मेळघाट धडक मोहिम २०१६

Submitted by हर्पेन on 30 June, 2016 - 06:03

धडक मोहिम २०१६

आतापर्यंत आपण मेळघाटात चालणार्‍या शैक्षणिक उपक्रमाविषयी अनेकदा माहित करून घेतले होते.
http://www.maayboli.com/node/39298
http://www.maayboli.com/node/45066
http://www.maayboli.com/node/44146
http://www.maayboli.com/node/55409

पण मैत्रीची सुरुवात झाली तीच मुळी धडक मोहिमेपासून (आणि आता धडक मोहिम ही मैत्रीची ओळखही झाल्ये असे म्हणावे लागेल) तर हे निवेदन आहे धडक मोहिमेबाबत.

पावसाळा आला! चला मेळघाटात...

दरवर्षी पावसाळ्यात मेळघाटातील बालमृत्यू व कुपोषण या विषयीच्या बातम्या वाचायला, ऐकायला मिळतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अशा परिसरात कुपोषण का? असा प्रश्न कोणालाही पडावा. पण पुरेशा आहाराअभावी झालेलं हे कुपोषण व पावसाळ्यातली रोगराई यामुळे मुलांच्या आरोग्यावर कायमस्वरूपी परिणाम होतो. त्यांची शारिरीक व बौध्दिक वाढ खुंटते व भावी जीवनात स्पर्धेत भाग घेण्याची क्षमताच मर्यादित होते.

पावसाळ्याच्या या तीन महिन्यांत मेळघाटमधील कुपोषण व उद्भवणारे आजार यांचं स्वरुप जास्त गंभीर असतं. म्हणूनच या काळात मेळघाटमधील कोरकूंच्या आरोग्य रक्षणासाठी प्रत्यक्ष तिथे जाऊन काम करणे हा उपक्रम आखला गेला – हा उपक्रम म्हणजेच मेळघाटमधील बालमृत्यू वाचविण्याची ’मेळघाट मित्र’ ची धडक मोहीम.

यावर्षीही “मैत्री”ने मेळघाटातील अतिदुर्गम ११ गावांमधे धडक मोहिमेचे आयोजन केले आहे. १५ जुलै ते ०२ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत ११ गटांमधे २२० स्वयंसेवक स्वखर्चाने या दुर्गम गावांमधे प्रत्यक्ष मुक्काम करणार आहेत. या मोहिमेत अर्थातच कोणीही सहभागी होऊ शकते. स्वत:चा प्रवास खर्च, तेथील राहणे आणि जेवण यासाठी १५०० रु. खर्च येतो. प्रत्येक सहभागी स्वयंसेवकाने हा खर्च स्वत: करणे अपेक्षित आहे. आपणही आपला सहभाग निश्चित करा. आणि इतरांनाही सांगा.

बॅच क्रमांक, मेळघाटात पोहचणे, मेळघाटातुन परत निघणे
१ , १६/०७/२०१६ , २४/०७/२०१६
२, २३/०७/२०१६, ३१/०७/२०१६
३, ३०/०७/२०१६, ०७/०८/२०१६
४, ०६/०८/२०१६, १४/०८/२०१६
५, १३/०८/२०१६, २१/०८/२०१६
६, २०/०८/२०१६, २८/०८/२०१६
७, २७/०८/२०१६, ०४/०९/२०१६
८, ०३/०९/२०१६, ११/०९/२०१६
९, १०/०९/२०१६, १८/०९/२०१६
१०, १७/०९/२०१६, २५/०९/२०१६
११, २४/०९/२०१६, ०२/१०/२०१६

धडक मोहीमेची उद्दीष्टे:
§ गरोदर स्त्रियांना दररोज भेटणे आणि त्यांचे आरोग्य शिक्षण करणे.
§ एक वर्षाखालील सर्व मुलांच्या घरी दररोज भेट देणे.
§ सहा वर्षावरील मुलांच्या आजारपणाकडे लक्ष देणे.
§ कुपोषित मुलांच्या घरी भेटी देणे आणि त्यांच्या पालकांना आहाराबद्द्ल मार्गदर्शन करणे.
§ गावातील लोकांना सोबत घेऊन सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविणे. साध्या आजारांवर उपचार करणे. प्रथमोपचार पध्दती अवलंबविणे.
§ शासकिय आरोग्य विभाग आणि अदिवासी यांच्यामधे दुवा साधणे.
§ आणि हे सगळं करतांना आपलं स्व-शिक्षण घडवून आणणे व महाराष्ट्रातील आदिवासी भागातले खरे प्रश्न डोळसपणे समजुन घेणे. सोबतच स्वतः मधले नेतृत्वगुण, लोकांमधे बोलण्याचे कसब, रुग्णाला समजावुण सांगणे, लहान अबोल आदिवासी मुलांन बोलते करणे, व आजार – उपचार यांच्यावर प्राथमिक माहिती करुन घेणे. या मोहिमेत १८ वर्षावरील सर्व व्यक्ती सहभाग घेऊ शकतात शैक्षणिक पात्रता, अर्हता, कार्यक्षेत्र यांचे कुठलेही बंधन नाही). प्रत्येक बॅचमध्ये २० स्वयंसेवक असतील. स्वयंसेवकाचा प्रत्येकी खर्च रू. १५०० आहे.

