रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहिती अपडेट :

मालिकेत कोकणाची सकारात्मक बाजू दाखवू - राजू सावंत

यांच्या युनिटचे माजी खासदार निलेश यांना आश्वासन,
येत्या 4 दिवसात घेणार निलेश राणे यांची भेट.

झी मराठी वर सुरु असलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिके बाबत विचारणा करण्यासाठी निलेश राणे यांचे कार्यकर्ते आज चित्रीकरणाच्या ठिकाणी पोहचले हि बाब लक्षात घेऊन दिग्दर्शक राजू सावंत यांच्या युनिटने मालिकेत यापुढे कोकणाची सकारात्मक बाजू दाखवू, असे आश्वासन माजी खासदार निलेश राणे यांना दिले. तसेच येत्या 4 दिवसात हे युनिट निलेश राणे यांची भेट घेऊन मालिकेत पुढील भागात काय असेल हे सांगणार आहेत.
नुकतीच झी मराठी या वाहिनीवर रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत कोकणात कशा पद्धतीने भुताटकी आहे हे दाखवण्यात येत आहे. या अशा मालिकांमुळे कोकणात येणा-या पर्यटकांच्या मनात भीती निर्माण होईल आणि त्याचा परिणाम कोकणातील पर्यटनाला होईल हे लक्षात येताच निलेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चित्रीकरणाच्या ठिकाणी पाठवत चित्रीकरण बंद करण्यास सांगितले मात्र रवी सावंत यांच्या युनिटने त्वरित निलेश राणे यांच्याशी संपर्क साधून आपण मालिकेत यापुढे कोकणाची सकारात्मक बाजू दाखवू, असे आश्वासन दिले. तसेच मालिकेत यापुढे काय दाखवले जाईल याची पूर्वकल्पना देण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.

काय फालतूगिरी लावलेय .third class अ .नी स .यांना ,अनैतिक सम्बन्ध ,भ्रष्टाचार ,खूनखराबा ,कट कारस्थान यांवरच्या मालिका चालतात यामुळे होणारे समाजाचे नुकसान यांना दिसत नाही . (ही मालिका अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी मालिका आहे... या मालिकेतून कोकणची बदनामी केली जात आहे,) म्हणे .मला तर उलट
वाटतय की स्पेशल भूतं बघण्यासाठी म्हणून पर्यटक कोकणात येतील. .

नानबा बरोबर आहे तुमचं, फक्त बाईवर टीका करणं, काम न करता ती गप्पा मारते म्हणून योग्य नाही. तिच्यासह तिच्या नवऱ्याने आणि मुलानेपण मदत करायला हवी, काही कामे असतील तर सहभागी व्हायला हवं. ते रिकामे बसून असतील आणि tp करत असतील टीका त्यांच्यावरही करायला हवी.

कारण अशा वेळी सगळ्यांच्याच मदतीची गरज असते आपापल्यापरीने आणि करतातही बरेच जण, काहीना काही कामे चालूच असतात पुरुषांचीपण.

एकंदरीत एरवी असं काही कारण नसेल तरीही कामात सहभाग घरातील सर्वांचाच हवा आणि तो असतोही.

त्या ठोकळीला इतकं रागवायला काय झालय जर मुलाने अंबोळी, घावण, पोहे खाल्ले तर?

चांगल पौष्टीकच तर खातोय. चेहर्‍यावर एकच भाव असतात तिच्या... एकदमच माठ.

आणि आता राज*** लोकांनी काहीही मुद्दा उचलला आहे का? इतकी कोकणाची चिंता काय...

जिथे तिथे असले मुद्दे काढून कलाकृतींना त्रास आहे. मान्य आहे सिरियल सादरीकरण बोर आहे पण बंद वगैरे कशाला?

सगळ्यात बेस्ट पांडू आहे. मस्त करतो काम. उलट तोच बरं(नोटः बरोबर बोलतोय असे नाही) मालवणी बोलतो.

