सुयुद्ध त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा.

Submitted by Suyog Shilwant on 9 June, 2016 - 16:02

"सुयुद्घ ञिनेञी आणि एक भयानक गुहा."

१) शोध.

एक शांत गावचा सुंदर रम्य नजारा, पक्षी आकाशात भरारी घेत आहेत. जवळच वाहत्या नदीत खळखळ करणाऱ्या पाण्याचा आवाज. सगळीकडे शांतता, स्वच्छ गार वाहती हवा. त्या हवेचे वाहणारे हळुवार झुळूक. श्वास घेतला तर मन शांत एकांतात जाईल. सकाळचा उगवत्या सौम्य सुर्याचे कोमल ऊबदार ऊन. वाह...! जर नदीच्या काठाला बसून पाय पाण्यात सोडले तर शितल पण वाहते पाणी अंगात नविन उर्जा भरेल. आजूबाजूला असलेली झाडे, पक्षांचा किलकिलाट पाहूनच आपल्याला वाटेल कि ह्या रम्य नदी काठी शांत एका ठिकाणी बसून आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घ्यावा. नदी जवळील परिसर अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. हा नजारा क्वचितच कोणाचे मन मोहावनार नाही. अशा ठिकाणी नक्कीच कोणालाही जायला आवडेल.

