GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स

Submitted by राहुल on 11 August, 2009 - 15:24
ठिकाण/पत्ता: 
स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी

GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स

स्थळ : स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी

http://www.gatlinburgcabinsonline.com/cabin.asp?property_id=1216&navmont...

Property Management Office Address -
333 Ski Mountain Road
Gatlinburg, TN 37738
Phone : (865) 430-9868

चेक इन : २ ऑक्टोबर, दुपारी ३:०० नंतर
चेक आउट : ४ ऑक्टोबर, सकाळी १०:०० च्या आत.

खालील मायबोलीकरांनी आपली उपस्थीती नक्की केली आहे.

अटलांटामधून व्हॅन करून जाणारे -
१) RJ (२ मोठे + २ छोटे) २ नॉन-व्हेज
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
३) runi (२ मोठे) १ नॉन-व्हेज, १ व्हेज
४) fiona (२ मोठे) **tentative १ व्हेज/नॉन-व्हेज, १ नॉन-व्हेज
५) adm (१ मोठा) १ नॉन-व्हेज
६) Mo (२ मोठे + १ छोटा) २ व्हेज
एकूण : ११ मोठे + ४ छोटे
विनायकच्या घरी ३:०० वाजे पर्यंत जमायचे आहे.
३:३० वाजता स्मोकीजसाठी निघायचे आहे.
अटलांटाहून जाणार्‍यांसाठी एस कार रेंटल कडे एक व्हॅन बूक केली आहे.
https://www.acerentacar.com/resview.aspx?1375579=90440

शिट्टी ते स्मोकीज थेट ड्राईव्ह करून येणारे -
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
८) सुमीत आणि खुशबु २ व्हेज
एकूण : ४ मोठे + १ छोटा
रात्री ९:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.

लाँग आयलंड ते स्मोकीज थेट उडत येणार -
९) सँटी (१ मोठा)
रात्री ११:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.

एकूण : १६ मोठे + ५ छोटे

===============================

शनिवारचा कार्यक्रम -

१. Roaring Fork Motor Nature Trail : हा सिनीक ड्राइव्ह आहे. निसर्गसौंदर्य खूप पहायला मिळेल. इथे मध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थांबता येते. तसेच ह्या रोडवर इतर ट्रेल्सही घेता येतात. उदा.: Grotto Falls ची ट्रेल. सोपी आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येते. मुले एन्जॉय करतात.

२. Clingman's Dome : इथे चढावे लागते. ०.४ माइल्सच आहे पण खूप चढ आहे. हा स्मोकीजमधला सर्वात उंच पॉइंट आहे. वरून खूप सुंदर दिसते असे नेटवर वाचले.

३. Alum Cave : ही ४.६ माइल्सची ट्रेल आहे. थोडी अवघड आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येण्यासारखी आहे की नाही माहीत नाही. बहुतेक नाही. पण सर्वाधिक पॉप्युलर ट्रेल आहे.

४. Cades Cove Loop Road: हा पण ड्राइव्ह आहे. सीनरी मस्त. गर्दी असते. लोक गाड्या मध्येच थांबवून फोटो काढत असतात. चिडचिड होण्याची शक्यता.

५. गॅटलीनबर्ग डाऊन-टाऊन फेरफटका.

रविवारचा कार्यक्रम -

१. Newfound Gap Road : हा सुध्दा ड्राइव्ह आहे. ३३ माइल्स. हा पूर्ण स्मोकी माऊंटन ओलांडून नॉर्थ कॅरोलायनाच्या पश्चिम टोकापर्यंत जातो. इथेही मध्येमध्ये बरेच पॉइंटस आहेत. तसेच Fall Foliage बघण्यासाठी हा ड्राइव्ह प्रसिध्द आहे.

