच ओढले तिथुन...तो तिचा कोण होता? वैगरे वैगरे प्रश्न बाजुला ठेवले तरी असा भर रस्त्यात अत्याचार्...मी परत दहा मिनीटांनी येउन बघितले तिथे तर कोणीच नव्हते. बहुदा त्यांचे प्रकरण मिटले असावे.

मी मात्र खुप अस्वस्थ झाले त्या प्रकाराने..मी मदत केली नाही हा सल होताच
पण ती घटना खोलवर गेली माझ्या मनात.. सगळे अंतर्मन ढवळले आणी मग रिंकु पाटील पासुन आजवर सगळ्या अत्याचारित स्त्रियांचा कॅलोडोस्कोप डोळ्यासमोर
फिरला...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्लीच्या या इंग्लिश मिडियम मुळे मुलांना बोलताना खूप प्रॊब्लेम्स...
मागे एकदा गावी गेलो तेव्हा माझ्या लेकिने तिच्या आजीच्या तोंडुन "चुळ भरणे" हा शब्द ऐकला..म्हणजे काय वैगरे त्यावर बरेच प्रश्न विचारुन झाले..
आनी परवा ती काहीतरी खुड खुड करत होती किचन मध्ये म्हनून मी विचारल काय करतेय तर म्हणे ह्या बॊटलची चुळ भरतेय..
यावरुन मग ब-याच गंमती जमती आठवल्या

माझी मनी एकदा मला म्हणे, "आई, खाली चढली,, थांब थोडं...." मी चकित.. मग लंगडत उठली अन पाय आपटायला लागली,, तेव्हा समजल की तिच्या पायाला मुंग्या आल्या म्हणून.. Happy गुजरातीत खाली चढणं म्हणजे पायाला मुंग्या येणं.. Happy आता काय कराव? Uhoh गुजराथी शब्दांबरोबर क्रियापद पण वापरायला लागलीये.... Sad

काल संध्याकाळी घरी गेल्यावर बाजूच्या बाई (काकू) मोबाइल घेवून आल्या .
काकू : तूझा फोन आहे. आज सारखा येतोय... कोणतर लेडीज आहे..
(ऑ ! मी यांचा नं. कोणालाच दिला नाही )
मी : हॅलो!
लेडीज: हॅलो सुन्या .. मी हवसा बोलून र्‍हाइले.
मी : कोण र्‍हाइलं हो ?
लेडीज: अरे मी हवसा ..
मी : तूम्हाला कुठे लावायचाय फोन..
लेडीज: हप्त्याला लागलाय न्हंव.
मी :नाही हो, तूम्ही चुकीचा नं लावला आहे.. कोण पाहीजे तूम्हाला ? म...मी दुसरा सुन्या आहे हो...
लेडीज: अगबाई ! कोणतरी दुसरच बोलून र्‍हाइलं !
मोबाइल : टू..टू..टू..टू.......

अनघा, सुन्या...:D

मला अजुन एक किस्सा आठवतोय. तांदळाच्या बॅग्ज असतात पहा तर ती एक ५० कि ची बॅग असेल . माझे बाबा ती उचलत होते आणि मनुला म्हणाले की खालून धर रे..तो म्हणाला अहो आजोबा पण खालुन कसे धरु? त्याला देठ नाहीये खाली..क्षणभर आम्हालाही कळेना म्हणतोय काय हा..आणि जेव्हा कळाले कि खाली धरायला काही नाहीये कोपरा वैगरे असे म्हणायचे होते त्याला तेव्हा हसुन लोटपोट...:D

देठ Rofl

फोन चा किस्सा...

ऑफीसात एकतर वर्कलोडमुळे फोन घ्यायचा कंटाळा येतो... आणि त्यातून राँग नंबर म्हणजे...

एकदा असाच एका बाईने कॉल केला.. जयश्री?
मी म्हटलं राँग नंबर...
पुन्हा त्या बाईच्या (बहुतेक) मुलीने कॉल केला.. जयश्री? हेलो, जयश्री?

मी पुन्हा म्हटलं राँग नंबर... खरी मज्जा ऐका... तर ती शहाणी म्हणते....,"तो फिर जयश्री का नंबर दे दो ना..."

