अ टेल ऑफ थ्री सीटीज : जिगसॉ पझल्स

Submitted by rar on 27 June, 2016 - 13:26

जिगसॉ पझल्सच्या माझ्या वेडाबद्दल पूर्वी मी मायबोलीवर लिखाणं करत असे. आता त्याबद्दल लिहित नसले तरी हे वेड अजून आहेच.
नुकतीच मी ' अ टेल ऑफ थ्री सीटीज' ही तीन जिगसॉ पझल्सची सीरीज पूर्ण केली. ही पझल्स मी फारच वेगाने म्हणजे सरासरी २.५ तासात पूर्ण केली. ब्रेन मस्त स्टिम्यूलेट झालेला अनुभवला.
ग्रीस, पॅरीस आणि व्हेनीस. ह्यातल्या ग्रीसला अजून गेले नाहीये, पण जायची इच्छा आहे. पॅरीस आणि व्हेनीस दोन्ही माझी आवडती ठिकाणं. पझल्स लावताना ती शहरं, तिथला प्रवास, त्या गल्ल्या, तिथलं वातावरण आठवत होतं. ह्या आठवणींची देखील आपलीच एक वेगळी मजा. वेगळा प्लेवर. एकूणच धमाल अनुभव आला ही पझल्स सोडवताना.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५०० पिसेस >> अवघड आहे. पेशन्स ची परिक्षा असते असले पझल्स पूर्ण करणे. आणि ते ठेवायचे कुठे असाही प्रश्न पडतो.

५०० पिसेस , अयो ! तुमचे पाय कुठे आहेत ?
तुझी थॉट प्रोसेस कशी असते सॉल्व्ह करताना. मी एक छोट्स पझल सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला होता , पण अजीबात जमलं नाही . नाद सोडुन दिला शेवटी.
वरच्या पझल मधले एकाच कलरचे पिसेस किती अवघड असतील.

सरासरी २.५ तासात पूर्ण केली. ब्रेन मस्त स्टिम्यूलेट झालेला अनुभवला.--- सा. न.

मी माझ्या मुलीला ती ५-६ वर्षांची असल्यापासून जिगसॉ पझल्स पूर्ण करायची सवय लावली आहे. आता ती १२ वर्षांची आहे, आत्तापर्यंत आम्ही ५०० पिसेस ची ४, ७५० पिसेस ची २ व १००० पिसेसचे एक पझल पूर्ण केली आहेत. अर्थात एवढ्या वेगात शक्यच नाही आमच्यासारख्याना!!
फोटो अपलोड करण्याऐवजी फेसबुक अल्बम ची लिंक दिली तर चालेल का?

आता ती १२ वर्षांची आहे, आत्तापर्यंत आम्ही ५०० पिसेस ची ४, ७५० पिसेस ची २ व १००० पिसेसचे एक पझल पूर्ण केली आहेत. >>> व्वा , जबरदस्त !
नेमका पीस शोधुन लावायचा , डोकं भंजाळुन जातं.

खूप भारीय हे!!
माझ्या ३ वर्षाच्या पुतण्यासाठी १-२ कार्टून्सचे जिगसॉ पझल्स घेऊन गेलेले. प्रत्येकात २५,३०,७५ असे ३ पझल्स होते. त्याला पहिल्यांदा हे सोडवण्यासाठी आम्ही(मी आणि त्याची आई) मदत केली. पण हा छोटासा टास्क पूर्ण करता करता आमच्या नाकी नऊ आले. Uhoh Proud
तुम्हाला हॅट्स ऑफ... सगळेच सुंदर आहेत.

झकास एकदम... हे असले मोठे पझल लावायचे आहे एकदा... मला प्रचंड आवडतं हे करायला..

माझा मुलगा आणि भाची दोघेही मस्त लावतात पझल्स वय वर्षे ३.५ आणि ३.. पण साधारण ४० तुकड्यांची पझल्स पण न चुकता लावतात.. कदाचित सारखं सारखं लावून त्यांना आता ती पझल्स पाठ झाली असावीत पण एकदम बुंगाट स्पीड मध्ये लावतात दोघेही..