===============================
मेन्यू -

शुक्रवार डिनर : स्मोकीज च्या वाटेवर बाहेर कुठेतरी.
शनिवार ब्रेफा : झटपट ब्रेफा. टोस्ट, बेगल्स, मफीन्स, वै.
शनिवार लंच : पराठे.
शनिवार डिनर : ग्रील (चिकन/व्हेज), मिसळ
रविवार ब्रेफा : पोहे, वै.
===============================

कामाची वाटणी -

सिंडी - मिसळीसाठी मटकी, डिस्पोजेबल
पूर्वा - लहान मुलांसाठी डाळ/तांदूळ, देसी ग्रोसरी (पोहे, फरसाण, पनीर, कोथींबीर, कढीपत्ता, आलं)
आर्जे - बार्बेक्यु तयारी आणि इतर (योगर्ट, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स, वॉटर बॉटल्स), क्लिनींग सप्लाईज
मो - मुलांसाठी फळे (केळी, सफरचंद, वै.), भाज्या (कांदे, बटाटे, शिमला मिरची)

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावना ते सगळं एका पोस्ट मधे टाकं बरं.. अशी एकेका पदार्थासाठी पोस्ट पाडू नकोस.. Happy
ते मृ नी सांगितलेलं बनाना डेझर्ट करूया ग्रील वर.. ती कृती माझ्या विपूत शोधावी लागेल... !!

अहो खजिनदार.. इथली महत्त्वाची पोस्ट वरच्या निवेदनात हलवा..

फ्रेश चिकन : costco
भाज्या : aspargous, pepper, corn, mashrooms, tommatos, red potatos, paneer, पर्ल ओनीअन, झुकीनी, अननसाच्या फोडी

व्हेज किती, नॉन व्हेज किती हे पण एकदा यादीत येवु द्या म्हणजे त्याप्रमाणे पदार्थांची खरेदी करणे सोपे जाईल. प्रत्येकाने आपापल्या नावापुढे ते लिहून मग ती सगळी यादी कॉपी पेस्ट करा.

१) RJ (2 मोठे + २ छोटे)
२) lovevin (२ मोठे + १ छोटा)
३) runi (२ मोठे) - (१ व्हेज, १ नॉनव्हेज)
४) fiona (२ मोठे)
५) adm (१ मोठा)
६) Mo (२ मोठे + १ छोटा)
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा)
८) सिंडीचे मित्रमंडळ (२ मोठे + ???)
९) सँटी (१ मोठा)
१०) bo-vish (१ मोठा)

व्हेज किती, नॉन व्हेज किती हे पण एकदा यादीत येवु द्या म्हणजे त्याप्रमाणे पदार्थांची खरेदी करणे सोपे जाईल. प्रत्येकाने आपापल्या नावापुढे ते लिहून मग ती सगळी यादी कॉपी पेस्ट करा.

१) RJ (2 मोठे + २ छोटे)
२) lovevin (२ मोठे + १ छोटा)
३) runi (२ मोठे) - (१ व्हेज, १ नॉनव्हेज)
४) fiona (२ मोठे)
५) adm (१ मोठा)
६) Mo (२ मोठे + १ छोटा) (२ व्हेज)
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा)
८) सिंडीचे मित्रमंडळ (२ मोठे + ???)
९) सँटी (१ मोठा)
१०) bo-vish (१ मोठा)

१) RJ (2 मोठे + २ छोटे)
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) (१ मोठा वेज्/नॉनवेज, १मोठी वेज)
३) runi (२ मोठे) - (१ व्हेज, १ नॉनव्हेज)
४) fiona (२ मोठे)
५) adm (१ मोठा)
६) Mo (२ मोठे + १ छोटा) (२ व्हेज)
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा)
८) सिंडीचे मित्रमंडळ (२ मोठे + ???)
९) सँटी (१ मोठा)
१०) bo-vish (१ मोठा)