अस्सं सणकलं होतं ना...
असो होतात चुका माणसांकडून....

आणखी १ मजा... एका बाईने एकदा मला कॉल केला आणि तावातावाने बडबडायलाच लागली...
कोन गं तू? आधी छोटूला फोन दे...
मी म्हणाले कोण छोटू?
तर म्हणे त्याचा फोन तुझ्याकडं कसा गं...
त्या छोटूने काय पराक्रम करून ठेवलेला देवाला माहीत...

२-३वेळा असं झाल्यावर मी नंबरच बदलून टाकला... Happy

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

मी नुकतीच नविन स्कूटर विकत घेतली होती. स्कूटर वरून बायकोला हिंडवण्याची खूप हौस! (बायको आणि स्कूटर नविन असल्यामुळे). पुण्यातल्या रस्त्यावरून मागे (पिलियन सिट वर) बसलेल्या बायकोशी गप्पा मारीत जाणे हा माझा त्याकाळी एक छंदच झाला होता.
बायको मात्र मी तोंड वळवुन बोलल्यामुळे अ‍ॅक्सिडेंट होईल म्हणून फारसे बोलायची नाही, गप्पच रहायची.

अशाच एका सकाळी आम्ही घरातून निघताना माझ्या ध्यानात आले की गाडी रिझर्व्ह (Reserve) ला आलेली आहे. मी बायकोशी गप्पा मारत मारत जंगली महाराज रोडवरच्या कलमाडी पेट्रोल पंपावर गेलो. तेथे थोडी गाडी स्लो केली, बायको म्हणाली "अरे येथे पेट्रोल नाहीयं" मी लगेच पुढे निघालो व लकडी ब्रिज पार करून कुलकर्णींच्या पंपा वर गेलो जाताना गप्पा (वन वे - माझ्याच) चाललेल्या होत्या. ही आपले नेहेमीसारखे हुं हुं करते असे वाटत होते.

तेथे मी बायकोला खाली उतरण्या साठी सांगून मागे बघितले.... तर ती मागच्या सिटवर नव्हतीच, आजु, बाजुला कोठेही दिसेना! मी अतिशय घाबरलो -वाटले रस्त्यात कुठे ही पडली बिडली की काय? मग मी कुणाबरोबर बोलत होतो?
तसाचा उलटा परत फिरून घाई घाईत पण आजु बाजुला बघत परत कलमाडी पेट्रोल पंपापर्यंत गेलो. ते १-१|| कि.मि चे अंतर प्रचंड टेन्शन खाली पार केले. तेथे पहातो तर ह्या बाईसाहेब हासत हासत उभ्या!. ह्या आधी मी तेथे गाडी स्लो केली होती तेव्हा बोर्डावर काय लिहिले आहे ते पहाण्यासाठी ह्या बाईसाहेब गाडीवरून उतरलेल्या !!!

अरे मग तिला सांगायचे ना...

"चालत्या गाडीतुन[स्कूटरवरुन] उतरणे धोक्याचे !!!!!!!!!!"

मी हा किस्सा जुन्या माबोवर लिहीला होता... मी केलेला इब्लिसपणा मध्ये. इथे योग्य आहे की नाही माहीत नाही तरिही टाकतेय.

एकदा मी दांडेकर पुलाकडून अलकाकडे गाडीवरून जात होते, सेनादत्त पेठ पोलिस चौकिचा सिग्नल लाल होता त्यामुळे थांबले होते. आणि अलकाकडून सेनादत्त पेठे कडे वळणारा सिग्नल सुरू होता, पण तो जवळ जवळ संपायला आला होता, त्यांचा सिग्नल रेड झाला आमचा ग्रीन झाला तरिही अलकाकडून एक मारूती कारवाला जबरदस्ती उजवीकडे वळू लागला. 'मामा' दूरवर कुणाशी तरी 'निगोशिएट' करण्यात गुंतले होते. माझ्या डोक्यात काय आलं काय माहीती, मी माझी गाडी पुढे दामटली आणि त्या कारवाल्याच्या समोरच थांबवली, मग त्या कारवाल्याला पुढे जाता येईना आणि मागेही राहता येईना.. मी तिथूनच जोरात ओरडून 'मामा' ला म्हणलं, हे घ्या तुम्हाला गिर्‍हाईक.... Proud

