समारोप

Submitted by संयोजक on 10 March, 2016 - 01:00

२०१० सालापासून आपण मायबोलीवर कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा करतोय. गेल्या वर्षीचा अपवाद वगळता यंदाचं हे सलग सहावं वर्षं. श्री. गो. नी. दांडेकर यांच्या जन्मशताब्दी-वर्षातला हा मराठी भाषा दिवस आपण गोनीदांना समर्पित केला होता. आपले या वर्षीचे काही उपक्रम त्या अनुषंगानं आयोजित करण्यात आले होते, तसंच काही उपक्रम नेहमीप्रमाणेच मायबोलीकरांच्या मुलांकरता होते. या सगळ्यांच उपक्रमांना मायबोलीकरांनी व घरातील बालगोपाळांनी भरभरून प्रतिसाद दिला. यात सहभागी झालेल्या आणि उपक्रम यशस्वी होण्यास हातभार लावलेल्या सर्व मायबोलीकरांचे मनःपूर्वक आभार.

ॠणनिर्देश

'स्मरणे गोनीदांची' या पुस्तकातील लेख वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल डॉ. श्रीराम लागू, श्रीमती दीपा लागू, श्रीमती वीणा देव व मृण्मयी प्रकाशन (पुणे) यांचे आभार.

वृत्तबद्ध कवितांचं सादरीकरण -

वृत्तबद्ध कवितेची तोंडओळख अतिशय सुगम पद्धतीनं करून दिल्याबद्दल अमेय२८०८०७ यांचे आभार.

स्वरचित वृत्तबद्ध कवितांचं सुंदर सादरीकरण केल्याबद्दल भारती. व स्वामीजी यांचे आभार.

'बोली - तुझी माझी' या उपक्रमासाठी स्वलिखित उतारे वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल खालील लेखकांचे आभार -

उतारा क्र. १ - अमेय२८०८०७
उतारा क्र. २ - चिमण
उतारा क्र. ३ - मुंगेरीलाल

'काव्यचित्र' उपक्रमासाठी सुंदर प्रकाशचित्रं वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल जिप्सी, जागू, के अश्विनी, सूर्यकिरण यांचे व या उपक्रमात मदत केल्याबद्दल जर्बेरा यांचे आभार.

'गोपाळांचा मेळा' उपक्रमातील प्रशस्तिपत्रकासाठी छानसं चित्र काढून दिल्याबद्दल विनार्च यांची कन्या अनन्याचे आभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा उपक्रम पुन्हा एकदा सुरु झाला त्याबद्दल मायबोली प्रशासकांचे अनेक अनेक आभार.

हा उपक्रम ह्यावर्षी यशस्वीरित्या अमलात आणल्याबद्दल सर्व सर्व संयोजकांचे आणि मदत करणार्‍या स्वयंसेवकांचे अभिनंदन आणि सोबत आभार.

सीतेच्या ह्या अशोकतरुच्या भरगच्च फुलोर्‍याप्रमाणे वेगवेगळे लेख, कविता, मुलांच्या गमतीजमती ऐकायला पहायला वाचायला मिळाल्यात.
Ashok1.JPG

उपक्रम मस्त झाला, काव्यचित्र खुप छान वाटले, काही लेख अजुन वाचुन व्हाय्चे आहेत पण ते पण चांगलेच असणार ही खात्री आहे.
सर्व संयोजकांचे आणि त्यांना मदत करणार्‍यांचे आभार !!

ज्यांनी अतिशय उत्साहाने सादरीकरण केले त्या सार्‍यांचे व संयोजकांचे अनेकानेक आभार.
सुंदर लेख वाचायला मिळाले, कविता वाचन अजून ऐकायचे आहे.

बी, अशोकाची फुल मस्तच.

सर्व संयोजकांचे आभार.. मायबोलीवरच्या उपक्रमात मी पहिल्यांदाच भाग घेतला आणि उपक्रम पूर्ण झाल्यावर लेखाखाली एक मस्त प्रशस्तीपत्रक मिळाल.. छान वाटल.

संयोजक मंडळ,

तुम्ही घेतलेल्या कष्टांसाठी मनःपूर्वक धन्यवाद. छान व्यवस्थित झाला म. भा. दि उपक्रम. नीट आणिक प्रशस्तीपत्रकं वगैरे दिलीत. व्यवस्थित समारोप केलात. खेळही छान होते.

जमतील तितके लेख वाचलेत. व्हिडियो पहायचे राहिले आहेत. भारती ताईंचा व्हिडियो नीट पहावा म्हणून ठेवले आहे.

मनःपूर्वक धन्यवाद.

मी नताशा आणि मुग्धटली, हा फोटो मी इथल्या बोटॅनिकल गार्डन मधे घेतला आहे. पाना फांदीला डावलून फुले थेट खोडातून निघाली आहेत Happy

बी खुप सुंदर फोटो. हा अशोक मी इथे अजुन पाहिला नाहीय.

सगळ्यांचे मनापासुन आभार. तुम्हा सर्वांचा उत्साही सहभाग संयोजकांचाही उत्साह वाढवुन गेला.

सगळ्यांचे मनापासुन आभार. तुम्हा सर्वांचा उत्साही सहभाग संयोजकांचाही उत्साह वाढवुन गेला.>>>> +१

धन्यवाद संयोजक ....खूप छान झाला म भा दि उपक्रम ... लेकीला खारिचा वाटा उचलायला दिला ..त्याबद्दल आभार___/\___ Happy

संयोजकांचे मनापासून आभार या भरगच्च उपक्रम-आयोजनासाठी , बींच्या अशोक-पुष्पबहराइतक्या सुंदर अभिव्यक्ती पुष्पांसाठी.

फार सुंदर उपक्रम पार पडला. संयोजक मंडळ आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांचे आभार.

बी छान आहे सीता-अशोक.

संयोजक मंडळाचे विशेष कौतुक करावेसे वाटतेय मायमराठीचा भाषा दिन सोहळा संस्मरणीय केल्याबद्दल. या निमित्ताने काही तरी छान ऐकावयास,वाचावयास मिळाले .धन्यवाद !
बी,अशोकाचे फुलोरे अप्रतिम दिसतायत.