माझ्या गावच्या नदीचं खोलीकरण

Submitted by चिंतामण पाटील on 15 May, 2016 - 00:16

माझ्या गावच्या नदीचे खोलीकरण

***चिंतामण पाटील ***
समाजाला भेडसावणाऱ्या समस्येचे निराकरण
समाजाच्याच माध्यमातून व्हावे, ह्या
संघकार्याच्या वास्तवाचे दर्शन यंदाच्या
दुष्काळात पुन्हा एकदा दिसून आले. कुठे चारा
छावण्या असतील, कुठे टँकरद्वारा वाडया-
वस्तीवर पाणीपुरवठा असेल किंवा नदी-
नाल्यातला गाळ उपसून नद्या पुनर्जीवित
करण्याची कामे असोत - संघस्वयंसेवकांनी
समाजात जागृती निर्माण करून काम सुरू केले.
लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीचेही यातीलच
एक भव्य काम आपण बघतोच. या सगळया
कामांमध्ये आणखी एक भर पडली आहे ती
खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील भोणे
येथील कयनी नदीच्या खोलीकरणाची.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाणी
ह्या
एकाच
समस्येने
सगळया
महाराष्ट्राला ग्रासले असताना आजची
समस्या येत्या काळात उभी राहू नये, हा
विचार भोणे येथील संघाच्या स्वयंसेवकांनी
केला. त्यातून फक्त 10 दिवसात 3 लाख 45
हजार 350 रुपये खर्चात, गावाजवळून
वाहणाऱ्या कयनी नदीचे 400 मीटर लांब,
सरासरी 1.5 मीटर खोल व 18 मीटर रुंद इतके
खोलीकरण करण्यात आले. यातून 10 हजार
800 घनमीटर गाळ काढण्यात आला असून
खोलीकरणात एकावेळी 1 कोटी लीटरपेक्षा
जास्त पाणी साचणार आहे. त्यामुळे
पहिल्याच वर्षी नदीकाठावरील असंख्य
विहिरींना पाणी वाढेल. गावाच्या
पिण्याच्या पाण्याचीही टंचाई दूर होऊ
शकेल.
समाजाला भेडसावणाऱ्या समस्येचे निराकरण
समाजाच्याच माध्यमातून व्हावे, ह्या
संघकार्याच्या वास्तवाचे दर्शन यंदाच्या
दुष्काळात पुन्हा एकदा दिसून आले. कुठे चारा
छावण्या असतील, कुठे टँकरद्वारा वाडया-
वस्तीवर पाणीपुरवठा असेल किंवा नदी-
नाल्यातला गाळ उपसून नद्या पुनर्जीवित
करण्याची कामे असोत - संघस्वयंसेवकांनी
समाजात जागृती निर्माण करून काम सुरू केले.
गेल्या चार वर्षांपासून दहीगव्हाण येथे सुरू
असलेले नाला खोलीकरण, चित्ते नदी
पुनरुज्जीवन, दापशेड, मावलगाव येथील नदी
खोलीकरण यासारखी अनेक कामे संघाशी
निगडित संस्था, आयाम यांच्या माध्यमातून
सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील मांजरा
नदीचेही यातीलच एक भव्य काम आपण
बघतोच. या सगळया कामांमध्ये आणखी एक
भर पडली आहे ती खान्देशातील जळगाव।
जिल्ह्यातील भोणे येथीन कयनी नदीच्या
खोलीकरणाची.
भोणे हे धरणगाव तालुक्यातील धरणगावपासून
7 कि.मी.वरचे गाव. गावची लोकसंख्या सुमारे
दोन हजार. गावात 1982पासून संघांची
शाखा सुरू आहे. राष्ट्रभक्तीचे धडे घेतलेले
असंख्य तरुण या शाखेतून तयार होऊन आज
समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करीत
आहेत. देवगिरी प्रांताच्या ग्रामविकास
विभागाच्या रचनेनुसार भोण्यातही
ग्रामविकासाचे लहान-सहान उपक्रम
चालतात. विनयजी कानडे यांच्या सततच्या
प्रवासातून येथे ग्रामसमिती गठित होऊन
विविध उपक्रम राबविले जातात.
ग्रामसमितीच्या वेळोवेळी होणाऱ्या
बैठकीत गावाच्या पाणी समस्येवर चर्चा
व्हायची. यंदाचा दुष्काळ या चर्चेतून मार्ग
काढायला लावणारा ठरला.
ग्रामसमितीच्या पाण्याच्या विषयावरील
चिंतनाला जोड मिळाली ती राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाद्वारा संचालित जिल्ह्याच्या
जलसमन्वय समितीची.
मार्च महिन्यात जळगाव येथे पाणी
विषयाबाबत तळमळ असलेले बालरोग तज्ज्ञ
डॉ. हेमंत पाटील यांच्या दवाखान्यात या
समितीची पहिली बैठक झाली. या
प्राथमिक चर्चेच्या वेळी संघाचे देवगिरी
प्रांताचे सेवा प्रमुख योगेश्वर गर्गे, केशवस्मृती
प्रतिष्ठानचे प्रमोद मोघे, हेमंत पाटील, सागर
धनाड, सुनील सराफ व स्वत: मी उपस्थित
होतो. या वेळी जिल्ह्यात पाण्याबाबतीत
काही गावांमध्ये काम करण्याबाबत
विचारविनिमय झाला. पावसाळयापूर्वी
काम होणे अपेक्षित असल्याने जेथे लवकर काम
सुरू करता येऊ शकेल, अशा दोन गावांची निवड
करण्यात आली. त्यात अमळनेर तालुक्यातील
जुनोने व धरणगाव तालुक्यातील भोणे या
गावांची निवड करण्याचे ठरले. जुनोने येथे
सेवावर्धिनी व केशवस्मृती प्रतिष्ठान
यांच्यामार्फत याआधीच गावकऱ्यांमध्ये
