सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

Submitted by मार्गी on 23 February, 2016 - 09:47

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

"नवीन सायकलने" नवीन सुरुवात

मार्च २०१४ मध्ये सायकल भरपूर चालवली. पण जेव्हा लक्षात आलं की, ह्या वर्षी लदाख़ला सायकलवर जाता येणार नाही, तेव्हा एकदम गॅप पडली. सायकल जणू थांबलीच. मार्चमध्ये सायकल चालवताना एक लय मिळाली होती. एक टेंपो तयार झाला होता आणि अचानक मोठी गॅप पडली. एखाद्या बॅटसमनने मेहनत घेऊन डावाची पायाभरणी करावी आणि अचानक त्याची विकेट जावी तसं! पण घडतं ते असंच असतं. आपल्याला वाटत असतं की, आपण सगळं काही 'करतो', पण प्रत्यक्षात बरंच काही 'होत असतं.' किंबहुना आपल्याला आपण जे 'करतो' असं वाटतं, ते सगळं 'होतच' असतं! त्यामुळे जेव्हा सायकल चालवली गेली नाही, तेव्हा नाही चालवू शकलो. नंतर कित्येक महिन्यांची गॅप पडली व त्या काळात फक्त मे महिन्यात एकदाच सायकलवर फेरी मारली. वळीवाच्या पावसात फिरलो होतो. असो.

ही गॅप एका अर्थाने उपयोगीच पडली. इतक्या विरामामुळे परत एकदा सायकल चालवावी अशी इच्छा तीव्र झाली. हळु हळु इच्छा साठत गेली. मनात एकदा विचार आला की, ही सायकल तर खूप छोटी आहे; अगदी बेसिक आहे. नवीन सायकल घेऊ का? कदाचित ह्या अॅव्हरेज सायकलमुळे (क्रॉस बाईकची सगळ्यात स्वस्त साडे पाच हजारांची ६ X ३ गेअरची सायकल) लांब अंतर जाताना अडचण येत असावी. एकदा वाटल्यानंतर लगेच परभणीतल्या सायकल मित्रांना विचारलं. त्यांनी लगेच सांगितलं, एका मित्राला सेकंड हँड सायकल विकायची आहे. मग अजिबात उशीर केला नाही! त्या मित्रांकडून ती सायकल घेतली. टारगेट फायरफॉक्स ७ X ३ गेअर्स! त्यांनी ती सायकल एका वर्षापूर्वी सेकंड हँडच घेतली होती, म्हणून मी घेतली ती थर्ड हँड झाली! त्यामुळे आणखीनच स्वस्त मिळाली. त्या मित्रांनी तर रेटही सांगितला नाही, तुला वाटेल तो दे म्हणाले. एक रूपया दिला तरी ठेवून घेईन. इतका राजा माणूस! मूळ किंमत पंधरा- सोळा हजार असावी व ती त्यांनी नऊ हजारांना घेतली होती. थर्ड हँड असल्यामुळे मी साडेतीन हजार दिले. अशा 'नवीन सायकलीसोबत' सायकलिंग पुन: सुरू झालं. नवीन सायकलसोबत पंक्चर किट व पंपसुद्धा घेतला.


"नवीन" सायकल!

जूनमध्ये सायकल घेतली. पण तरीही अनेक दिवस फार फिरता आलं नाही. कामानिमित्त प्रवास होत राहिले. त्यामुले गॅप वाढली. जेमतेम मॉर्निंग वॉक म्हणता येईल इतकीच सायकल चालवली. तरीही नवीन आणि 'एडव्हान्स' सायकल चालवण्याची मजा येत होती! मार्चनंतर जुलै आला तरी मोठी राईड झाली नाही. शेवटी ३ जुलैला एकदाची मोठी राईड झाली. परभणीच्या घरापासून राष्ट्रीय महामार्ग २२२ वर 'झिरो फाटा' ह्या जागी जायला निघालो.. मस्त मजा येते आहे. परभणीतले सायकलिस्ट मित्रही सोबत आहेत. पण ते अगदी पुढे पळत आहेत. येतानाचे वीस किलोमीटर एका तासाच्या आत पूर्ण केले व माझा वेगाचा विक्रमही मोडला. आधीच्या सायकलवर कधीही एका तासात वीस किलोमीटर हा मूव्हिंग स्पीड मिळाला नव्हता. नक्कीच हा नवीन सायकलचा फरक आहे. आणि असणारच, कारण ही सायकल बरीच एडव्हान्स आहे, उंच आहे, वजनाने हलकीसुद्धा आहे. माझ्या उंचीचा ह्यात जास्त उपयोग होतोय.


