सांग सांग भोलानाथ...

Submitted by प्रज्ञा९ on 2 March, 2016 - 00:48

kavita.png

काल लेकीला भरवताना ही कविता सुचली. आम्ही रोज भोलानाथाचं गाणं म्हणत जेवतो. काल मात्र गाणं म्हणताना मी काहीतरी वेगळं म्हटलंय अशी शंका मला गाणं संपल्यावर आली. ती ३-४ मिनिटं मी बहुधा हरवल्यासारखी झाले असेन, एरवी लक्षात आलंच असतं. मग जरा डोक्याला ताण देऊन आठवायचा प्रयत्न केला. जे आठवलं ते लिहून काढलं. शेवटचे ३-४ शब्द सोडले तर संपूर्ण कविता जशी सुचली तशी आहे, कोणतेही यमक वगैरे संस्कार केलेले नाहीत.
स्वतःच्या नावासकट इमेज करून छापण्याचा सल्ला मिळाला कारण सोशल मिडियात अज्ञात वाचकांकडून काय होईल सांगता येत नाही. म्हणून इमेज आणि टंकलिखित अशा दोन्ही स्वरूपात देतेय.

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय
धरणामध्ये पाणी साचून तहान भागेल काय?

भोलानाथ दुष्काळी दिवस सरतील काय
पावसाच्या थेंबांचा आवाज होईल काय?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातून पाणी आता येईल का रे तीनदा?

भोलानाथ कठीण आहे नियतीचा पेपर
अशा दुष्काळावर आता आहे का रे उत्तर?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

आशूडी, Happy

खरंतर मला समजलंच नाही की मी हे स्वतःच म्हणतेय. असो.

माझ्या काही मैत्रिणी लातूरच्या आहेत. त्या सांगत होत्या की तूरीचं/ बाकी इतरही पीक करपलंय.. घरावर छप्पर आहे ते पत्र्याचं, तर उन्हाळ्यात निभाव कसा लागणार.. घराचं नवीन काही काम/ दुरुस्ती करायची तर शेतीचं उत्पन्न हाताशी नाही.. एकीचे सासरकडचे लोक उन्हाळ्यात पुण्यात यायचं म्हणतायत कारण तिथे पाणीच नाही. महिन्यातून एकदा बोअर चालू केली की अर्धा तास जेमतेम पाणी मिळतं... जित्राबं कशी सांभाळयची वगैरे Sad

हे सगळं ऐकून डोक्यात सतत तेच चित्रं फिरतंय. दुष्काळची तीव्रता खूप जाणवतेय. म्हणून बहुतेक आलं असावं हे!