लोणावळा

Submitted by पल्ली on 4 July, 2016 - 05:53

घामानं उकाड्यानं हैराण झालो होतो म्हणून लोणावळ्या ला जायचं ठरवलं,
सकाळी सकाळी फक्त चहा पिऊन बाहेर पडलो, म्हणजे ब्रेक फास्ट न करता
हवा छान होती, सीडी वर एकसे एक गाणी वाजत होती आणि आमची तोंडही ..
कुठेही न थांबता सरळ लोणावळ्याचं मन:शक्ती केंद्र गाठलं, एक नंबर ब्रेक फास्ट मिळतो इथे.
श्रावणीच्या वेळी प्रेग्नंट असताना मी इथे गर्भ संस्कार शिबिराला आले होते. इथलं वातावरण छान असतं. मेन म्हणजे शि-शु केंद्राची सोय अगदी स्वच्छ आहे.
आता पर्यटन. लोणावळा हे ठिकाण अद्भुत निसर्गानं नटलेलं, आधुनिकता आणि जुन्या अस्तित्वाच्या खुणा जपणारं आहे...
इतका नयनरम्य नजारा होता की क्या बात!
शुभ्र वाहणारे निर्झर, धुक्यानं झाकली गेलेली झाडं, ओले चिंब रस्ते... आहा, लै भारी न लै गार गार...
अश्यातच पावसाची हलकी सर आली, अजुन काय पाहिजे!
एका दुकानात शिरलो, चिक्की, फज, फुटाणे घ्यायला. तिथली माणसं काही दाखवायलाच तयार नाहीत, आणि मालक तर इतका तुसडा, चेहऱ्यावर बारां वाजलेला.. सगळ्या आनंदावर विरजण पडायची वेळ आली. काही न घेताच बाहेर पडलो. असच ज़रा पुढे चालत आलो, तर एक हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याचा तरुण एका दुकानात काउंटर पलीकडे दिसला. हां नक्की छान बोलेल ह्या खात्रीनं आम्ही आत शिरलो. माझी आर्टिस्टिक नजर भिरभिरायला लागली. वॉल वर व्हाइट बॅकग्राऊण्ड वर खाऊ चे फोटो होते, एकेक पदार्थ बघुन तोंडाला पाणी सुटलं.
माझी अवस्था बहुधा त्यांनी ओळखली, एकेक नमूना माझ्या मुखात येऊ लागला. वा, आहा, सही, मस्त, भारी असे शब्द बाहेर पडू लागले...
तिथली मुलं पण मालकाइतकिच उत्साही दिसली. प्रेमानं, आपुलकीनं वागवणारी.
मग मी ज़रा इंटरव्यू घ्यायचं ठरवलं, पुणेकर गप्प बसला तर तो कसला पुणेकर?
त्यांच्या तीन पिढ्या ह्या व्यवसायात आहेत की ज्या ग्राहकांच्या तीन पिढ्यांना सेवा देतायत! अतिशय कष्टातून हे सर्व उभं राह्यलंय. स्वच्छता, ताजेपणा, गुणवत्ता आणि उत्तम सेवा ह्या जोरावर ही मंडळी माझ्या सारख्या खादाड आणि चोखंदळ गिऱ्हाईकांचं समाधान करतायत.
मला रेट अगदी वाजवी वाटले, कुठला पदार्थ घेऊ नी कुठला ठेवू असं झालं...☺
एक्सलंट क्वालिटीचं फरसाण, बऱ्याच प्रकारच्या शेव आणि सहाssss प्रकारचे फज घेऊन मी अगदी मजेत बाहेर पडले.
लोणावळ्याला गेल्यावर आवर्जून जावं असं हे ठिकाण 'नवरत्न चिक्की'. त्या हसऱ्या बोलक्या तरुणाचं नाव रितेश. ह्या तरुणानं लोकली लिमिटेड न राहता मोबाईल ऍप वरही होम डिलिव्हरी ची सोय करायचं ठरवलं आहे. माझी सोय झाली, लोणावळ्याला जायला जमलं नाही तरी हे मला घरपोच मिळेल!
आता पुण्याला परत निघालो, पावसानं बऱ्यापैकी जोर धरला होता. ढगाळ आकाश, बरसणाऱ्या सरी आणि सीडी वर माझं लाडकं गाणं.... 'रिमझिम रिमझिम,,,, पावसाची ओली ओली झिंग.... "

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख लोणावळ्यावर आहे की चिक्कीवर? Wink

सहाSSSSSSSS प्रकारचे फज? जगात एकमेव खराखुरा फज असतो - चॉको-वॉलनट, बाकी सगळ्या फजीत्या :). दुकानाचा ठावठिकाणा पण लिही की.

Yes...navratn ch farsan ek number asta....baki goshti tar astatach....amch hi tharlela shop

सगळ्यांचे आभार.
माधव अरे नवरत्न चिकि हेच दुकान.. लोणावळ्यात कुणालाही विचार मावळा पुतळा... त्याच्या जवळ आहे दुकान.
पुण्याकडून कुमार रिसॉर्ट किंवा हॉटेल राम कृष्ण... मॅकडोनल्ड पासून खाली उतर्ल्यावर मावळ पुतळा आहे. लोणावळा गावाकडे जातानाच्या सरळ रस्त्यावर.

छान लिहीलंय, अपेक्षेनुसारच !
<< हे काय पल्ले, लेख इतका त्रोटक का लिहिलायस? >> सहमत. क्वचित येतां, किंचित लिहीतां !! Wink

माय फेव्हरेट प्लेस इन द वर्ल्ड............
जन्मा ला आल्यापासुन एकही वर्ष न चुकता भेट दिलेले कुलदैवत कम पिकनिक स्पॉट..