१) RJ (2 मोठे + २ छोटे)
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) (१ मोठा वेज्/नॉनवेज, १मोठी वेज)
३) runi (२ मोठे) - (१ व्हेज, १ नॉनव्हेज)
४) fiona (२ मोठे) (१ मोठा नॉनव्हेज, १ मोठी व्हेज/नॉनव्हेज)
५) adm (१ मोठा)
६) Mo (२ मोठे + १ छोटा) (२ व्हेज)
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा)
८) सिंडीचे मित्रमंडळ (२ मोठे + ???)
९) सँटी (१ मोठा)
१०) bo-vish (१ मोठा)

१) RJ (2 मोठे + २ छोटे)
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) (१ मोठा वेज/नॉनवेज, १मोठी वेज)
३) runi (२ मोठे) - (१ व्हेज, १ नॉनव्हेज)
४) fiona (२ मोठे) (१ मोठा नॉनव्हेज, १ मोठी व्हेज/नॉनव्हेज)
५) adm (१ मोठा)
६) Mo (२ मोठे + १ छोटा) (२ व्हेज)
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा) (१ मोठा नॉन वेज, १ मोठी वेज)
८) सिंडीचे मित्रमंडळ (२ मोठे) (२ मोठे वेज)
९) सँटी (१ मोठा)
१०) bo-vish (१ मोठा)

आमच्या बरोबर येणारे स्वाती आणि प्रशांत ह्यांचे रद्द झाले. आता सुमीत आणि खुशबु येणार आहेत. हे दोघे आणि माझा नवरा हिंदी भाषीक आहेत. लेकिन घाबरनेका कोई एक कारण नही है...सब लोग अपना हिंदी जैसे जमेगा वैसे झाडो...उनको चमक्या तो चमक्या नै चमक्या तो उनका ब्याड लक खराब, क्या ? तसे माझ्या नवर्‍याला मराठी उत्तम येते, अगदी नाटक बघून enjoy करण्याइतके किंवा गेला बाजार मी टोमणे मारलेले कळण्याइतके Proud

१) RJ (2 मोठे + २ छोटे)
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) (१ मोठा वेज/नॉनवेज, १मोठी वेज)
३) runi (२ मोठे) - (१ व्हेज, १ नॉनव्हेज)
४) fiona (२ मोठे) (१ मोठा नॉनव्हेज, १ मोठी व्हेज/नॉनव्हेज)
५) adm (१ मोठा नॉनव्हेज)
६) Mo (२ मोठे + १ छोटा) (२ व्हेज)
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा) (१ मोठा नॉन वेज, १ मोठी वेज)
८) सिंडीचे मित्रमंडळ (२ मोठे) (२ मोठे वेज)
९) सँटी (१ मोठा)
१०) bo-vish (१ मोठा)

हिंदी भाषिक??? ठिके बघेंगे उनको भी.. Happy

माझ्या काही सूचना:
१. ब्रेड ऑम्लेट इतक्या लोकांसाठी बनवणे ह्यात खूप वेळ जाइल. त्यापेक्षा चीज/चटणी(फ्रोझन)/बॉइल्ड एग असे काही वापरुन सँडवीच केले किंवा दूध/सिरिअल खाउन पटकन निघता येइल.
२. शनिवारी संध्याकाळी कोपो साजरी करायची आहे. त्यासाठी मिसळ/पाव, मसाला दूध, ग्रिल्ड भाज्या/पनीर/चिकन असे करता येइल. २-२ करी भाज्या करण्यात वेळ जाइल. शिवाय आर्जे मिसळ मसाल्याचे पाकिट हडप करुन बसला आहे ते बाहेर निघेल Proud
३. लहान मुलांसाठी नाष्टा: दूध, सिरिअल, एग, केळं, सफरचंद, इ जेवण: वरण/भात, खिचडी, उपमा इत्यादी करता येइल. मुलांसाठी स्नॅक्स वेगळे आणावे लागतील.
४. सां का करण्याची कोणाला आवड आहे का ? की फक्त भेंड्या, पत्ते, इतर खेळ इतपत ठीक आहे ? सँटीने बारा गटगला गाणे म्हंटले होते. अजून कोणी असे काही करु इच्छीते का ? लहान मुलं पण काही ना काही करु शकतील. (माझा लेक फुरक्या मारणे वगैरे (अ)सांस्कृतीक कार्यक्रम करतो)
५. इथुन काही खाद्यपदार्थ आणण्यापेक्षा मी सगळ्यांसाठी डिस्पोजेबल्स आणते. पेपर टावेल्स, ताटं, वाट्या, इ.
६. पुस्तकांची देवाण घेवाण करायची असल्यास पटापट क्लेम लावा Happy