ओ हो..मस्त...:P
ड्रीमगर्ल..:)
दक्षिणा कोणा कोणाला सोडु नको...मामांना त्याचं गिर्हाईक दिल... हे हे.....:P

रविन, मला त्यावरुन माझा किस्सा आठवला

मुलगा लहान होता. नवरा गाडी चालवत होता मी मुलाला आमच्या दोघांमधे बसवल होता. बाफना पेट्रोल पम्पाजवळ गाडीत पेट्रोल भरले नवर्‍याने आणि गाडी माझ्याजवळ आणून उभी केली. मी मुलाला मधे बसवल. तो फार तर दोन एक वर्षांचा असेल तेव्हा. आनी मी बसणार तेव्हाड्यात नवरा गादी सार्ट करुन भुर्रकन निघुन गेला. पेट्रोलपंपवाला मी दोघ ही मागुन ओरदतोय आनी हा अपला माझ्याशी चालाय बोलत मि मागे आहे असे समजुन. मग मी अ‍ॅटोकरुन गेले मागाहुन.आणि त्याच्या पुढे जाऊन थांबवली अ‍ॅटो मग हा आश्चर्याने मागे बघायला लागला... ...:P

:)) मस्तच किस्से..

मधे माझे सासु-सासरे इकडे आलेले त्यामुळे लेकीचे मराठी वर्ग चालु असायचे. एकदा तिची मराठी बालगीतान्ची डिविडी बघत बसलेली..कशावरुन तरी अजोबा आज्जीला म्हणाले, ' आता कुठे डोके लावतियेस..' लेक झटक्यात डोक्यावर हात मारुन ठसक्यात उत्तरली, 'आज्जोबा, डोके नाही गाण लावलय..' Happy

एकदा ऑफिसमधून निघायला उशिर झाला म्हणुन गडबडीने गाडी सुरु करुन निघाले तर रस्त्यात एक बाई छोट्या बाळाला कडेवर घेउन आडवी आली. अगदीच केविलवाणी दिसत होती ती. बरोबर एक १२-१३ वर्शाचा मुलगा ही होता. ती त्या बाळाकडे बोट दाखवुन ते सकाळपासुन उपाशी आहे म्हणुन सान्गत होती. कोणत्यातरी गावावरुन आली होती आणी पैसे सम्पले आहेत असे सान्गत होती. त्या बाळाला तापही होता. सुटे सापडले तेवढे ५० - ६० रुपये तिला दिले आणि मी घरी निघुन गेले कारण माझेही पिलु घरी वाट बघत होते...............
पण घरी आल्यावर मात्र त्या बाळाचा चेहरा डोळ्यासमोर सारखा तरळत होता. आजही ते आठवले तरी जीव गलबलून जातो आणि मी आणखी थोडे पैसे द्यायला हवे होते असे वाटते.....

अस्मी, मलाही असाच अनुभव आला होता. एकदा मी प्रभात रोडवरून संध्याकाळी येत होते. एक जोडपे हातात लहान बाळाला घेउन एक्दम मध्ये आले. ब्रेक दाबून थांबले तर त्या बाईने असेच सांगितले. वर ते बाहेर गावाहून आलेत, ससूनमध्ये बाळाला न्यायचेय पण पता सापडत नाही, परत गावी जायचेय, पैसे चोरीला गेले. अशी बरीच कहाणी सांगितली. मी अतिशय घाईत असल्याने त्यांना १०० रू काढून दिले, अन रिक्षाने ससूनला कसे जायचे सांगितले. पण मनात थोडे काहीतरी खटखटले, तरी उशीर झाल्याने लगेच निघाले.
दुसइया दिवशी तिथे राहाणा-याशी बोलताना हा विषय झाला तेव्हा त्यांनी ही फसवणूकीची नवी पद्धत असल्याचे सांगितले. तिथे राहणा-या अनेकांना या जोडप्याने असे गंडवले होते. आपल्याला खरे कोण खोटे कोण हे समजतच नाही , नाही का? मग अशा मदत करण्यावरचा विश्वासच उडतो. तेव्हापासून मी योग्य संस्थांनाच मदत करायची किंवा स्वतः त्यांना घेऊन जायचे, जेवायला घालायचे किंवा हवी ती मदत करायची पण उचलून पैसे द्यायचे नाही असे ठरवले.

