Fancy dress sathi idea havi aahe

Submitted by saare_ga_ma_pa on 25 February, 2016 - 07:29

शाळेत Fancy Dress आहे तरि कहि सुचवा.
काही तरी नवीन वेगळे करायचे आहे.
थीम कही दिलेली नही आहे.
मोठ्या गटात आहे.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी गणपतीला कर्दळीच्या मोठ्या मोठ्या पानांचा फ्रॉक घरि शिवला होता आणि तो साध्या फ्रॉक वर घातला होता. (फ्रॉक लाच पानं शिवली होती पूर्ण), आणि पेड मत काटो चा मेसेज दिला होता.(आणि हम बेवफा गाण्यातले झिंगलाला हू पाठ करुन घेतले होते पण ऐनवेळी ते म्हटले गेलेच नाही Happy ) दुसरे बक्षीस मिळाले होते.
संपर्क साधल्यास फोटो शेअर करेन.

मी लहानपणी बऱ्याच भूमिका केल्या होत्या. झाशीची राणी, टीचर, भाजीवाली वगैरे commen भूमिका तर केल्याच, पण त्यातली सगळ्यात गाजलेली म्हणजे लक्ष्मी. छोट्या स्टुलाला कार्डपेपरच्या पाकळ्या लावून कमळ केले होते. त्यावर लक्ष्मी सारखी लाल साडी आणि दागिने घातले होते. आणि सोनेरी गोल टिकल्या एकमेकांना जोडून एक कॉइनची वाटेल अशी माळ तयार करुन मुठीत ठेवली होती. डायलॉग म्हणून झाला की माळेचे एक टोक हातातच ठेऊन हात उघडला की नाणी घरंगळायचा भास् व्हायचा. तुम्हाला भूमिका मुलासाठी हवी आहे की मुलिसाठी?

आम्ही एकदा traffic signal केला होता. काळा टीशर्ट आणि पिवळ्या रंगाचा पायजमा घातला होता (traffic signal pole ) आणि टीशर्ट वर एकदम हलके, प्लॅस्टिकचे लाल, पिवळा आणि हिरवा असे बॉल चिकटवले होते आणि काळ्या चार्ट पेपरने दिव्यावरची फ्लॅप केली होती. डोक्यावर डिजीटल डिस्प्ले केला होता किती सेकंद राहिलेत ते दाखवणारा.

traffic signal चं गाणं/कविता म्हणता येईल.

परवा छोटे चॅंपियन का कुठला शो आहे फराह खान चा भौ जज ए त्यात गोलगप्पा मस्त जमला होता. मला वाटत बुट्टी ला त्या रंगाचं कापड लावून तो केला असावा.त्याच्या तोंडी संवाद दिलेत तर हट के होईल. ( लिंक भेटेल तू नळीला)

बाकी काही थीम्सः
१- खंडोबा
२- धनगर व्यक्ती
३- नारळाचे झाड
४- फळांपैकी केळे,सफरचंद वगैरे
५- विमान
६- विंड मिल
यापैकी काही

डीटेक्टीव्ह कसे वाटेल (एक टोपी, खेळण्यातली दुर्बीण, भिन्ग, वही,पेन), सफेद शर्ट, काळी पन्ट, काळे बूट,

हरवत चाललेल सूख शोधायचे सन्वाद द्यायचे..

कर्दळीच्या मोठ्या मोठ्या पानांचा फ्रॉक घरि शिवला होता आणि तो साध्या फ्रॉक वर घातला होता. (फ्रॉक लाच पानं शिवली होती पूर्ण), आणि पेड मत काटो चा मेसेज दिला होता >>> पानं खरी असतील तर हे विसंगतीचं उत्तम उदाहरण म्हणता येइल.

Sure.

