सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवाणा-या राईडस

Submitted by मार्गी on 12 March, 2016 - 05:12

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

उत्साह वाढवाणा-या राईडस

तोरणमाळ ट्रेक केल्यानंतर उत्साह बराच वाढला. पुढे नियमित राईडस सुरू राहिल्या. सप्टेंबर २०१४ मध्ये अनेक लक्षात राहण्यासारख्या राईडस झाल्या. काही अर्धशतक आणि काही छोट्या राईडस नियमित सुरू राहिल्या. आता अशा छोट्या नियमित राईडसचं महत्त्व कळतं आहे. जितक्या नियमित राईडस करू, तितकं शरीर तयार होत जातं. छोटीच राईड आहे- जेमतेम ४० किलोमीटरची. परत येताना शेवटच्या बारा किलोमीटरमध्ये तुफान पाऊस आला. एकदम दृश्यमानता कमी झाली आणि रस्त्यावर धुकं आलं. त्यामुळे संध्याकाळ होता होता रात्र झाल्यासारखंच वाटलं. हायवेवर अंधारात सायकल चालवणं फार कठिण. पण न थांबता चालवत राहिलो आणि थोड्याच वेळात शहरात पोहचलो. अंधारलेला रस्ता, जोरदार पाऊस आणि सायकलिंग!

नियमित राईडस केल्यामुळे बराच फरक पडतोय. परभणीजवळ एक ८० किलोमीटरची राईड केली आणि गंमत म्हणजे सकाळी सव्वा दहा परतही आलो. पहाटे सव्वा पाचपासून जेमतेम पाच तासांमध्ये ८० किलोमीटर झाले! हा नियमित राईडसचा फायदा! आता मूव्हिंग स्पीड जवळजवळ २० किमी/ प्रति तास मिळतोय. अर्थात् ह्या राईडस खूप सपाट रस्त्यांवरच्या आहेत. तरीही आधीपेक्षा फरक दिसतोय. थेंबे थेंबे तळे साचे- अगदी तसंच एक एक छोट्या राईडसमुळेसुद्धा स्टॅमिना वाढवण्यासाठी मदत होते. पण आपण नेहमी मोठ्याच राईडमध्ये गुंतून पडतो- करायची तर मोठी राईड करू म्हणतो आणि छोटं पाऊल उचलण्यापासूनही दूर राहतो.

आता साठ- ऐंशी किलोमीटरच्या राईडस खूप सोप्या वाटतात. अर्थात् नियमितता टिकवावी लागेल आणि वाढवाई लागेल. हे थोडं कठिण काम आहे. आठवड्यात कमीत कमी पाच दिवस राईडस करायला हवी. जर परत गॅप पडली तर ही तयारी उपयोगी येणार नाही. सप्टेंबरमध्ये आणखी काही राईडस झाल्या. सायकल राईडस करताना खूप काळजी घ्यायला पाहिजे. सगळं शरीराच्या कलाने घेतलं पाहिजे. एकदम घाई केली तर शरीर थकतं आणि आरामसुद्धा करावा लागतो. म्हणूनच सायकलमधले एक्सपर्ट प्लॅन देतात- पहिल्या आठवड्यात पाच दिवशी १० किलोमीटर; पुढच्या आठवड्यामध्ये १२- १५ किलोमीटर आणि असं हळु हळु वाढवत जायचं. जर अशा प्रकारे शरीराला जुळवून घेण्यासाठी संधी देत व शरीराच्या गतीने पुढे गेलो तर शरीर खूप काही जुळवून घेतं. पण जर एकदम उडी मारायला गेलो तर विपरित परिणाम होतो. असो.

रूट कोणताही‌ असो, अंतर कितीही असो, प्रत्येक राईडची वेगळी मजा येते. रस्ता जरी एकच असला, तरी वेगळी मजा येते. सकाळचा ताजेपणा, पक्ष्यांचं कूजन, उगवता सूर्य, गायब होणारे तारे आणि सायकल चालवताना अंगावर येणा-या हवेचा आवाज! सायकल चालवताना मान वळवून बघितलं तर टायर्सचा मंजुळ आवाज येतो! अगदी तसाच आवाज, जसा हायवेवरच्या ट्रकचा आवाज दूर ऐकू येतो! पण हे सगळं एंजॉय करणा-यावरसुद्धा अवलंबून आहे. शक्यतो आपण सायकल चालवतानाही आपल्या काळज्या, पुढचे विचार, भूतकाळ किंवा भविष्यकाळाचाच विचार करत असतो आणि त्या राईडमधला तो क्षण मिस करत असतो. खरं सांगायचं तर माझा हाच अनुभव आहे की फार क्वचित, अगदी कधी तरी मन त्या राईडमधल्या त्या क्षणी स्थिर होतं आणि ते क्षण एंजॉय करू शकतं. आणि जेव्हा आपण असं एंजॉय करू शकतो, तेव्हा सोबत द्यायला निसर्ग असतोच!

   पुढील भाग २०: दुखापत व नंतरच्या राईडस

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> पण आपण नेहमी मोठ्याच राईडमध्ये गुंतून पडतो- करायची तर मोठी राईड करू म्हणतो आणि छोटं पाऊल उचलण्यापासूनही दूर राहतो. <<<< अगदी बरोबर... आमालाही कळतय, पण वळत नाहीये अजुन ......

>>>> की फार क्वचित, अगदी कधी तरी मन त्या राईडमधल्या त्या क्षणी स्थिर होतं आणि ते क्षण एंजॉय करू शकतं. <<<< याबाबतीत मात्र मी नशिबवान आहे.... राईड करताना फक्त अन फक्त राईडचाच विचार अन बाकी लक्ष आजुबाजुच्या परिसरावर, घडणार्या बारीक सारीक घटनांवर.....

छान लिहीलय, फोटोही मस्त.... खरेतर तुमचे लेख म्हणजे सोबत फोटोंची / दृष्यांचीही मेजवानी अस्ते...

मस्त चालू आहे लेखमाला
तुमच्यामुळे वेगळ्या वाटा बघायला मिळताहेत
धन्यवाद