सैराट - रिव्यु (रीडः कौतूक)

Submitted by वैद्यबुवा on 10 June, 2016 - 16:29

पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अ‍ॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!

सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? Lol कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अ‍ॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं Lol ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!

पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात. Happy
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))

नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!

खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अ‍ॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! Happy )

त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!

परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) Lol स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!

आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..

आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.

सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अ‍ॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.

अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss

ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये. Happy

नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्‍यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अ‍ॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!) Happy

नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्‍या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?) Proud

कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!! Lol

पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!

गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अ‍ॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल! Happy

आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अ‍ॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अ‍ॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!

आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अ‍ॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"

काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....

त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्‍याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो..... Happy

अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….

_/\_

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनश्री >>
मला वाटत, तस नाही काहि...

त्यना रहायल कोणिच जागा देत नसत...ते Lodging वाले देत नाहीत जाग..
मग ते कुठे बस स्टन्ड वर झोप... मुव्ही थेटर मधे झोप...अस करत असतात...
( कसल वाइट वाटत ते पाहुन.. Sad )

थेटर मधे पण ते झोपलेले दाखवलेत..

ते थेटर मधून बाहेर पडतात तेव्हा मला असे वाटले की स्वप्नातुन रिअ‍ॅलिटीत आलेत आणी ती धग पटकन सोसत नाही असे काहीसे. म्हण्जे ते पिक्चर पहायला जाण्याची कारणे वगैरे बरीच आधीच्या प्रतिसदांत आलीत तशीच, पण हा सीन दाखवायचे प्रयोजन असे असावे असे वाटलेले.

बाकी चर्चा अशी चालू आहे की व्हॉट्सप ग्रुप जणू Light 1

भारी लिहिलय सगळ्यांनी. बुवा ,जबरी बाफ आहे एकदम.
मला फक्त ते आर्चीचा माज लिहिलेल पटलेल नाही . माज नाहि तो . आत्मविश्वास आहे. गावाकडच्या पोरी उगाच काहीतरी मिळमिळित नाहीतर फटकड्ञा दाखवायची पद्धत पाडून टाकलीये आपल्याकडे पिक्चर वाल्यानी.
खरतर गावाकडच्या मुली इतक्या मस्त दाबात असतात एकदम.
छोट जग, अपेक्षा कमी आणि आहे त्यात भारी करून दाखविणे . इनसिक्युरिटी वगैरे फारशी नाही .आर्चीच वागणं तस आहे.
उदा. २०००ची साडी घेणार. त्यासाठी १०० दुकानं फिरतील मगच निवडतील. साडी आपल्या दृष्टीने अगदीच झँग पँग वगैरे असेल. पण त्यांना ती साडी एकदम जगातली सगळ्यात भारी वाटत असते. मग तुम्ही १०००० रुपयाची डिझाईनर साडी नेसली तर त्यावर त्यांचा डायलॉग ' काय सीमाताई, कसली मळ्खाऊ साडी नेसलायसा. जरा पण कलर उटुन दिसत नाही. असलच फिकं कलर घेतायसा नेहमी '
आणि ते बोलायची पद्धत पण अशी की समोरच्याला वाटाव कि काय म्हणुन आपण १०००० ची साडी घेतली.
माझी जाऊ अशीच बोलते. फुल्ल कॉन्फिडन्स.

कधी कधी शेतात पाऊस असतो आणि गावात टिपुस नसतो. कुणितरी भिजून आला शेतातन कि
'आ. काय चेंबरात पडलातास का काय?' असाच प्रश्न असणार. इथे चेंबर म्हणजे स्किमचे शेतात सोडलेले पाणि जिथे जाते तो हौद.