मला नवरात्रीच्या वेशभूषेत बरीच बक्षीसे होती. कारण बदललेल्या वेषासाठी कराव्या लागणार्या अभिनयात किंवा नाचात मी सरस ठरायचो.
सातवीत असताना पहिले बक्षीस पहिल्या क्रमांकाचे आलेले ज्यात गुजराती मुलगी बनलेलो.
एका वर्षी लुंगी घालून आणि चेहर्याला काळे फासून मेहमूद बनलेलो. हम काले है तो क्या हुआ दिलवाले है.
एका वर्षी न्यूज पेपरचा बुजगावणे बनलेलो. पेपर बांधायची पद्धत आणि त्यावर दाखवलेल्या बातम्या यातील क्रिएटीव्हिटी मला नंबर मिळवून देईल असे मला वाटलेले. पण नाही आला नंबर. जे जज होते त्यांचा क्रिएटीविटीशी दूरदूरचा संबंध नाही असा निष्कर्श मी काढला होता. तसा मी चिडका होतो बराच. वेशभूषा स्पर्धेत मोठ्या हिरीरीने भाग घ्यायचो आणि काहीतरी हटके वा पर्रफेक्ट करायचे हेच डोक्यात असायचे. पण नंबर नाही आला की मला सहन नाही व्हायचे. एकदा सत्यनारायणाच्या पूजेला स्टेजवर जाऊन वेशभूषा परफॉर्म करायची होती. मी आयत्या वेळी दूरगावाहून आलेलो. अगदी अर्धा पाऊण तासभर आधी. मग काय त्यातूनही भाग घ्यायचाच होता. मग बेवडा बनलो. वेशभूषा बेवड्याला साजेशी जेमतेमच. मग आता स्टेजवर बेवड्याचा अभिनय जो काही करू त्यावरच आपली मदार हे ठाऊक होते. स्वताला असे झोकून दिले की त्या नादात स्टेजवरून खालीच कोसळलो. त्यातही टाळ्या मिळवून गेलो. पण बक्षीस नाही मिळाले. तेव्हाही परीक्षकांना अभिनयातील काही कळत नाही असा निष्कर्श काढला. माझ्या या सवयीला खरे तर वाईट सवयी लेख मालिकेत घ्यायला हरकत नाही. बरेच किस्से आहेत. बघूया...

तुम्हाला भूमिका मुलासाठी हवी आहे की मुलिसाठी? मुलिसाठी

mi_anu, माणिकमोति , गायत्री१३ ,विज्ञानदासू, ऋन्मेऽऽष, स्वप्नाली , राजू, सगळ्यानचे आभार....

मला आधी पसुनच हया गोश्टी नाही जमत. आणि मुलीला नेहमी कही तरि नवीन हवे अस्ते. सो मला जाम तेन्सिओन येते. Sad दोन दिवसा पासुन मे विचार करत होते, कही सुचतच नव्ह्ते. आता थोडे बरे वाटत आहे.
आत तुम्ही सुचवलेल्या आईडीया वर पहाते कय जमते ते.

मला सगल्यच आईडीया खुपच छान वाटत आहेत. पहते कय करयल जमते ते.
मल फोटो सेन्द कराल जमत असेल तर.

Thanks To all, you helped me a lot.....

चेहर्याला काळे फासून मेहमूद बनलेलो.>>> हे मी माझ्या भाच्यासाठी केलं होतं. आणि त्याला 'खयालोमे खयालोमे' असं बोलायला शिकवलेलं पण ऐनवेळी तो बोललाच नाही.

कुठलाही प्राणी देखील करता येईल.. पण ते तसे commen आहे. जोड़ीने भाग घेणे चालत असेल तर ससा-कासव, आजी-आजोबा असे करता येईल. मी आणि माझा छोटा भाऊ एकदा शिवबा आणि जिजाऊ झालो होतो. डायलॉग चमकदार हवे आणि चुनचुणितपणा असला की बक्षीस सहसा मिळतेच.. वेशभूषा स्पर्धेत भाग घेऊन आता बरीच वर्ष झाली, लेटेस्ट काय असते सद्ध्या, ते बघायला हवे..

