GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स

Submitted by राहुल on 11 August, 2009 - 15:24
ठिकाण/पत्ता: 
स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी

GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स

स्थळ : स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी

http://www.gatlinburgcabinsonline.com/cabin.asp?property_id=1216&navmont...

Property Management Office Address -
333 Ski Mountain Road
Gatlinburg, TN 37738
Phone : (865) 430-9868

चेक इन : २ ऑक्टोबर, दुपारी ३:०० नंतर
चेक आउट : ४ ऑक्टोबर, सकाळी १०:०० च्या आत.

खालील मायबोलीकरांनी आपली उपस्थीती नक्की केली आहे.

अटलांटामधून व्हॅन करून जाणारे -
१) RJ (२ मोठे + २ छोटे) २ नॉन-व्हेज
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
३) runi (२ मोठे) १ नॉन-व्हेज, १ व्हेज
४) fiona (२ मोठे) **tentative १ व्हेज/नॉन-व्हेज, १ नॉन-व्हेज
५) adm (१ मोठा) १ नॉन-व्हेज
६) Mo (२ मोठे + १ छोटा) २ व्हेज
एकूण : ११ मोठे + ४ छोटे
विनायकच्या घरी ३:०० वाजे पर्यंत जमायचे आहे.
३:३० वाजता स्मोकीजसाठी निघायचे आहे.
अटलांटाहून जाणार्‍यांसाठी एस कार रेंटल कडे एक व्हॅन बूक केली आहे.
https://www.acerentacar.com/resview.aspx?1375579=90440

शिट्टी ते स्मोकीज थेट ड्राईव्ह करून येणारे -
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
८) सुमीत आणि खुशबु २ व्हेज
एकूण : ४ मोठे + १ छोटा
रात्री ९:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.

लाँग आयलंड ते स्मोकीज थेट उडत येणार -
९) सँटी (१ मोठा)
रात्री ११:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.

एकूण : १६ मोठे + ५ छोटे

===============================

शनिवारचा कार्यक्रम -

१. Roaring Fork Motor Nature Trail : हा सिनीक ड्राइव्ह आहे. निसर्गसौंदर्य खूप पहायला मिळेल. इथे मध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थांबता येते. तसेच ह्या रोडवर इतर ट्रेल्सही घेता येतात. उदा.: Grotto Falls ची ट्रेल. सोपी आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येते. मुले एन्जॉय करतात.

२. Clingman's Dome : इथे चढावे लागते. ०.४ माइल्सच आहे पण खूप चढ आहे. हा स्मोकीजमधला सर्वात उंच पॉइंट आहे. वरून खूप सुंदर दिसते असे नेटवर वाचले.

३. Alum Cave : ही ४.६ माइल्सची ट्रेल आहे. थोडी अवघड आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येण्यासारखी आहे की नाही माहीत नाही. बहुतेक नाही. पण सर्वाधिक पॉप्युलर ट्रेल आहे.

४. Cades Cove Loop Road: हा पण ड्राइव्ह आहे. सीनरी मस्त. गर्दी असते. लोक गाड्या मध्येच थांबवून फोटो काढत असतात. चिडचिड होण्याची शक्यता.

५. गॅटलीनबर्ग डाऊन-टाऊन फेरफटका.

रविवारचा कार्यक्रम -

१. Newfound Gap Road : हा सुध्दा ड्राइव्ह आहे. ३३ माइल्स. हा पूर्ण स्मोकी माऊंटन ओलांडून नॉर्थ कॅरोलायनाच्या पश्चिम टोकापर्यंत जातो. इथेही मध्येमध्ये बरेच पॉइंटस आहेत. तसेच Fall Foliage बघण्यासाठी हा ड्राइव्ह प्रसिध्द आहे.

