सारी ईस्कटून जिंदगी मी पाहिली - अजय-अतुल फॅन क्लब

Submitted by हायझेनबर्ग on 7 June, 2016 - 11:47

२०१४ च्या फँड्रीनंतर 'त्या' एकाच गाण्यासाठी साठी धागा काढावा म्हणता म्हणता सैराट ऊजाडला आणि अजय -अतुल फॅन क्ल्ब जमवणे नेसेसिटीच झाली.

https://www.youtube.com/watch?v=O_R0Sx6bggI

खरं तर अजय- अतुल फॅन क्लब काढण्यासाठी फँड्रीतली ऊरूस स्टाईल म्युझिक कंपोझिशन, नटरंग मधला गण किंवा जीव रंगला, किंवा मोरया सुद्धा असं एखादंच गाणं पुरेसं आहे. चित्रपटांची जंत्रीच्या जंत्री देण्याची काही गरजंच नाही, पण तरी फॅन म्हंटलं की ऊदो ऊदो करणं हक्कंच आहे आमचा.
अगं बाई अरेच्याचं एकंदर मुझिक पॅकेज मस्तं होतं.मला कोंबडी वगैरे सारखी गाणी फार अपील झाली नाहीत पण नटरंग च्या गाण्यांनी पुन्हा वेड लावलं.
'जीव झाला येडा पिसा' ऐकून दिवसभर काही सुधरलं नाही. त्या गाण्याचं लिरिक्स, अजयचा आवाज फार फार अमेझिंग यट डिस्टर्बिंग आहे. सैराटचा ऊल्लेख करण्याचीही आवश्यकता भासणार नाही, कारण 'एपिक लवस्टोरी सारखी' ईतकी ही गाणीही 'एपिकच' आहेत.
अजय-अतुलनं मराठी संगिताला काय दिलं वगैरे विचार करण्याच्या फंदात मी पडत नाही, त्या गाण्यांनी मला काय दिलं - तर 'जीव झाला येडापिसा' ने दिलेले शहारे आठवतात, मोरयावर तालात पडणारी पावलं आणि अंगात भिनणारी झिंग आठवते, वाजले की बारा असो की अप्सरा आली असो, गण असोवा सिंफनी असो दोन्हींमध्ये एक रांगडी नजाकत आहे जी तुमच्या डोक्यात भुंग्यासारखी ऊडत राहते, सैराट झालं जीचं गुदगुल्यानंतर अंग शहारवणारं तरूण प्रेम असो वा जीव रंगलात हरिहरन च्या सोल सर्चिंग आवाजातून जाणवणारी प्रेमातली प्रगल्भता, मला अजय-अतुल , त्यातल्या अजयच्या आवाजासहित सॉलिड आवडतात.
मला तर वाटतं अजय-अतुल नं एक्स्ल्यूझिवली मराठीतंच रहावं पण व्यावसायिक गणितं आपल्या डोक्याबाहेरची आहेत आणि तो ईथे विषयही नाही.
अजय-अतुल आणि अरिजित असं एक हळूवार मराठी कॉबिनेशन ऐकण्याचीही फार मनिषा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विंचु माझ्या जास्त आवडीचे, पण पहिल्या स्थानावर नीळकंठचे अधीर मन झाले आहे. यातला पावसाळी निसर्ग पण अफाट वेड लावतो. विंचु बर्‍याच वेळा ऐकते, पण प्रवासात कारमध्ये एक वेगळाच फिल येतो.