आरती ,अस्मि ,हा अनुभव मलाही आला सिहंगड रोड वर आणि मी चक्क फसले त्यांचे ते केविलवाणे भाव ते कडेवरचे पोर बघुन. मी ५० रु काढुन दिले. अजुन मागत होते ते पण माझ्याकडे सुट्टे नव्हते..:( न

म्तर कळले की त्या जोडप्याने बर्‍याच जणांना गम्डवले असे..

मलापण असा अनुभव पनवेलला आला होता ,५ वर्षांपूर्वी.
१ जोडपं त्यांच्यामुलासकट होतं,आणि सांगत होते कि पैसे चोरिला गेलेत्,मुलाने काहि खाल्लं नाहि.पैसे द्या.
पण मी पैसे नाहि दिले.:(

मला ही १३ वर्षापुर्वीचा एक प्रसंग आठवला. मी पुण्यात नविन आल्या आल्या मी आणि माझी थोरली बहीण फ्लॅट घेऊन सदाशिव पेठेत रहात होतो. बाबा मोजून पैसे पाठवायचे दोघींसाठी. असेच महिन्याच्या सुरवातीला आम्हाला पैसे मिळाले, बहीण बाहेर गेली होती. दुपारी ३/३.३० च्या सुमारास २ लोक आले होते, मी दार उघडलं आणि म्हणाले की कॉर्पोरेशनचं पाणी सोडतो आम्ही, पैसे द्या... मी म्हणलं किती? ते म्हणाले की १०-२० मी म्हणलं सुट्टे नाहीत. ५० ची नोट आहे.
त्यातला एकजण म्हणाला आम्ही सुट्टे आणून देतो... मी मुर्खासारखी ५० नोट दिली त्यांच्यावर विश्वास ठेऊन.....:( वाट पाहीली ते लोक काही आले नाहीत. मी तशी लहानच होते तेव्हा... ११ वीत असेन. असला अनुभव कधी आला नव्हता.. कोल्हापुरातले लोक जीव देतील एकवेळ पण दिलेला शब्द पाळतील. Sad मग मी सोसायटीतल्याच एका अजोबांना ही गोष्ट सांगितली. ते म्हणाले मी त्या दोघांना हाकलून दिलं, एक दमडी देऊ नये असल्यांन्ना, आता ५०/- रुपये अक्कलखाती गेले असं समज... Sad मग मी संध्याकाळी बहीणीचा खाव्या लागणार्‍या माराचा विचार करत राहीले. Sad

तेव्हापासून मला कुणीही पैसे मागितले रस्त्यात तरिही मी देत नाही. दरवाज्यावर ही असंख्य बायका, पुरूष वर्गणी... वगैरे मागायला येतात, मी देत नाही असं सांगून वाटेला लावते..

मध्यन्तरी घरी झुरळान्चा खूप सुळ्सुळाट झाला होता. मला पेस्ट कन्ट्रोल ची महिती हवी होती. सहज बोलता बोलता शेजार्‍याना म्हणाले ," झुरळ खूप झाले आहेत. तुम्ही काय करता?" . पायातले स्लिपर्स टाइल्स वरती आपटत ते म्हणाले ," मारतो " . मग चेहरा प्रश्नान्कित करत मला म्हणाले , " तुम्ही ?"

आज सकाळी भिकारदास हे नाव ऐकल आणि कॉलेजला असतानाच किस्सा आठवला...
आमच्या जीपीपी ला म्हनजे आताच्या आयनॉक्सला ( बरोबर का?) संध्याकाळी बस थांबायचीच नाही..खुप गर्दी व्हायची..आणि पी एम टी चे प्रकार तर सर्वज्ञातच आहेत्..कुठे बस बंद पडतात तर कुठे बोर्डच नसतात..तर अशीच एक बस आली बोर्ड नसलेली... थांबावायचे नाव नाही..काही मुले पळत गेली बस पाठी तर परत आली हात हलवत्..
काय रे कुठली होती तर एक जण म्हणे संगितलच नाही त्यांनी.
दुसरा म्हणाला अरे भिकारदास बहुदा
हं ड्रायव्हर भिकारदास आणि कम्डक्टर मारुती..बोलायलाच तयार नाही.. खुप वैतागुन तो म्हणाला
पण त्याच्या या वाक्याने त्या इतक्या उद्वेगातही हसायला आले..:P

एक असाच प्रसंग आठवतोय.

