पंचममॅजिक कार्यक्रम २७ जुन २०१६

Submitted by कांदापोहे on 28 June, 2016 - 05:47

दरवर्षी वारीला जाणार्‍या वारकर्‍याला जसे
"पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान
आणिक दर्शन विठोबाचे"

यातच स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो त्याचप्रमाणे पंचममॅजिकची वारी आम्हा पंचमप्रेमींकरता स्वरांची पंढरी आहे.

पुढे लिहीण्यापूर्वी या आधी पंचम मॅजीक संस्थेविषयी मी थोडे लिहीले होते तेही इथे बघता येईल. http://www.maayboli.com/node/11300

या वर्षी एक नविन प्रथा पाडली ती म्हणजे पंचममॅजिक जे कॅलेंडर देते ते जुन ते जुन असेल. कार्यक्रमाची सुरुवात उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या सहभागापासुन झाली व मैफिलीला पहिले रिंगण पडले. उस्ताद अल्लारखा, उस्ताद झाकीर हुसेन, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरीप्रसाद चौरसीया यांसारख्या मातब्बर पण पाय जमिनीवर असलेल्या कलाकारांच्या पठडीतील उस्ताद तौफिक कुरेशी यांनी मला उस्ताद म्हणु नका असे सांगुन अनौपचारीक गप्पांना सुरुवात केली. त्यांच्या लहानपणच्या आठवणी सांगत कार्यक्रम बहरत गेला व पंचमच्या श्वासावरील नियंत्रणाने मी कसा प्रभावीत झालो होतो हे सांगत त्यांनी एक डेमो पण दिला. तौफिकजींनी त्यांच्या पंचम यांनी बनवलेल्या आवडत्या ७ वेगवेगळ्या गाण्यांचे ओळख करुन देतान मधेच प्रत्यक्ष वाजवुन सहभाग घेतला व रसिक त्या स्वरोत्सवात न्हाऊन निघाले. मधे एक आठवण सांगताना ते म्हणाले की पंचम इतका महान होता की त्याला कुणाचा कसा कधी उपयोग करुन घ्यायचा हे बरोब्बर माहीत होते. त्याच बरोबर मोठे मोठे कलाका सुध्दा बिनदिक्कतपणे तिथे जाऊन एखादाच पीस वाजवायला नखरे करत नसत. पं. शिवकुमार शर्मा यांनी एका गाण्यात फक्त एक तरारम तरारम सारखा बीट दिला आहे. (ओ मेरे दिल के चैन) तसेच एकदा तबल्यावर एकच आर्टीस्ट होता व पंचमला दोन तबल्याचा आवाज हवा होता, तेव्हा पं. शिवकुमार शर्मा यांनी त्या गाण्यासाठी तबला वाजवला आहे. (शोलेमधला भग धन्नो भागमधला बॅकग्राऊंडचा तबला) रसिक प्रेक्षकांच्या व संयोजकांच्या आग्रहाला मान देऊन उस्ताद तौफीक कुरेशी यांनी सोलो परफॉर्मन्स पण दिला ज्यात त्यांनी प्रेक्षकांना पण सहभागी करुन घेतले.

त्यानंतर मध्यंतराच्या आधी सुनिल अवचट व अश्विन श्रीनिवासन यांनी दोनच गाणी बासरीवर वाजवुन हलक्या सरी आणल्या. त्यानंतर नुकतेच दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अ‍ॅवॉर्ड मिळालेले रवि सुंदरम यांनी थोडीशी माहिती दिली व ४ जानेवारीला वाद्यांसह हजेरी लावण्यासे आश्वासनही दिले.

मध्यंतरानंतर मात्र मुसळधार सरींप्रमाणे पंचमचे संगीत कोसळत राहीले. आशा भोसले यांच्या समवेत गेले ३० वर्श काम करणारे सचिन जांभेकर यांची ओळख करुन देण्यात आली व त्यानंतर त्यांनी संपूर्ण टिळक स्मारकचा हॉल स्वरतालाने भिजवुन टाकला. पंचमच्या गाण्यातील गमतीजमती सांगतानाच त्यांनी पेटीवर ते वाजवुन दाखवले. ते जी पेटी वाजवत होते ती स्वतः पंचम अर्थात आरडी बर्मन यांची पेटी आशा भोसले यांनी त्यांना भेट दिली आहे.