जलजागृती करण्यात येत होती. त्यामुळे येथेच
काम सुरू करावे असे ठरले.
दि. 16 एप्रिल रोजी या जलसमन्वय
समितीमधील मी स्वत: योगेश्वर गर्गे, डॉ. हेमंत पाटील,
केशवस्मृती प्रतिष्ठानचे प्रमोद मोघे, सचिव
रत्नाकर पाटील, सागर धनाड, जुनोन्याचे
सतीश पाटील आदी भोणे येथे आले. त्यानी
गावालगत वाहणाऱ्या कयनी नदीची दोन
किलोमीटरपर्यंत पाहणी केली. त्यानंतर
गावाबाहेरच महादेवाच्या मंदिराच्या
ओटयावर ग्रामसभा घेऊन लोकसहभागाच्या
व संघाच्या ग्रामसमितीच्या माध्यमातून
नदी खोलीकरण करून पाणी समस्या दूर
करण्याचा संकल्प करण्यात आला.
त्यानंतर संघाच्या ग्रामसमितीची दररोज
बैठक होऊन कामाचे नियोजन करण्यात आले.
ग्रामसमितीतील व गावातील काही
मंडळींचा समावेश करुन एक स्वतंत्र समिती
गठित करून काम करण्याचे ठरले. दि. 25 एप्रिल
रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी गावात सुरू
असलेल्या कीर्तन सप्ताहाच्या सांगतेला
उपस्थित ह.भ.प. गोपाल महाराज यांच्या
हस्ते खोलीकरणाचे भूमिपूजन करण्यात येऊन
26 तारखेपासून जेसीबीच्या साहाय्याने
कामाला प्रारंभ झाला. ग्रामसमितीचे
प्रमुख संजय भास्कर पाटील व सहप्रमुख हरीश
राजेंद्र पाटील यानी सपत्निक पूजा करून
खोलीकरणाचा शुभारंभ केला. जेसीबीने
सुरुवात करण्यात आली, परंतु कामाला गती
यावी म्हणून 29 एप्रिलपासून मोठया
पोकलॅनने खोलीकरण सुरू केले.
गावाजवळून वाहणाऱ्या व गाळ साचून उथळ
झालेल्या नदीचे पाणी गावात शिरू पाहायचे.
त्यामुळे गावाजवळचा रस्ता वारंवार पुराच्या
पाण्याखाली जायचा. पूर यायचा, पण
पाणी जमिनीत मुरण्याऐवजी सरळ वाहून
जायचे. त्यामुळे पावसाळा संपला की
महिन्याभरातच नदी कोरडीठाक होऊ
लागली होती. वाहून जाणाऱ्या ह्या
पाण्याला अडविण्यासाठी ठिकठिकाणी
सिमेंट बांध आहेत. परंतु शासकीय कामातील
दिरंगाईमुळे बांधकाम कुचकामी असल्याने,
पाणी तत्काळ पाझरून बंधारे तत्काळ कोरडे
होतात. त्यामुळे ते बंधारे असले काय नि नसले
काय, सारखेच. मात्र संघाच्या माघ्यमातून
होणाऱ्या या कामात नदीत ठिकठिकाणी
डोह करायचे ठरविण्यात आले. गावाजवळच
महादेव मंदिराजवळ यातला पहिला डोह
करण्यात आला. गावाच्या वरच्या अंगाला
असलेल्या भागातही डोह तयार करण्यात
आले. कामाचा हा पहिलाच टप्पा होता.
येत्या वर्षांमध्ये ठिकठिकाणी बांध
बांधण्याऐवजी डोह करून पाणी जमिनीत
मुरविण्याचे काम केले जाणार आहे. नदी
खोलीकरणाच्या या कामात
ग्रामसमितीसोबत असंख्य गावकरी, 10-12
ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांसह सरपंच,
सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते उत्साहाने
सहभागी झाले.
नदी खोलीकरणातील गाळ-मुरुम
गावालगतच्या मंदिर परिसरातही टाकण्यात
आला. असे करताना त्या भागातील उकिरडे
कायमस्वरूपी उचलण्यात आले आहेत. या 150
मीटर क्षेत्रात वृक्षारोपण करून सुशोभीकरण
करण्यात येणार आहे. त्यामुळे गावाच्या
सौंदर्यात भर पडणार आहे. खोलीकरणाच्या
कामात गाव एक झाल्याचे दृश्य पाहायला
मिळाले.
भोणे येथील या 400 मीटर नदीच्या
खोलीकरणासाठी 4 लाख 5 हजार रुपये
इतका खर्च आला आहे. याबाबतीत आपल्या
गाव परिसरात ज्यांनी काम केले आहे, त्या
जिल्हा जलसमन्वय समितीच्या डॉ. हेमंत
पाटील यांनी सांगितले की, ''एवढया कमी
खर्चातले जिल्ह्यातील हे पहिले आदर्श
उदाहरण आहे. या खोलीकरणामुळे पहिल्या
वर्षी चार-पाच वेळा पाणी साठेल. नदी
वाहती न राहिल्यास पाच ते सात दिवसात
आटेल. तरीही पहिल्या वर्षी नदीत
दिवाळीनंतरही पाणी दिसेल. परंतु दर वर्षी
पाणी जिरत गेल्याने पुढल्या वर्षापासून
नदीत संक्रांतीपर्यंत पाणी दिसेल. त्यामुळे
विहिरी मार्चपर्यंत तरी तुडुंब भरलेल्या
राहतील. यातूनच मे महिन्यात बागायती
कापूस लागवडीसाठी पाणी उपलब्ध राहू
शकेल. देवाची कृपा राहिल्यास भोणे
परिसरातील शेतकऱ्याच्या बऱ्याच
क्षेत्रफळाच्या सिंचनाचा व पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.''
या कामासाठी गावकऱ्यांनी 1 लाख
रुपयांपर्यंत लोकसहभागाची रक्कम गोळा
करण्याचे निश्चित केले होते. उर्वरित रकमेपैकी
1 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश डॉ.
हेडगेवार सेवा निधीच्या माध्यमातून देण्यात
आला.
8805221372

