पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!
सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!
पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात.
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))
नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!
खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! )
त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!
परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!
आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..
आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.
सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.
अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss
ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये.
नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!)
नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?)
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!!
पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!
गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल!
आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!
आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"
काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....
त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो.....
अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….
_/\_
आर्चीचा फोन येणार असतो तेव्हा
आर्चीचा फोन येणार असतो तेव्हा ती वाजणारी कॉलरट्युन कुठली आहे ?
सैराट फॅन क्लबात मी पण.. 3
सैराट फॅन क्लबात मी पण..
3 वेळा पाहिलाय. खूपच आवडला. आर्ची , परशा , त्याचे मित्र सगळे च भारी.. सैराट चे संवाद आणि गाणी यामुळे खरचं सैराट झालयं. रिपीट मोडवर ऐकतेय गाणी सध्या. आणि संवाद ही पाठ झालेत.
विहीरीत परशाने उडी मारल्यानंतर चा सीन आणि डायलॉग एकदम बेस्ट!.
वर्गात ती एकटक बघत असताना तो तिला हात जोडून विनंती करतो.. सही दिसलाय एकदम. आणि एक्स्प्रेशन्स पण मस्त! शेवटी बिचारा म्हणतो. सर पोटातदुखायल घरी जाऊ का? त्यावर ती पण म्हणते. सर अनी च्या ही पोटात दुखायलयं
मंग्या ला दम देते तो सीन ही भारीये. पुन्हा त्याला हात तर लावून बघ मग सांगते मला काय करायचे ते.. ह्या बोलण्यावर परशा, सल्या आणि लंगड्या तिघांच्या रिअॅक्शनमस्त.
सेकंड हाफ मधले डिटेलिंग ही आवडले. पहिल्यांदा ते खातात त्या गाड्या वर तिच बाई असते जी त्यांना नंतर मदत करते. हे दुसर्यांदा मुवी बघताना लक्षात आले.
इथे परत सगळे डिटेलिंग वाचायला मजा येतेय. सध्या अगदी सैराट झालयं. हा सैराट फिवर लवकर कमी होईल असं वाटतं नाही.
श्री, तुला ती ट्युन तुझ्या
श्री, तुला ती ट्युन तुझ्या मैत्रिणीकरता राखीव म्हणून हवी आहे का?
अय आरे ती काय शब्दात पकडता
अय आरे ती काय शब्दात पकडता यील का लगा टुन?
आर्ची सारखी मैत्रिण असती तर
आर्ची सारखी मैत्रिण असती तर लावली असती की तीच ट्युन
बुवा पकडायची कुणालायं
सगळ्यांना सैराट ने वेड
सगळ्यांना सैराट ने वेड लावलंंय. जिथे तिथे हीच चर्चा आणि गाणी ऐकूयेत आहेत. माबोवर ही एका मूव्ही वर इतके धागे.!! आणि प्रत्येक धाग्यावर भरपूर प्रतिसाद.. !!!
अय! सगळे त्याला लंगडा व्हय
अय! सगळे त्याला लंगडा व्हय त्याला. त्याचं नाव पण असेल की.
किती चांगलं नाव हाय, नावानं हाक मारत जा त्याला
पण मला कधीपासूनचा एक प्रश्न
पण मला कधीपासूनचा एक प्रश्न पडला आहे. महाराष्ट्रात एव्हढा दुष्काळ आहे मग ह्या करमाळ्याला ती विहीर, आणि नदी(?) दाखवली आहे त्याला एव्हढं पाणी कसं काय? पाण्याच्या बाबतीत करमाळा एकदम रिच दिसतंय पिक्चरमध्ये दाखवलंय.
आणि सैराट झालं जी च्या शेवटी ती षटकोनी विहीर आहे ती जागा, कुठली तरी फॅक्टरी असावी तिच्या चिमण्या (त्यातल्याच एकाच्या टॉप वर ते भेटताना दाखवले आहेत ना (की ते मिनार आहेत), आणि सैरात झालं जी मध्ये ती त्याताला पोक करते ती जागा ह्या एव्हढ्या सुंदर जागा तिकडे करमाळ्यात आहेत का? एकदा खरोखर जायला पाहिजे. फारच सुंदर परिसर दिसतोय हा.
ऊप्स्! आता परत बघितलं लक्ष देऊन. त्या चिमण्या नसून मंदिराचाच भाग आहे सर्व (भगवा दिसला). पण अशा मिनार टाईप स्ट्रक्चर ला काय म्हणतात? दीपमाळा तर नाहीत.
होळीचा सिन तर भारी अाहे.
होळीचा सिन तर भारी अाहे.
अार्चीने रंगाचा फुगा परश्यावर मारल्यावर उडणारा स्प्लॅश!
काय मस्त पकडलाय कॅमेरात.
१००... तिकडं पन झाले का १००
१००...
तिकडं पन झाले का १०० कोटी ?
