रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या शिरेलीचा रिपिट टेलीकास्ट दिवसा केव्हा असतो? आमच्याकडे साडे नउनंतर ब्लॅक आउट असतो. काल दिवसभर शोधत होते पण जय-पसंत-कारे-नांदा हेच दिवसभर चालू होते.

सिरिअल मधला सगळा इंटरेस्ट गेलाय.. Sad भिती तर वाटत नाही उलट (हसून-हसून) पोटात मात्र दुखायला लागते Wink
त्यामुळे आता फक्त टायटल साँगपुरतं बघतो.. मग चॅनेल चेंज!

मल कोणी अपडेटस देईल का प्लीज.
मला ही सेरिअल नही पहाता येत. कोणी तरी अपदेटस ताका ना रोज......

कालच्या भागात काहीही खास दाखवलं नव्हत. फक्त ती मुल (आर्चिस, दत्ताची मुलगी आणि तो पांडू ) गाडी घेऊन समान आणायला बाजारात जातात. जायच्या आधीच तो गणेश म्हणजेच दत्ताचा मुलगा म्हणतो 'अडचण येणार' आणि निघून जातो. मग आर्चिस गाडी स्टार्ट करतो पण ती चालू होत नाही. ठोकळा आणि ठोकळी हे पाहत असतात. ठोकळा काय झाल ते बघायला जातो आणि परत एकदा ट्राय करायला सांगतो, (ह्या सगळ्यात background music मस्त दिलय). पण 'खोदा पहाड और निकला चुहा' असं होत, म्हणजेच गाडीच्या (कुठल्याश्या भागात - नाव येत नाही मला त्याच) लाकूड अडकलेल असत. ते काढल्यावर गाडी चालू होते. मग गावचा गुरव येतो ह्यांच्या घरी तयारी बघायला (आणि नसत्या चौकश्या करायला) ह्यांच्या जमिनीचे वाटे होऊन कोणतीतरी एक जमीन देवाच्या जागेत येते, तिकडे म्हणे दर अमावस्या पौर्णिमेला कोंबडे देउक लागता, तर हि जमीन ज्याच्या वाट्याला येईल त्याने हे सगळ करावं, अस सांगतो तसेच देविकाशी लग्न लाऊन देऊ नका म्हणतो कारण ती ह्या घरात यायच्या आधीच आण्णा गेले आणि आता ती परत आली तर ह्या घरातल्या प्रत्येक माणसाची तीच गत होणार, असं म्हणतो. बस, जास्त काही नाही दाखवल.

मोठ्या भांड्यात स्वैंपाक करायचा तर चर खोदतात, कडेने दगड लावुन त्यावर हंडी/तपेले मांडतात. (माझ्यकडे काढलेत पण नेमके आत्ता इथे दाखव॑अयला फोटो नाअहीत... )
चर अशाकरता की लाकडाचे मोठे फाटे/ओंडके लावता येतात. >> लिंबूकाका, आमच्याकडे तरी मोठ्या भांड्यात स्वयंपाक करताना चिर्‍याच्या चुली करतात, त्या मध्ये सहजच मोठी लाकडं लावता येतात.

नाथाने काढलेल्या खड्ड्याची जर चुल करायची झाली तर त्यावर केवढी मोठी भांडी चढवावी लागतील, तेराव्याचं जेवण आजूबाजूच्या गावांना पण घालणारेत का?

आणि चुलीत खड्डा काढणं अशुभ असतं ना. Happy

कालच्या भागात काहीही खास दाखवलं नव्हत. फक्त ती मुल (आर्चिस, दत्ताची मुलगी आणि तो पांडू ) गाडी घेऊन समान आणायला बाजारात जातात. जायच्या आधीच तो गणेश म्हणजेच दत्ताचा मुलगा म्हणतो 'अडचण येणार' आणि निघून जातो. ,>>>>
इथे थोडी दुरुस्ती करतो... जायच्या आधीच तो गणेश म्हणजेच दत्ताचा मुलगा, 'अडचण येणार' सांगून जातो.. जाताना गप गुमानं न जाता गाडीच्या सायलेंसरमध्ये गपचुप लाकूस खुपसून उगीच किडा करुन निघून जातो. Wink =)) =))

पण मुळात चुल बनवण्यासाठी खोदावं का लागतं? जागा सारखी / समतल करून त्यावर मांडतात चुल.. >>>> मोठी लाकडं चुलीत नीट बसण्यासाठी किंवा मोठ्या लाकडांचा अडथळा न होता, भांडे चुलीवर नीट बसण्यासाठी तसेच जळलेल्या लाकडांच्या राखेचा अडथळा नको म्हणून थोडाफार खड्डा खणावाच लागतो पण ज्याप्रमाणे तो कब्रस्तानमध्ये खड्डा खणल्यासारखा खड्डा खणत असतो, त्यावरुन त्यांच्या घरात जत्रेचं गाव-जेवण असावं असं वाटतं! Wink

