प्रेम म्हणजे नक्की काय असतं ???

Submitted by उडन खटोला on 16 March, 2016 - 12:04

दररोज पेपरात प्रेमभंगातून नैराश्य आल्याने अथवा विरुद्धलिंगी व्यक्तीने योग्य प्रतिसाद न दिल्याने अथवा आपल्या प्रेमास समाजाने /कुटुंबाने मान्यता न दिल्याने आत्मघात केल्याच्या बातम्या येत असतात ....

आम्ही स्वत: प्रेमात तसे अपयशीच , आमची व्यथा इथे पहा ... http://www.misalpav.com/node/27748
तर प्रेम म्हणजे नक्की काय असते ? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केयास अनेक उत्तरे समोर आली ...
विकीबाबा म्हणतात... Love is a variety of different feelings, states, and attitudes that ranges from interpersonal affection to pleasure It can refer to an emotion of a strong attraction and personal attachment.[1] It can also be a virtue representing human kindness, compassion, and affection—"the unselfish loyal and benevolent concern for the good of another".[2] It may also describe compassionate and affectionate actions towards other humans, one's self or animals.[3]

पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रेम भावना ही विशिष्ट वयात ( पौगंडावस्था ते युवा -तरुण अवस्था ) पुनरुत्पादन /प्रजोत्पादना साठी निसर्गात:मानवी मेंदुमध्ये जे हार्मोनिक बदल होतात त्यास भिन्नलिंगी आकर्षक व्यक्ति दिसल्यानंतर मेंदूने दिलेले प्रतिसाद व त्याचे अभिव्यक्तीकरण असे असावे असे वाटते ... प्रेमात माणसे खरोखर वेडी होतात ,आंधळी देखील होतात याचा अनुभव मला स्वत:ला तर आलाच ,पण इतर अनेकांमध्येही तशी लक्षणे कॉमन आढळली ....

आपणास काय वाटते ? प्रेम म्हणजे नक्की काय असतं ???

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

विकिपीडिया वर योग्य सांगितले आहे.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या आई वडिलांवर माझे प्रेम आहे.
माझ्या बायको/नवऱ्यावर माझे प्रेम आहे.
माझ्या प्रेयसी/प्रियकरावर माझे प्रेम आहे.
माझ्या मुलांवर माझे प्रेम आहे.
माझ्या मित्र-मैत्रिणींवर माझे प्रेम आहे.
माझ्या कलेवर माझे प्रेम आहे.

इथे प्रत्येक वाक्यात प्रेमाचा अर्थ निराळा आहे. देशभक्ती, आदर, आकर्षण, आपलेपण, काळजी, मैत्री, आवड इत्यादी सगळ्या भावनांचे रंग ज्यावर उमटतात त्या कॅनव्हास ला प्रेम म्हणतात. प्रेम नसेल तर या शब्दांना अर्थ नाही. कॅनव्हास नसेल तर चित्र काढणार तरी कसे (मग ते चित्र देशभक्ती पासून शारीरिक आकर्षण पर्यंत कोणतेही असो). म्हणून या सर्वांमध्ये प्रेम हि कॉमन गोष्ट आहे.

निरपेक्षपणे सेवा करण्यातले किंवा आनंद देण्यातले सुख म्हणजे प्रेम म्हणता येईल.

देशासाठी सेवा करण्यातले सुख. देशप्रेम. आईची सेवा करण्यातले सुख. मातृप्रेम. आपल्या सहवासाने जोडीदाराला आनंद देण्यातले सुख. पतीप्रेम/पत्नीप्रेम. मुलांचे काळजी पालन पोषण करण्यातले सुख. पुत्रप्रेम. आपल्या कृतीमुळे मित्र-मैत्रिणींना खुश पाहण्यातले सुख. मित्रप्रेम. कलेला योगदान देताना मिळालेले सुख. कलाप्रेम.

जिथे अपेक्षा आहे. तो व्यवहार. जिथे देण्यातल्या सुखापेक्षा सुख घेण्याची आस आहे. ती जबरदस्ती.

गाता रहे मेरा दिल गाणे ऐका. त्यात एक कडवे संपले की एक क्लेरिओनेट की तत्सम वाद्याची एक
धुंद करून टाकणारी धून आहे. माझ्या मते तरी ते प्रेम आहे. आपल्याला तसे बेछूट धुंद वाटायला लावते, सर्व सोडून वेडे करते असे ते प्रेम. हे रोमँटिक प्रेम झाले. पण इतरही आहेत. व तितकीच महत्त्वाची आहेत. सर्व मिळून आपला एक प्रेमळ स्वभाव बनत असतो. एखादा खडूस वाटणा रा माणूस देखील घरी एखाद्या झाडावर/ मांजरावर फार प्रेम करू शकतो.

लव्ह मेक्स द वर्ल्ड गो राउंड. ही अनुभवायची चीज आहे. आणि आपण प्रेम करतो म्हणून त्या बदल्यात आपल्याला कोणी तसेच तितकेच प्रेम करेल ही अपेक्षा दु:खाचे मूळ आहे. तसे कधी होत नाही.
खुश नसीब है वो जिनको प्यार से प्यार मिला.

अतुलने लिस्ट केली तशी प्रेमात भरपुर व्हरायटी आहे. पण तुम्हाला हिंदी सिनेमामधे दाखवतात ते प्रेम अपेक्षित असाव.

ते प्रेम म्हणजे मेंदुमधे झालेला टेम्प. केमिकल लोचा. Wink वयानुसार हळुहळु बरा होतो.

प्रेम म्हणजे

उगाच साहित्यिक
http://www.maayboli.com/node/28131

उगाच वैज्ञानिक

न्युटनच्या एका सिद्धांताप्रमाणे ज्या वस्तूला वस्तूमान (मास) आहे अशी वस्तू आपल्या जवळच्या वस्तूला आकर्षित करते . म्हणजे प्रेम असणे हा एक आकर्षणाचा भाग आहे, पण मग सर्वजण सर्वांवर प्रेम न करता एखाद्या व्यक्तिवरच का करतात याचे कारण एकच असू शकते..........आपल्याला जी व्यक्ती आवडते तीचे आपल्या दृष्टीने (मनाने) वसूमान जास्त असावे. मग तीची काळजी घेणे ,सहवास मिळवणे हा पुढचा भाग म्हणजे प्रेम .

उगाच काल्पनिक ( फक्त प्रियकर प्रेयसी या नात्यासाठी)
प्रौढ झाल्यानंतर शारिरिक आकर्षणामुळे किंवा एका आयुष्यभर सुरक्षैततेच्या भावनेतून एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाणे.

उगाच प्रॅक्टीकल
प्यार व्यार सब झूट है.. ए तो मन का वहेम है.