येस! मी पण फॅन क्लबात! तशी सगळिच आवडतात पण तरी काही काही मास्टर पिसेस आहेत जस अप्सरा आली ,खेळ मान्डला, जीव रन्गला, माउली-माउली, म्हलारवारी, अभि मुझ मे कही( ह्यात सोनु निगमचाही वाटा आहे)
फॅन्ड्रि च जीव झाला वेडापिसा पण अस चढत जाणार, (हे गाण्याकडे लक्षपुर्वक एकल तर सिस्टिमविरुद्धचा एक रागही दिसतो.जब्याचा सगळा उद्वेग त्याच्या प्र्त्येक बिटमधे जाणवत राह्तो.)
सन्थ गतिने सुरु होवुन टिपेला पोहचत जाणार माउली तर सिपली ग्रेट!
सैराटच्या गाण्याने तर पार झिन्गच चढवलिय त्यातही "सैराट झाल जी " जरा जास्त आवडतिच! आणी त्यानी हॉलिवुअला येवुन रेकॉर्डिन्ग केल त्याचा फरकही जाणवतो त्याच्याच बा़की गाण्यापेक्षा ही गाणि अगदी क्रिस्प, एकही जास्तिची लकेर नाही अगदी क्लिन वर्क त्यामुळे सगळा वाद्यमेळ परफेक्ट कानात घुमत राहतो.
सैराट त्याच्या सन्गितामुळेच मला जास्त आवडला.
मधे मधे अजय-अतुल अ‍ॅबस्कॉन्डच झाल्यासारखे वाटले बट नाउ दे आर बॅक अ‍ॅन्ड बॅक विथ बॅन्ग!

मला पण आव्डतात त्यांची गाणी. मल्हारवारी विशेष छान. आणि त्यातील आम्ही अंबेचे गोंधळी पार्ट सुरू झाला की मला नेहमी एच आरचे लोक वाट लावत आहेत निर्दय पणे असे फीलिन्ग येते.

माउली, सैराट व नटरंग ऐकली आहेत.

मी पण अजय-अतुल फॅन क्लबात Happy

सुरवात 'आई भवानी' ने ते आता 'सैराट' पर्यंत सगळीच गाणी एकेसे बढकर एक.

अजय-अतुलची जी देवांची गाणी आहेत जसे 'आई भवानी', 'मोरया', अथर्वशिर्ष, श्रीगणेशा,एकदंताय वक्रतुंडाय, माऊली' ही सगळीच गाणी ऐकताना प्रत्येकवेळी डोळ्यात 'भावाश्रू' (सद्भावनेने ओतप्रोत भरलेले अश्रू) येतातच.

अजय-अतुलची जी देवांची गाणी आहेत जसे 'आई भवानी', 'मोरया', अथर्वशिर्ष, श्रीगणेशा,एकदंताय वक्रतुंडाय, माऊली' ही सगळीच गाणी ऐकताना प्रत्येकवेळी डोळ्यात 'भावाश्र्र्' (सद्भावनेने ओतप्रोत भरलेले अश्र्र्) येतातच.

>> अगदी अगदी.

अजय-अतुलची जी देवांची गाणी आहेत जसे 'आई भवानी', 'मोरया', अथर्वशिर्ष, श्रीगणेशा,एकदंताय वक्रतुंडाय, माऊली' ही सगळीच गाणी ऐकताना प्रत्येकवेळी डोळ्यात 'भावाश्रु (सद्भावनेने ओतप्रोत भरलेले अश्रु ) येतातच.
+१११

फॅनक्लबात बेशक ......

जीव रंगला, मोरया, सैराट आणि अनेक आणि पिरतीचा विंचू ........ भन्नाट आहेत दोघेही भाऊ

मी पण फॅन क्लबात
अगदी अथर्वशिर्ष, मोरया मोरया, आई भवानी पासुन सैराट पर्यंत सगळीच गाणी वेड लावुन जातात. तसंच राजा शिवछत्रपतीचं टायटल साँग.

फॅनक्लबात बेशक ! +१

मन उधाण वार्‍याचे , मल्हारवारी, गोर्‍या गोर्‍या गालावरी अशी त्या वेळची जी जी नवीन मराठी गाणी आवडताहेत असे जाणवले ती ती सगळी गाणी अ अ ची होती.

लाईव्ह शोज देखिल मस्त असतात त्यांचे.

ए आर रेहमानला टक्कर देऊ शकेल अशी शक्यता ज्यांच्याबाबत वर्तवता येऊ शकते त्या संगीतकारांपैकी माझे पहिल्या पसंतीचे मत ह्यांनाच !