काही प्रश्न:
१. शुक्रवारी रात्री सगळ्यात आधी कोण पोचणार आहे ? आम्ही रात्री ९ पर्यंत पोचणार आहोत. त्याआधी चावी घेऊन तिथे कोणी आलेले असेल का ?
२. ऑक्टो.च्या पहिल्या वीकांताला तिथे थंडी कितपत असेल ? जास्तीची अंगडी/टोपडी आणावी काय ? इशानसाठी बरोबर ठेवणारच आहे. मोठ्यांसाठी गरज नसेल तर आणत नाही.
३. लहान मुलांना घेउन तिथे कोणी गेले आहे काय ? स्ट्रोलर सहजी जातील अशा ट्रेल्स आहेत काय ?
४. वरचं पाच नंबर चालेल ना ? Happy

ह्या सर्व (नम्र) सूचना आहेत. अर्थातच सगळ्यांना आवडेल/पटेल ते ठरवु Happy

मागच्या वेळी आम्ही चार जोड्या गेलो होतो तेव्हाच्या अनुभवा वरुन.....
१) शुक्रवारी रात्रीचे जेवण बाहेरच करणे सोयीचे पडेल.....सिंडी वगैरे जी मंडळी अट्लांटा हून जाणार नाहीत त्यांच्यासाठी आपल्याला केबीन वरती काहीतरी तयारी करून ठेवावी लागेल किंवा अट्लांटा हून त्यांच्यासाठी काहीतरी घेवून जावे लागेल. शुक्रवारी रात्री पोहोचायला सगळ्यांना उशीरच होइल असे वाटते.
२) शुक्रवारी मी सुट्टी घेणार आहे. म्हणजे मला दुपारीच जाउन वॅन आणता येइल. दुसरी वॅन (करणार असु तर) आणायला माझ्या बरोबर आणखी एकाला यावं लागेल.
२) शनिवारी शक्य तितक्या लवकर बाहेर पडावे. बघण्या सारखे अनेक स्पॉट्स आहेत. लेकरा बाळांसह पंधरा सोळा जणांची वरात हाकायची म्हणजे नॉर्मली जिथे एक तास लागतो तिथे दोन तास लागतील.
३) ट्रेल्स वरती स्ट्रोलर सहज जाणार नाहीत. स्ट्रोलर जाणारच नाहीत. त्यामुळे पालक वर ट्रेल्स्वर गेले असताना मुलांना खाली कोणीतरी संभाळावे लागेल. अन्यथा स्ट्रोलर फ्रेंडली ट्रेल्स शोधाव्या लागतील. फॉल कलर्स पहायला ट्रेल्स वर गेलेच पाहीजे असे नाही. घाटातल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गाडी पुल ओव्हर करुन स्रुष्टी सौंदर्य बघायची सोय करून ठेवली आहे.
४) शनिवारी रात्री जेवणाचा मोठा घाट घालायला कितपत एनर्जी (आणि वेळ) राहील ह्या बाबत जरा शंका वाटतेय.
५) थंडी किती असेल हे सांगणं अवघड आहे. इतर कुठ्ल्याही ठिकाणा प्रमाणे इथेही ह्या विकेंड ला एकदम छान वातावरण तर लगेच पुढच्या विकेंड ला भयानक थंडी पडू शकते. त्यामुळे त्या वीकच्या सुरुवातीला वेदर कसे राहाणार आहे हे बघुन मगच ठरवुयात्.....मागच्या वेळी आम्ही थँक्स गिव्हींगला गेलो होतो तेव्हा मस्त बर्फ पडला होता.