मी वाशीत होतो. मुख्य चौकात सिग्नलला उभा होतो. एक लहान मुलगी, साधारण १०-११ वयाची असावी, तिच्यापेक्षाही लहान बाळाला कडेवर घेउन सिग्नलला भिक मागत होती. मुलीचे कपडे फाटके होते तर बाळाच्या अंगावर काहीच नव्हते. हलकासा पाऊस पडत होता. मुलीने तिच्या फाटक्या ओढणीने स्वत:ला व बाळाला कसेबसे झाकले होते. एवढ्यात पाऊस थोडा वाढला. त्या मुलीने ती ओढणी काढून बाळाला व्यवस्थित त्यात गुंडाळले आणि स्वतः भिजत पुन्हा भिक मागू लागली. मी ज्या सिग्नलला उभा होतो त्याच्या उजव्या हाताच्या सिग्नलपाशी हे सगळं सुरु होतं. ते पाहून मी अक्षरशः सुन्न झालो. मागून गाड्यांच्या हॉर्नचे आवाज ऐकून भानावर आलो. नंतर बरेच दिवस ते दृश्य डोळ्यासमोरुन हलत नव्हतं.
-
मी सहसा पैशांची मदत करत नाही. भीक देणं मला आवडत नाही. पण पुणे-मुंबई ट्रेनने प्रवास करताना बरेच भिकारी ट्रेनमधे येतात. त्यांच्यापैकी लहान मुलं असली तर मी त्यांना ट्रेनच्या डब्यात जे खाऊवाले येतात त्यांच्याकडून पोटभर खाऊ घालतो.

-योगेश

योगेश खरच रे सुन्न व्हायला होते असं काही बघितलं की... पण खरतर पैसे देण्या पेक्षा त्यांच्या पोटाला देण फार महतवाच्..कारण ते पैसे त्यांना मिळतात की नाही? हा खुप वेगळा प्रश्न आहे..

तो सिग्नल वरचा सिनेमा बघुन मी खरतर खुप आश्चर्यचकित झाले होते ते जग बघुन

योगेश मला ही पटलं, खाणं देणं हे उत्तम, पैसे कोणी काढून घेतं, किंवा ही मुलं त्याचा सदुपयोगंच करत असतील कशावरून?
मी टिव्ही पहात नाही पण बेताब दिल की तमन्ना है नावाच्या एका सिरियलची जाहीरात गेले काही दिवस लागतेय सोनीवर, भिषण वाटतं ते पाहताना. सेम विथ स्लमडॉग मिलेनियर.. Sad
सुन्न म्हणजे बधिर...च अगदी... Sad

खाणं देणं हे उत्तम>> एकदा आम्ही वडापाव घेत होतो... मागून एक मुलगी हात लावून भिक मागऊ लागली... दोन चार वेळा मागितल्यावर, वडापाववाल्याने बांधून दिलेला वडापाव मी तिला दिला आणि मी दुसरा बांधून घेतला... तर त्या मुलीने तो आमच्या समोर फेकून दिला आणि म्हणाली ये क्या... पैसा देदो पैसा... आम्ही दोघी आवाक!

सत्पात्री दान करावे हेच खरे... मी अगदी गलितगात्र म्हातारे यांनाच खायला किंवा पैसे देते...

परवा आमच्याकडे काही मंडळी जेवायला आली होती. तर त्यावेळी कोणीतरी सांगितलेला किस्सा नवरा मला येऊन काल सांगत होता. अर्थात तो किस्सा मराठीत सांगितला गेला होता आणि नवर्‍याला फारसं मराठी अजून येत नाही. ऐकून यथाशक्ती अर्थ लावतो. त्यातूनच हा किस्सा घडलाय.