ज्याप्रमाणे तो कब्रस्तानमध्ये खड्डा खणल्यासारखा खड्डा खणत असतो, >>> Rofl : Rofl
हो बरोबर त्याने ,अभिनय तर असा केलाय जसे काही कबर येणारे आता बाहेर!!!
सुश्मा त्याला म्ह्णते कि आण्णानी ६ वा वाटा माझ्यानावावर केला त्यात माझी काय चुक? कोणी माझ्याशी नीट वागत नाही... तेव्हा तो तीला सान्गतो, थोडा धीर धर , हे सगळे एक दिवस आपणहुन तुझ्याशी बोलतील..

नक्कीच नाथा चे कायतरी गौडबन्गाल आहे!

म्हणजे काल खड्डा वातावरणनिर्मिती. शेवटी डोंगर पोखरून उंदीर नका काढू, विन्तेरेस्तिंग करा सिरीयल आता.

ती सुषमा तर करत नसेल ना, तिच्या आईला मारून, आत्महत्या दाखवली असेल तर बदला. इन जनरल ज्या ज्या लोकांवर संशय जातो ती नंतर निष्पाप दाखवतातना अशा शिरेलीत.

लिम्बुटिम्बु
>>>> कोकणातली भुतं...... या वाक्यामुळे कोकणवासीय चिडला आहे, <<<<<<
कोण म्हणते असे? मिडियावाले? की पेडन्यूजवाले?

माझ्या आसपास राहणार्यांची हीच प्रतिक्रिया आहे . मला वैयक्तिकहि बाब खटकली,
आज वय वर्ष ३३, सिन्धुदुर्गातच राहतो आहे, अद्याप मी 'को़क्णातली भुता' पाहिली ना SSSSSS य...

माझ्या घराबद्दल असे मुद्दाम कोण वाइट बोलत असेल तर मला राग येनारच, आणि यायलाच हवा, 'कोकणातली भुता' एवजी ' हयली भुता' असा शब्द असता तर काहिहि वाटले नसते

आहेत इथे भुत खेत...देवपान, द्रुष्ट काढणे या इथल्या रिति असल्या तरि त्याचा उदोउदो केला जात नाहि. मालिकेतुन त्याच गोस्टिचा मारा आहे.

पुन्हा एकदा ....मालिकेत काय हवं ते दाखवा, पण 'कोकण' या शब्दावर माझा आक्षेप आहे,

आणि हो ''' तुमका पोटांत का दुखुक होय?'''
पोटात दुखत नाय.... पण जरा जळजळताहा

जल्ला येक तो कोंकणं शब्द वापरला तां काय लगिच "कोकंणंद्रोह" झाला असा काय तात्यानूं ? ज्येएन्यूत्ल्या "देशद्रोहा" सारका? Proud

Happy

काल अभिराम, प्रोफेसर भाऊ आणि शास्त्रज्ञ बाई त्याच्या खोलीत बोलत असताना, बाईच्या चेह्र्यावरचे भाव नक्की काय होते..? तिला छद्मीपणे हसाय्च होतं का ती नवरा बरोबर बोलतोय अशा अर्थाने मान हलवत होती..?

नंतर सगळे वाद घालत असताना मग गप्प का बसली होती?

ठोकळी पेक्षा माशाबाला म्हणूयात की. मधुबाला च्या चालीवर.

मी तर अच्छ जी मै हारी चलो मान जाओ ना... या गाण्यात माशाबाला इमॅजिन करतोय. देव आनंद गांगरला असता गूढ अभिनयाने.
समुद्रावर चालत असतानाचा एपिसोड पण भारी होता. रमत गमत चालणं दाखवायचं होतं. पण चालताना पण माशाबाला उड्या मारल्यासारखी होती. त्यामुळे कॅमे-याचे भयाण अँगल्स लावावे लागले. वर लिंक दिलेली आहे सर्व एपिसोडची.

एकंदरीत माशाबालाचा अभिनय हे सुद्धा एक मनोरंजन मूल्य ठरणार शिरेलीचं.

सारखे ठोक्ळीच्या चेह्रर्याचे शॉट का दाखवत होते Uhoh

आणि सगळे वाद घालत असताना द्त्ति गरागरा मान हलवत होती अधुनमधुन :p

Pages