चांगला उपक्रम आहे, तुम्ही बहुतेक मोबाईलवरून लिहिता आहात असे वाटतेय. प्रतिसादात जे दिलेय ते परत संपादन करून मूळ लेखात घाला आणि नीट परेग्राफ पाडा.

इथून मदतीचे आवाहन करायचे असल्यास नीट पत्ता, संपर्क, बँक डिटेल आणि होत असलेल्या कामाचे फोटो टाका म्हणजे ज्यांना मदत करायची असेल ते करू शकतील.

कापसाला खूप पाणी लागते असे ऐकिवात आहे, आता जागृती होतेयच तर कापसबरोबर इतर कॅश क्रॉप्स घेण्याबद्दलही जनजागृतीहोते का पाहा म्हणजे सुरवातीची काही वर्षे साठणाऱ्या पाण्यावर जास्तीचा भार पडणार नाही.

स्तुत्य उपक्रम! शुभेच्छा.
साधनाताईंच्या सूचनांवर जरूर विचार करा.
हे आणि असेच काम कुणाला करावयाचे असल्यास लागणारा तपशील्/मॉडेल लिहीता येत असल्यास उत्तम.
असे उपक्रम सर्वांना राबवता यावेत.

अतिशय छान उपक्रम , संघाबरोबर इतर संघटनांनी पण पुढे येऊन अशा लोकोपयोगी कामांना हातभार लावयला हवा.
शुभेच्छा !