‘असंतांचे संत’ हा १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीय अग्रलेख लोकसत्ता या आघाडीच्या वर्तमानपत्राने मागे घेतला.
मागे घेतला म्हणजे नेमके काय केले तर इंटरनेटवरील आवृत्तीत जिथे हा लेख प्रसिद्ध झालेला दिसत होता तिथून तो हटवून केवळ दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन छापले आहे. परंतु त्याखालील प्रतिक्रिया तिथे दिसत आहेत. कदाचित काही प्रतिक्रिया हटविल्या देखील असतील, त्याबद्दल मात्र काही उल्लेख नाहीये.
http://www.loksatta.com/sampadkiya-category/aghralekh/
अर्थात छापील आवृत्ती ज्या लाखो लोकांपर्यंत पोचला आहे तो मात्र मागे घेता येणे अशक्यच आहे. जर इंटरनेटवरील आवृत्तीचा जमाना नसता तर अग्रलेख मागे घेण्याकरिता काय केले असते हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. मागे आणिबाणीच्या कालखंडात सरकारचा निषेध म्हणून या एक्स्प्रेस वृत्तसमूहाने अग्रलेखाची जागा कोरी ठेवल्याचे स्मरते परंतु अशा प्रकारे अग्रलेख छापून तो नंतर मागे घेतलाय असे कधी आठवणीत नाही.
अशा प्रकारे अग्रलेख मागे घ्यावा लागणे ही नामुष्की समजायची का? की शहाणपण समजायचे? आणि शहाणपणच असेल तर ते उशिरा सुचलेले. मग आधी असा लेख छापणे हा मूर्खपणा म्हणावा का? आधी असे लेख छापायचे आणि मग भावना दुखावल्याचे निमित्त करून ते मागे घ्यायचे योग्य आहे काय?
अशा प्रकारे मागे घ्यायचेच असतील तर मग यापूर्वी छापलेले इतर अग्रलेख जसे की, विधानसभेत चर्चिला गेलेला बळीराजाची बोगस बोंब, त्याचप्रमाणे कुमार केतकरांच्या घरावर मेटेंच्या अनुयायींनी हल्ला करण्यास कारणीभूत ठरलेला शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयीचा अग्रलेख असे कितीतरी अग्रलेख मागे घ्यावे लागतील. लोकसत्ता हे सर्व अग्रलेख मागे घेणार का?
तसे नसेल तर चोवीस तासांत असंताचे संत हा अग्रलेख मागे का घ्यावा लागला? तो छापील आवृत्तीत तर आहेच शिवाय ईपेपर आवृत्तीत देखील आहे.
http://epaper.loksatta.com/c/9181266
तसेच समजा जर ईपेपर आवृत्तीतूनही तो लोकसत्ताने काढला तरी इतर अनेकांनी तो सेव्ह करून ठेवला असल्याने ते जनहितार्थ गुगल डॉक्स अथवा इतर माध्यमांतून प्रसिद्ध करणारच अशा वेळी हा अग्रलेख मागे घेऊन लोकसत्ताने काय साधले?
एका वाचकाने प्रतिक्रिया दिल्याप्रमाणे अग्रलेख मागे घेतल्याने "गाढव गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले" अशी पुरोगामी लोकसत्तेची अवस्था झाली आहे.
मायबोलीकरांची या विषयावरील मते जाणून घेण्यास उत्सुक आहे.
...........
...........
सजग नागरिक मंचाच्या नावाने
सजग नागरिक मंचाच्या नावाने खालील मेसेज सोशल मिडीयावर फिरत आहे.
झाली पुरेशी टिंगल लोकसत्ताची | झाली भरपूर थट्टा सम्पादकांची | चला जाऊ एक पाऊल पुढे, आली वेळ ठोस कृतीची...