अजय अतुल फेमस "विश्वविनायक" या त्यांच्या अल्बम पासून झाले. खास शंकर महादेवन आणि एस पी बालसुब्रमण्यम या दोन दिग्गज गायकांनी त्यांच्यासाठी गाणी गायली होती.
त्यातले "एकदंताय वक्रतुंडाय" या गाण्याचा अमिताभ बच्चन यांच्या "विरुध्द" चित्रपटात समाविष्ट केलेला.
संगीत बरोबर त्यांनी बर्‍याच चित्रपटात बॅकग्राऊंड म्युझिक सुध्दा दिले आहे. अग्निपथ, ब्रदर्स, नटरंग, इ चित्रपटांमधले बॅकग्राऊंड म्युझिक सुध्दा उत्तम दिले आहे. आमिर खानचा "पिके" या चित्रपटातले "ठरकी छोकरो" हे राजस्थानी अंदाजातले गाणे अजय अतुल यांचे आहे.

मी सुद्धा ह्या क्लबात :). थँक्स टू ग्लोबलायझेशन! अजय अतुलची गाणी रीलीझ झाली की लगेचच ऐकायला मिळतात. आवडती गाणी सगळीच "मल्हारवारी" ते "सैराट झालं जी". "देवा श्रीगणेशा" , "अभी मुझमें कहीं" आणि " ओ सैयां" ही हिंदी गाणी सुद्धा तितकीच आवडतात.

गीत - कवि भूषण , डॉ. शिरिष गोपाळ देशपांडे
संगीत - अजय-अतुल
स्वर - अजय गोगावले
( शीर्षक गीत, मालिका- राजा शिवछत्रपती, वाहिनी- स्टार प्रवाह )

फॅन्ड्रि च जीव झाला वेडापिसा पण अस चढत जाणार, (हे गाण्याकडे लक्षपुर्वक एकल तर सिस्टिमविरुद्धचा एक रागही दिसतो.जब्याचा सगळा उद्वेग त्याच्या प्र्त्येक बिटमधे जाणवत राह्तो.) >> प्राजक्ता +१००

प्रेम, ऊद्वेग, राग, संघर्ष, न्यूनगंड, घालमेल, असह्यता असा सगळा एक मेंदूला झिणझिण्या आणणारा भाव आहे त्या पूर्ण गाण्यातंच. मी आधी लिहिलं तसं ऊरूसांमध्ये वाजवतात तसं म्युझिक अजूनच गूढ आणि दु:खी बनवतं गाण्याचा एकूण मोहौल.

सिंघममधले " साथिया पगले से दिल ने ये क्या कीया" आवडते.मराठी त्यांचे होम पीच आहे,वार्यावरती गंध पसरलापासून त्यांची अनेक गाणी आवडतात,खेळ मांडला ' गाण्यात फार आर्त स्वर लागला आहे अजयचा.
मी फॅनक्लबात आहे हे वेगळे सांगायला नकोच.
सलिल कुलकर्णी ,अवधूत गुप्ते यांच्या तुपाळ गाण्यांपेक्षा अजय अतुलची रांगडि गाणि मस्त चमचमीत वाटतात.

मला पण्‍ा अजय अतुलची सगळी गाण्‍ाी अावडतात. देवाची गाण्‍ाी तर अप्र‌त‌िमच... त्यातल्या त्यात गाेंध्‍ाळ अन् मल्हारवारी अावडतं...

मी पण मी पण... फॅनक्लबात!! Happy

मन उधाण वार्‍याचे पासून वेड लागलंय. आणि बहुतेक सगळीच गाणी आवडतात.

राजा शिवछत्रपतीचं टासाँ पण जबरा होतं.

मी पण फॅन क्लब मध्ये.!
अजय अतुल ची सर्व च गाणी आवडतात.
सध्या सैराट झालं जी.. हे टॉप मोस्ट आहे.. रोजच रिपीट मोडवर ऐकतेय.
अजय चा आवाज ही आवडतो. इनफॅक्ट झिंगाट गाण्यातअतुल पेक्षा अजय चा आवाज जास्त आवडला.

गं पोरी नवरी आली मस्त गाणं आहे.
त्यातली सासरी लाभेल तुला माहेराची माया च्या कडव्याच्या तालाने डोळे हमखास पाणावलेच पाहिजेत.

Pages