===============================
मेन्यू -

शुक्रवार डिनर : स्मोकीज च्या वाटेवर बाहेर कुठेतरी.
शनिवार ब्रेफा : झटपट ब्रेफा. टोस्ट, बेगल्स, मफीन्स, वै.
शनिवार लंच : पराठे.
शनिवार डिनर : ग्रील (चिकन/व्हेज), मिसळ
रविवार ब्रेफा : पोहे, वै.
===============================

कामाची वाटणी -

सिंडी - मिसळीसाठी मटकी, डिस्पोजेबल
पूर्वा - लहान मुलांसाठी डाळ/तांदूळ, देसी ग्रोसरी (पोहे, फरसाण, पनीर, कोथींबीर, कढीपत्ता, आलं)
आर्जे - बार्बेक्यु तयारी आणि इतर (योगर्ट, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स, वॉटर बॉटल्स), क्लिनींग सप्लाईज
मो - मुलांसाठी फळे (केळी, सफरचंद, वै.), भाज्या (कांदे, बटाटे, शिमला मिरची)

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मो, अभिनंदन....
ईतर कुठल्याही गटग प्रमाणेच ह्याही गटग चा उद्देश फॉल फोलीयेज पहाणे कमी असून जास्तीत जास्त मा.बोलीकरांना भेटणे आहे...त्यामूळे ज्या ज्या मा.बोलीकरांच्या मनात द्विधा वगैरे मनस्थीती असेल त्यानी आता फार विचार न करता येण्याचा निर्णय घेउन टाकावा....अगदी शुक्रवारी रात्री पासुन जॉईन होउ शकत नसाल तर शनिवारी सकाळी/दुपारी जॉईन झालात तरी चालेल....

हे घ्या!!!
एस कार रेंटल कडे दोन (२) वॅन बूक केल्या आहेत.

https://www.acerentacar.com/resview.aspx?1375579=90440
https://www.acerentacar.com/resview.aspx?1374908=90440

हे थोडं वॅन बद्द्ल....
http://www.fordvehicles.com/trucks/eseries/gallery/photos/interior/

आयला बेष्टच रे स्मोकीमध्ये म्हणजे.. ते गॅटलीनबर्ग हे मी बघितलेल्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे रे..

अकरांनो,
गणपती बाप्पा पोचले घरी...आता तयारी GTG ची !!
चला परत जिवंत करा हा बाफ....अजून बरीच ठरवा-ठरवी व्हायची आहे.
आता फक्त १ महिना उरलाय...चला पटापट तुमच्या आयडीया टाका....

१.गेम्स
२.खाणे-पिणे
३.
४.
५.

सहीच. स्मोकीज मध्ये गटग.. नेमका मी देशात परत आल्यावर ठेवताय.. angry.gifनाहीतर मी नक्की आलो असतो..

मजा करा...

मला वाटतं किचन आहे सगळं.फक्त सामान न्यावं लागेल आपल्याला.
शुक्रवार रात्र,शनिवार पूर्ण दिवस आणि रविवार सकाळ ह्याप्रमाणे खाण्याचा विचार करावा लागेल.
अर्थात बाहेर खाणं होईलंच पण मला वाटतं एखाद दुसर्‍या वेळेस कूक करावे लागेल स्पेशली लहान मुलांसाठी.

वा! वा! ... एका संयोजन समितीच काम झालं की दुसरं लगेच चालू. Happy
सिंडी बाय, कॉफी मशिन नसलं तरी, \चहा ची तयारी करून नेता येईल की.
आणि तुमच तळ्यात - मळ्यात कधी संपणार? आता हे ड्राईव्ह करून नक्की का? Proud

>>> ह्याच्या संयोजनाचं बाकीच्यांनी बघा.. आम्ही दमलो आता..
फार तर ह्याच्या जाहिरातींच काम बघु Proud

मधे एका मित्राकडे थांबणार आहोत. आम्हाला इथुन १२ तास लागतात.

आर्जे, \चहा करायचा तर जास्तीचं \काम पडेल. त्यापेक्षा कॉफी सोप्पी.

सिंडी, मी चहा आणि कॉफी दोन्हीवालीही नाही आहे, पण बर्‍याच चहावाल्यांचे पाहीलेय की त्यांच्याकरता कॉफी चहाला सबस्टिट्युट होऊ शकत नाही. Wink
आमच्या मागच्या स्मोकी ट्रिपचे थोडे अनुभव आहेत, आपण त्यापैकी काही गोष्टी करु शकतो. (६ जण होतो आणि ३ रात्रींकरता गेलो होतो)
१. आम्ही चहा/कॉफी पावडर, साखर इ. घेऊन गेलो होतो. तिथे पोहोचताना जवळच्या ग्रोसरी स्टोअर मधून दूध घेतले. आमच्यामध्ये - चहाला पर्याय नाही - ह्या विचाराचे बरेच जण होते. Wink
२. आम्ही इथून निघताना कांदे पोहे, भेळ आणि मिसळ यांचे सामान नेले होते. त्यामुळे ब्रेकफास्ट, स्नॅक इ. घरीच असायचे.
३. इथून मॅरिनेटेड चिकन, पनिर आणि भाज्या इ. आईस बॉक्स मध्ये नेले होते. पहिल्या दिवशीच आमची ग्रिल पेटली होती :).