----करु या एक चळवळ : जागृतीची, अभिनव निषेधाची, वाचकांच्या हक्काची --
दै. लोकसत्ता या एक्सप्रेस वृत्तसमूहाच्या दैनिकाने गुरवार दि.17 मार्च रोजीचा मदर टेरेसा आणि संतपद यावर टिका करणारा 'असंतांचे संत' हे संपादकीय मागे घेतल्याची घोषणा शुक्रवार दि.18 मार्च रोजी कोणतेही कारण न देता केली आहे.सदर संपादकीयाने भावना दुखावल्या बद्दल माफीनामा प्रसिद्ध केला आहे. संपादकीय मागे घेणे हे वृत्तपत्रीय इतिहासात बहुदा पहिल्यांदाच घडले असावे. संपादकीय वापसीत व्यवस्थापन व संपादक यांच्यावर प्रचंड दबाव आल्याचे कळते. कारण न देण्याइतका दबाव भयकारी असावा. "जर्नालिझम ऑफ़ करेज" ला ही भीती वाटावी असे काही घडले असणार. हा दबाव स्वाभाविक ख्रिश्चन संघटना,चर्च, मिशनरी, काही प्रभावी ख्रिस्ती व्यक्ति यांनी आणला असणार. त्यांना हिन्दू विरोधक डावे, समाजवादी, पुरोगामी सेक्युलर, जिहादी समर्थक यांच्यासह हिन्दू असण्याची लाज बाळगणारे, अपराध वाटणारे यांनी साथ दिली असणार. या सगळ्यांनी अत्यंत अल्पावधित एक ताकत निर्माण केली आणि संपादकीय मागे घ्यायला लावण्याचा 'चमत्कार' केला आहे. हा सर्व प्रकार वृत्तपत्र सृष्टीला काळीमा फसणारा आहे. माध्यमांवर हुकुमशाही लादणारा आहे. ही एक प्रकारे आणिबाणी आहे. भयंकर असहिष्णुता आहे. लोकसत्ताचे वाचक संघटित नसल्याने, दबावाच्या खेळी पासून अनभिज्ञ असल्याने हे घडले आहे. वाचक आणि ग्राहक म्हणून त्यांच्या मुलभुत हककांवर गदा आणली गेली आहे. त्यांना मागे घेण्याचे कारण न कळल्याने त्यांची फसवणूक झाली आहे. मूल्यांना पायदळी तुड़वले आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्यावर प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच संपादकीय मागे घेण्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे.यासाठी एक विधायक आंदोलन लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वानी केले पाहिजे. रविवार दि.20 मार्च चा लोकसत्ता "नाकारला" पाहिजे. "आम्ही वाचक रविवारी लोकसत्ता घेणार नाही कारण, संपादकीय मागे घेण्याच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. यापूर्वी अनेकदा भावना दुखविणारे संपादकीय आपण प्रकाशित केले. त्यावेळी ते मागे घेणे दूर पण दिलगिरीही व्यक्त केली नव्हती. याचा धिक्कार करतो. आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आब राखु इच्छितो. माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आम्ही झुगारु इच्छितो. अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी रोखु इच्छितो.आणि याचे सामूहिक प्रतीकात्मक प्रकटीकरण म्हणून आम्ही रविवार दि.20 मार्चचा लोकसत्ता घेणार नाही.वाचक म्हणून आमच्या या कृतीची दखल घेऊन संपादकीय मागे घेण्याची कारण जाहीर करावी." चला निर्धार करा ! माध्यमांच्या हितासाठी एक दिवस Say No To लोकसत्ता.
( सजग वाचक मंच)
१.सोशल मिडीयावर हा मेसेज
१.सोशल मिडीयावर हा मेसेज वाचणारे साहजिकच नेटवर वृत्तपत्राची नेट आवृत्तीही पहात असणार.
इथे माबोवरपण एकजण असे होते. लोकसत्ताचा निषेध म्हणून पेपर घेणे सोडले पण नेटआवृत्ती वाचून प्रत्येक संपादकीयावर टीका हमखास करत.
२. एका दिवसाच्या लाक्षणिक पेपर नको आंदोलनाने वृत्तपत्राचे काही नुकसान होत नाही.
तरिही ही चळवळ मला फार आवडली असल्याचे नमूद करते. असे उठसुट संपादक लोक सवंगपणे अग्रलेख लिहू लागले आणि नंतर मागे घेऊ लागले तर एकंदर 'वृत्तपत्र' या माध्यमाची विश्वासार्हताच संपेल.

म्हणून मी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देते.
(तसंही आमच्याइथे कुठलं चांगलं मराठी वर्तमानपत्र मिळतच नाही.)
कपोचे यांच्या प्रतिसादाचा
कपोचे यांच्या प्रतिसादाचा अर्थ मला असा जाणवला.>>> कपोचे ऐवजी गोळविलकr गुर्जी असे वाचावे.
