सैराट - रिव्यु (रीडः कौतूक)

Submitted by वैद्यबुवा on 10 June, 2016 - 16:29

पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अ‍ॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!

सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? Lol कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अ‍ॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं Lol ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!

पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात. Happy
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))

नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!

खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अ‍ॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! Happy )

त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!

परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) Lol स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!

आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..

आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.

सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अ‍ॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.

अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss

ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये. Happy

नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्‍यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अ‍ॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!) Happy

नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्‍या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?) Proud

कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!! Lol

पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!

गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अ‍ॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल! Happy

आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अ‍ॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अ‍ॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!

आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अ‍ॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"

काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....

त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्‍याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो..... Happy

अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….

_/\_

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहा हाहा. प्रतिसाद वाचून खूप मज्जा वाटत्ये.

आता विचारले म्हणून सांगते - असायचे कोड ऑफ कंडक्ट हो. सीनियर मुलींच्या ग्रूप ने जूनियर मूलीना एफ वाय ला सांगितलेले. किस मागितली म्हणून लगेच द्यायची नाही, थोडा भाव खायचा, आपणहून कधीच पुढाकार घ्यायचा नाही इत्यादी इत्यादी.

आणि ह्या अशाच फालतू खूळचाट नियमाना आर्चीने सुरुंग लावून फोडून दिले म्हणूनच आपण ह्या सिनेमावर फिदा.

आमच्या साबांनी टिप्पणी केली की पराशा ने किस इतकी आधी का मागितली, अजुन एफ् वाय लाच आहे ना तो.
<<
Biggrin
त्याने फ्रेंडशिप मागतात तसा किस मागितला तो पण अपॉइंटमेन्ट घेउन याचच हसु आलं मला , वाटल आर्ची ओरडणार अता कोवळ्या पोरावर " किस काय फोन वर मागतात का रे नरसा़ळ्या' !

परवा तनु वेड्स मनु ओझरता पाहिला तेंव्हा एकदम रिंकुव्ही आठवण आली कंगनाचा किल्लर अ‍ॅटीट्युड पाहून.
म्हंटलं फार सैराटमय झालोय आपण, पण आज योगायोगानी रिंकुचा इंटर्व्ह्यु पहात होते तेंव्हा ती म्हणे तिची फेवरेट अ‍ॅक्ट्रेस कंगना :).

आणि याड लागलं मधली विहीरही कसली मस्त, भरपूर पाणी असलेली >>> त्या विहिरीत पाणी कमी होतं तेव्हाही म्हणून टँकरने पाणी ओतून शूटिंग केलं असं वाचलं. ह्यावर्षी तर ती विहीर कोरडीठाक पडली आहे म्हणे. फोटो आले होते मध्ये पेपरला.
अर्थात मासेमारीच्या शॉटमधलं धरणाचं पाणी तर खरंच असणार.

बुवा,
छान लिहिलाय अ‍ॅडेड पार्ट पण !
तो मार खाणे सीन फार रिअ‍ॅलिटी चेक आहे आर्चीसाठी, सिनेमाचा पहिला पार्ट जितका गुलाबी-स्वप्नाळु -रोमँटीक तितका सेकंड पार्ट अंगावर येतो!
पिसा सारखं उडत जाताना एकदम धाडकन दगडावर आपटल्याचंं फिलिंग येतं !
पळून आल्यापासून अगदी डे १ पासून जे सामोरं येतं दोघांच्या, नुसता संघर्ष !
लग्नं मात्रं एकमेका ंवर विश्वास घट्ट झाल्यावर मग करतात ते आवडल ं .

बुवा नवीन भाग पण मस्त लिहिलायसं.
पण आर्चीचा माज म्ह्णु नको रे काळजाला घरं पडतात Proud , तो माज नाही अ‍ॅटिट्युड आहे , आणि फार कमी जणांना असा अ‍ॅटिट्युड कॅरी करता येतो.

सैराट अघळ पघळ गोष्ट सांगावी तसा सुरु होतो क्रिकेटच्या मॅचने पण हळू हळू डेन्स, टोकदार होत जातो आणि शेवट तर खच्चकन भोसकला जातो प्रेक्षकांमध्ये.

जर सुरुवात अशी हलकी फुलकी नसती तर शेवट इतका अंगावर आला असता का हा ही प्रश्न पडतो. सैराटची लांबी कमी करायला माझा पूर्ण विरोध.