परश्याला घातलेल्या घड्याळाची पण अशीच स्टोरी असणारे. गावाकडे बहुतेक करून मामा , हुशार असलेल्या भाच्याला १० वी किंवा बारावीला कधीतरी चांगले मार्क पडले कि घड्याळ घेवून देतातच देतात. (पुर्वी कंपास पेटी हा एक आयटम असायचा त्या सोबत.) ते घड्याळा बरेचवेळा अगदी फोकस मध्ये आहे. (इतर मुलांच्या हातातले घड्याळ लक्षात येत नाही. पण परश्याच्या हातातले लगेच लक्षात आहे. )तो ते काढूनच पोहायला जातो. कारण त्याची ती सवयच असणार. घड्याळ घेतल्यापासून ते जपायचे ,आणि मोस्टली अगदी ते दुरुस्त करण्याच्या पलिकडे गेल्या शिवाय वापरणे थांबयाचे नाही . कित्येक मुल दिसतील तुम्हाला तशी. मंजुळेनी अगदी मस्त रित्या पर्श्या हुशार आहे हे सांगितलय इतर मुलांपेक्षा. (आता हुशार म्हणजे ९० च्यावर मार्क वगैरे जाऊ नका. )
(माझ्या नवर्‍याच्या, चुलत भावांच्या हातात अशी घड्याळ दिसतील तुम्हाला. बेल्ट झिजला तरी अजुन तेच वापरायचे. )
पिक्चर मध्ये शेवटाच्या जवळ ,
आर्ची गाडी चालविते आणि पर्श्या मागे बसलेला असतो ते पण मंजुळे नी आर्ची ड्रायव्हिंग फोर्स आहे. आणि अजुनही संसारातले सारे निर्णय मुख्यतः तिचे घेते हे फार सटल रित्या दाखविले आहे. पर्श्या नेहमीच बॅक सिट वर आहे.
फोन ती सुरुवातीला पण करत असणार आहे. परश्याला त्याचा संशय आलाय. म्हणुनच तो फोन बघायचा प्रयत्न करतो. पण तिन पासवर्ड प्रोटेक्ट केलाय. तिचा अजुन त्याच्यावर विश्वास नाही म्हणण्यापेक्षा तिला ते पर्रश्याच्या रागाला घाबरुन सांगायच नाही यापैकी काहीही कारण असेल. पण नंतर ती उघड उघड आईशी बोलताना दाखवलय. थोडक्यात आता त्यांच नातं मॅच्युअर झालय. ती पाटलांची पोर आहे. पण गावाकडच्या पाटलांची. उगाच करोडोंका माल पाटलांकड असणार नाही. आणि गावाकड पैसे कितीही असले तरी कपड्यांना पैसे घालणार नाहीत. तिचे कपडे पण म्हणुन तसे दाखविलेत. पण त्याचबरोबर शेवटी आईशी बोलताना ती ४०००० पगार सांगते. उगाच ४ लाख सांगत नाही.

-------------
मला शेवट अज्जिब्बात पटला नाही.जातीचाबद्दल मला हा सिनेमा न वाटता गरीबी आणि श्रिमंती बद्दल जास्त वाटला.
अजुन नंतर लिहिते.

चित्रपट संपताना एक सरसरुन काटा येतो अंगावर. भयंकर खळबळ माजते डोक्यात. एक अस्पष्ट शिवीही उमटते ओठांत. सगळी एकशे साडेत्रेहत्तर मिनीटे झपकन लयास जातात. उरतात ते काही सेकंद. ते सेकंद भयंकर जाळतात, गुदमरवतात. त्या चकचकीत थेटरमधून बाहेर निघायची घाई करतात.
बाहेर मोकळा श्वास घेतल्यावर ते सेकंद कुठेतरी पुरुन टाकतो.
असे सैराट पक्षी कुणी कसे मारु शकतो? आणि का?

बाय द वे, हे बिटरगावातलं कॉलेज आमच्या सोलापूर शहरातल्या कॉलेजपेक्षा फॉरवर्ड आहे. आम्ही एफ वायला असताना आम्हाला पण पी टी मधे कवायत असायची पण मुलांची आणि मुलींची एकत्र नाही, वेगवेगळ्या वेळांना. अर्थात मुलींच्या कवायतीला जिमखान्याच्या आसपास मुलांची गर्दी असायची. Happy

सीमा - मस्त लिहीले आहेस.