तो अग्रलेख "आख्खाच्या आख्खा "
तो अग्रलेख "आख्खाच्या आख्खा " मागे घेण्याचे कारण काय?
आख्खा अग्रलेख मदर तेरेसांच्या संत पदवी बाबत लिहून सुरवातीस व शेवटी तोंडि लावण्यापुरते हिंदु ढोंगी संतांचा उल्लेख करणे हे सद्याच्या "सर्वधर्मसमभावी" इनथीमला तसेच सगळ्यांनाच "सारखा न्याय लावतो" या दिखाव्याला वा अस्सल भुमिकेला धरुनच नव्हते काय?
साधारणतः टाईम्स गृप कायमच सत्ताधार्यांच्या पाठीशी असतो, व एक्स्प्रेस गृप कायम विरोधात अशी ढोबळ मांडणी पूर्वी होती. टाईम्स गृप आजही आहे तसाच आहे, एक्स्प्रेस गृप मात्र गेल्या विस पेक्षा जास्त वर्षात स्वतःची भुमिका कोणती याबाबत गोंधळात आहे असे वाटते.
कित्येकदा असेही वाटते की टाईम्स गृप उजवा आहे तर एक्स्प्रेस ग्रुप डावा, अन गेल्या काहीवर्षातील एक्स्प्रेस ग्रुपमधिल "भरती' मुळे तो अधिकाधिक "डावा" बनत चालला आहे. अन त्यामुळेच सध्याचे संपादक उजवे नाहीत हे नक्की पण प्राप्त परिस्थितीपुढे/मुळे किती डावे झालेत इतकाय काय तो प्रश्न माझे मनात होता.
इतकेच काय, तर मी तर असेही मत / उपपत्ती मांडू इच्छितो की वृत्तपत्रीय सृष्टिमधे बोकाळलेल्या/भरमसाठरित्या वाढलेल्या एकांगी "डाव्या" विचारांमुळे, खरे तर "लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ " ही वृत्तपत्रांची भुमिकाच संशयास्पद वाटू लागलेली आहे, कारण "डावे विचार" अन "लोकशाही" यांचे विळाभोपळ्याचे सख्य/नाते सर्वश्रुत आहेच. असो.
"अग्रलेख मागे घ्यायला लागणे ही नामुष्कीची वा "कसल्यातरी मजबुरी"चीच गोष्ट आहे.
पण ती घटना "इष्टापत्ती" मानुन, लगेच त्या घटनेचा रोखही "हिंदू साधूंकडे" वळवित बुद्धिभेद करण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा हल्ली तितकीशी अचंबित करीत नाही" .
असे म्हणतात की मेसोपोटॅमिया की कुठल्याश्या राणीचे नाक वाकडे होते म्हणून जगातील पुढील अनेक गोष्टी घडल्या...
उद्या खरोखरच हिमालय देखिल मेवाड आईस्क्रिम/कुल्फी बनला, तर ते बनण्यामागेही "हिंदू साधूसंतच" आहेत असा नि:ष्कर्ष काढायला डाव्यांचे पुजारी मागे पहाणार नाहीत.
कुबेरांचा लेख, व तो मागे घेणे ही एक किरकोळ घटना आहे. पण त्यामागची कारणे मात्र "अतिविशाल" आहेत. असो.
आपला काय संबंध वृत्तपत्रांशी? महिन्याच्या शेवटी कडकी आली की घरातील इतःस्ततः पसरलेली रद्दी गोळा करुन वाण्याच्या दुकानात नेऊन घालणे, अन महिनाअखेरीची तुट, तो खळगा कसा तरी भरु पहायचा, इतकीच आमची लायकी. सबब आमच्यासारख्यांनी या घटनेवर बोलायला जाऊच नये... नै का?
( एकाच विषयावर दोन दोन धागे, मग काय करणार? कॉपीपेस्टच करणार.... नाहीतर शब्दांमधे फरक पडु शकेल ना ! )
@ साधनाजी, अग्रलेख मागे
@ साधनाजी,
अग्रलेख मागे घ्यावा लागला हि वृत्तपत्राच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे........
संपादक म्हणजे ब्रम्हदेव आहे अश्या थाटाचे विधान आहे. संपादकाचे मत चुकु शकत नाही किंवा संपादक अभ्यासाशिवाय लिहीतच नाही अश्या चुकीच्या गृहितकावर आधारीत हे विधान आहे.