अर्थात, आम्ही तिथे जास्त दिवस होतो आणि मेन प्लॅन हा भरपूर गप्पा, खाणे आणि मुव्हीज पहाणे हा होता आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे एकही छोटी मंडळी लुडबुड करायला नव्हती :).

मो सहमत..
प्रत्येक मिल (ब्रेफा/लंच्/स्नॅक्स्/डिनर) हे काय करायचं आहे ते ठरवून जे घरी करायचं आहे त्याचं सामान घेऊन जायचं...
आपण शुक्रवारी जाणार आहोत तर शनिवारी केबीन वर डिनर/ ग्रील करू शकतो... त्याची जरा realistic estimates करून सर्व सामानाची यादी (मेन पदार्थ आणि इतर जसे फोडणीचं सामान, भाज्या इ.) बनवू शकतो..
बाकी पोहे, मॅगी ई. सामान २ ब्रेफा साठी घेऊन जाऊ.. अंडी, दुध, आईस्क्रीम, रंपा, अजून मिट हवं असेल तर ते तिथेच घ्यायचं विकत..
शिवाय कॉस्टको, सॅम्स ची मेंबरशिप असेल तर छोट्या चिप्सच्या पाकिटांचं "पोतं" आणि पेप्सी, कोक टिन्स, पाण्याचा बाटल्या ई ची पण तिथून आणायचे.. ते स्वस्त पडतात आणि उरले की परत पण देऊन टाकता येतात..
बाकीचे सप्ल्याईज e.g. पेपर नॅपकिन्स, चमचे, प्लेट्स हे घरचेच आणायचे थोडे थोडे...

माझ्यातल्या ट्रिप ऑर्गनायजर जागा होतोय.. पण मी त्याला परत झोपवतो.. Proud

२ डिनर ( शुक्रवार रात्र + शनिवार रात्र) + २ ब्रंच (शनिवार सकाळ + रविवार सकाळ) एवढी तयारी करावी लागेल
ब्रंच लिहीलय कारण ब्रेकफास्ट + लंच असे दोन वेळा वेगळे करायचे म्हटले तर पहिले संपेपर्यंत दुसर्‍याची वेळ येते
त्याप्रमाणे या चारहीचे आधीच मेनु ठरवले तर तयारीला सोपे पडेल.
तसेच अ‍ॅडम म्हणतोय तशी इतर सामानाची यादी करावी लागेल म्हणजे मग ते आणायला सोपे पडेल.
लहान मुलांसाठी किती वेळा जेवण, दूध, झोप, अजून काय काय चालणार हे त्यांचे पालक ठरवतील. ती एक वेगळी यादी होवु शकेल "मुलांसाठी" अशी.

सिंडे, कॉफी हा चहाला पर्याय होवू शकत नाही. चहा हवाच. Happy

गप्पा + खाणे पिणे + टवाळक्या यासोबतच फॉल कलर्स शोधत हिंडणे हा पण उद्देश आहे. तेव्हा भटकायची तयारी ठेवा. Happy

अरे अरे झोपवू नकोस त्याला. हमे उसकी जरुरत है. Wink
एक ट्रेझरी नॉमिनेट करु ह्या ट्रिप करता. कोणी कोणी काय काय आणलं त्याच्या रिसिट्स ठेवा आणि सगळे कॉमन अकाऊंट मध्ये टा़कू.
बाकी आपले तिथे २ ब्रेकफास्ट, २ लंच आणि २ डिनर होतील, त्या हिशोबानी काय काय बनवायचे हे ठरवू.

ब्रंच लिहीलय कारण ब्रेकफास्ट + लंच असे दोन वेळा वेगळे करायचे म्हटले तर पहिले संपेपर्यंत दुसर्‍याची वेळ येते
>> हे ही खरेच Happy

>>> एक ट्रेझरी नॉमिनेट करु ह्या ट्रिप करता.
मी तयार आहे. आणि केबीनची आगाऊ रक्कम मी आधीच भरली आहे. तेव्हा त्या अकाऊंटमधेच पुढचे खर्च टाकता येतील.

Pages