बरोबर श्री.
माज प्रिन्सचा, आर्चीचा बिंधास्त अ‍ॅटिट्युड, डॉमिनेटींग नेचर किंवा तोरा.
तिला प्रिन्सचं सरांना थोबाडीत मारणं embarrassing वाटतं, त्याला सुनावतेही !
प्रदीपला लंगड्या म्हणण् आवडत नाही.
परशाची किंवा त्याच्या मित्रांची जात इन्फिरिअर वाटत नाही, परश्याकडे जाऊन पाणी मागणं कमीपणाचं वाटत नाही, त्याची आई उन्हाची भांडी घासते बघून वाइट वाटतं , असे बरेच मुद्दे ज्यामुळे तिचं व्यक्तिमत्त्व छान फुललय.
सैराट मधे इतर सिनेमांपेक्षा वेगळच काहीतरी म्हणजे मित्रं पण पळतात या दोघांबरोबर , नंतर हैदराबाद पर्यंत जाऊ शकत नाहीत ते वेगळ् पण मित्रं कायम सच्चे साथी पर्श्याचे :).
यांची लव्ह स्टोरी जमत असताना, रोमान्स चालु असताना, गाण्यांमधे कायम मित्रं बरोबर , अगदी आर्ची परश्याच्या घोड्यावरच्या रपेटी बरोबर लंगड्या आणि सल्ल्या पण बाजुलाच गाढवावर :).
सेकंड पार्ट मधे फार मिस केलं दोन्ही मित्रांना !

Buva, buva u made my day.. this is the kind of honour and love needed for a movie like sairat.

बुवा ते "आकरीत" घडलंया असं लिहाल का? अक्रीत साठी ग्रामीण शब्द आहे तो.

आणि अल्या नव्हे "सल्या" सलीम चा अपभ्रंश!

मालिकेबद्दल धन्यवाद!

त्या दिवशी टीपापा मध्ये लिहिलं होतं तेच थोडं वाढवून पुन्हा इथे टाकतेयः
कॉश्चुम पण खुपच मस्त घेतले आहेत. अगदी बारिकसारिक डिटेल्स वर मेहनत घेतलेली दिसुन येते (सुजाण आणि सामान्य प्रेक्षकांनाही. स्वघोषित सिनेमा परिक्षकांना फक्त ओलेत्या अंगाची अर्ची अन न दाखवलेला किस च दिसला ते सोडा).
आर्चीचे कपडे गावातल्या इतर मुलींपेक्षा जास्त रंगीत, महागाचे, क्वचित कधीतरी पँटालुन्समधले ऑफ द शेल्फ उचललेले, तरी जरा गावठी स्टाइलचे. प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग बांगड्या आणि चमकदार, चीप कानातली. गावातल्या इतर मुलींच्या मानानी स्टाइलची परमावधी पण शहरी प्रेक्षकांना त्यातला गावठीपणा दिसतोच. परशा पण हुशार दाखवल्यामुळे डाव्या हातात पुर्णवेळ रिस्टवॉच घालुन . कपडे ही इतर थिल्लर मुलांपेक्षा सोबर.
विहिरीत बेभान उडी मारतानाही त्याला त्याच्यासाठी महागाच्या वस्तुंचं भान आहे. उडी मारायच्या आधी बरोब्बर घड्याळ आणि वॉलेट मित्राच्या हातात द्यायला तो विसरत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी माणसं अगदी खरी वाटतात. इतर बकवास पिच्चर च्या डिरेक्टर्स सारखं नागराजनं कुठेही वास्तवाचं भान सुटु दिलेलं नाही.

पहिल्या हाफमध्ये त्या हिरव्या रंगाच्या विविध शेड्सही खुपच सुंदर. अगदी प्रत्येकच फ्रेम सुंदर असली तरी मला कमाल आवडलेले दृष्य म्हणजे हिरवं-पिवळं रान, त्यामागे हिरवी मालगाडी (चक्क!) आणि मधुन आपल्या धुंदीत नाचणारा परश्या आणि त्याच्यासारखंच स्वच्छंद एक हिरवं फुलपाखरु, अर्रे किती सुरेख आणि मिनिंगफुल दाखवशील नागराज? आम्हाला असलं काही सुरेख, अर्थपुर्ण बघायची सवय नाही रे बाबा.. अता तुझा पुढचा सिनेमा येईपर्यंत आम्ही एकापेक्षा एक बकवास, अनरिअलिस्टिक सिनेमे बघावे तरी कसे?