>>४. वरचं पाच नंबर चालेल ना >>>>काही कळलं नाही बॉ....

ह्या सर्व (नम्र) सूचना/माहिती आहे. अर्थातच सगळ्यांना आवडेल/पटेल ते ठरवु

वरील नम्र सूचनांमधे हा माझा पावशेर -

स्वयंपाकात वेळ न घालवता, गप्पा / गाणी / खेळ ह्यासाठी जास्ती वेळ ठेवावा.
ग्रीलींग गप्पांसोबत होऊ शकते, तेव्हा ते करूच (नॉन-व्हेज लोकांची सोय).
पण बाकी स्वयंपाकाचा मोठा घाट घालण्यापेक्षा काहीतरी शॉर्टकट शोधावा.
उदा. : ब्रे.फा. - Dunkin Donut किंवा तत्सम आणि डिनर साठी एकच कुठला तरी व्हेज पदार्थ.
(रच्याकने : मिसळ चालेल. सिंडी तर्फे आलेलं मसाल्याच पाकीट मी घेऊन येतो. मी प्रामाणीक पणे ते पाकीट फक्त GTG साठीच वापरायच, म्हणून बाजूला काढून ठेवलं आहे :फिदी:).

विनायक, आपल्याला एकच व्हॅन पुरेल असं वाटतय. कारण बच्चे कंपनी धरून बरोबर १५ होत आहेत.

पण बाकी स्वयंपाकाचा मोठा घाट घालण्यापेक्षा काहीतरी शॉर्टकट शोधावा.
>>
हे पटतंय...कारण १२-१३ माणसांसाठी स्वयंपाक करायला तेवढी मोठी भांडी असायला हवीत.

शनिवारी ब्रेफा शक्यतोवर बाहेरच केला तर बरा...तो आपला साईट-सीईंग चा महत्वाचा दिवस आहे.
शुक्रवारी उशीरापर्यन्त सगळे जमल्यावर शनिवारी समजा उठायला उशीर झाला तर ब्रेफा करून बाहेर पडायला उशीर होईल.

शुक्रवारी रात्री बाहेर जेवणापेक्षा आपण अटलांटामधून हॉटेलचे जेवण नेऊ शकतो.त्यामुळे सिंडी,सँटी वगैरे डायरेक्ट येणार्‍यांची सोय होईल आणि एकत्र जेवता पण येईल.

सिंडी, लव्हविनच्या नम्र आणि आर्जेच्या पावशेर सुचनांना मोदक.
माझं अर्धा शेर -
१. आपली व्हॅन फुल कपॅसिटीला भरेल (१५ जण), आपल्याबरोबर जेवणाचे थोडेफार सामान असेल त्यामुळे प्रत्येकानी छोट्या डफेल बॅग्स, बॅक पॅक्स इ. आणाव्यात म्हणजे त्या सीटखाली वगैरे कश्याही ठेवता येतात.
२. विनायकला एक नम्र सुचना - तू कार रेंटल सर्व्हिसला निघायच्या आधी २-४ दिवस फोन करुन १५ सिटर व्हॅन बद्दल कन्फर्म करुन ठेव. मी बर्‍याचदा मोठया गाड्यांबद्दल हे पाहिली आहे की ऐनवेळेला (आपल्याल गरज असते तेंव्हा) त्या अव्हेलेबल नसतात.
३. अ‍ॅटलांटामधून येणार्‍यांनी इथून काय काय आणायचेय त्याची लिस्ट बनवून कोण काय आणणार आहे ते आधीच ठरवूया.

