रायटर्स क्रॅंप

Submitted by प्रकाश घाटपांडे on 1 May, 2016 - 00:58

संगणकावर गेली ८-१० वर्षे जास्त वेळ जातो.सरासरी डेली ३- ४ तास संगणकावर जात असतात. पण हल्ली हल्ली कीबोर्डवर टायपिंग करायला बसले की कोपरापासून हातापर्यंत चे स्नायू हे ताणले जातात, फुरफुरतात. आतून गुदगुल्या झाल्यासारखे वाटते. त्यामुळे कीबोर्डवर फार लिखाण करता येत नाही.ही रायटर्स क्रँप ची लक्षणे आहेत. संगणकापासून दूर राहिल्यावर त्रास जाणवत नाही. सध्या संगणकीय लिखाणावर फार मर्यादा येत आहेत. एकाने आयुर्वेदिक मसाज यावर उपाय असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी फिजिओथेरपिस्टने बोटांचे व मनगटाचे व्यायाम दिले होते व अल्ट्रासॉनिक शेक चे तीन चार सेटिंग केले होते. त्याने हळू हळू थोडा फरक जाणवला होता. नंतर त्रास कमी झाला पण यावर्षी पुन्हा तो होउ लागला आहे. माबोकरांनी उपाय सुचवावेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैद्यकीय उपाय केल्यानंतर,

  1. कीबोर्ड लेऑउट बदलुन ड्वोरॅक करुन घ्या व कीबोर्ड + मॉनीटर व तुमचा हात यांचा कोन योग्य करुन घ्या.
  2. भारतात टीव्हीएस कंपनीचे योग्य दरात यांत्रीक कळफलक मिळतात ते वापरा. टीव्हिएस भारत या नावाने असतात.
  3. कीबोर्ड व माऊस एकाच रेषेत असतील तर माऊस हाताळताना कमी ताण येतो असा माझा अनुभव आहे. याऊलट जर माऊस कीबोर्डपेक्षा वर + लांब असेल तर जास्त ताण येऊ शकतो.
  4. हात व कण्यावर कमीत कमी ताण येण्यासाठी खुर्ची व इतर रचना बदलुन घ्या.

अधिक माहिती इथे http://www.maayboli.com/node/57274

किबोर्ड बदलल्याने हातावर येणारा ताण कसा कमी होतो हे समजले नाही. उपचार व प्रतिबंध या दोन्ही पातळीवर चर्चा अपेक्षित आहे.

ह्यासाठे योगासने एकदम लाभदायक ठरतील. हाताला मुंग्या येणे ही स्पॉन्डॅलेसिसची लक्षणे सुद्धा असू शकतात. रोज रात्री घरी गेल्यावर गार पाण्यानी स्नान करत जा.

हातांसाठी गोमुखासन
उष्ट्रासन
ताडासन
धनुरासन
आणि सर्वात उत्तम म्हणजे सुर्यनमस्कार आहेत.
पण योगाभ्यास कोण शिकणार! त्यातही भारतात राहून योगाभ्यास शिकणे आणि योगाभ्यास करणे मुश्किल काम आहे.

प्रकाश,
तो फक्त किबोर्ड बदलणॅ हा एकच परिणामकारक उपाय नाही. मी त्यासोबत ईतर गोष्टीही सुचवल्या आहेत.
कृपया त्या धाग्यावर जाऊन त्या किबोर्डबद्दल वाचा. तो किबोर्ड हातावर समान ताण येईल, एकाच हातावर जास्त ताण येणार नाही असा खास संशोधन करुन बनवलेला आहे. अर्थात फक्त इंग्रजी टंकनासाठी.

मानेला कॉलर लावून काम केले तर बराच आराम मिळतो.

दर पन्धरा ते वीस मिनिटानी हात ताणावेत व बसल्या जागी व्यायाम करावेत. तसेच दर तासाने खुर्चीवरून उठून फेरी मारावी. हे करायला वेळ मिळत नाही पण प्रयत्न करावा.