अमलेश्वर आणि खोलेश्वर - अंबाजोगाई

Submitted by मुरारी on 13 March, 2016 - 11:31

या वर्षी अंबेजोगाई ला जायचा योग आला.योगेश्वरी देवी कुलदेवता असल्याने तसे अधे मध्ये जाऊन येतो.लातूर एक्सप्रेस झाल्याने आता जाणे सोपे झाले आहे. पूर्वी सारखे औरंगाबाद हून बस ने वेग्रे जावे लागत नाही. लातूर ला उतरून एक गाडी केलेली होती.आमच्याच गाडीला अमित देशमुख असल्याने , सिंघम स्तैल मध्ये आधी त्याच्या २०-२५ गाड्यांचा ताफा धुरळा उडवत निघून गेला. मग इतर लोकांच्या गाड्या निघाल्या

सकाळचे लातूर स्टेशन
॑wdeew

मध्ये पोहे आणि चहा ब्रेक झाला, लातूरहून अंबाजोगाई साधारण पन्नास किलोमीटर आहे.
fef

गेल्यावर अंघोळी आटपून दर्शनाला गेलो.अभिषेक नेवेद्य झाला कि तसे करण्यासारखे काही नसते, आजूबाजूला फिर्ण्यासारखे पण विशेष काही नाही असे वाटत असतानाच हातातल्या एक कागदावर
अम्लेश्वर आणि खोलेश्वर अशी शिवाची दोन प्राचीन मंदिरे असल्याचे समजले. म्हटले चला काहीतरी वेगळे बघायला मिळेल.गाडी केलेली असल्याने ड्रायवर दिवसभर सोबत होताच , वैजनाथ ला अनेकवेळा गेल्याने तिकडे गेलो नाही.दुपारी जेवण झाल्यावर थोडा आराम केला, प्रचंड उकाडा होता त्यामुळे लगेच बाहेर पडणे अशक्य होते. चहा घेऊन थोडा वेळ देवळात बसलो.

योगेश्वरी देऊळ

wdeew

देऊळ अगदी प्रशस्थ आहे, पूर्व आणि दक्षिण दिशेला महाद्वार आहेत. समोर दीपमाळा आहेत.चहूबाजूंनी तटबंदी आहे

wdeewwdeewjbjhb

देवळाच्या आवारात अनेक विरगळ, प्राचीन अवशेष विखुरलेले आहेत. पण सर्वांची अवस्था खूपच कठीण आहे

fssf

तिथून आधी अमलेश्वरा कडे निघालो, दहाव्या शतकातले मंदिर यापुढे याबद्दलची काहीही माहिती मिळाली नाही, इथले माहितगार याबद्दल मार्गदर्शन करू शकतील.पण हेमाडपंती बांधकाम वाटले नाही.
देऊळ अगदी एकांतात होते, बाकी कुणीच नव्हते. इतक्या देखण्या मंदिराची अशी अवस्था पाहून वाईट वाटले.

अमलेश्वर
wdeew

गाभार्यात अप्रतिम कोरीवकाम केले होते, पण खूप अंधार असल्याने शिवाय सोबत क्यामेराही नसल्याने तसेच टिपण्याचा प्रयत्न केला

wdeewwdeew

वर चढायला पायर्या होत्या, पलीकडील बाजूला एक सुंदर पाण्याचे टाके होते, इतक्या दुष्काळात या टाक्याला पाणी असलेले पाहून आश्चर्यच वाटले.

wdeewwdeewwdeew

अवस्था खराब असली तरी मुळचे सौंदर्य एकेकाळचे वैभव दाखवतच होते.

wdeewwdeewwdeew

देवळाच्या पायर्यांवर असे हत्ती कोरलेले आहेत

wdeewwdeew

याचं हास्य लैच विकृत वाटतंय Happy

wdeew

माहितगार कोणी नसल्याने विशेष माहिती समजली नाही , तिथून निघून मग खोलेश्वराकडे निघालो
आता उकाड्याने परिसीमा गाठलेली होती, पण आकाशात मात्र ढग दाटून यायला लागलेले होते.
wdeewwdeewwdeew

खोलेश्वर

wdeew

इथे थोडी माहिती लिहिलेली दिसली,अतिशय सुंदर देऊळ पण आत भयंकर अंधार असल्याने, शिवाय सर्व भिंतींना कचकून ओईल पेंट चोपडल्याने हिरमुस झाला Sad

wdeew

अजूनही हातात बराच वेळ होता, म्हटले मुकुन्द्राजांची समाधी पाहून येऊ, ग्रुप मधल्या बर्याच लोकांनी पाहिलेली नव्हती
यावेळी मात्र आम्ही बरोबर वेळेला पोहोचलो, समोरच्या दरीत भरपूर मोर पाहायला मिळाले, सोबतची बच्चे कंपनी खुश झाली, पूर्ण पिसारा दाखवत उडणारे मोर पाहणे म्हणजे खरेच विलोभनीय दृश्य होते.

सूर्यदेव हळू हळू घरी पळायच्या मार्गावर होते

fsdfwdeewwdeew

आम्हालाही लातूर ला पोहोचायचे असल्याने छोटी भटकंती आम्ही आटोपती घेतली आणि निघालो. लातूर ला वाडा नावाच्या एका अप्रतिम हॉटेल मध्ये जेवलो, एकदमच सुपर, झकास वातावरण निर्मिती केलेली होती, अंधारलेला वाडा, त्याचे महाद्वार, आतमध्ये स्वागताला तुळशी वृंदावन त्यात उदबत्ती पण जळत होती, खर्या तुळशीचे जंगल, नंतर विहीर , आणि आत मध्ये दगडी वाडा.एकदम अंधुक उजेड , जागोजागी कंदील लटकलेले. जेवण तर जबराटच होते. वांग्याचे भरीत, ज्वारीच्या भाकर्या, दाण्याची चटणी, हिरवा ठेचा, शेवभाजी, दही , मजबूतच अडवा हात मारला.
जेऊन बाहेर आल्यावर मात्र वातावरण बदललेले होते , दणकून विजा चमकायला लागल्या.सगळीकडे मस्त मातीचा सुवास सुटला, बारीक पावसाला सुरवात झाली, सुरवातीला गम्मत वाटत होती, पण हळू हळू विजांनी रौद्ररूप धारण केले. कसेबसे स्टेशन ला पोचलो. लातूर एक्स्प्रेस उभी होतीच. मुंबई च्या दिशेने एका सुंदर दिवसाची समाप्ती झाली

टीप : सर्व फोटो मोब्ल्यावरून काढल्याने सर्वसाधारण आलेले आहेत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलापण संध्याकाळी फोटो नव्हते दिसत म्हणून रात्री बघूया ठरवलं. आता दिसतायेत फोटो. अमलेश्वर, खोलेश्वर माहिती नव्हतं. दोन वर्षापूर्वी योगेश्वरी आणि परळी वैजनाथला जाऊन आलो.

फोटो छान आहेत. प्राचीन देवळे छान आहे, जपणूक व्हायला हवी. भडक रंग, oilपेंट उगाच देतात, सौदर्य जातं मूळ. लातूरच्या वाडा हॉटेलचा फोटो नाही काढला?

ओ साहेब कसले फोटो काढलेत राव.मोबिल कंचा म्हणायचा?

एक लंबर, भारीच

वाडा हाँटेल मस्तच आहे, गेलोय एकदा, भर पावसात

फोटो फारच सुरेख आले आहेत. पहिला रेल गाडीचा फोटो तर मला 'शोले'च्या पहिल्या सीनची आठवण करून देऊन गेला.