न : अरे कल तुम्हारे चाचाजी एक किस्सा बता रहे थे| तुम नही थी वहा, पर अजीबसा किस्सा था|
मी : अच्छा? क्या था?
न : तुम्हारे पिताजी और चाचाजी जब छोटे थे, एक दिन घर के बाहर खेल रहे थे | तो वहा से कौमुदी आयी |

मी बुचकळ्यात. या किश्श्यात ही एवढी स्पेसिफिक कौमुदी कोण आली म्हणून .....

न : उन्होने उसको भगा दिया पर वो बार बार आ उनके पास आ रही थी |

मी बुचकळ्यात आणखीन खोलवर डुबक्या मारल्या.

न : तो फिर उन्होने सोचा की उस को पकडे |

मी एकदम अ‍ॅलर्ट झाले. हे काय ऐकतेय मी??? नक्कीच काहीतरी गफलत आहे हा संशय पहिल्यांदा मनात आला. नवरा पुढे सांगतोयच....

न : तो फिर उन्होने एक टॉवेल लिया और उसको पकडके टोकरी के नीचे रख दिया | उन्होने सोचा था की बाद मे खा लेंगे |

मी : क्या???? कौमुदी को पकडा??? कौन कौमुदी????
नः अरे कौमुदी..... मुर्गी | तुम लोग मुर्गी को कौमुदी बोलते हो ना??

मग माझी ट्युब पेटली. आम्ही कोंबडी म्हणतो ते त्याला कौमुदी ऐकू येतं. आपण फास्ट बोलताना ते 'कोमदी' असं ऐकू येत असणार आणि हे हिंदीभाषिक तसेही 'कौमुदी' असं न म्हणता 'कोमुदी' म्हणतात. त्यामुळे हा सगळा घोळ. नंतर मी अफाट हसलीये. Proud Proud Proud

(तो बिचारा पूर्ण शाकाहारी असल्याने हे असं काही लहान मुलं करतील हे त्याच्या कल्पनेपलिकडचं होतं.)

माझ्या साबादेखिल मी मराठी बोलत असताना 'मुलगी' हा शब्द आला की खुप हसायच्या. कारण त्यांना तो शब्द 'मुर्गी' वाटायचा आणि त्यामुळे मराठीत लहान मुलींना 'मुर्गी' म्हणतात की काय असं त्यांना वाटायचं. Happy

मामी........ कौमुदी ?.......(भयंकर हहगलो). खालील किस्सा मी आंग्लानुवाद मधे टाकलाय पण इथेही टाकते!
माझा एक भाचा आहे. त्याला फार पॉश ठिकाणी गेलं की खूप गावरानपणा करायची हुक्की येते.
मल्टिप्लेक्समधे गेलं की हा हमखास विचारणार,....अगदी हेल बील काढून.... "गुळमाट लाह्या घ्यायच्या की टंबाटीच्या लाह्या?"
म्हणजे कॅरॅमल पॉप कॉर्न घायचं की टोमॅटॉ फ्लेवर्ड?
शेजारी एक सिंपलटन म्हणावा असा मुलगा रहातो. मी गेटपाशी दिसले की येऊन गप्पा मारतो.
त्याची आजी संधीवाताने आजारी आहे. मी तिची चौकशी केली. "कशी आहे आजीची तब्ब्येत? सध्या थंडीत अगदी तिला चालताही येते नाहीये."
तो म्हणाला, " हो ना सांधे आखडलेत. उठता बसता येत नाही....म्हणून आम्ही आता 'कंबोडीचा संडास" बसवून घेतोय तिच्या साठी. "
मला आधी काहीच कळेना की हा संडासाचा कंबोडीयन प्रकार कधी ऐकला नव्हता.
नंतर प्रकाश पडला. !!!!!!!!!!!!!!!!!! (ज्यांना कळणार नाही त्यांनी विचारावे...आणि ज्यांना कळेल त्यांनी अर्थ लिहावा.)
काही शब्दांचे अलगदच आपोआप आणि हळूहळू मराठीकरण होते. जसे- रिक्रूट - रंगरूट.

ओह चंबू .आहे ना गंमत. .......पण कुणीच वाचलेलं दिसत नाही. तरी मी हेच आंग्लानुवादातही टाकलं आहे.

Pages