जिगसॉ पझल्स

अ टेल ऑफ थ्री सीटीज : जिगसॉ पझल्स

Submitted by rar on 27 June, 2016 - 13:26

जिगसॉ पझल्सच्या माझ्या वेडाबद्दल पूर्वी मी मायबोलीवर लिखाणं करत असे. आता त्याबद्दल लिहित नसले तरी हे वेड अजून आहेच.
नुकतीच मी ' अ टेल ऑफ थ्री सीटीज' ही तीन जिगसॉ पझल्सची सीरीज पूर्ण केली. ही पझल्स मी फारच वेगाने म्हणजे सरासरी २.५ तासात पूर्ण केली. ब्रेन मस्त स्टिम्यूलेट झालेला अनुभवला.
ग्रीस, पॅरीस आणि व्हेनीस. ह्यातल्या ग्रीसला अजून गेले नाहीये, पण जायची इच्छा आहे. पॅरीस आणि व्हेनीस दोन्ही माझी आवडती ठिकाणं. पझल्स लावताना ती शहरं, तिथला प्रवास, त्या गल्ल्या, तिथलं वातावरण आठवत होतं. ह्या आठवणींची देखील आपलीच एक वेगळी मजा. वेगळा प्लेवर. एकूणच धमाल अनुभव आला ही पझल्स सोडवताना.

विषय: 
Subscribe to RSS - जिगसॉ पझल्स