नेकलेस भाग २

Submitted by Chetan02012 on 13 May, 2016 - 16:02

साल्या मी बोललो म्हणून विचारलास तरी तिला. नाहीतर नुसता दिवसाढवळ्या स्वप्न पाहत बसला असतास तीची...
तस नाही रे राजा ..... She is different, तुला कस सांगू तेच कळत नाहीये रे ....
अबे मला काय सांगतोस.... मला सगळ माहितीये बे... मी आहे म्हणून तू आहेस... नेहमी लक्षात ठेव कोंबड्या ....
तुझी अशी फालतुगिरी चालते न म्हणून काही बोलावस वाटत नाही मला.....
गप बे.... माझी फालतूगिरी आयुष्यभर तुझ्या अंगचटीला आहे बघ .....
पण ती आल्यावर तुला आराम आहे राजा.....
लेट्स सी .....
वोह जब नजदीक होती हे तो साला पूरी दुनिया उलटी घुमने लागती हे यार .....
अबे पुराने मूव्ही के फ्लोप हिरो ... बंद पड......
-------------------------------------------------------------------------------------------------------
१६ nov २०१४,
आताशा अस वाटू लागलाय कि तो माझ्या आजूबाजूलाच आहे...माझ्या मनाची तळमळ एवढी का वाढते आहे ???माझ मलाच कळत नाहीये ....
१० वर्ष झालीयेत आता ,,,,, तरीही मी दररोज न चुकता त्याचा एवढा का विचार करते????
जस काही तो माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे...
सुरुवातीला सगळ काही एक गम्मत म्हणून झाल होत ....पण आता सगळ बदलल आहे अस वाटत ... दिवसेंदिवस अजून अस्वस्थ वाटायला लागलय.....
ते दिअवसच वेगळे होते,,, नुकतीच कॉलेज मध्ये आले होते... आधी जिला अवतीभोवती फक्त मुली दिसत होत्या अश्या मुलीला एकदम जर का तुम्ही खऱ्या मुलामुलीच्या जगात आणून ठेवल्या वर कोणतीही मुलगी बावरानारच न हो....तसाच माझही झाल..... काहीच सुचत नव्हत ...... मग मैत्रिणी बनत गेल्या.. काही वर वर ..काही जिवाभावाच्या... पण तरी कॉलेज मध्ये मुल पण होती म्हणून खूप बावरले होते... आणि त्या कॉन्वेन्ट च्या मुलीतर कसल्या बिनधास्त बोलायच्या मुलांशी...मला तर घामच फुटायचा हे सगळ पाहून... आता खरच स्वतःवरच हसायला येत हे सगळ आठवून!!!! एक महिना तर त्या कॉलेज मध्ये सेट होण्यातच गेला,,, मग कुठ शेवटी माझी गाडी रुळावर आली ......

आणि त्यातच ते सुरु झाल .....
अचानकच मी वर्गात आल्यावर मुलांचा गोंधळ सुरु होण.... वहिनी आली..वहिनी आलीच्या हाका सुरु होण..... कळसच झाला....
वर्गाच्या बाकांवर जेव्हा माझ नाव लिहिलेलं मला कळाल तेव्हा माझा पारा चढला ....
काय फालतुगिरी यार,.... केवढी रडले होते मी... हे अस सगळ पहिल्यांदाच घडत होत... आणि फक्त माझ्याच बाबतीत...
दररोज सकाळी पहिल्या लेक्चर च्या आधी माझ नाव फळ्यावर .... आणि वर्गात टीचर आल्यावर पहिला पहिला प्रश्न.. कोणाचा नालायकपणा आहे हा??? नशीब कधी विचारलं नाही की कोण आहे ही मुलगी म्हणून....शरमेने मेलेच असते मी...
आणि ज्या मुलासोबत माझ नाव जोडलं गेल होत त्याच्याकडे बघितल्यावर तर कीव येत होती...
come on ... he was looking like a village kid ...
एकदा त्याला एकटा पकडून काय ओरडले होते मी!!! बिच्चारा एखाद्या कोवळ्या कोकारासारखा मान खाली घालून ऐकत होता....एक शब्दही तोंडातून बाहेर काढला नाही बेट्याने..मलाच कसतरी झाल म्हणून निघून गेले मी .... तरी पुढचे २ दिवस त्याचाच विचार करत होते... काय वाटल असेल त्त्या बिचाऱ्याला??...

पण आता ३ वर्षांपूर्वी त्याचा फोटो पहिला फेसबुक वर आणि गारच झाले मी... हा खराच तो होता ??
केवढा बदललाय हा !!!! अस वाटत न की..................
बापरे ....
काश मी त्याला त्यावेळी स्वतःहून विचारलं असत....

आणि आज माझ स्वप्न जणू काही अस्तित्वात आल... पुस्तकातून नजर वर गेली आणि तो समोर..... जीव असा टांगणीला लागला होता.... पोटात खूप मोठा गोळा उठला... हातातला कॉफीचा कप तोंडापर्यंत गेलाच नाही.....एखाद्या राजकुमारीने स्वतःच्या स्वप्नातल्या राजकुमाराची आठवण काढावी आणि तो समोर यावा अश्या परीकथेसारखी अवस्था झाली माझी......

केवढा गोंधळलेला दिसत होता........माझ्याकडे तर भूत बघाव तस बघत होता...

२ दिवसांनी परत भेटायचंय ....... २ दिवस .......

रात्र बरीच झालीये..... उद्या काम बरच आहे... झोपायला हव....
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आज तिला परत भेटायचं रे....
अबे सकाळपासून ५० वेळा सांगून झालय... बंद पड आता नाहीतर समोरच काम पूर्ण नाही झाल तर तो बॉस चालू होईल....
गप रे... मला काहीच सुचत नाहीये यार... समोरच्या स्क्रीन वर मला फक्त तिचाच चेहरा दिसतोय बघ .......

आसमान की परी हे वो..
मेरे ख्वाबो की मलिका हे...
वही मेरी जिंदगी और वही मेरी रु ...

तुझे चाहता हु मै इस कदर,
की दुनिया को भुला बैठा,
तेरी एक हसी के बदले,
अपनी जिंदगी भुला बैठा…….

अबे ओ मिर्झा गालीब, समोरचा command चुकला बघ... eroor message तुझ्या carreer मधला मोठा पूर्णविराम दाखवतोय....

खड्ड्यात गेल राव आजच काम!!!!
मेरी जान, चल आता आतमध्ये. सकाळपासून २ ओळी टाइप केल्या आहेस आणि ७ चैतन्यकांड्या विझवल्या आहेस फुकाड्या.....
मागचे दिवस आठवता आहेत रे....तुला आठवतंय तिला प्रपोज मारायचं म्हणून १५ दिवस दररोज बाथरूम मध्ये डोक्याला शाम्पू लावून, केसांच्या वेगळ्या वेगळ्या स्टाइली करून , अमिताभ सारख आरश्यात पाहून डायलॉग पाठ करायचो .........
हो आठवतंय आणि मग आई बाहेरून जोरजोरात दरवाजा वाजवून ओरडायची "तासतासभर काय नखरे करतोय रे पोरींसारखे नालायका, बाहेर निघ लवकर..."
साल्या तू प्रत्येक गोष्टींमध्ये गोमच शोध.....
सगळ काही तिच्यासाठीच होत यार....आपली स्कूटी चालवताना पण रस्त्यापेक्षा अर्ध लक्ष आरश्यात असायचं आणि हवेने उडणारे केस बघून तुला विचारायचो की "साला अपने ये बाल देखके वो तो फिदा हो जायेगी ना??"..
हो... आणि मी तुला म्हणायचो "पळ बोच्या!!!!"
-------------------------------------------------

मेरे भाई , खिशाला परवडणार हॉटेल बघायचं रे....४ दिवस झालेत येवून... हातात अजून पगार आला नाहीये... आणि उधळपट्टी सुरु....अम्याला कळाल तर लगेच बोलेल "साल्या मुलीवर उडव तू .. मित्रांची वेळ आली की खिशाला भोक पडत तुझ्या!!"

"जास्त वेळ वाट पाहायला नाही लावली ना मी तुला??"
हो पूर्ण २० मिनिटे आणि ४३ सेकंद

"नाही ग, बिलकुल नाही.. आत्ताच पोहोचलो बघ..."
"जायचं आत??"

साल्या, मी म्हणतो तेव्हा माझ्या पोटाला चिमटा काढतोस ... ती म्हटली म्हणून आक्ख्या हॉटेल मधले पदार्थ मागवलेस रे....

"तू बिलकुल चेन्ज नाही झालीस ग"
"असेल बहुतेक, पण तू खूप चेन्ज झाला आहेस... मस्त पर्सनैलिटी झालीये तुझी..."
"ही..ही... काहीही !!"
"अरे नाही खरच.... आणि केवढा लाजतोस रे तू मुलीसारखा..."

अग आता कोणतरी मुलीसारख वागल पाहिजे ना....

"छे ग... पण खरच वाटल नव्हत परत भेटशील म्हणून..."
"अरे, जग छोट आहे ... आज नाहीतर उद्या भेटलोच असतो "
क्या डायलॉग हे भाई..
"बोलण्यात अजूनही तुला तोड नाहीये..."
....
.....
....
....
"ए चल मला जायला हव... दोन तास कसे गेले कळलच नाही रे जुन्या आठवणींमध्ये... सॉरी बर का... निवांत भेटू... and thanks again for dinner..."
दोस्ती का एक उसूल हे मैडम.. दोस्ती मे नो सॉरी नो thank you...
"ए काहीही नको बॊलुस...नंतर भेटूच परत.... चल तुला ऑटो मध्ये बसवतो."

एक मुलगा आज बराच खुश आहे ..
अबे कुत्र्या काय नुसता मध्ये मध्ये करत होतास रे.....किती दुर्लक्ष कराव तुझ्याकडे....
हाहाहा .... चला घरी....

पहिली भेट ... पहिली डेट....पहिल्या क्रश सोबत.... जिंदगी इसी का नाम हे...
तिच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलो होतो रे...काय मस्त स्माईल करते रे ती ... तिची प्रत्येक अदा म्हणजे मला सजा होती...हे सगळे क्षण कुठे साचवून ठेवू रे ... तूच सांग....

चल बाळा घरी चल..... उद्या आपला बॉस.... तुझा रिपोर्ट बघून सांगेनच ....

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१९ नोव २०१४,

कितीतरी दिवसांनी एवढे हसले मी काल ... काळाची संध्याकाळ खरच खूप मजेत गेली.. आज दिवसभर कामात लक्षच नव्हत... फक्त रोहनच....खरच काय झालय मला??? ही माझ्या हृदयात त्याची आठवण आल्यावर जी धडधड वाढते आहे ते काय आहे नक्की...एक नवीन आशेचा किरण आलाय माझ्या आयुष्यात... नवीन आहे की जुना ??? जुनाच म्हणावा.. ..

दिवसभर त्याच्याशीच chat करत होते आज ..फक्त तो नी तोच....

काही लिहावासच नाही वाटत आहे आज.... तो आणि तोच.....

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

“अहो ... अहो , वाजलेत किती पहा .... सकाळी ड्यूटीवर जायचय... एक वाजलाय... चला झोपायला...”

बायकोच्या हाकेने इन्स्पेक्टर परब वर्तमानात परत आले..हातातल्या डायरीकडे सुन्न नजरेने पहात मान टाकलेल्या सिगरेटचा शेवटचा झुरका मारून ते उठले....रुचाच्या डायरीने डोक्यात उठवलेल्या वादळाला बरोबर घेवूनच बायको पाठोपाठ बेडरूम च्या दिशेने पावले टाकू लागले.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users