मस्त! २.५ तासात एक पझल _/\_

जिगसॉ पझल्स लावायला मलाही अतिशय आवडतं. काही वर्षांपूर्वी एक सेट भेट म्हणून मिळाला होता. १००, २५०, ५००, ७५०, १००० पीसेसची ५ चित्रं होती. आम्ही खोलीच्या एका कोपर्‍यात एका प्लायवूडच्या मोठ्या तुकड्यावर कापड अंथरून त्यावर एक-एक पझल सोडवत रहायचो.
आधी एकसारख्या कलर-स्कीमचे पीसेस वेगवेगळ्या गठ्ठ्यांत काढायचे, मग चित्राचे कोपरे आणि कडा निश्चित करायच्या आणि मग आतले पीसेस लावायचे. मज्जा येते! घरातलं जे कुणी रिकामं असेल ते जाऊन १०-१५ मिनिटं, अर्धा तास, जसा वेळ असेल तसं तिथे बसून ते पझल पुढे-पुढे न्यायचं.
काही पझल्ससोबत एक रोलर मिळतो, अर्धवट पझल्स त्यात गुंडाळून ठेवता येतात असं मी ऐकलं आहे.

मस्तच!!!
आधी एकसारख्या कलर-स्कीमचे पीसेस वेगवेगळ्या गठ्ठ्यांत काढायचे, मग चित्राचे कोपरे आणि कडा निश्चित करायच्या आणि मग आतले पीसेस लावायचे. मज्जा येते! >>>अगदी अगदी

आधी एकसारख्या कलर-स्कीमचे पीसेस वेगवेगळ्या गठ्ठ्यांत काढायचे, मग चित्राचे कोपरे आणि कडा निश्चित करायच्या आणि मग आतले पीसेस लावायचे. मज्जा येते! >>> भारी की , ट्राय करायला पाहीजे , अजुन थोडी चिकाटी वाढवावी लागेल.

अरे वा ! बरेच जण आहेत की उत्साही . सहीच.
ह्या ३ पझल्सच्या आधी नुकतंच एक २००० पिसेसच केलं.. मस्त मजा आली. टाकते त्याचा फोटो आज उद्या.

मी आजवर ३०-३५ पझल्स केलीयेत. विविध डीफीकल्टी लेव्हलची - उदा. कडा नसलेली (बॉर्डरलेस), मोझाइक (चित्रात विविध लहान चित्र) , ३ डी, चित्र पूर्ण व्हायला लागतं त्यापेक्षा जास्त पीसेस असलेली (५ एक्स्ट्रा पीसेस, जे पझल लावून संपल्यावर बाजूला उतरात), पुढे -मागे एकच चित्र पण ९० डीगरी कोनात वळवलेलं (हे पझल अजून झालं नाहीये) अशी अनेक.
पूर्वी मायबोलीवर लिहायचे याबद्दल - लिंका देते लवकरच किंवा त्यातलं काही जुन्या फाँट मधे असेल तर रीटाईप करायचं आहे मला.
आता ३५ एक पझल्स झाल्यानंतर 'जिगसॉ गॅलरी' करण्याच्या प्रोसेस मधे आहे. त्यात ह्या सगळ्याचे एकत्र फोटो असतील.
नाव : मै यहा टुकडोमे जी रही हू Happy

काही प्रश्नांना उत्तरं
१) रोलर ट्राय केला. पण फारसा वर्क झाला नाही माझ्यासाठी. त्यापेक्षा टाकावुतून टिकाऊ धोरणाने - खोकी कापून त्याचे मो ठ्ठे कार्डबोर्ड वर्क्स फॉर मी. अनेकदा दुसरा कार्डबोर्ड त्यावर झाकून बेडखाली ठेवता येतात.
२) ही लहान मुलांनी करायची अ‍ॅक्टीव्हेटी आहे असा एक गैरसमज आहे. आता टॅगल आर्ट किंवा अ‍ॅडल्ट कलरींग बुक जशी मोठ्यांसाठी मेडीटेशन, फोकस , ब्रेन एक्सरसाईज म्हणून वापरतात - तसं जिगसॉ पझल्सचा उपयोग ब्रेन एकसरसाईझ म्हणून मोठ्यांसाठी जास्त आवश्यक आहे. रोजच्या व्यवहारात अनेक गोष्टी आपण मेकॅनीकली करत असतो, त्यामुळे ब्रेनसाठी खास वेगळा व्यायाम, फोकसींग अ‍ॅबीलीटी मेंटेनन्स यादृष्टीने याकडे पाहिलं जातं.
३) भारतात (पुण्यात , मुंबईत ) मी ही पझल्स बिग बझार किंवा मॉलमधे पाहिली आहेत.
शिवाय कोणाला करण्यात इंटरेस्ट असेल तर माझ्या भारतवारीत माझ्या बॅग मधे २-३ तरी असतातच. आईबाबा मग ते कोणाला इंटरेस्ट असेल त्यांना देतात. परवाच एक मित्राला हे व्हेनीस पझल गिफ्ट दिलं (हे पझल मी दोनदा केलं. एक गिफ्ट द्यायला आणि एक माझ्या सीरीज साठी) , तर त्याच्या मुलाला करायची इच्छा झाली म्हणून घरी ठेवलेलं एक पझल घेऊन गेलाय Happy

अयोssss !!! पझल्सचे एवढे प्रकार असतात हेच मुळात माहीत नव्हतं. छान माहीती देतेयस.
मला ब्रेन एक्सरसाईजची प्रचंड आवश्यकता आहे. Proud ट्राय करायला हवं.