१७ मार्च चा अग्रलेख का मागे घेण्यात आला याबाबत माझा अब्यास नाही त्यामुळे त्यावर माझे मत अजुन तयार नाही. हा लेख काय होता आणि जनभावना कश्या आहत होत होत्या हे वाचल्या म्हणजे समजेल.
असे असेल तर मग लोकत्तेने आजवर
असे असेल तर मग लोकत्तेने आजवर जे लिहिले त्यातले कितपत विश्वसनीय? उगाच गावगप्पा वाचल्या काय वेळ देऊन? >>> इन फॅक्ट याच्या उलट आहे. लोकसत्तेने सहसा जे लिहीले आहे ते ते ठामपणे म्हणू शकत होते. या लेखात असे काहीतरी होते की जे ते कायदेशीर कारवाईत अडचणीत आले असते म्हणून काढले. यामुळे बाकी लेखांवर प्रश्नचिन्ह उभे राहात नाही.
हे असेच झाले असेल असे मला म्हणायचे नाही. पण ती एक शक्यता आहे.
>>>> या लेखात असे काहीतरी
>>>> या लेखात असे काहीतरी होते की जे ते कायदेशीर कारवाईत अडचणीत आले असते म्हणून काढले <<<<
यात मी एक शब्दाची भर घालू का फारेण्डा?
या लेखात असे काहीतरी होते की जे ते आंतर्राष्ट्रीय कायदेशीर कारवाईत अडचणीत आले असते म्हणून काढले <<< अशीही शक्यता असु शकते का?
ते सुद्धा असेल. मदर टेरेसा
ते सुद्धा असेल. मदर टेरेसा मुद्दाम गलथान वातावरण ठेवत वगैरे उल्लेखही अडचणीत आणणारे असू शकतात. पण इथे अनेकांनी वरती लिहीलेले आहे की मदर टेरेसांवर प्रचंड टीका देशात परदेशांत अनेकांनी केलेली आहे. कुबेरांसारखा माणूस ते लिहीणे सेफ आहे ही खात्री असल्याशिवाय एवढा मोठा लेख लिहील असे वाटत नाही. त्यामुळे त्यांना शेवटच्या परिच्छेदात जे म्हणायचे होते ते एडिटिंग करताना भलतेच आले व त्यामुळे लेख मागे घेतला ही शक्यता जास्त वाटते.
मात्र वरती नंदिनीनेही म्हंटल्याप्रमाणे करेक्शन करता आले असते. ते का केले नाही कल्पना नाही.
जौ द्या न हो. कशाला
जौ द्या न हो. कशाला इतकाकाथ्याकुत्ट ...
मोदीन्च्या नावावर फाडुन टाका इ बिल.
त्यानी दबाव आणला. प. बंगाल मध्ये निवडणुका आहेत अन मुबईकर असले लेख चापून आणून राहिलेत तर ते रागावले.
शिरीष कणेकर नेहमी सांगतात तो
शिरीष कणेकर नेहमी सांगतात तो घर या सिनेमाच्या मूळ बातमीचा किस्सा. त्यांनी ती बातमी छापली तेव्हां इंडियंन एक्सप्रेसचं व्यवस्थापन ठामपणे पाठिशी उभं राहीलं. बातमीचा सोर्स देण्याची जबरदस्ती सरकारला करता येणार नाही असे न्यायालयाने निवाडे अनेकदा दिलेले आहेत. मीडीयाला भीती असती तर झी न्यू़जने कन्हैयाचा डॉक्टर्ड व्हिडीओ प्रसारीत केला नसता. (अर्थात अनेक शक्यता त्यात दडलेल्या आहेत, कदाचित कन्हैया केस करणारच नाही अशी त्यांना खात्री असावी ही एक शक्यता). पण मिडीयाने कायद्याची भीती बाळगली असती तर आरुषी केस आणि अन्य केसच्या मीडीया ट्रायल्स झाल्या नसत्या.
कुबेरांची त्या लेखातली
कुबेरांची त्या लेखातली आक्षेपार्ह वाक्य इथे देतो ,
१. समाजसेवेच्या आवरणाखाली त्यांचा ( मदर तेरेसांचा ) चेहरा होता तो धर्मांतरासाठी हपापलेला.
२. त्यांनी स्थापन केलेली वैद्यकीय केंद्रे मुद्दाम अकार्यक्षम आणि अस्वच्छ ठेवली गेली होती.
