रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावो हिस्सो सुशमाचो आसा मां ! >> माझं गेस्सींग बरोब्बर आलं Proud

कंटाळुन तीन दिवस बघेतलीच नाही सिरीयल, इथेच अपडेट घेत होते पण आता असं वाटतयं थोडी थोडी खुलतेय कथा. आजपासुन पुन्हा सुरवात करते बघायला.

हाय लोक्स!! मी शनिवार चा भाग मिस्लेला.. आता ईथे अपडेट वाचतेय. धन्स सगळ्याना ईथे अपडेटल्या बद्द्ल!!
सगळयान्चे स्माईली आणि प्रतिसाद मस्तच!!!

सिरियलच्या सुरुवातीलाच एक नोट येते ती कोणी नीट वाचली असेल तर कळेल की ही सिरियल हाॅरर नाहीये तर सस्पेन्स थ्रीलर आहे.
हल्ली वाट्टेल त्या गोष्टींवरुन राडा करायची वृत्ती फोफावत चाललीय हेच खरं.. Sad

भाषेचं खरंच काहीतरी करा.
अण्णी हिरवो चुडो हिरवो चुडो म्हण्ते ते तसंच म्हणतात का मालवणीत? नशीब हिरवो साडो नाही म्हणत.

अगं , हिरवा चुडा म्हणून हिरवो चुडो , जस काळा तवा - काळो तवो Wink
हिरवी साडी - स्त्रिलिन्गी . म्हणून ती हिरवी साडीच Happy

आतापर्यंत हॉरर मालिकेत फक्त एकच मालिका "किले का रहस्य" जबरदस्त आवडली होती (शाळेत/कॉलेजात असताना दूरदर्शनवर रात्री लागायची) >> +१ अगदी लहान होते ही मालिका लागायची तेव्हा... टायटल ट्रॅकच कस्ला खतरनाक होता! म्युझिकनेच तंतरायची!!

रच्याकने कोकणात राहुनही समुद्रात जाता येत नाही म्हणजे खरंच हे नाईक शापितच आहे, >> + ११११ Proud

रच्याकने सुषमा कोण?

भाषेची पार वाट लावलेय मात्र!! Sad

मला एक सान्गा , अण्णान्ची भानगड अण्णा गेल्यावरच अ‍ॅ़क्टीवेट का होते?? सुषमा ला तीचा हक्क मिळावा म्ह्णून लढा देणारे भुत अशी काही स्टोरि तर नाही ना ?

यमी ने यमाला ओवाळले व नंतर एक
स्वीट डिश दिली खाण्या साठी...
यमाने पहिला घास घेतला..व यमी ने विचारले "कसा
झाला आहे पदार्थ"
.
यम म्हणाला.....यम्मी..

दत्तीचं काम एकदम आवडेश, कामाने रापलेली बाई चांगली वठवतेय.>> मला पण ते दत्ता-दत्ती दोघेही आवडतात. तिने फक्त जरा ओव्हरअ‍ॅक्टिन्ग कमी करायला हवी . आणि उच्चारांकडे लक्श द्यायला हवं . माई पण चाण्गल्या वठल्या आहेत. अगदी पूर्वा पण.

आज काय झालं, आज बघायचा प्रयत्न केला पण लक्षात आले की आपल्या एका नातेवाईकांसाठी आज क्राईम पेट्रोल बघायला हवी, म्हणून सोनी channel लावलं.

आज त्यातल्या त्यात interesting शेवटच्या २ मिनिटात
तो गणेश (दत्ताचा मुलगा) घरी येतो, दत्ती रडत रडत त्याला सांगते अण्णा आपल्याला सोडून गेले वगैरे वगैरे, त्यावर तो म्हणतो, कोणीच कुठे गेलं नाही, सगळे इथेच आहेत, अण्णा वाड्यातच आहेत
बाकी सुरुवातीला ६व्या हिश्शावरून भांडणं आणि रडारड

Pages