एका नवीन लग्नं झालेल्या मारवाडी मित्राच्या बायकोने पहिल्यांदा माहेरी गेल्यावर तिच्या लग्नातल्या एका भल्या मोठ्या फोटोचा जिगसॉ पझल बनवून त्याला पाठवला, आणि आठवड्याभरात ती येण्याआधी पूर्ण करण्याचे फर्मान सोडले. नवीन नवरोबा प्रेम न दाखवून कुणाला सांगतो, जेव्हा शेवटच्या दिवसापर्यंत ईंजिनियर साहेबांनी प्रोजेक्ट पूर्ण केला नाही तेव्हा (खान-पान न करणारा मित्रं आहे हा Wink ) त्याच्याकडून बिर्याणी आणि दोन वारुणींच्या खुराकावर आम्ही दोन मित्रांनी नाईट मारून ते पझल बायको (त्याची) सकाळी लँड होण्याच्या आधी पूर्ण केलं. Proud
तो ४ x ४ साईझचा चेहरा डोक्यात एवढा घुसला होता की बिना झोपेच्या डोळ्यांमध्ये सकाळ झाल्यावरही ब्रेन मोनालिसा स्माईल ट्रान्स मध्ये होता.
तेव्हापासून फार धसका घेतला आहे मी ह्या पझल्स चा.

तुमचे पझल्स छान आहेत पण, स्पीड पण जबरा.

रार, तू जुळवून झालेली पझल्स कशी फ्रेम करतेस? पुठ्ठ्यावर चिकटवतेस का?
आम्हाला अजून ह्याचे चांगले सोल्युशन मिळाले नाहिये

टण्या, पझल सेव्हर नावाचा ग्लू मिळतो. पूर्वी अनेक ठिकाणी मिळायचा, आता फक्त वॉलमार्टमधे मिळातो, लहान मुलांच्या टॉइज सेक्शनमधे. पझल झाले की तो पझलच्या वरुन पसरायचा ( आडनावाला न जागता ..लोल). तो पिसेस मधल्या गॅप्समधे फील करतो आणि पझल चिकटवतो. साधारण २ तास लागतात. असं चिकटवून झालेलं पझलं मी पालथं करून मागच्या बाजूने सेलोटेप मारते.
पूर्वी हा ग्लू नव्हता तेव्हा मी सोडवून झालेलं पझल पीस-बाय-पीस पालथं करून सेलोटेपने चिकटावायचे.

मी हे सगळं माझ्या पझल ब्लॉग मधे लिहिलं होतं जुन्या मायबोलीवर. जुन्या रंगीबेरंगीवरुन सगळं गेलंय Sad

अव्यक्त, जबरी आहेत पझल्स. त्यातलं Neuschwanstein Castle मी नुकतंच केलं २००० पिसेस.

धनश्री, आमच्याकडे डायनिंग टेबलाचा वापर पझल टेबल म्हणूनच जास्त होतो हे तुला माहित आहेच Proud
सध्या तिथे नंद्याशेटनी दिलेलं ब्लॅक-व्हाईट पझलचे तुकडे आहेत. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट मी पहिल्यांदाच करतीये.. टोटल किक.

पझल्सशी माझी ओव्हर द इयर्स इतकी दोस्ती झालीये, की अनेकदा चित्र पूर्ण होईपर्यंत मला माहितही नसतं की चित्र काय आहे. आय डोंन्ट रीफर टू चित्र, पझल सोडवताना. रंग छटा, आणि पिसेस शेपचं लॉजीक.
ह्या वरच्या पझल्स मधे तर फक्त रंगछटा, कारण सगळे पिसेस सारखेच आहेत (दोन शेंड्या, विरुद्ध दिशेला)

दोन - तीन दिवसात दिवसात माझी पझल गॅलरी अपलोड करते Happy

वॉव टु गुड!
मी फोन वर अ‍ॅप डाउनलोड केलय. रोज वेळ मिळाला की खेळते. पण ५०० चा विचारही करवत नाही.

Pages