पंचम यांनी किती महान काम केले आहे हे सांगताना त्यांनी एकच उदाहरण दिले. लताबाईंनी नुसते 'नाम गुम जायेगा' या गाण्याची सुरुवात करुन नुसते नाम म्हणले की आमच्याकडे दिवाळी होते. काय उपमा आहे खरच.

पंचमच्या गाण्यामधील चढउतार तसेच त्यातील असलेल्या पॉजलाही किती महत्व आहे हे सांगताना त्यांनी त्या त्या गाण्यांचा झलका वाजवुन ती जागा दाखवुन दिली. ते दाखवतानाही पंचम किती महान होता व हा फक्त माझा या गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन होता व तुम्हा रसिकांना त्यात आणखी काही दिसले असेल तर सांगा असाच अ‍ॅप्रोच होता. आरडीच्या दु:खाची किनार असलेल्या, हॅपी मुड असलेल्या, भयानक सुरावट असलेल्या व साध्या कुठल्याही संगितप्रेमीला कळणार्‍या अशा निरनिराळे रंग असलेल्या एकापेक्षा एक गाण्यांचे सादरीकरण त्यांनी पेटीवर केले. त्यात चंद्रभागे स्नान म्हणजे 'ये प्यार हमे किस मोडपे ले आया' हे संपूर्ण गाणे त्यांनी सादर केले. सुरुवातीला हळुवारपणे असलेले हे गाणे हळुहळु वर जाते. ते वाजवताना सुध्दा कशी दमछाक होते हे त्यांनी दाखवले.

थोडक्यात अत्यंत अप्रतिम असा कार्यक्रम होता. स्वर्गीय अनुभव घेताना उस्ताद तौफिक कुरेशी यांनी सुरु केलेल्या पुष्पक विमानाचे नंतर सचिन जांभेकर यांनी सारथ्य केले व स्वर्गातील पंचमकडे सर्व रसिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आले.

या कार्यक्रमाची सांगता "नाम गुम जायेगा, चेहेरा ये बदल जायेगा" या गाण्याने झाली. "गर याद रहे" असे म्हणायची आवश्यकताच नाहीये.

Hats Off to Pancham Magic Team.
http://panchammagic.org/

पंचम मॅजिक हा पंचमवेड्यांचा ग्रुप गेले अनेक वर्ष सातत्याने हा कार्यक्रम RD Burman यांच्या जयंती पुण्यतिथीला टिळक स्मारकला करता आहे. या कार्यक्रमाची कुठेही जाहीरात होत नाही व First come first server तत्वावर त्यांच्या ऑफीसमधे याची तिकीटे मिळतात.

Please search Pancham Magic on YouTube for earlier events.

इथेही काही जुन्या कार्यक्रमांची झलक बघता येईल. Happy
http://panchammagic.org/community/movie-of-the-month/

>>>>>>>
मयूरेश | 28 June, 2016 - 13:44
काल खरच खूपच अप्रतीम झाला कार्यक्रम.

सचिन जांभेकरने तर पेटीचं पूर्णपणे सिंथमध्येच रुपांतर केलं होतं. प्रत्येक गाण्यातला सूर अन सूर ,शब्द अन शब्द त्याने पेटीवर वाजवुन दाखवला. अगदी केरो मामा सारखं ऑफबीट गाणं सुध्दा.निव्वळ कमाल. शिवाय त्याने काही पंचमच्या गाण्याचे ट्रॅक्स ऐकवुन त्यातली सौंदर्यस्थळं दाखवून दिली ते पण मस्त होतं.

मुख्य म्हणजे तौफिकजी आणि सचिन दोघांनीही सर्व रसिकांनाही सहभाग घ्यायला लावला हे कालच्या कार्यक्रमाचं अजुन एक वैशिष्ट्य.

शिवाय सचिनने सांगितलेला आशाताईंनी पंचमची पेटी त्याला भेट दिल्याचा किस्सा पण भारी होता.त्याच पेटीतूनच काल त्याने कमाल दाखवली आपली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users