आमच्याकडे एक छोटा मुलगा पुढारी झाला होता, सूटलेले पोट म्हणून आईने ओढणी/साडी पोटात सदर्याच्या आत घातली होती. त्याचा नंबर येईपर्यंत "पोट" घसरून गुढग्यापर्यंत आले होते..:खोखो:

वेट लिफ्टर

नेहमिच्या वपरातलि ३/४ स्लाक्स + टि शर्ट

लांब काटिला दोन्हि बाजुने पुट्टाचे/थर्माकोल चे वेट्स लावायचे

पहिला फॅन्सी ड्रेस - लिटल सीड
image1.jpg

लाईन होती "आय अ‍ॅम अ लिटल सीड सो मी ग्रो मी"
पंधरा मिनीटांपूर्वी बोलून दाखवलं नी ऐनवेळी स्पर्धेत बाब्या बोललाच नाही! म्हणून पहीला नंबर हुकला.

यावर्षी मात्र मिळाला पहिला नंबर टूथब्रशला Happy
tooth brush.jpg
लाईन्स होत्या "ब्रश यूर टीथ ट्वाईज अ डे
टेक बाथ एव्री डे, वेअर क्ल्नीन क्लोथ्ज, इट गूड फूड, प्ले इन ओपन एअर अँड स्लीप वेल अ‍ॅट नाईट" (गूड हॅबीट्स च्या पाठ असलेल्याच ओळी) ब्रश ने स्वतःच्या अखत्यारीत नसलेले एवढे सगळे चांगले चांगले उपदेशाचे डोस दिले तर काय बिशाद नंबर न मिळण्याची Proud

असो नंबर साठी नाही पण करताना मात्र मजा आली!! आमचीही कलाकारी आणि हाथ की सफाई थोडी Wink

१. सोप्पा विषय निवडावा. ज्यावर बोलायला मुलालाही जड पडू नये व तयारी करताना आपल्यलाही
२. अर्णवच्या शाळेत ड्रेसवरची मेहनत बघतात. (रेडीमेड ड्रेस घालून पाठवले तर काय फायदा म्हणून!)
३. जेवढा युनिक ड्रेस व टॉपिक असेल तेवढा नंबर मिळण्याचा चान्स जास्त! मजा ही येते डोकं लढवताना.
४. मेसेज (सोशल/जेनेरिक) देता आला पाहीजे.

बर्‍याच जणांनी फळांची टोकरी, भाज्यांची टोकरी, मोबाईल, पाणी वाचवा, मुली वाचवा, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट, पॉपकॉर्न, पायनॅपल, ग्रेप्स, असे छान छान ड्रेसेस केलेले.

grapes banwa, kale fuge fugwoon tychi mala karaychi and body
bhovati gundalychi

कार्डबोर्ड किन्वा पुठ्ठा वापरुन मोबाईल किंवा टॅब बनवा.

त्यावर समोर नॉर्मल डिसप्ले आणि मागे मस्त नक्षिकाम करता येईल.

हा फॅन्सी ड्रेस करा असा मी अजिबात सल्ला देणार नाही पण अनेक वर्षापुर्वी आमच्या कॉलनीत दोन मुलींनी हा प्रकार केला होता. त्यांना बक्षीसही मिळाले होते. आणि आज जवळजवळ ४० वर्षानंतरही तो माझ्या लक्षात आहे.

दोन मुलींनी शेजारी शेजारी उभे राहून समोर एक चादर ताणून धरली होती. एका मुलीचे मानेपासून खालचे शरीर चादरीच्या पुढे आणि डोके, चादरीला छिद्र पाडून चादरीच्या मागे. तर दुसर्‍या मुलीचे फक्त डोके पुढे. धड असलेल्या मुलीच्या हातात उभारलेली तलवार. हॉरीबल दृष्य होते ते. नशीब चादरीवर लाल रंग टाकला नव्हता.

आणि त्याचवर्षी एका लहान मुलाने डोलणारी बाहुली केली होती. त्याला एका गोल बुडाच्या घमेल्यात बसवले होते आणि घमेल्यासकट त्याला लाल ड्रेस घातला होता. पुर्वी अश्या गोल बुडाच्या बाहुल्या मिळत. त्यालाही बक्षीस मिळाले होते.