परभणीजवळची पूर्णा नदी

झिरो फाटावर मित्रांसोबत नाश्ता केला. त्यांनी सायकलिंगच्या टिप्सही सांगितल्या. मी ३- ४ गेअर काँबीनेशनवर सायकल चालवली होती. त्यांनी सांगितलं की, २-५ किंवा २-६ जास्त चांगलं राहील. ३-४ मुळे पायांना व गुडघ्याला त्रास होऊ शकतो. सायकल वळवून परत निघालो. लवकरच सगळे जण पुढे गेले. आता खरी ह्या सायकलची मजा कळते आहे. पाय एकदम थकून गेले. येताना केवळ ५७ मिनिटात २० किलोमीटर आलो होतो. रस्ता सपाटच आहे. पण आता अशा फ्लॅट रोडवरही अवस्था वाईट आहे. कशीबशी १५- १६ किलोमीटर वेगाने सायकल चालवतोय. ही सायकल उचलायला हलकी आहे, पण आता चालवताना हेवी वाटते आहे! नक्कीच हे असं इंजिन असणार जे फास्ट पळतं, पण त्याला तितकंच जास्त इंधनही लागतं! आणि माझ्या पायांना तर जुन्या सायकलची सवय आहे. आधी ह्या सायकलची सवय करावी लागेल. शिवाय पहिल्या टप्प्यात सगळे सोबत असल्यामुळे मी माझ्या नैसर्गिक गतीपेक्षाही जास्त गतीने सायकल पळवली. आता परिणाम भोगावा लागतोय. तसाच जात राहिलो. दीड तास लागला घरी पोहचायला. कदाचित आणखीन काही राईडसपर्यंत अशीच अवस्था राहील. बघूया.

 पुढील भाग १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह नवीन सायकल...मज्जाय....झकास चाललाय प्रवास तुमच्याबरोबर आमचाही....

कीप ईट अप

वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

@ आशूचँपजी, धन्यवाद!! Happy तुमची राईड कशी झाली, तुमच्या राईडसच्या लेखनाची वाट बघतोय!

छान.... फोटो मस्तच... Happy

>>>> मी ३- ४ गेअर काँबीनेशनवर सायकल चालवली होती. त्यांनी सांगितलं की, २-५ किंवा २-६ जास्त चांगलं राहील. ३-४ मुळे पायांना व गुडघ्याला त्रास होऊ शकतो. <<<<
एक (कदाचित सिली) प्रश्न......
हे असे कॉम्बिनेशन सांगितले जाते तर ते कसे ओळखायचे की....
पहिला आकडा हा पेडल पासच्या व्हिलचा आहे.... लहान व्हिल १ नम्बरने, मोठे व्हिल चढत्या क्रमाने
तसेच दुसरा आकडा मागिल चाकापासच्या दातेरी चक्रांकरता आहे, लहान व्हील १ ने मोठे चढत्या क्रमाने...
असेच आहे का?
की कसे/?

बाकी मी आजवर पुढे मोठे एकेरी व्हिल (ते देखिल ५२ आट्यांचे) वापरुन चालविली.....
नम्तर पुधे एकेरी ४८ चेही वापरुन बघितले
आता पुढे कैतरी ४२/४४ चे मोठे व दोन उतरती आहेत.
त्यातिलही मधल्या दुसर्या व्हिल वर ठेउन चालविणे दमणूक टाळतय असे लक्षात येतय. Happy

@ लिंबूटिंबू जी, हो काका, असंच आहे. २-५ म्हणजे पेडलजवळचा २ गेअर आणि मागच्या चाकाजवळचा ५ वा गेअर (अर्थात बोलीभाषेतलं वर्णन!)

ओके मार्गी, आता एक छोटा प्रश्न.
पुढिल १ / २ /३ वा मागिल १/२/३/४/५/६ ही चक्रे कोणत्या क्रमाने ओळखली जातात?
म्हणजे सर्वात लहान चक्राला १ की सर्वात मोठ्या चक्राला १ संबोधायचे? थोडक्या चढत्या की उतरत्या क्रमाने मोजायचे?

@ लिंबूटिंबू काका, समोरचा १-२-३ गेअर चढत्या क्रमाने असतो (३ मोठा) आणि मागचे १-२-३-७ हे उतरत्या क्रमाने असतात (७ चा आकार सगळ्यात लहान तर १ चा सगळ्यात मोठा). वापरताना तुम्हांला कळलंच असेल ना.