स्थलांतर (कथा)

Submitted by मी प्राजक्ता on 13 May, 2016 - 02:07

स्थलांतर : भाग 1

राजा विक्रमादित्याच्या राजधानीत आज गडबड होती. त्याच्या एकुलत्या एका मुलीचा जयगौरीचं लग्न होतं. राजा आदित्यनारायणाच्या मुलासोबत नरेंद्रासोबत आधीच ठरलं होतं.

लखलखता सुर्यप्रकाश. निळं आभाळ. भर बाजारातलं संगमरवरी मंदिर. नेहमी वर्दळ. पण आज इतकी गर्दी. बापरे!
सुंदर केशरी पोषाखात जयगौरी आणि तितकाच छान नरेंद्र. फेरे झाले, माळा घातल्या, एखाद्या शाही घराण्यातल्या लग्नासारखं पार पडलं लग्न.

नरेंद्र जयगौरीला घेऊन आदित्यनारायणाच्या राजधानीला निघाला. नगर आल्यानंतर वेशीजवळ आल्यावर त्याने सर्वांना राजधानीला जायला सांगितले. आणि चार विश्वासू शिपाई घेऊन तो राजमहालाचा रस्ता सोडून गावाकडे निघाला.

एका सुरक्षित जागेवर एक भुयार खोदले होते. तिथून तिला घेऊन एकटाच नरेंद्र पुढे निघाला. रस्त्यात तिने नरेंद्राला असं वेगळं जाण्याचं कारण विचारलं पण त्याने काहीबाही सांगून तिला चुप बसवलं. चालता चालता ते परत जमिनीकडे येत होते. रस्ता संपल्यावर नरेंद्राने हाताने भुयाराचे दार उघडले. जयगौरी वर आल्यावर तिला दिसल्या त्या शिसवाच्या कोरीव पाय-या. पायऱ्यांच्या मागे एक दार असावं बहुतेक. स्वयंपाकघर असावं ते. दोघं पायऱ्या चढून वर गेले.

डाव्या बाजूला जयगौरीची रहायची खोली होती.
आत गेल्यावर समोर एक प्रशस्त बैठा दिवाण. दिवाणासमोर मोठा सोनेरी कड्यांनी बांधलेला झोपाळा. झोपाळ्याच्या डाव्या बाजूला एक छोटी बाल्कनी. मोठी खिडकीच ती. उजव्या बाजूला मोठा आरसा. आरशावर केस मोकळे सोडलेल्या बाईचं डिजाईन. तिची सोनेरी झुलूपं आरशाच्या दोन्ही बाजूंनी आली होती. आरशाशेजारी छोटं सोन्याचं कपाट होतं. त्यात दागिने असावेत बहुधा.

झोपाळ्यासमोरचा भाग जरा उंच बांधला होता. आणि वर .... एक माणूस आत उभा राहील अस् पिंजरा टांगला होता !!!!

जयगौरीनं खिडकीतून पाहिलं तर खाली राजधानीतलाच सुवर्णकारांचा बाजार होता.सगळीकडे मोठमोठी दुकानं होती.

दुसरी दालनंही तितकीच सुंदर होती त्यातलं एक वस्त्रागार आणि वरच्या मजल्यावर शयनगूह होतं.

जयगौरी भारावून गेली होती आणि इंच न् इंच कोरलेल्या शिसवात बनलेला महाल पाहून आनंदीत झाली होती. काही प्रश्न अनुत्तरीत होते, त्याचं ऊत्तर नरेंद्राला मागणार होती. पण त्याआधीच नरेंद्राने दोन विश्वासू दासी बोलवून घेतल्या होत्या. या दोघीच तिच्याबरोबर रहाणार होत्या. त्यातली एक तिची जेवायची व्यवस्था पहाणार होती. आणि दुसरी तिच्या सेवेसाठी रहाणार होती.

नरेंद्र जयगौरीला तिच्या दालनात घेऊन आला पिंज-याचं दार उघडून तिला आतून पिंजरा बघायला सांगितला. ती आत गेल्यानंतर त्याने पिंजरा बंद करून घेतला.चावी सांभाळून ठेवताना भयचकित झालेली जयगौरी सोडण्याची याचना करत होती. तिला काहीच कळत नव्हते.

नरेंद्राने दासींना तिच्याशी न बोलण्याची आणि तिच्या बोलण्यात न गुंतण्याची सक्त ताकीद दिली होती.

जयगौरी त्या हलणार्या पिंज-यात गज पकडून थरथरत उभी होती, काही अनुत्तरीत प्रश्न घेऊन. कोणते होते ते प्रश्न ?

तिला पिंज-यात का बंद केलं ? लोकांपासून लपवून का ठेवलं ? सुवर्णाच्या बाजारात महाल का बांधला ? महाल अंत: पुरात असतो. बाग असते. हे सर्व अनुत्तरित ठेवून नरेंद्र का निघून गेला?

नेमके हेच प्रश्न नरेंद्रच्या वडिलांना पडले होते.आणि मुलगा काही सांगत नाही हे पाहून त्यांनी गुरुगृही धाव घेतली.

क्रमश :

Written by : kshamayermalkar

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users