वृत्तबद्ध कविता - एक तोंडओळख (भाग - २) - अमेय२८०८०७

Submitted by संयोजक on 29 February, 2016 - 12:53

आपण आपल्या विचारांचे भाषेच्या माध्यमातून प्रकटीकरण करत असताना नेहमीच्या स्वाभाविकपणे जे बोलतो ते गद्य, पण तेच विचार जेव्हा लयबद्ध शब्दरचनेमधून प्रकट होतात, तेव्हा त्याला पद्य म्हटले जाते. पद्यात जी विशिष्ट शब्दरचना केली जाते त्याला वृत्ते किंवा छंद असे म्हणतात.

शाळेत असताना आपल्यापैकी सर्वांना अशा विशिष्ट चालीत तालासुरात म्हटलेल्या कविता आठवत असतीलच. पण शाळा सोडून कित्येक वर्षे झाली, आता त्यातले काही आठवत नाहीये अथवा शाळेत शिकताना मराठी हा मुख्य विषय नव्हता, त्यामुळे ह्यातलं काही माहीतच नाही, अशा सर्वांकरता आज आपण करून घेणार आहोत एक तोंडओळख वृत्तबद्ध कवितांशी.

ही ओळख करून दिली आहे सिद्धहस्त कवी व लेखक अमेय२८०८०७ यांनी.

तर मंडळी, सहर्ष सादर करत आहोत, अमेय यांनी खास आपल्यासाठी मौखिक रूपात करून दिलेली वृत्तबद्ध कवितांशी तोंडओळख - भाग २.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users