आतापर्यंत माहिती असलेल्या गोष्टी -
१) ग्रिल करता -
फ्रेश चिकन : costco
भाज्या : aspargous, pepper, corn, mashrooms, tommatos, red potatos, paneer, पर्ल ओनीअन, झुकीनी, अननसाच्या फोडी
स्क्युअर्स (लागत असल्यास)
(आपण तंदूर मसाला/पेस्ट विकत आणणार आहोत का? असल्यास लक्ष्मी ब्रँडची तंदूर पेस्ट चांगली आहे)
२) चहा, कॉफीचे साहित्य
३) मिसळीचे सामान
४) पोहे, रेडी टू ईट पराठे इ. (हे एकदा फायनल करायला हवे)
५) लहान मुलांच्या जेवणाचे साहित्य

केबिन मधे भांडी असतात जनरली बरीच...
शनिवारी रात्री डिनर घरी बनवायला हरकत असू नये माझ्या मते... कारण त्या दिवशीच मेन टिपी होणार.. ग्रील चालू असताना एकीकडे दंगा करता येतो...
ब्रेफाचं पण ऑमलेट नको हे पटलं सिंडी चं पण होतं काय सगळ्यांचं आवरत बसेपर्यंत मध्ये खूप वेळ असतो.. त्यामुळे त्याकाळात ब्रेफा उरकून घेता येतो.. पोहे किंवा एकच पदार्थ केला तर नंतर हॉटेल मधे थांबून खायचा वेळ पण वाचतो..
शुक्रवारी ऑन द वे प्रत्येक जण आपापलं जेवू शकतील.. सँटी एअरपोर्टवर खाऊ शकेल..
त्यावेळी सगळे जमल्यावर जेवत बसायला उशिर होईल.. सो आईस्क्रिम, चहा कॉफी, रंपा असं काहितरी करता येईल...
केबिन रेंट केलेलं असताना एकत्र जेवण बनवणे हा कार्यक्रम पण खूप मजेदार असतो.. फुल टिपी होतो..
बाकी मंडळ काय ठरवेल ते.. Proud

मो, हो..... तो अनुभव आम्ही पण घेतलाय.... परत एकदा कनफर्म करून घेइन गाडीचं...... शुक्रवारी मात्र गाडी आणण्या साठी माझ्या बरोबर कोणाला तरी यावं लागेल....माझ्या मते कमीत कमी दोन तरी ड्रायवर्स आसावेत रेंटल अ‍ॅग्रीमेंट वर....

एक अनाहुत सल्ला:

रेंटल कारच्या ड्रायव्हर्स्च्या ड्रायव्हिंग लायसन्सेस वर 'टेंपररी' लिहिलं नाहीये ना ते बघून घ्या. (एच-१, एफ-१, जे-१, एल-१ व्हीसा धारकांच्या लायसन्स्वर आजकाल हे लिहिलं असतं). एंटरप्राइज आणि बर्‍याच रेंटल कंपन्यांच्या नव्या नियमानुसार ते लोक अश्या परवानाधारकांना मोटारी रेंटवर चालवू देत नाहीत.

मो च्या यादीत अजून अ‍ॅडीशनः-
१.डिश वॉशिंग लिक्वीड -कारण कधीकधी भांडी खराब,तेलकट असतात/फक्त डिश वॉशरची पावडरच असते.
२.मसाला दूधासाठी मसाला.

लहान मुलांसाठी नेण्यासारख्या गोष्टी:-
१.डाळ,तांदूळ - वरण-भात/खिचडी साठी
२. रवा - ब्रे.फा ला उपमा/शिरा करता येईल.
३.योगर्ट
४.फळे- केळी,पेअर,प्लम्स
५.दूध
अजून कोणाला काही सुचत असेल तर अ‍ॅड करा.
आदीपेक्षा मोठी मुलं अजून काही खात असतील तर ते पण अ‍ॅड करा.