धागा प्रतिसाद सारेच भारी ..
धागा प्रतिसाद सारेच भारी .. सैराट वर एवढे धागे आले पण सगळ्यात जास्त मजा हा वाचायला आली.. आणि ते ही ईतक्या दिवसाने .. वा .. प्रत्येक द्रुश्यात एकेकाला काय काय दिसतेय .. मला आकाशात जेव्हा केव्हा हल्ली पक्षांचा थवा दिसतो तेव्हा सैराटच आठवतो .. त्यात तो जरा पसरला तर मी खालून ओरडतो, अरे नीट उडायला शिका रे.. पिक्चरमध्ये काम मिळेल
कळमाळातल्या पाणी
कळमाळातल्या पाणी परिस्थितीबद्दल:
उजनी धरणामुळे या भागात (बारामतीच्या दक्षिण पूर्व) भरपूर पाणी आले आहे. त्यामुळे हा भाग ऊस शेती आणि नवश्रीमंत शेतकऱ्यानी भरला आहे. सगळ्या सोलापूर उस्मानाबाद मध्ये ही परिस्थिती नाहिये.
ती षटकोनी विहीर बाजीरावाची विहिर आहे का? आषाढी वारीत रिंगण नावाचा एक प्रकार असतो त्यातलं शेवटचं रिंगण जिथे होतं तिथे अशी एक मोठी विहीर बघितल्यच आठवतंय मला. त्याला बाजीरावाची विहीर म्हणत.
आमाला बया परशाच आवडला . लई
आमाला बया परशाच आवडला . लई म्हंजी लैच
धन्यवाद टण्या! ती विहीर बघून
धन्यवाद टण्या!
ती विहीर बघून ह्याची आठवण झाली: http://www.maayboli.com/node/57352
पण ह्यातली विहीरही सैराट मधल्या षटकोनी विहीरीएव्हढी भव्य आणि वेल मेन्टेन्ड दिसत नाही.
आणि याड लागलं मधली विहीरही कसली मस्त, भरपूर पाणी असलेली, आणि अतिशय सुंदर निगा राखलेली आहे. त्या पाण्याच्या पात्रात मध्ये ती जागा आहे जिकडे ते भेटताना दाखवले आहेत (हा ट्रेलर मध्ये आहे तो सीन, "मला खरंच वाटत नाही तू इकडे आली ते" "मी खरंच आली") ती जागा, पाणी, ते घोड्यावर बसतात सैराट झालं जी मध्ये ती जागा सगळं स्वच्छ सुंदर. कुठे कचरा नाही. शूटींग करता म्हणून साफ करून घेतलं असेल काय?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=iFhC_A-iW0w
इथे १:११ ला दिसतं तसं रिंगण म्हणतोस का टण्या?
मासेमारीचा सीन बहुतेक उजनीचा
मासेमारीचा सीन बहुतेक उजनीचा असावा.
त्या चिमण्या नसून मंदिराचाच भाग आहे >>> मंदिरात आहेत ते मिनारच वाटतात , पण मंदिरात मिनार कसे ?
>> पण मंदिरात मिनार कसे
>> पण मंदिरात मिनार कसे ?
हैद्राबाद /ओस्मानाबाद इन्फ्लुएन्स?
नेटवर 'कर्माळा' असं सर्च केलं
नेटवर 'कर्माळा' असं सर्च केलं तर इमेजेसमधे हे मंदिर, मनोरे, पोक करते ती कमानी-कमानीची जागा सगळं दिसतं.
होय सशल, त्या विडिओत आहे तेच
होय सशल, त्या विडिओत आहे तेच रिंगण. अशी दोन-तीन रिंगणं असतात बहुतेक
सैराट्चं जेव्हा टीझर आलं
सैराट्चं जेव्हा टीझर आलं तेव्हा नागराज ने त्याच्या फेसबुकवर त्या षटकोनी विहीरी बद्दल ही माहिती दिली होती
"सैराटचं शूटिंग माझ्या गावात-करमाळ्यात व करमाळा तालुक्यातील परिसरात- जेऊर,केम, कंदर, चिखलठाण, वांगी,मांगी, पोफळज,मांजरगाव कर्जत अशा अनेक ठिकाणी झालं. या टीजरमधे जी विहीर दिसते आहे तिला 'बारव' ( 96 पायऱ्यांची विहीर ) असं म्हणतात. अशी अनेक बारवं करमाळा परिसरात आहेत. ही बारवं लहानपणी माझ्या कुतुहलाची व आवडीची ठिकाणं होती. या बारवात लहानपणी खुप वेळ घालवलाय, खेळलोय. दुःख आनंदात, अनेक पोरक्या क्षणात या बारवांच्या मायाळू कुशीचा आधार घेतलाय. तेंव्हा वाटायचं ही बारवं किती सुंदर आहेत. करमाळ्यातील मातीचा लळा खूप मुलगामी आहे.