माका अन्ना दिसलय. त्येंका मी सकाळी चाय दिलय. Proud

तो अगदी आमच्या बॉस सारखाच दिसतो. आणि वाक्य संपताना, असच ते खिदळणं. ... ते कुत्सित असायचं, पण आम्हाला पांडू सारखच वेडा बॉस हास्य वाटायचं. Proud

कालच्या भागात दत्ताचा मुलगा गणेश घरी येतो. तो काळी विद्या वगैरे शिकत असतो. तो घरी तेउन सगळ्यांना सांगतो कि कोणी कुठेही गेलेलं नाही आहे अण्णा इथेच आहेत. तो त्याच्या आज्जीला सांगतो कि ते इथेच आहेत आपल्याला बघत आहेत. तो सांगतो कि घरी ते गेल्यावर जो दिवा लावलेला आहे त्याच्या पिठाखाली १२ दिवसांनी उलट्या पावलांचे ठसे दिसतील. ठोकळीला काल मेल करायचा असतो पण नेटवर्क मिळत नसते म्हणून ती खिडकी उघडते तीच खिडकी जिच्यातून 'ते' झाड दिसत असत. ठोकळा तिला ती बंद करायला सांगतो पण नेहमीप्रमाणे ती ठोकल्याला उडउन लावते. त्यानंतर रात्री ठोकळ्याला कोणाच्यातरी घुसमटण्याचा आवाज येतो. उठून बघतो तर ठोकळी असते तिच्या छातीवर कोणीतरी बसलाय अस तिला वाटत. पण काही विशेष घडल नाही अस दाखवत ती झोपते. (कालच्या भागात गणेश सगळ्यांना सांगतो कि आण्णांच्या मर्जीविरुद्ध जो वागेल त्याच चांगल होणार नाही). हुश्श दमले बाबा मी …

>>>>घरी ते गेल्यावर जो दिवा लावलेला आहे त्याच्या पिठाखाली १२ दिवसांनी उलट्या पावलांचे ठसे दिसतील. <<

हे बरेच जण विश्वास ठेवून करतात.

>>>>घरी ते गेल्यावर जो दिवा लावलेला आहे त्याच्या पिठाखाली १२ दिवसांनी उलट्या पावलांचे ठसे दिसतील. <<

हे बरेच जण विश्वास ठेवून करतात. <<<<< बापरे, असं पण असत का?

असे समज आहेत की, ते ठसे सांगतात की ती व्यक्ति आता कुठे व कधी जन्म घेणार.(इति गावातले भटजीबुवा)

द्त्त्तीचा मुलावर लई जीव. आणि पुर्वा, आत्या, माई ला पण त्याच्याब्द्द्ल आस्था आहे. फक्त द्त्ताला तो काळी विद्या करतो म्ह्णुन आवड्त नाही. तो सतत रेघोट्या ओढ्त अस्तो जमीनीवर..छाया ने छान अभिनय केला काल त्याच्याश बोलताना.
गणेश सगळ्याना सान्गतो अण्णान्ची ईच्छा पुर्ण झाल्याशिवाय त्याना मुक्ती मिळणार नाही.

ईकडे ठोकळी आर्चीस ला बजावते ,गणेश पासुन दुर रहा.