संपर्क- “मैत्री” कार्यालय: ०२०-२५४५०८८२, ८६०५९१४०८६. रामेश्वर फड ९४०४१०३७०६,
डॉ.अभिजित कस्तुरे ९९७०५४७०१६, राजु केंद्रे, ७०६६१३६६२४, ऋषी अंधाळकर. ९४२३७८८५४१
Email: maitri1997@gmail.com Website: www.maitripune.net संपूर्ण माहीती आणि Online नोंदणीसाठी आपण www.dhadakmohim.wordpress.com या ब्लॉगला भेट द्या.

ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आपला सहभाग हवा आहे.

जर आपण स्वत: येऊ शकणार नसाल तर इतर अनेक प्रकारेही या मोहिमेसाठी कदत करु शकता.
एका स्वयंसेवकाचा दहा दिवसांसाठीचा खर्च रु. १५००/- एवढा आहे. आपण काही स्वयंसेवकांचा हा खर्च उचलू शकता. अनेकजणांना सहभागी होण्याची इच्छा असते पण आर्थिक पाठबळ नसल्याने ते सहभागी होऊ शकत नाहीत. अशांसाठी आपण आर्थिक मदत करु शकता.

किराणा साहित्य, औषधे, प्रथमोपचार साहीत्य, या गोष्टींसाठीही आर्थिक मदतीबरोबरच वस्तूरुपानेही आपण मदत करु शकता. प्रत्येक बॅचला साधारण रु. १०,०००/- चा किराणा तर रु.३०००/- चा भाजीपाला लागतो. धान्य स्वरुपात मुग/तूर डाळी, कडधान्ये, तांदुळ, गहू, पोहे चहा इ. रुपात मदत करु शकता.

या मोहीमेसाठी गाडी आणि डिझेल यासाठी रु.६०,०००/- एवढा खर्च येणार आहे. आपण हा खर्च पूर्णत: किंवा काही प्रमाणात उचलू शकता.

'मैत्री'च्या उपक्रमांना आर्थिक मदत करण्यासाठी खालील लिंक पहा. त्यात बँकेचे डिटेल्स आणि मैत्रीकडून देणगीची पावती मिळण्यासाठी काय माहिती पाठवायची ते सविस्तर दिले आहे.

http://www.maitripune.net/PlusYou_contribute.html

तळटीप - चालू शैक्षणिक वर्षामधे (२०१६-१७) राबवण्यात येणार्‍या शैक्षणिक उपक्रमांविषयी लवकरच कळवतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सुनिधी, सिंडरेला, योरॉक्स.

यो, वर नमूद केलेल्या कालावधीत जाऊ शकलास तर खूपच भारी. मला खात्री आहे, तू सहजरित्या काम करू शकशील तिकडे!

'मैत्री'च्या उपक्रमांना आर्थिक मदत करण्यासाठी बँकेचे डिटेल्स आणि मैत्रीकडून देणगीची पावती मिळण्यासाठी काय माहिती पाठवावी ते खालीलप्रमाणे. (ह्याचीच लिंक वर धाग्यातही अ‍ॅड केली आहे.)

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

Donations to MAITRI are eligible for benifit of deduction under section 80G(5)(vi) of Income Tax Act 1961.

When you transfer any funds to Maitri account, please send us an email to maitri1997@gmail.com.
This e-mail address is being protected from spambots.

You need to send us the following details as it will help us to issue a receipt to you promptly.

Full Name

Address

Phone no.

Date of birth

Email ID

Amount remitted

From (Bank & Branch)

Date

Auth code / Reference (if any)

हर्पेन, फारच भारी उपक्रम आहे हा, कार्यकर्ता म्हणुन काही करता येणार नाही लगेच, पण आर्थिक मदत नक्की करू शकेन.
तसेच, आमच्या कंपनीत, ओळखीच्या लोकांना माहिती देऊन सहभाग, मदत यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करू शकेन.

धन्यवाद आदित्य सिंग, जिज्ञासा
सर्वांनी कृपया, आपल्या मित्रमंडळींत हा लेख फिरवावा. धन्यवाद.