भारतीय चित्रपटाला शंभर वर्ष झाली पण माझं गाव,माझा परिसर, माझी माणसं चित्रपटाच्या या रूपेरी पडद्यासाठी आजवर अस्पृश्यच राहिली म्हणून कुठेही ऊटी,वाई वा स्वित्झरलैंडला न जाता माझ्या मातीत, माझ्या मळकटलेल्या माणसांना घेऊन सैराट करण्याचा हट्ट केला. मी खूप आनंदी आहे की माझी माती नि माझी ओबडधोबड माणसं चित्रपटाच्या चंदेरी पडद्यावर प्रदीर्घ काळासाठी कायमची छापली जाताहेत..."
परशा आणि आर्चीची फोनफोनि चालू
परशा आणि आर्चीची फोनफोनि चालू होते तेव्हा पण खूप मज्जा येते. लंगड्याचा शेवटचा मार्मिक विनोद तर पर्फेक्ट टाइमिंग संवाद फेक.
"काय करतोस परश्या?"
"काय नाय"
"जेवली का आर्चे?"
"नाय. तू जेवला काय?"
"नाय. तू जेवली की मी जेवणार"
"आधी तू जेव"
"नाय, आधी तू जेव"
“आधी तू जेव. इंग्लीश मधून सांगू का आता?”
लंगड्या इन बॅकग्राउंड: "नुसती जेवली का, जेवली का, जेवली का, जेवली का, किती वेळा जेवत्यात दिवसातून काय माहीत?"
अगदी खूप जुने कॉलेज चे दिवस आठवले. आमच्या वेळी मोबाइल फोन नव्हते आणि कॉलर आयडी पण नव्हता. "त्याच्या" फोन ची वाट बघायची आणि फोन आला की सुखावून जायचेया एकाच गोष्टीत आनंद. एकदा फोन आला की फोन वर नक्की बोलायचे काय ह्याची दूरदृष्टी दोघांना नव्हती. मग संवाद अगदी असेच व्हायचे अगदी.
खरचं किती आत्मविश्वास असेल ना
खरचं किती आत्मविश्वास असेल ना म़्ंजुळेना , ३.५ करोड घालून करमाळ्यासारख्या ठिकाणी , नवख्या चेहर्यांना घेऊन शुट केलं , भाषेचा लहजा पण सगळ्यांनाच पुर्ण समजेल असा नाही. सगळेच प्रेक्षक जर इंट्रनेट वर मुद्दामहुन निगिटिव्ह कमेंट करणार्यांसारखे मिळाले असते तर किती मोठी रिस्क ठरली असती.
पण नाही, मंजुळेना त्यांच्या ड्रीम विषयी पुर्ण विश्वास होता आणि आम्हाला म्ंजुळेंवर , थँक्यु नागराज फॉर गिव्हिंग अस सच अ वंडरफुल ट्रीट. टण्या म्हणतो तसा हा मराठीतला शोले ठरेल.
लेट्स एंजॉय इट.
मोना डार्लिंग, मस्तच.
मोना डार्लिंग, मस्तच.
सैराट च्या निमित्ताने अजुन एक
सैराट च्या निमित्ताने अजुन एक किस्सा.
आमच्या साबांनी टिप्पणी केली की पराशा ने किस इतकी आधी का मागितली, अजुन एफ् वाय लाच आहे ना तो. त्यांच्या साठी तो एक कल्चरल धक्का होता.
"वैचारिक मत आहे पण सांगता येत नाही" अशी घरी परिस्थिती असल्याने येथे सांगते. साधारण प्रपोज़ केल्यानंतर किस मागण्याचा कालावधी सहा महिन्यांचा असायचा, हल्ली तो दोन ते तीन महिने असे ऐकिवात आहे. त्यानुसार पराशा आर्ची जरा विलंबितच होते.
किस ला काळ वेळ असलं काही बंधन
किस ला काळ वेळ असलं काही बंधन नसतं हो , ती काय एफडी आहे मॅच्युरिटीची वाट बघत बसायला
भारी माहिती मोना! (तुमचं
भारी माहिती मोना!
(तुमचं आडनाव लिहायला संकोच वाटतो. उगा आम्ही साधं काहीतरी बोलाय जावं अन आम्ची धानात नेऊन धुलाई व्हायचीओ!)
अरे पण डार्लिंग ह्या शब्दाचा
अरे पण डार्लिंग ह्या शब्दाचा अर्थ जे प्रिय ते असा ना? मग काय एव्हढा संकोच? (त्यांनां वाटला नाही नाव घेताना तर आपण का बरं वाटून घ्यावा, हो की नाही हो डार्लिंग? :हाहा:)
किस बाबत कधी द्यावा घ्यावा
किस बाबत कधी द्यावा घ्यावा ह्याचा कोड ऑफ कॉन्डक्ट असेल हे माहित नव्हतं
हायला.
हायला.
खलनायक अजितची आठवण म्हणून हा
खलनायक अजितची आठवण म्हणून हा आय्डी घेतला व्हता.
Pages