३. पैशाच्या स्त्रोतात आकंठ डुंबणार्या मदर तेरेसा आणि त्यांच्या संस्थांनी त्यांच्याकडील वैद्यकीय व्यवस्था परिपुर्ण केल्या नाहीत कारण त्यांना वेदेनेच्या प्रदर्शनाचे आकर्षण होते .
४. त्यांच्याविषयीच्या भारावलेपणाचाच अलगद फायदा त्यांनी उठवला आणि आपल्या समाजसेवेच्या निरागस पदराखाली प्रचंड प्रमाणावर धर्मांतरे घडवली.
५. सुरुवातीला पाश्चात्यधार्जिण्या काँग्रेसनेतृत्वामुळे मदर तेरेसा यांचे उदात्तीकरण झाले , नंतरच्या काळात मग येथील राजकारण धर्मीनिधर्मीवादाच्या राजकारणाभोवतीच फिरत राहीले. आपल्या हिंदु मुळांना नाकारणे म्हणजेच निधर्मी म्हणजेच पुरोगामी असे येथील शहाजोग आणि माध्यमवीर मानत.
आता तरी कबुल कराल का की तो लेख का अप्रकाशीत केला गेला.
यातला कुठला आक्षेप पहिल्यांदा
यातला कुठला आक्षेप पहिल्यांदा घेतला गेलाय ? त्या वेळी कुणीच कशी माफी मागितली नाही ?
लोकमतच्या वेळी आक्षेप कुणी घेतला आणि का हे पण छापलं गेलं होतं. मग इथे वाचकांच्या भावना असं का ?
उलट लोकमतला माफी मागायला लावण्याचा द्वेषभक्त नागरिकांनाच लाभ झाला. ख्र्सिती समाजाने दबाव आणला असता तर आतापर्यंत तसा खुलासा नक्कीच केला गेला असता.
(द्वेषद्रोही नागरिकांनी डुकराच्या अंगावर मुस्लीम धर्मातील पवित्र वाक्यं लिहील्याबद्दल तो निषेध केला होता, आयसिस वर टीका केल्याबद्दल नाही हे स्पष्ट केलं होतं. पण याच बाफवर अजूनही द्वेषभक्त लोकांचेच म्हणणे मांडले गेलेले आहे).
Shree, Nothing new. This has
Shree,
Nothing new. This has been written many times. Both in English and Marathi.
या विषयावरच्या झंप्या दामले
या विषयावरच्या झंप्या दामले यांच्या लेखावर इथली कमेण्ट हलवण्यात आली आहे.
वर mother तेरेस्सांवर केले
वर mother तेरेस्सांवर केले गेलेले आरोप खरे आहेत क? मी कधीच त्यांच्या आश्र्माला भेत दिलेली नाही म्हणुन विचारले.
बाकी, अगदी एसटी मागे घ्यावी
बाकी, अगदी एसटी मागे घ्यावी तितक्या सहजतेने मागे घेतला.
म्हणजे संपादक अग्रलेख नावाच्या एष्टीत ड्रायव्हरच्या जागी बसलेत. निषेधवाडी स्थानक आले तसे "संचालक मंडळ" नावाच्या वाहकाने गाडीतून टाण्णकन उडी मारली. आणि इशाऱ्याची शिट्टी तोंडाने हाणत हाताने खुणा केल्या.
"येऊ द्या... येऊ द्या... येऊ द्या... येऊ द्या..."....
शेवटी आला मागे अग्रलेख. मग संपादकानी पण टाण्णकन उडी मारली. केबिनचे दार दाण्णकन बंद केले. वाहक साहेबांनी घोषणा केली,
"गाडी फक्त दहा मिनटे थांबेल"
आणि गेले दोघे चहा प्यायला. हाय काय अन नाय काय. चढणाऱ्या उतरणाऱ्या पब्लिकचा मात्र मागे धुमाकूळ सुरु झाला.
(No subject)
हाहाहा
हाहाहा
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Criticism_of_Mother_Teresa
हे वाचनात आले. वरील चर्चेमुळे हे वाचले गेले.
आणि गेले दोघे चहा प्यायला.
आणि गेले दोघे चहा प्यायला. हाय काय अन नाय काय. चढणाऱ्या उतरणाऱ्या पब्लिकचा मात्र मागे धुमाकूळ सुरु झाला.>>>>
Pages