विहिरीत उडी मारुन वर येताना आर्ची-परश्याची नुसती नजरेतली केमिस्ट्री! जबरदस्त! नजरेतून बोलणं म्हणजे काय ते कळतं. सगळ्या प्रेक्षकांचं त्यांच्या नजरेतून चाललेया संभाषणाकडे लक्ष असताना काही स्वघोषित चीप परिक्षकांना आणि सौंस्क्रुतीरक्षकांना मात्र ओली ( भले पुर्ण अन डिसेंट कपड्यातली असो) आर्चीच दिसली??? ज्यांच्या मनातच वाईट विचार आहेत त्यांना बुरख्यातल्या बाया बघुनही चेकाळायला होतं, हे खरंच आहे..

पहिल्या हाफमधल्या हिरव्या निसर्गाच्या बॅकड्रॉपवर अगदी मॅजिकल, डिव्हाइन दिसणारे आरची-परश्या आणि त्यांचं प्रेम हैद्राबादमध्ये आल्या क्षणापासुन अगदी ऑर्डीनरी दिसु लागतात. इस्पेशली त्या बसस्टॉप वरच्या सीनम्ध्ये तर फारच. गर्दीत अशी अनेक माणसं आपण बघतो आणि दुर्लक्ष करतो तेव्हा आपल्या मनातही येत नाही की ह्यांचाही एक अतिशय सुरेख, नाट्यमय आणि इंटेन्स पास्ट असु शकेल.

आणखी कुणाला एक सीन नै का आवडला..

परश्याला विहिरीतून बाहेर काढल्यावर त्याचे सारे मित्र भोवताली गोळा होतात अन सल्या त्याला विचारतो,
" काय म्हणली र आर्ची?"
अन त्यावर परश्या म्हणतो,
"हू बाहिर निंग म्हणली.."
अस म्हणत तो जो लाजरबुजर खट्याळ हसत जातो अरे खत्तम.. काय हसली होती मी तेव्हा Lol

"सटकला तु ल्यका".....आठवतंय का कोणाला? आर्ची तु आली .....विश्वासच नाही बसत नंतर ती त्याचा हात घेऊन चिमटा काढते तेव्हाचा डायलॉग...

थँक्यु जाग्याव पल्टी. बदल केले आहेत. Happy

भारी भारी अनॉय्ड. Happy

अरे ते माज म्हणजे मला श्रीमंतीचा रुबाब ह्या अर्थानी लिहायचं होतं. कसय एकदा परशावर प्रेम बसल्यावर मग थोडा मायेचा ओलावा दिसतो नाहीतर एरवी फट फट फटाकड्यासारखी उडणारी आर्चि कशाला ह्या पोरांना भाव देइल? Happy
अशा पोरींना उगा पोरं टरकून नसतात. आपण आवडलो नाहीतर शिंगं मारु शकतात. Proud

लग्नं मात्रं एकमेका ंवर विश्वास घट्ट झाल्यावर मग करतात ते आवडल ं .
>>
अगदी अगदी!!
शिवाय बाळाविषयीचा निर्णय सगळं स्थिर आणि सेटल झाल्यावर घेतात हे आवडले.

नाहीतर सध्या अडनिड्या वयात लग्न करुन, संसाराची घडी नीट बसलेली नसताना देखील बाळ जन्माला घालून, आपली नि आपल्या बरोबर बाळाचीदेखिल फरफट सोसणार्‌या मुली पाहिल्या की वाईट. वाटतं.

हे नुसतं पळून जाऊन लग्न करणाऱ्याच नाहीतर अगदी रितसर ठरवून लग्न केलेल्या मुलींच्या बाबतीत देखील पाहायला मिळते.

अजुन एक जाणवलेल मला निट लिहता येइल की नाही ते माहिती नाही पण प्र्यत्न करते , पिक्चरवर आक्षेप असणार्‍याच्या यादित असणारा एक आक्षेप म्हणजे ज्या वयात शिकायच त्या वयात ही मुल पळुन जातात आणि ल्ग्न करतात ही शिकवण मन्जुळे देणार का आजच्या पिढिला?
पण निट बघितल तर यात कितीतरी ठिकाणि नागराजने रिअ‍ॅलिटीच अन्जणच घातलय पहिल जेव्हा मासे पकडताना परश्याचा बाप त्याला "सावलतिल काम बघा सान्गतो" म्हणजे निट नोकरी शोधा, कट टु जेव्हा हे लोक पळुन हैदराबादेला येतात तेव्हा आर्चिच्या अन्गावर ओढणी नसते की याना रात्रिचा निवाराही मिळत नाही, ज्या झोपडित हे लोक राहतात त्याच्या सावर्जनिक सन्डासात जायला आर्चिला कसतरी होत असत पुढे हिरो उधारिचा स्टोव्ह आणून त्यावर वरण-भात लावतो, डोस्याच्या गाडिवर काम करतो त्यामुळे शिक्षण न घेता कोवळया वयात केलेली प्रेमाची वाटचाल खडतर आहे हेचतर मन्जुळेना दाखवायच.
शिवाय एकाठिकाणि जेव्हा छाया कदम( याना आसरा दिलेली अम्मा) त्याना " प्रेम करण सोप पण निभावण कठिण" अशा अर्थाच काहितरी सान्गते.
ज्याला जे रिएलिटि चेक करायच ते करतीलच की यातुन,