नदी पलिकडे एक गाव आहे. अगदी मोजकिच घर असतील पण गाव मोठे आहे. गावाचे नाव 'विश्वेश्वरम' एक छोटा रस्ता गावाकडे जातो. त्या रस्त्याला कोणी एक माणूस काठी घेऊन जणू चाचपडत येताना दिसतो. थोडा पूढे येऊन तो थांबतो. मागुन कोणी आवाज देत असेल असा पलटतो. एक मूलगा धावत येत त्याला आवाज देत असतो.
" बाबा ... मी तयार होतो. तुम्ही मला सोडून एकटेच येणार होतात का? "
तसा तो माणूस थोडा हसतच म्हणतो. " नाही रे उशीर होत होता. बाळा..! तुला ठाऊक आहे ना... मी अगदी वेळेवर येण पसंत करतो. " मुलगा त्याचा समोर उभा राहून आजोबांकडे बघतच राहतो. म्हातारा माञ जागी फिरतो व चालू लागतो. मुलगा पटकन त्याचा हात पकडून नदीजवळ काठाशी घेऊन येतो. मुलगा काही प्रश्न न विचारता त्याचे काम करतो जसे काय दररोज ते दोघे तिथे येत असावे. थोडा वेळ वाट बघून मग तो म्हातारा नदीत उतरतो. हातात नदीचे जल घेऊन तो अर्ध्य अर्पण करू लागतो. मुलगा माञ ते सगळ नित्य नियमाने पाहत असावा असे पाहतो. अगदी १२-१३ वर्षाचा तो त्याला काय कळणार यातल. पण कोतूहलानं नक्की पाहत होता. अचानक त्याला प्रश्न पडला असा विचारात पडतो. न राहवून तो शेवटी विचारण्याचे ठरवतो व बोलतो.
'बाबा आपण रोज इथे येतो. पण..' एवढ बोलून तो थांबतो. त्याला कळेना की जर मी हा प्रश्न विचारला तर आजोबा उत्तर देतील की नाही.
त्याला अस थांबलेल बघून म्हातारा पटकन विचारतो. ' पण काय सुयुद्ध?' अचानक मुलाच्या डोळ्यात चमक येते. जसे त्याचा प्रश्नाचे उत्तर त्याला मिळणार.
' बाबा ... तूम्ही रोज इथे येता. नदी मध्ये उतरता सुर्याकडे बघता अर्घ्य अर्पण करता.
पण कशासाठी ? त्याने तुमचे डोळे निट होतील का?'
असा प्रश्न त्याने का विचारला. कोतूहला ने विचारलेला प्रश्न अगदी सहजतेने तो बोलून आपल्या आजोबा कडे पाहत होता. तो प्रश्न त्याचा मनाला शांत बसू देत नसेल म्हणूनच त्याने हा प्रश्न विचारला असावा. त्या निरागस डोळ्यात काय आहे. हे आजोबाला कळले होते. पण तो आंधळा म्हातारा आपल्या नातवाला कसे काय समजावेल हेच त्याला काय कळत नव्हते. तरी थोडा धीर मनाशी धरून म्हातारा पाण्याबाहेर निघून काठावर उभा राहतो . थोडा वेळ शांत राहून मनाशी विचार ठरवून मग बोलतो.
' अरे बाळा…इकडे ये. कस सांगू तूला. हे बघ.' चाचपडत तो नातवाच्या चेहऱ्यावर हात फिरवतो. मग त्याचा डोळ्यांना हात लावून म्हणतो. " डोळे हे देवाने आपल्याला दिलेली खूप मोठी देणगी आहे. त्या शिवाय आपल्याला हे सुंदर कसं पाहता आलं असत. जरी मला डोळे नसले तरी तू आहेस ना मला रस्ता दाखवायला. मी इथे येतो कारण मला तुझ्या डोळ्यांनी ही नदी, सुर्य, आकाश हा निसर्ग पाहायचा असतो. "
आजोबांनी दिलेल्या उत्तराने त्याचे समाधान काय झालेले नसते. तो पुन्हा विचारतो. ' पण बाबा..तूम्हाला माझा डोळ्यानी कसे दिसेल?' ह्या प्रश्नाचे उत्तर माञ म्हाताऱ्याकडे नसते. थोडासा गोंधळलेला तो आता नातवाचा हातातली छडी घेऊन त्याचा खांद्यावर हात ठेवून तो विषय बदलण्याचे ठरवतो व म्हणतो. ' अच्छा मला सांग तूला आकाशातील सुर्य कोणत्या रंगाचा दिसतोय?' सुर्याकडे बघताना पहील्यांदाच त्याचा डोळ्यांवर प्रकाश पडतो. गडद निळे डोळे सुर्याचा प्रकाशात जणू तेजस्वी हिऱ्या सारखे चमकतात. साधी अंगकाठी गौरवर्ण चेहरा आणि ते गडद निळे डोळे. चेहऱ्यावर तेज जसे तो कोणी तेजस्वी अवतार असावा. सुर्याकडे बघतच तो म्हणतो.
' बाबा सुर्य तर भगवा दिसत आहे. पण हा सुर्य जसजसा आकाशात उंचावर जातो. तसतसे त्याचा कडे बघणे कठीन का होते? ' नातवाचा ह्या प्रश्नाने आजोबा सुखावतो कारण आता त्याला हवे असलेले उत्तर तो नातवाला सहज देऊ शकत होता. काठी आपटत रस्त्याचा अंदाज घेत तो वळतो आणि म्हणतो. ' हे बघ बाळा .. सुर्य हा लांब क्षितिजाकडे उगवताना किंवा मावळताना असला कि तेव्हा त्याचा प्रकाश हा मंद असतो. त्यामुळे त्याचाकडे बघणे सोपे असते. पण जसजसा तो आकाशात वर चढत जातो तसा त्याचा प्रकाश प्रखर व दिपवणारा होतो. जो आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. ' समाधानाचे उत्तर मिळाल्याने सुयुद्ध खुष होतो. पण मगाशी विचारलेला प्रश्न तो विसरलेला असतो. आजोबाला हेच हवे असते. आता तो रस्त्याने चालू लागतो. नातू आजोबाचा हात पकडून चालतच असतो की नातू थांबतो आणि हात सोडून पटकन धावत मागे जातो. आजोबा आपली चप्पल विसरल्यात हे सुयुद्ध पाहतो पटकन जाऊन तो ती चप्पल ऊचलून आणतो आणि म्हणतो. ' बाबा तूमची चप्पल राहीली होती. ' म्हातारा हसतो व म्हणतो. ' बघितलस अस काहीतरी मी विसरतो. म्हणुनच तुझे डोळे देवाने मला दिलेली देणगीच आहे. हो कि नाही.'
'हो ' सुयुध्द उत्तर देतो पण मगाशी विचारलेला प्रश्न विसरून गेलेला.
आता म्हातारा आपल्या नातवा सोबत परत घरी जायला निघतो.

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !