स्थलांतर (कथा) भाग 2

Submitted by मी प्राजक्ता on 13 May, 2016 - 02:10

स्थलांतर भाग 1

http://www.maayboli.com/node/58652

स्थलांतर भाग 2

स्थळ : सुंदरनगर महाराष्ट्र.

लांबलांबपर्यंत खुलं मैदान. जे काळोखामुळं दृष्टीपथात येत नाही. ग्रे कलर मधे दिसतो तो फक्त एक अंडाकृती मंच. त्या मंचाच्या दोन टोकांना दोघं उभे आहेत. अरुंद बाजूला स्त्री व रूंद बाजूला पुरुष. स्त्रीच्या मागे मंच संपतो तिथे एक प्लायवुडची भिंत आहे, स्ट्रॉ कलरची. आणि वर एक मोठा झगझगीत प्रकाश देणारा लाल बल्ब. बल्ब बंद आहे. वेळ संध्याकाळची किंवा पहात संपून सकाळ होण्याची.

आता ती दोघं उभी आहेत तिथे:

तो मानसिक आजारावर काम करणारा (डॉक्टर किंवा जादुटोणा करणारा) वीस बावीस वर्षाचा, मध्यम बांध्याचा, मॉडर्न मुलगा. टी शर्ट, जीन्स. पायात स्पोर्ट्स शुज. डोक्यावर कॅप.

ती, वीस बावीस वर्षांची, आत्मविश्वास कमी असणारी मुलगी. अंगात ऑफ व्हाईट साडी.

अचानक बल्ब पेटतो. मुलीची सावली तिच्या समोर पडते. मुलगा दोन्ही हात वर करून जोरात एक छोटा मंत्र बोलतो. त्या मुलीच्या सावलीचे सहा तुकडे होऊन पक्ष्यांसारखे फडफडत दूर निघून जातात. तेवढ्यात ती वेणी घातलेली, सुंदर मुलगी किंचाळुन खाली ओणवी बसते, डोकं दोन्ही पायात घालून.

तो धावत येतो तिच्याकडे.
"शुभा !!!!" " शुभा, तू ठीक आहेस ना?"
तो काळजीच्या स्वरात पण ओरडल्यासारखा विचारतो.
"नाही. अंगातलं त्राण गेल्यासारखं वाटतंय." ती.
"असं होणारच होतं. जर माझा प्रयोग यशस्वी ठरला तर सावली वापस येईल. पुढचं तुला सांगेन मी. किंवा मग उद्यापर्यंत सावली वापस येईल. तू उद्या ऑफिसात ये. सकाळी सात वाजता." तो.

उजाडायला सुरुवात झाली होती. म्हणजे ती सकाळ होती. शुभा जाता जाता विचार करत होती. आईबाबांनी मला दत्तक घेतलं खरं, पण माझ्या पाठीवर निखील झाला म्हणून ते जास्त खूष होते. माझ्या खर्या आईबाबांकडून दत्तक घेताना माझ्या नावावर केलेली जमीन आता निखीलला हवी आहे. देवा ! मार्ग काढ.

खरं तर यासाठीच तिने वरचा सगळा खटाटोप केला होता. ती घरी पोचली. तशीपण ती एकटीच रहात असे. त्यामुळे ती झोपी गेली.

इकडे शुभाच्या सावलीवर एक्सपरिमेंट करणाऱ्या तरुणाच्या ऑफिसात :
अशोक. संशोधक.वैज्ञानिक.मनोचिकित्सक.
तिच्या सावलीच्या गुप्त होण्याबद्दल आधी कल्पना होतीच अशोकला. पण आता जर सावली वापस नाही आली तर... सावली गायब झाल्यामुळे शुभाचे वजन अर्धे झाले होते.
अशोकच्या कयासानुसार तीन ते चार दिवसात सावली वापस नाही आली तर शुभापण रहाणार नव्हती.

दुसऱ्या दिवशी परत त्या जागी ती दोघं आली. पण दुर्दैवानेअशोकला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही.तो घाबरून गेला पण शुभाला तसं न दाखवता म्हणाला, "तू हलु नकोस जागेवरुन शुभा !!!मी वापस येईपर्यंत. मी मशीन रुमला चाललोय. मशीनचा डिफेक्ट गेला कि व्यवस्थित होईल सगळं."

पण तू हलू नकोस जागेवरुन.

क्रमश :

Written by : kshamayermalkar

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ता कथेच्या हेडींगमध्येच भागांचे नंबर द्या, म्हणजे वाचायला सोप जाईल..

छान लिहीताय. पुलेशु.

भाग 2