कॅलिडोस्कोप

Submitted by स्मिता द on 10 September, 2009 - 01:41

कॅलिडोस्कोप...(आनंदाच्या , दु:खाच्या, रागाच्या, फजितीच्या, प्रेमाच्या सगळ्याच आठवणींचा).........

रोजच्या जगण्यात असे किती प्रसंग येतात. किती प्रत्यक्ष घडतात..कितीतरी वाचनात येतात..ते बघुन आपण आतुन कुठेतरी हलतो..रिलेट होतो त्याच्याशी अन मग अंतर्मनात एक कॅलिडोस्कोप फिरतो..गर्रकन काही आठवणी, घटना आपल्या नजरेसमोरुन तरळुन जातात..
प्रत्येकाच्या आयुष्यात असे घडत असते....ते आपण शेअर करु या ..घटना वेगवेगळ्या असतील..कुठे नात्यांशी रिलेटेड असतील तर कुठे मैत्रीशी..कुठे शत्रृत्वाशी तर.... कुठे एकदम अनोळखी..चला आपण एक एक मांडुया

सुरवात माझ्या पासुन
परवा रस्त्यात जाताना मी एक दृष्य बघितल एक माणु स तर्र दारू प्यायलेला एका मुलीला ओढत होता . टि नाही नाही म्हणत होती. अक्षरशः फरफटत चालवल होत तिला हाताला धरुन .. लोक केवळ बघ्याची भुमीका घेऊन शांतपणे तो तमाशा निरखत होते. मी थांबले पण माझ्या मैत्रीणीने पण मला बळेच ओढले तिथुन...तो तिचा कोण होता? वैगरे वैगरे प्रश्न बाजुला ठेवले तरी असा भर रस्त्यात अत्याचार्...मी परत दहा मिनीटांनी येउन बघितले तिथे तर कोणीच नव्हते. बहुदा त्यांचे प्रकरण मिटले असावे.

मी मात्र खुप अस्वस्थ झाले त्या प्रकाराने..मी मदत केली नाही हा सल होताच
पण ती घटना खोलवर गेली माझ्या मनात.. सगळे अंतर्मन ढवळले आणी मग रिंकु पाटील पासुन आजवर सगळ्या अत्याचारित स्त्रियांचा कॅलोडोस्कोप डोळ्यासमोर
फिरला...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मानुषी.. तुमच्या भाच्याच वाचुन आठवलं, माझाही एक मित्र कॉलेजला मुलींसमोर अस्सल नगरी ढंगात्.."ए भोss! आपून न्हाई येनार त्या मास्तराकडं..."वगैरे बडबडायचा...

Pages