न्यूज अपडेट

Maharashtra Times Mar 2, 2016, 04.00 AM

रात्री चालणाऱ्या खेळावर आंदोलनाचे भूत!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपर्यटनाच्या नकाशावर बहरू लागलेल्या कोकणचा संदर्भ घेऊन सुरू झालेल्या 'रात्रीस खेळ चाले...' या भयमालिकेचा विपरित परिणामहोऊ शकतो, अशी भूमिका घेत कोकणातील काही संघटनांनी या मा​लिकेच्या विरोधात दंड थोपटले आहेत. विशेषतः 'कोकणातली भूता लई वाईट, एकदा का झाड धरल्यानी की सोडनात नाय...' अशा प्रकारच्या वाक्यांमुळे लोकांत कोकणाबद्दलचे गैरसमज वाढीस लागतील,असा आरोपही केला जात आहे. दरम्यान, भास-आभासांचा खेळ असणाऱ्या या मालिकेतून कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा आमचा हेतू नाही, असे झी मराठीचे बिझिनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांनी स्पष्ट केले.कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी सोमवारी चिपळूण पोलिस ठाण्यात या मालिकेच्या विरोधात तक्रार दाखल केली. तर आज, बुधवारी रत्नागिरीत शाहू-फुले-आंबेडकर विचार मंच, राष्ट्र सेवा दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीया परिवर्तनवादी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे, या मालिकेवर कारवाई करण्यात यावी,असे निवेदन देणार आहेत.रत्नागिरीच्या शाहू-फुले-आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यासंदर्भात म्हणाले, 'कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या जवळ नारळी-पोफळीच्या बागांमध्ये असलेल्या मोठ्या वाड्यात राहायचं असतं. अनेक वाडे आणि कोकणी घरं सध्या पर्यटनासाठी दिली जातात. अशा वेळी 'रात्रीस खेळ चाले'सारख्या मालिकेमुळे पर्यटकांच्या मनात भीती निर्माण होऊन ते पुन्हा कोकणाकडे पाठ फिरवू शकतात.'एकूणच अशा प्रकारच्या मालिकांसंदर्भात भूमिका मांडताना अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, 'कोकणातल्या भुताखेतांच्या प्रश्नावर अंनिस गेली अनेक वर्षे काम करीत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी तर 'शोध भुताचा बोध मनाचा' अशी मोहीमचरावबली होती. अर्थात कविकल्पना म्हणून कुणी भुताखेतावर लिहीत असेल, तर विरोध करण्याचं कारण नाही. परंतु भुताखेताच्या नावाखाली कुणाचा छळ होत असेल, तर त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. या मालिकेमुळे समाजात अंधश्रद्धा पसरत असेल, तर नक्कीच विचार करायला हवा.'दरम्यान या मालिकेमुळे पर्यटनावर परिणाम होऊ शकतो, असं सांगत खासदार निलेश राणेयांचे कार्यकर्ते मालिकेचे चित्रिकरण बंद करण्यासाठी गेले होते. परंतु पुढच्या भागात कोकणाची सकारात्मक बाजू दाखवू, असे आश्वासन निर्मात्याने निलेश राणे यांना दिल्यावर कार्यकर्ते मागे फिरले.कथा म्हणून बघा, अस्मिता म्हणून नको!कोकणच्या मातीचा, त्या प्रांताचा आम्हाला अभिमान आहे. भास-आभासांचा खेळ असणाऱ्या या मालिकेतून कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा आमचा हेतू नाही. मालिका जसजशी पुढे सरकेल तशी त्याची नेमकी गोष्ट उलगडत जाईल. भास-आभासांचे असे खेळ यापूर्वीही अनेक कलाकृतींमधून आपण बघितले आहेत. या सगळ्या गोष्टी निव्वळ मानसिक असतात हेही सांगण्याचा प्रयत्न या मालिकेतून होईल.या मालिकेकडे प्रेक्षकांनी कथा म्हणून बघावे, अस्मिता म्हणून नाही एवढेच मी सांगू इच्छितो, असे झी मराठीचे बिझिनेस हेड दीपक राजाध्यक्ष म्हणाले✏

आता मालिका रंगत चालली Happy . कालचा भाग पाहून टरकायला झालं .
माईंच बेअरिन्ग चान्गलं आहे . आवडतात त्या मला .

वाटण्यांमधे आता जमीन २२५ + एकर पाहिजे ना? शेवंता गेल्यावर तिची जमीन परत अण्णांकडे यायला हवी ना? मग २५ एकरच कशी काय?

ती विकून शेवंताने पैसा केला असा उल्लेख वाचला, म्हणून मी विचारलं ना की मग तिची मुलगी अशी का राहते यांच्याकडे.

काळी विद्या वगैरे आली का आता ह्याच्यात, अरेरे.

हा तोच मला प्रश्न पडला की मग ती मुलगी मस्तपैकी एखाद्या दुसऱ्या बंगल्यात वगैरे ऐशोआरामात इस्टेट सांभाळत बसलीय असं हवं होतं. कोणीतरी बळकावले असेल सर्व बहुतेक.

हो हो, त्यापेक्षा एकेक आठवड्याला एकेक स्टोरी असती तर मी बघितली असती शनिवारी तरी. किंवा आता टीका झालीय कोकणातून म्हणून आटोपती पण घेतील.

कालचा भाग त्या मानाने जरा बरा वाटला. लोकांना एक विनंती करावीशी वाटते ती अशी कि ह्या मालिकेला एक मनोरंजन म्हणूनच पाहावे उगी श्रद्धा - अंधश्रद्धेचा भाग बनऊ नये. (एरव्ही सास बहु टाईप मालिका बघताना, मग हि पण तशीच समजा आणि एन्जोय करा )

लोकांना एक विनंती करावीशी वाटते ती अशी कि ह्या मालिकेला एक मनोरंजन म्हणूनच पाहावे उगी श्रद्धा - अंधश्रद्धेचा भाग बनऊ नय

>>> अगदी अगदी, आणि असे असेल तर डिस्क्वरी आणि तत्सम अश्या वेगळ्या आणि हॉण्टेड जागा ई. कितितरी प्रोग्राम्सवर बन्दी आणली का कधीकुणी??

Pages