अजून एक मला जाणवले ते म्हणजे इम्पॅक्ट साठी ते पाटील कुटुंब व्हिलनिश दाखवले आहेत गावाच्या दृष्टीने सुद्धा - अ‍ॅरोगण्ट वगैरे. त्यामुळे ते नंतरच्या प्रसंगात तसे वागतात ते स्वाभाविक वाटते. पण प्रत्यक्षात मी अनेक ठिकाणी असे पाहिलेले आहे की गावात ती एक परंपरेने चालत आलेली व्यवस्था असते. त्याच्या मर्यादा पाळल्यात तर सगळे लोक एकमेकांशी "चांगले" असतात- "तुम्ही तुमच्या लिमिट मधे राहा" टाईप. आता हे बरोबर नाही हे उघड आहे, पण जे दिसले त्याप्रमाणे सांगतोय. ते मुलाने मास्तराला वर्गातच मारणे हे जरा फिल्मी आहे. गावातील राजकीय नेतासुद्धा गावातील लोकांचा इतका उघड अपमान सहसा करत नाही - मास्तर वगैरे प्रतिष्ठित तर नाहीच पण इतरही नाही. पण हे सगळे त्या मर्यादेच्या आत असते तोपर्यंत.

यातील प्रेमासारखी ती मर्यादा तोडली गेली तर सगळे चित्र बदलते. पण एरव्ही इथे दाखवले आहे तितके उद्दाम लोक सहसा नसतात.

आर्ची आणि परश्याचे जे होते ते त्यात हे गावचे नियम जास्त कारणीभूत आहेत. ती पाटील फॅमिली कशी दाखवली आहे त्याचा फारसा संबंध नाही. ते 'झिंगाट' पर्यंत अगदी चांगले असू शकतात आणि तरीही नंतर असेच वागू शकतात.

सीमाताई, येक नंबर लिहीतायसा.
हे सगळं वाचताना मनातल्या मनात किती वेळा सिनेमा पाहिला जातोय!
आर्चीच्या वडलांची भूमिका केलेला अभिनेता पण जबरदस्त आहे. नजरेत काय धाक, काय जरब! पोलीस स्टेशनात आपले हात दगडाखाली असल्याचं फक्त देहबोलीवरून दाखवलंय. नंतर रात्री मंग्याला घरी बोलावतात तेव्हा कोणत्याही स्टिरीओटाईप व्हीलनच्या पाठी असलेले पार्श्वसंगीत नसतानाही थरकाप उडतो. बिचार्या मंग्याचीच काळजी वाटायला लागते. आता हे बेणं नक्की चड्डी ओली करणार असं वाटतं जेव्हा पाटील त्याला शेजारी बसायला सांगतात. आणि यानंतर कटटू - निवडणूकीनंतरच्या सभेत प्रेक्षकातला पाटील. एक मान हरला आणि त्यापायी आजवरची सगळी कमावलेली इज्जत धुळीला मिळालेली. दात नखं काढलेला सिंह. काय ग्राफ आहे! आणि त्या नटाने तो समर्थपणे पेललाय. नागेश भोसलेला कुणीतरी पर्याय मिळाला अखेरीस मराठीत. Happy

सुरेश विश्वकर्मा असे नाव आहे आर्चीच्या बाबाचा रोल केलेल्या अभिनेत्याचे. तो बहुतेक मराठी भाषिक नसावा असे आकाश आणि रिंकूच्या एका मुलाखतीत ऐकल्याचे स्मरते. ते दोघे त्याचा उल्लेख सुरेश अण्णा असे करत होते आणि त्याला मराठी समजत नसल्यामुळे त्याची खिल्ली उडवायचे असे काहीतरी....