केबीनपासून जवळ कुठे डीडी किंवा तत्सम असेल तर ब्रेफा तिथुन आणायचा आणि ज्याचे जसे आवरेल तसे ब्रेफा उरकणे असे करु शकतो. इतक्या लोकांसाठी पोहे म्हणजे चिराचिरी बरीच होणार. तरीपण अ‍ॅडम करणारच असेल पोहे तर मी खाइन घासभर Wink

शुक्रवार बाबतीत अ‍ॅडमाला अनुमोदन. अ‍ॅटलांटाहुन एकत्र येणारी मंडळी तुमच्या सोयीने जेवुन घ्या. आम्ही शिट्टीहुन येणारे वाटेत थांबुन जेवुन घेऊ. चहा/कॉफी/आइस क्रीम चालेल Happy

मुलांसाठी दूध, केळी, डाळ/तांदूळ अटलांटावले घेऊ शकतील काय ?

फ्रोझन पराठे आणण्यापेक्षा कोणी ताजे करुन देणारे आहे का तिकडे ? नसल्यास मी इथुन घेऊन येऊ शकते, एक बाई ऑर्डर घेऊन करतात. चांगले असतात पराठे. आइस बॉक्स मधे हवाबंद डब्यात आणले तर खराब होणार नाहीत.

रच्याकने, जगाच्या पाठीवर कुठेही, कशासाठीहे गेले असताना स्वयंपाक करणे हे माझ्यासाठी आनंददायी नाही. तुम्ही (म्हणजे अ‍ॅडमाच्या प्रस्तावात सामील लोक) स्वयंपाक करा, मी (आणि माझ्यासारखे इतर) आयतं हादडु Proud

*** माझा लेक सव्वा दोन वर्षाचा आहे. त्याला डोनट/बेगल असे चालते ब्रेफाला.

तरीपण अ‍ॅडम करणारच असेल पोहे तर मी खाइन घासभर >>:D मी पण

मुलांसाठी दूध, केळी, डाळ/तांदूळ अटलांटावले घेऊ शकतील काय ? >> हो

फ्रोझन पराठे आणण्यापेक्षा कोणी ताजे करुन देणारे आहे का तिकडे ? नसल्यास मी इथुन घेऊन येऊ शकते, एक बाई ऑर्डर घेऊन करतात. चांगले असतात पराठे. आइस बॉक्स मधे हवाबंद डब्यात आणले तर खराब होणार नाहीत.>> चालेल

रच्याकने, जगाच्या पाठीवर कुठेही, कशासाठीहे गेले असताना स्वयंपाक करणे हे माझ्यासाठी आनंददायी नाही. तुम्ही (म्हणजे अ‍ॅडमाच्या प्रस्तावात सामील लोक) स्वयंपाक करा, मी (आणि माझ्यासारखे इतर) आयतं हादडु >> अनुमोदन

तुम्ही (म्हणजे अ‍ॅडमाच्या प्रस्तावात सामील लोक) स्वयंपाक करा, मी (आणि माझ्यासारखे इतर) आयतं हादडु >>>> Done !!! फक्त.. आधीची चिराचिरी आणि नंतरची आवरा आवरी तू (आणि तुझ्या कंपूतले इतर) करणार असलीस तर माझी काहीच हरकत नाही.. Happy

त्याला डोनट/बेगल असे चालते ब्रेफाला. >>>> ते मला पण चालते.. Proud

अ‍ॅडमा, "स्वयंपाक" ह्या शब्दाचा अर्थ ध्यानी घे बघू Wink आणि तुझ्या मेनुत सुरळीच्या वड्या दिसत नाहीत त्या. केबिन रेंट केलेलं असताना सुरळीच्या वड्या बनवणे हा कार्यक्रम पण खूप मजेदार होइल बघ Proud

बाकी पालकांची परवानगी असेल तर मी मुलांना खेळायला बबल्स आणि वॉचायला डिवीड्या आणेन.

