शब्दपुष्पांजली: सारं काही राज्यांसाठी...

Submitted by घारुआण्णा on 5 March, 2016 - 06:54

गडांचा राजा रा्ज राजेश्वर रायगड...
कितीही वर्णनं करा,कौतुक करा अपुरीच पडणारा माझ्या राजाची किर्ती दिगंतात करणारा रायगड..
r4 .jpg
गडकोटं पाहाणं हा खरतर मराठी मातीत रुजलेला पुर्वपार छंद आहे... अगदी फारसा इतिहासात न रमणार देखील महाराष्ट्राबाहेर किल्ला पहायला गेला तर लगेच महाराष्ट्रातल्या किल्ल्याचं कौतुक आणि तुलना करत राहातो...प्रत्येक किल्ला वेगळा आणि त्याहुन त्या कडे पहाणारे, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या प्रमाणे..
कोणाला राजगड आवडतो तो तिथल्या चिरेबंदी नागमोडी माच्यांसाठी तर कोणाला अवखळ अवघड बालेकिल्ल्यासाठी.काहीं चोर दरवाजे आणि घळीतल्या वाटा प्रिय, तर काहींना डुब्यावरचा आणि ने्ढ्यातला मोकाट वारा प्रिय...शाळा कॉलेज पासुन दिवाळीच्या आणि उन्हाळी सु्ट्टीत गड्कोट फिरणे हे कायमच असे.दुर्गभरमण गाथेत खरतर इतरही किल्ले वाचले,पाहीले.पण भुरळ घालतात ते रायगड आणि राजगड. त्यातही रायगड जास्तच कारण, गड आमच्या गावकीतला,कोकणपट्ट्यातला ना.. राजगड म्हणजे जिवाभवाचा सखा सोबती,पण रायगड मात्र आब राखुन पाहयचा,मानाचा असावा तसा असामी. राज्याभिषेकानिमीत्ताने जाणे झाले अनेकदा.राज्याभिषेकाला जाणे हि पर्वणी असायची तेंव्हा..( तारीख आणि तीथींचे वाद नाहीत नव्हते,तारीख आणि वेळेचा निरोप यायचा) पण त्यावेळी सगळे लक्ष्यबरोबर असणारे विध्यार्थी-विदयार्थीनींची जबाबदारी, राहाण्याची व्य्वस्था आणि त्याचे टाइमटेबल सांभाळणे यातच लागलेले.त्यातुनही आम्ही दरसालं "राज्याभिषेकाला" जातो हे सांगताना उगाच दो इंच फुगणारी छाती.तो का्ळच नुसत्या उत्साहाचा आणि आनंदाचा असायचा.
r2 .jpg
गड्कोटांचे सामर्थ्य काय? त्याचे सामरिक महत्व कोणते?, असे प्रश्न त्यावे्ळी ना डोक्यात होते ना कृतीत.त्या भरात कित्यक गोष्टी पाहायच्या राहुन जात होत्या हे पुढे कैक वर्षानी परत रायगड्ची यात्रा घडली तेव्हाच कळलं. अर्थात कारण बरोबर भेटलेले दोन भक्कम सांगाति.एक कायम घेउन पारायणं करत बसावं असा "दुर्गभ्रमण गाथा" आणि दुस-याबरोबर कधीही रायगड फिरायला मिळावं असा आणि त्यांनीच डोक्यात नव्याने निर्माण केले,रायगड परत परत पाहायचे खुळ. आप्पांची दुर्गभ्रमण गाथा" खुप पुर्वी वाचली होती पण अगदी अंधुकक्षी आठ्वणारी..दुसरा सांगाती म्हन्जे प्र. के. सर. खर पाहात हे दोन्ही सखे ना एका काळाचे ना जातकुळीचे, एकाने मनात सतत भिनवली डोंगरद-यांवरच प्रेम,आ्णि निसर्गाची जवळीक आणि दुस-याने स्वराज्याच्या मानक-याचे प्रेम,माहीती, आणि दिला त्याच माहीतीला प्रत्यक्ष जाउ्न पड्ताळुन पाहाण्याचा दृष्टीकोन.
अप्पानी पाहीलेला रायगड आणि आजचा रा्यगड यात खरतर खुपच वेगळा असावा असा आहे.अंतर आहे फक्त काळाचं... बाकी सरकारी अनास्था आणि समाजाचा सहज न बदलणा्रा दृष्टीकोन तसाच.. आणि गडावरची माणसं... हा.. हा.. इथे मात्र मि नशी्बवान
गडावरची माणसं अजुनही बदलेली ना्हीत.. आप्पाना तुकाराम बाळु शेडगे,आणि मनी अवकिरकर भेटले. मला पप्पु अवकिरकर, नीलमताई आणि त्याच्या कुटंबानी ओळखीत घेतलं. "ओळ्खीत घेतलं" अशासाठी लिहिलयं नुस्ती ओळख होणं,ओळख दाखवणं वेगळं. मीच काय माझा दंड पण ओळखीचा झालाय सगळ्यांच्या.काही वर्षापुर्वी एकदा काही अवखळ रांडचे (फारशा शिव्या इथे लिहिता येत नाहीत..)गडावर शिवसदनात क्रिकेट खेळात होते,सांगुन ऎकेनात म्हट्लं राजाचा वाडा त्यापरीस माळावर खेळा,तर म्हणे बॉल लांब नाही मारता येत , थोडा वेळ खेळतो.पप्पुला विचारलं तर म्हणाला दादां इथे आम्ही एकटे दुकटे कोण ऎकणार आमचं, मग काढला दंडा आणि दिले एकदोघानं रट्टे, दिले हाकलुन गडावरुन आणि अर्काइववाल्यास सांगितल पुन्ह येतानं दिसले तर रोप वेला सांग निरोप. आहे इथे दोन दिवस मग बघुया.. कसले येतायत परत...असो.
r3 .jpg
रायगड खुपदा पाहीला अजुनही पाहायचा बा्कीच आहे.खुप जणांबरोबर पाहीला्य,सगळ्या ॠतुत पाहीला,दिवस,रात्र अमावास्या पोर्णिमेला, संध्याछायेच्या खेळात पाहीला..
पण आजही रा्यगडला जायच का ? या प्रश्नांच उत्तर कधी निघायचयं ? असंच असतं...
r5 .jpg
आत्ताशा गडाला जाणं होते ते तिथले दगड धोंडे पाहायला.ते ताशीव कडे,तिथले दरवाजे, बुरुज,त्याचे बांधकाम,सामरिक महत्व,त्यामागचा राजाचे विचार आचार आणि त्यातले नियम उमजुन घ्यायला.बरोबर जे असतील त्यानाही ते दाखवायला सांगायला... बाबांनो या राजाने खुप काही मांडून ठेवलयं गडावर तिथे या समजुन घ्या आणि मग मुजरा घालत, त्याचा जयघोष करत परत जा.. उगाच काठ्यांना पटके गुंडाळू आणि नुस्ते शिवगंधाचे आणी चंद्रकोरीचे ठसे कपाळावर मारुन ना रायगड समजेल ना राजा. ना राजाची नीती कळेल, ना सार. नुसता जातीपातींच्या आणि पक्षांच्या बुजबुजाटात तुमचा राजा कधी हरुन जाइल ते कुणालच उमगणारच नाही. r6 .jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users