हो ना बुवा. आणि एक नोट केलंत का, शो मधे ती पा'णी' पुरी म्हणते, पानीपुरी नाही. पहले सीखा फिर चलाया ट्रॅक्टर हे अजून दोन वर्षांनी ती पुन्हा पाहील तेव्हा तिचं तिलाच हसू येईल. परश्याही गोंधळलेला समोरून थेट प्रपोजल आल्यावर. त्या पंजाबी काकांनी मस्त सांभाळून घेतलं. त्या दोघांचं वय आणि त्यातून आलेला निरागस बिनधास्तपणा दिग्दर्शकाने कॅमेर्यातून अचूक टिपलाय तोच यूएसपी आहे सैराटचा. उद्या रिंकू आकाशला वेगळ्या भूमिकांमधे वेगळ्या जोडीदारासोबत बघायला आवडेल की नाही माहीत नाही. नागराज मंजुळेने आमची यांच्यातल्या आर्ची परश्याशी जी ओळख करून दिली आम्ही त्यांच्याच प्रेमात पडलो. या अर्थानेही हा सिनेमा संपूर्ण नागराज पोपटराव मंजुळे चा आहे!

Kapil sharma show thodach pahila, Kapil was having more fun talking to Langdya I guess .

गावाकडे बहुतेक करून मामा , हुशार असलेल्या भाच्याला १० वी किंवा बारावीला कधीतरी चांगले मार्क पडले कि घड्याळ घेवून देतातच देतात. <<<< सीमा, Happy Happy

जेव्हा लंगड्या परश्याला सांगतो की विहिरीवर आर्ची आली आहे तेव्हा परशा आधी आंघोळ करून मग विहिरीवर जातो. नदीत पोहून आलेला असतो आणि विहिरीत उडी मारणार असतो मग आंघोळ का करतो? मग काही दिवसांनी लक्षात आलं अरे आर्ची भेटणार असते आणि हा मासे मारत असतो. खरंतर ताज्या माश्याना फारसा वास येत नाही पण इथे रिस्क घेणे योग्य नाही. तो साबण लावून स्वच्छ आंघोळ करून जातो. Happy

पाहिला
मला मूव्हीपेक्षा इथल्या प्रतिक्रिया जास्त आवदतायेत. पिक्चर आणखी कळत जातोय.आर्ची सुपर्ब आहे. परश्या गोड आहे.

आत्ता कपिल शर्मा बघत होतो. रिंकु राजगुरु दहाव्वीत आहे!!! आयो बाबो!
>>>
कुठे पाहिला? लिंक देणार का?

कपिल शर्मा शो विथ सैराट टिम आता युट्यूब वर पाहिला.
सगळे क्यूट आहेत.सल्या ला अजून थोडं एक्सपोजर देता आलं असतं.तानाजी एकदम मनमोकळा.आकाश लाजाळू.रिंकू मॅच्युअर्ड, आणि गंमत म्हणजे सैराट कपिल शर्मा शो मध्ये आर्ची परश्या बाळ्या सल्या चा कोवळेपणा, निरागस परफॉर्मन्स आणि नागराज-अजय अतुल चा अनेक ठिकाणी जाऊन, वयाचे टक्केटोणपे आणि अनुभव घेतलेला सराईत वेल मॅनर्ड पणा(चांगल्या अर्थाने) दोन्ही एकदम उठून दिसतो.

सगळ्यांच्या पोस्टस भारी...
आपल्या आवडीनिवडी सांगताना,,परश्याच..हात पुढे करुन्,,सिरीयसली मला वाचायला आवडतात्(तेव्हा कोणी हसत नाही जसे प्रदीप ला हसातात सगळे ),कविता करायला आवडतात.पोहायला आवडत. भारी बोलतो तो.
आर्ची ने चिट्टी घेतल्यानंतर उत्तरासाठी सल्या आनि प्रदिप च सारख चिट्टी,,लेटर ,पत्र पत्र करण्,,येता जाता काहीतरी बोलुन तिला आठवण करुन देण आनि तिने ते फक्त हसण्यावारी नेण,हे सगळ मस्त घेतलय.

(अंवातर : हे दुसर्यांदा पाहत अस्ताना मला उगीचच दिल चाहता है आठवला,,सैफ म्हण्तो..जिंदगी मै कभी किसी को प्रपोज नही करुंगा और किया वो भी दुसरे के शादी मै १०० लोगो के सामने,,, ) इकडे आर्ची पण त्याला चिट्टी-बिट्टी देत नाही,,,खुला सगळ्यांसमोर मंग्या ला धमकी देते,,ज्यात ती प्रेम पण व्यकत करते.आनि मग एक्झिट की दुसर्यां दिवशी मस्त तयार होऊन वर्गात फक्त परश्यासाठी.