ते मला पण चालते >>> तसे तर त्याला बेबी योगर्ट आणि अ‍ॅपल सॉस पण चालतो. तुला ? Lol

मी म्हंटलं ना.. मला काहीही बनवायला काहीच हरकत नाहिये... बाकीची आवराअवारी तुम्ही करा.. Happy असो.. उपां पोस्ट वहात्या बीबींवर टाका.. इथे जरा ठरवाठरवी करुया आता.. कृपया.. Happy

तरीपण अ‍ॅडम करणारच असेल पोहे तर मी खाइन घासभर >> अडमा, मला पण चालतील पोहे. पण वरुन लिंबु आणी ओलं खोबरं पण हव. Proud

आपण कोणिकोणि आणी काय काय आणायचं ते ठरवुन घेतलं तर बरं पडेल.
BBQ साठी बरच सामान लागेल, म्हणजे charcoal, tong, etc etc.

मलाही खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये किंवा स्वयंपाक करण्यामध्ये विशेष इंटरेस्ट नाही. म्हणजे जे इतर ठरवतील ते मान्य. सगळं बाहेर खाऊ असं ठरलं तरी चालेल.

विशाल (बो-विश) अलीकडेच स्मोकीजला जाऊन आला. मी त्याच्याशी बोललो. त्याने मला ट्रेल्सची थोडीफार माहिती दिली आहे. विनायक, राहुल वगैरे लोक पूर्वी जाऊन आलेले आहेत. त्यांनाही माहिती आहे. रुनीचा नवरा नितीनला फोटोग्राफीची आवड आहे. त्यामुळे तो आणि रुनीसुध्दा जमल्यास ट्रेल्सची माहिती मिळवतील. शनिवार आणि रविवारचा मुख्य कार्यक्रम (प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे) ठरला की मग त्याच्या अनुषंगाने नाश्ता आणि जेवणाचे काय करायचे ते ठरवता येईल असे मला वाटते.

Alum Cove ही ट्रेल खूप चांगली आहे असे विशाल म्हणाला. तसेच कुठल्यातरी पॉईन्टवर सूर्योदयसुध्दा बघता येतो असे म्हणाला. मी डीटेलमध्ये त्याच्याशी पुन्हा बोलतो. बाकी लोकांनीपण आपापली मते लिहावीत. स्मोकीजमध्ये बघण्यासारख्या जागा खूप आहेत त्यामुळे प्लॅनिंग करावे असे मलाही वाटते.

काही गोष्टींची काळजी घेण्यास विशालने सुचविले आहे. जे लोक रात्री ड्राइव्ह करत येणार आहेत (म्हणजे मी आणि सिंडी) त्यांना केबिन मिळणे फार अवघड आहे. तिथे जीपीएसचा सिग्नल गायब होतो आणि मोबाईलवर रेंज येत नाही. रात्री येणार्‍यांसाठी केबिन्सच्या सर्वात जवळचा पत्ता (जीपीएस वर सापडणारा आणि मोबाईलची रेंज येणारा) त्याने सांगितला आहे. तो मी नंतर इथे लिहीन. आत्ता लिहीला तर ट्रीपच्या दिवसापर्यंत पार मागच्या पानावर जाईल.

तसेच अ‍ॅटलांटावरून येणार्‍यांनी शक्यतो दिवसा तिथे पोचावे असेही तो म्हणाला. तसेच तिथे पोचल्यावर केबिनमध्ये लॅन्ड्लाईन फोन असतो, त्याचा नंबर अजून पोचणार्‍यांना (मला आणि सिंडीला) सांगावा. म्हणजे मोबाईलची रेंज नसल्यामुळे होणारे घोळ वाचतील.

शनिवार आणि रविवारचा मुख्य कार्यक्रम (प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे) ठरला की मग त्याच्या अनुषंगाने नाश्ता आणि जेवणाचे काय करायचे ते ठरवता येईल >>> हे एकदम पटले.

Pages