एक सिन मला कळला नाही. परशाला चांगला धुवून प्रिंसदादा त्याच्या बाबाकडं आणून सोडतो आणि याला बाहेर पाठव म्हणून धमकी देतो. बाबा मग त्याला करमळ्याला धाडून देतो. इकडे आरचिला बघायला पाहुणे येतात. नंतर परश्या आणि गॅंग करमाळ्याच्या पाहुण्याकडे तोंडे पाडून बसलेले असताना मंग्या येतो. त्याच्या मागून आर्चि येते, दागिन्यांनी व पैशांनी भरलेली पर्स घेऊन.
आता हे कुठल्या गावात कुठल्या पाहुण्याकडे गेले हे आरचीला कसे कळते? परशाचा बाप काही सांगणार नाही तिला. बिटरगाव आणि करमाळा एसटीने जावे लागते इतके अंतर आहे हे पुढच्या शॉट मधून कळते. मग आर्चि सगळी माहिती काढून एसटी करून येते काय परशाकडे पळून?

बापरे तुम्ही तर सविस्तर सिनेमाच लिहायला लागलात की नवीन भागात. माझा त्यामुळे पास. प्रतिसाद पण वाचले नाहीत कारण लोक चक्क संवाद लिहु लागलेत आता. आता १-२ वर्षानी सिनेमा पाहिला की येईन इथे.

1 2 वर्षांनीच पाहणार तर आता वाचा कि. 2 वर्षात एकतर विसरून जाल किंवा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल.

प्राजक्ता, सहमत. पळून गेल्यावर हिंदी चित्रपटाप्रमाणे गोड गोड आयुष्य सुरु होत नाही तर राहायचे, खायचे आणि .... चे वांदे होतात, पश्चतापापर्यंत गाडी जाते हे प्रभावीपणे दाखवलंय. पळून जाणारे धडा घेतील.

आर्ची परश्या अशा प्रकारे गोळी मारून पळून गेल्यावर त्याचा राग प्रदीप आणि सल्यावर निघाला असेल, त्यांच्याबद्दल नंतर काहीच दाखवले नाही?
आर्ची सारख्या दमदार पर्सनॅलिटी ने परश्या चा नातलग करमाळ्यातला ट्रॅक करणे चौकशी ने शक्य आहे.

खायचे आणि .... चे वांदे होतात >>> Lol
पळून जाणारे धडा घेतील.>>> पळुन जाणारे तर धडा घेतीलच पण पळुन जायला भाग पाडणारेही धडा घेतील आणि दोन जीवांना सुखाने जगायला मदत करतील.

दीपांजली. बरोबर. लंगड्या घेऊनयेतो आणि असं दाखवलय indirectly.
शिवाय दुसऱ्या भागात परशा ला ही आपल्या घरच्यांंची आठवण येते, मित्रांची आठवण येते असं दाखवायला हवं होतं, असं वाटतं.
At least तो सल्या ला एखादा फोन करतो असा सीन हवा होता.

मस्त रिव्ह्यू लिहिलाय. असं वाचून मला सिनेमा पहायला जास्त आवडतं. कारण कोणत्या सीनमध्ये काय काय बघायचं हे कळतं. मी नक्की पाहणार आहे. (अजून का पाहिला नाही देव जाणे.) सध्या गाणी पाहतेय युट्युबवर. मस्त वाटतात पहायला. इथे काही वाचलं की पुन्हा एकदा ते गाणं बघते. Happy

काही प्रसंगात नागराज मंजुळे यांनी अ‍ॅपिअरन्स दिलाय का? उदा. याड लागलंय गाण्यात परश्या रस्त्यातल्या एका दुकानात केस ठाकठीक करतो त्यावेळी दुकानात बसलेला माणूस मंजुळे आहेत का? अजून एका गाण्यातल्या प्रसंगी त्यांच्यासारखा दिसणाराच एक माणुस ओझरता दिसतो.

हो, मंजुळे खूप वेळा आहेत। सुरवातीची कॉमेंटरी त्यांचीच. सल्याचा मामा मंजुळ्यांचा थोरला भाऊ.

Pages