परश्यांकडे एकटक पाहत असताना,,मास्तरांनी शब्दांच्या जाती शिकवायला घेण आनि मग आर्ची ने फक्त डोळ्यांनी दटावल्यावर त्यांनी ते पुसुन टाकण.अचुक टायमिंग,हॅटस ऑफ मंजुळे.

बाकीच नंतर.

२) लग्न होऊन इतका काळ लोटल्यावर सहसा ते, गेलीयेस ना आता, तिकडेच रहा, इथे येऊ नकोस परत अशा फेज मध्ये पोहोचतात. पळून जाऊन लग्न केल्यावर पुढे मूल वगैरे झाल्यावर मारुन टाकल्याच्या बातम्या मी तरी फार नाही बघितल्या. इन फॅक्ट कधीच नाही एकल्या. आय मे बी राँग.

>>>>>>>>>>>> १. क्राइम पेट्रोलला अगदी सेम स्टोरी दाखवलीय , भाऊ न त्याचे मित्र असेच साडी, बाळासाठी खाऊ न कपडे घेऊन येतात अन दोघांना मारून टाकतात.

२. अकलुज तालुक्यातील मित्राने एक घटना सांगितलीय. तेथील एका बागायतदाराची मुलगी अन जावई ऑनर किलिंगमुळे कर्नाटकामध्ये मारले गेलेत.

' हय रे पठ्ठे , डायरेक कानाखालीच ' पाटलाचं काम मस्तय.
बायदवे तो ' झिंगाट' गाण्यानंतर गाडीतून आर्चीला बाहेर ओढुन काढल्यावर पाटील खराखुरा फटका मारतो का ? आर्चीचे केस झप्पदिशी उडालेले दाखवलेत. प्रिन्स परशाला मारताना पण खरचं तोंडात मारतो वाटतं.

दुसर्‍यांदा सिनेमा पाहताना 'काळ्या चिमणीची राख' माझ्या लक्षात आली होती... smiley-happy093.gif

पण इथे लिहायचं राहिलं. Proud

मी सब-टायटल्सकडे ढुंकूनही पाहिलं नाही. काही काही संवाद जरा उशीरा कळायचे, पण त्यातही मजा आली.

भग्न किल्ल्यावर डावीकडे सल्या, लंगड्या बसलेले - हे माझ्या नजरेतून सुटलंय !!! पण आता व्हेरिफाय करायला `मायबोली' चॅनलवरची गाणी आहेतच Wink

हे कुणी लिहिलय का माहीत नाही.....

प्रिन्स वगैरे लोक अल्बम पाहत असताना एका फोटोत सल्या, बाळ्या , आर्ची, परश्या यांचा लग्नानंतरचा एक फोटो आहे. कदाचीत हे दोघे नंतर भेटले असावेत, भेटत असावेत.

भग्न किल्ल्यावर डावीकडे सल्या, लंगड्या बसलेले - हे माझ्या नजरेतून सुटलंय !!! पण आता व्हेरिफाय करायला `मायबोली' चॅनलवरची गाणी आहेतच >> हो मी तिथंच पाहून व्हेरिफाय केलं. काय जबरदस्त नजर आहे तुमची मोसा!

सगळेच फटके खरेखुरे घेतलेले आहेत असे टीमचे म्हणणे आहे >>>>>> परश्या सांगत होता एक मार खाण्याचा सीन त्याच्या बड्डेदिवशीच शुट झालाय..... बड्डेदिवशीच गाल लाल झालेले म्हनाला

अजून एक वेगळेपण :

एकही गाणे कुणाच्या तोंडी घातलेले नाही सिनेमात. सगळी गाणी कथेचा भाग म्हणून येतात आणि गोष्ट पुढे नेत रहातात.

Pages